Submitted by हसरी on 3 February, 2010 - 23:00
उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?
अशा दुर्लभ 'नरदेहाचे' स्तवन
अशा दुर्लभ 'नरदेहाचे' स्तवन करताना श्रीसमर्थ म्हणतात...
धन्य धन्य हा नरदेहो| येथील अपूर्वता पाहो |
जो जो कीजे परमार्थलाहो| तो तो पावे सिद्धीतें ||श्री दासबोध १.९.१||
परमार्थाकरीता जे जे म्हणून करावे... ते ते सर्व सिद्धीला जाण्याची अपूर्वता याच 'नरदेहात' आहे.
पशुदेहीं नाहीं गती| ऐसे सर्वत्र बोलती |
म्हणौन नरदेहींच प्राप्ती| परलोकाची ||२१||
परलोक प्राप्ती याच नरदेहाने होते... पशुच्या देहाने गती मिळत नाही.
म्हणौनी नरदेह श्रेष्ठ| नाना देहांमध्यें वरिष्ठ |
जयाचेनि चुके आरिष्ट| येमयातनेचें ||२४||
म्हणूनच नरदेह.. सर्व देहात श्रेष्ठ आहे... कारण या देहाचा उपयोग करून यमयातना चुकूवता येतात.
इतकें हें नस्तां वेंग| नरदेह आणी सकळ सांग |
तेणें धरावा परमार्थमार्ग| लागवेगें ||३२||
हे साधण्यासाठी... या परमार्थमार्गाला वेगाने लागावे.
सांग नरदेह जोडलें| आणी परमार्थबुद्धि विसर्ले |
तें मूर्ख कैसें भ्रमलें| मायाजाळीं ||३३||
पण हा दुर्लभ असणार 'नरदेह' मिळूनही.. जर ही परमार्थ साधणारी बुद्धि लाभली नाही.. तीचा मायेमूळे विसर पडला...तर मात्र देहबुद्धी वाढते. ही देहबुद्धी कशी असते याचे वर्णन श्रीसमर्थ पुढे करतात.
धन्यवाद!
सावट _/\_ तुम्ही विचारलेल्या
सावट _/\_
तुम्ही विचारलेल्या प्रश्नांपैकी थोडे उत्तर श्रीगुरुंचे स्मरण करुन देतेय. इदं न मम | इदं गुरुदत्तस्य ||
'भर्गलोक' म्हणजे काय? (आणि तत्सम प्रश्न) >>>
मृत्युनंतर जेव्हा मानवाचे प्राण, मन ह्यांचा लिंगदेह घेऊन जीवात्मा परत जन्मेपर्यंत परमात्म्याच्या विशाल परमेश्वरी मनात निवास करतो व तेथेच त्याच्या पूर्वकर्मानुसार ते परमेश्वरी मन उचित संस्कार करते. ह्या सर्व विश्वरचनेचे / परमेश्वरी मनाचे अध्यात्मानुसार सात स्तर आहेत . सगळ्यात खालच्या म्हणजे भूलोकातील प्रत्येक मानवाकडे (अगदी पाप्याकडेही) तरल अवस्थेतील 'परमेश्वरी मन' असते.
ह्याच्या लगत असणारा 'अंतरीक्ष' स्तर. ह्याचा स्वामी 'ब्रह्मदेव' आहे. भक्ती, कर्म, ज्ञान वा योग ह्यापैकी कुठलाही मार्ग न स्वीकारता, अनीतिनेच आचरण केलेला 'जीव' मृत्युनंतर ह्या स्तरावर रहातो आणि येथून लगेचच परत भूलोकी आपले प्रारब्ध भोगण्यासाठी जन्म घेतो. येथे परमेश्वरी मन त्याला जास्तीतजास्त शुद्धता, पावित्र्य व सत्य याची ओळख करुन देते व सोबत पुढच्या जन्मात घेऊन जायचे गाठोडेही देते. म्हणूनच ब्रह्मदेवास 'विधिलिखित लिहिणारा' असे म्हणतात.
अंतरीक्षाच्या वरचा स्तर 'तपलोक'. जीवनात ज्ञानमार्ग किंवा योगमार्गाने प्रवास केलेले व नीतिने वागण्याचा प्रयत्न केलेले जीव, मग भले ते अश्रद्ध असले तरी ह्या तपलोकात मृत्युनंतर येऊन पोहोचतात. शंकर हा ह्या लोकाचा स्वामी आहे. ह्या तपलोकात काही काळपर्यंत ह्या लिंगदेहांना विश्रांती व अधिक ज्ञान दिले जाते व मग प्रेमाची ओळख करुन देऊनच त्यांना भूलोकी जन्म दिला जातो.
तपलोकाच्या वर असणारा परमेश्वरी मनाचा स्तर म्हणजे 'यज्ञलोक'. ह्याचा स्वामी विष्णू आहे. भक्तिमार्गी व कर्ममार्गी जीव मृत्यूनंतर ह्या लोकी प्रवेश करतात. त्यांना अधिक प्रगतीसाठी ज्ञानसामर्थ्य देऊन मगच त्यांना भूलोकी जन्म दिला जातो.
तपलोकात शांतीचा व शिस्तीचा अनुभव येतो तर यज्ञलोकात शांती व सौख्याचा अनुभव येतो. ह्या वरचा स्तर म्हणजे 'ओज लोक'. ह्या लोकी फक्त पूर्ण नीतिमान, कृतिशील, मर्यादामार्गीय भक्तच फक्त येऊन पोहोचू शकतो. ह्या लोकाचा स्वामी 'श्री हनुमंत' आहेत. ते येथे येऊन पोहोचलेल्या उच्च दर्जाच्या जीवात्म्यांना भरभरून ओज देत रहातात व पुढील जन्मात जास्तीतजास्त सुंदर प्रपंच व सुंदर परमार्थ करण्यासाठी पात्र बनवतात. येथे तपस्वी व संतांच्या सान्निध्यात रहाण्यास मिळाल्यामुळे आपोआपच तो जीवात्मा अधिकच तेजःपुंज होऊन पुढील प्रवास सुरु करतो.
त्यावरील स्तर म्हणजेच भर्गलोक, परमेश्वरी मनाची परमोत्कट अशी सुंदर अवस्था. ह्या लोकाचा स्वामी परमात्मा / महाविष्णू / परमशिव. तो त्याच्या आल्हादिनी शक्तीसह व शेषभावासह तेथेच राहतो. ह्या लोकात 'सामिप्य' प्राप्त केलेल्या भक्तश्रेष्ठासच प्रवेश मिळतो. हेच ते खरेखुरे गोकूळ. परत जन्म फक्त प्रमात्म्याच्या बरोबर त्याची सेवा करण्यासाठी किंवा त्याच्या अवतरणाशिवाय त्याच्याच इच्छेने त्याचे कार्य करण्यासाठीच घेतला जातो. उदा. चोखामेळा, एकनाथ, तुकाराम वगैरे संतमंडळी (भारताबाहेरही या तोडीची संतमंडळी असतीलच).
भर्गलोकापलिकडे आहे ते 'परमपद'. याला अ-मन अशी ब्रह्मावस्था मानतात. मोक्षाची इच्छा धरून त्यानुसार कर्म करुन पूर्ण निष्काम व शुद्ध होऊन जो मोक्ष प्राप्त करतो तो जीवत्त्मा ह्या अवस्थेत विरघळून जातो, त्याचे सर्व अस्तित्वच संपते. म्हणूनच सर्व संतांनी ह्या मोक्षाला नाही म्हटले असून ज्ञानोत्तर भक्तीची म्हणजेच आत्मनिवेदनोत्तर 'सामिप्याचीच' (सख्यत्व आणि दास्यत्व) ओढ धरली आहे.
हेचि दान देगा देवा | तुझा विसर न व्हावा ||
गुण गाईन आवडी | हेचि माझी सर्व जोडी ||
नलगे मुक्ति आणि संपदा | संतसंग देई सदा ||
तुका म्हणे गर्भवासी | सुखे घालावे आम्हासी ||
धन्यवाद अश्विनी, छान विचार
धन्यवाद अश्विनी, छान विचार मांडले आहेत.
.....................................................................................................
जगद्गुरु श्रीसंत श्रीसद्गुरु तुकाराममहाराजांचा अजून एक अभंग पाहूयात...
विषयाचें सुख एथें वाटे गोड | पुढें अवघड यमदंड || १ ||
मारिती तोडिती झोडिती निष्ठूर | यमाचे किंकर बहुसाल || ध्रु. ||
असिपत्रीं तरुवरखैराचे विंगळ | निघतील ज्वाळ तेलपाकीं || २ ||
तप्तभूमीवरि लोळविती पाहीं | अग्निस्तंभ बाही कवळविती || ३ ||
म्हणऊनि तुका येतो काकुलती | पुरे आतां योनी गर्भवास || ४ ||
या अभंगात श्रीमहाराज देवास काकुळतीला येऊन मागणे मागत आहेत की,याच्या पुढे.. आता 'गर्भवास' नको...पुरे झाला. तर अजून एका अभंगात म्हणतात...
हेचि दान देगा देवा | तुझा विसर न व्हावा ||
गुण गाईन आवडी | हेचि माझी सर्व जोडी ||
नलगे मुक्ति आणि संपदा | संतसंग देई सदा ||
तुका म्हणे गर्भवासी | सुखे घालावे आम्हासी ||
देवा मला सुखाने गर्भवासी घाल... !
अशा दोन परस्परविरोधी भासणारे 'भाव' दर्शवून महाराजांना नक्की काय सांगायचे आहे? श्रीसंत नेहमी 'सत्य'च सांगत असतात. हे सांगणे एकच आहे .... हे तर निर्विवाद आहे.... उलट एक नाही असे म्हणणे म्हणजे श्रीसंतवचनावर 'संशय' व्यक्त करण्यासारखे आहे. हे 'पाप' आहे.
पण यात अजून एक भाग आहे. संशय व्यक्त करणे चुकीचे आहे अशी मनाची समजूत पटल्यामूळे(भितीने..आदराने.. श्रद्धेने).. आपण सगळे एकच आहे असे म्हणताना म्हणतो.. पण आपल्याला एक कसे काय? असे विचारले तर सांगता येईलच असे नाही... कारण तसा अनुभव आलेला नसतो. आणि अनुभवाशिवाय असे म्हणने(मूळ अभंग) शास्त्रदृष्ट्या 'सत्य' असले तरिही.. त्याच्या अनुभव आल्याशिवाय त्या व्यक्तीला त्याचा फायदा होईलच असे म्हणता येत नाही. ( फायदा म्हणजे काय? हे ही समजावून घ्यायला पाहीजे.)
परमार्थात मार्गातील 'अनुभव' हा कायम एकपणाचाच असतो, दोनपणाचा नाही ! श्रीभगवंताविषयीचा 'भोळा भाव' आणि 'शुद्ध भाव' यात कमालीचा फरक आहे. भाव 'शुद्ध' असेल तरच अनुभव येईल. "'अज्ञानात' सुख असते", हे परमार्थात खरे नाही. उलट सर्व संत सांगतात... खरे सुख(सुखाचे सुख..परमसुख) हे भाव शुद्ध असेल तरच... आत्मज्ञानं झाल्यानंतरच... प्रकटते... त्याच्या अगोदर, अज्ञानात कधीही नाही.
म्हणून 'चित्तशुद्धी करणे..होणे' हे 'प्रधान' कार्य आहे... तेही याच जन्मात...! मेल्यानंतरचा जन्म पाहीलाय कुणी? आहे तोच जन्म... का आहे? हे जिवंतपणी कळत नाही. आणि अशा अज्ञानातच मृत्यू आला तर.. मेल्यानंतर भले कसे काय होईल? जे जिंवतपणी झाले नाही, ते मेल्यावर कसे होईल??जे आडात नाही ते पोहर्यात कसे काय येईल? ही विचारकरण्यासारखी गोष्ट आहे.
धन्यवाद!
विषयाचें सुख एथें वाटे गोड |
विषयाचें सुख एथें वाटे गोड | पुढें अवघड यमदंड || १ ||
मारिती तोडिती झोडिती निष्ठूर | यमाचे किंकर बहुसाल || ध्रु. ||
असिपत्रीं तरुवरखैराचे विंगळ | निघतील ज्वाळ तेलपाकीं || २ ||
तप्तभूमीवरि लोळविती पाहीं | अग्निस्तंभ बाही कवळविती || ३ ||
म्हणऊनि तुका येतो काकुलती | पुरे आतां योनी गर्भवास || ४ ||
>>>> या अभंगातील मनुष्याच्या अवस्थेचं कारण प्रारब्ध हे असावे. हे प्रारब्ध केवळ विषयांच्या सुखातच वेळेचा अपव्यव केल्याने आणि श्रेयस न निवडता आल्याने निर्माण झालेले. आणि योनी गर्भवास हा शब्द प्रारब्धवशाने आलेला जन्म या अर्थाने असावा. म्हणजेच तुकाराम महाराज असा जन्म नको असं म्हणत असावेत.
या उलट,
हेचि दान देगा देवा | तुझा विसर न व्हावा ||
गुण गाईन आवडी | हेचि माझी सर्व जोडी ||
नलगे मुक्ति आणि संपदा | संतसंग देई सदा ||
तुका म्हणे गर्भवासी | सुखे घालावे आम्हासी ||
>>>
पहिल्या तीन ओळीत विषयांच्या विरोधी मागणं मागितलंय. मोक्ष न मागता, विठ्ठलाच्याच इच्छेने येणार असेल तर पुन्हा आनंदाने जन्म घ्यायची तयारी शुद्ध भावाने केलीय.
दोन्ही अभंगांमध्ये मागणं एकच आहे. १) प्रारब्धवश जन्म नको २) जन्म मिळणारच असेल तर तो तुझ्या इच्छेनेच मिळूदे. "प्रारब्ध भोगण्यासाठी" हा रिमार्क ह्या डिस्पॅचवर नको.
याच जन्मी, अगदी आत्मज्ञान नाही होऊ शकलं तरी भगवंत आणि आपल्यातलं अंतर जितकं कमी करता येईल तितकं करण्याचा प्रयास तर नक्कीच करता येईल. सुरुवातीला भोळा भाव असेलही, जो कुठल्या अडचणीतून सोडवू शकेल अशा एका शक्तीकडे आशेने पाहिल्याने आला असेल किंवा संतसमागम मिळाल्याने/गुणसंकिर्तन ऐकल्याने आला असेल. पण इथेच बीज रुजू शकते शुद्ध भावाचे. जिवंतपणीच मनुष्य त्या त्या लोकात प्रवेश मिळायचे क्वालिफिकेशन मिळवून ठेवत असेल परंतु देहाच्या बंधनांमुळे ते सगळे भौतिक पातळीवरच दिसत असेल (आहार विहार आचार विचारांमध्ये फरक पडलेला दिसून येतो). म्हणून तर म्हणतात ना, भौतिक दृष्ट्या, वरवर काहिही दिसले तरी त्या व्यक्तीची अध्यात्मिक पातळी जोखण्याची आपली कुवत नसते. कोण कुठल्या पायरीवर आधिपासूनच उभा आहे हे फक्त भगवंतालाच कळते कारण प्रत्येकाची रांगच वेगळी असते.
कायतरीच लिहितेय का मी?
अश्विनी, व्वा... छान.. सुंदर!
अश्विनी,
व्वा... छान.. सुंदर!
>>>पहिल्या तीन ओळीत विषयांच्या विरोधी मागणं मागितलंय. मोक्ष न मागता, विठ्ठलाच्याच इच्छेने येणार असेल तर पुन्हा आनंदाने जन्म घ्यायची तयारी शुद्ध भावाने केलीय.
श्रीमहाराजांची मूळ इच्छा काय आहे? (श्रीविठ्ठलांची इच्छा नाही विचारत!:) )श्रीमहाराज श्रीभगवंताना सांगत आहेत की तुझ्या सुखासाठी... तू म्हणतो आहेस म्हणून आम्ही परत 'गर्भवास' भोगावयास तयार आहोत... पण....
>>>दोन्ही अभंगांमध्ये मागणं एकच आहे. १) प्रारब्धवश जन्म नको २) जन्म मिळणारच असेल तर तो तुझ्या इच्छेनेच मिळूदे. "प्रारब्ध भोगण्यासाठी" हा रिमार्क ह्या डिस्पॅचवर नको.
आपल्या प्रिय भक्तास...परत जन्मास घालण्याची इच्छा श्रीभगवंताची आहे. मग नवा जन्म घ्यायचा तर 'प्रारब्ध' पाहीजेच ना! श्रीभगवंताचाच तसा नियम आहे. प्रारब्धसंपताक्षणी देह आपोआप पडतो आणि नवीन प्रारब्ध नसेल तर परत जन्म घेता येत नाही. मग हे प्रारब्ध येते कोठून? प्रारब्ध आहे असे म्हणावे.. तर बंधन आहे... प्रारब्ध नाही असे म्हणावे तर जन्म घेता येत नाही... आणि संत तर नीत्य-मुक्त असतात.
धन्यवाद!
याचा ’योगपर’ अर्थ ही
याचा ’योगपर’ अर्थ ही पहाण्यासारखा आहे. >> सावट, तो पण लिहा ना.
जन्माचे भय वाटते कारण जन्म म्हटला की त्याबरोबर दु:ख हे आलेच. म्हणून पहिल्या अभंगात तुकाराम महाराज जन्म नको म्हणताहेत.
पण जेंव्हा सगळ्या दुंखांचे मूळ असा तो काम (वासना) पूर्णपणे नष्ट होतो तेंव्हा पदोपदी, क्षणोक्षणी आनंदच अनुभवायला येतो. मग जन्माला यायचे भय पण संपतआणि म्हणूनच हा आनंदच सदोदीत रहाणार असेल तर मला कितीही वेळेला जन्माला घाल असे महाराज दुसर्या अभंगात म्हणत आहेत. द्वैत संपलय, स्वत:ची खरी ओळख पटली आहे पण ज्या सगुणाच्या मार्गापरून आलो तो मार्ग पण किती आनंददायी होता. आणि त्याच कृतज्ञेतून महाराजांनी परमेश्वर अशी दुसरी वस्तू (object) कल्पून त्याला उद्देशून हे लिहीलय.
@ अश्विनी >> "प्रारब्ध भोगण्यासाठी" हा रिमार्क ह्या डिस्पॅचवर नको. >> हे निव्वळ अप्रतिम आहे.
माधव, >>>जन्माचे भय वाटते
माधव,
>>>जन्माचे भय वाटते कारण जन्म म्हटला की त्याबरोबर दु:ख हे आलेच. म्हणून पहिल्या अभंगात तुकाराम महाराज जन्म नको म्हणताहेत.
माधव, तुम्हीं मागे चार लक्ष मनुष्य जन्म कसे काय? असा प्रश्न विचारला होतात. त्याचे उत्तर मिळते का पाहूयात.
जन्म म्हटला की .... नुसतेच दु:ख न म्हणता... 'सुख आणि दु:ख' याचे मिश्रण असते. या मिश्रणानुसार जीव चार गतीत... जन्म-मरण असा फिरत रहातो. या चार गती(देह) म्हणजे... देव(स्वर्ग), नरक, नर आणि पशु-पक्षादी... वृक्षादी.. तिर्यक गती. या चार वेगवेगळ्या गतीला जसे 'पाप' जबाबदार असते.. तसेच कर्त्याभावनेने..कर्मफळाच्या आशेने केलेले 'पुण्य' ही जबाबदार असते.
या मिश्रणात जर पाप-पुण्य सम असेल तर 'नरगती' मिळते. पापाच अधिक्य असेल तर 'नरक किंवा तिर्यक गती' मिळते... आणि महत्त्वाचे म्हणजे पुण्याचे अधिक्य असेल तर 'देवगती' मिळते. या गती कोणत्याही असल्या तरीहि मृत्यू(देह-प्रारब्ध) अटळ आहे.. हे लक्षात घेण्यासारखे आहे.
श्रीसमर्थांनी या चार गतीची विभागणी ८४ लक्ष योनीत करताना... देव,नर आणि नरक गती ४ लक्ष मनुष्ययोनीत... शास्त्रानुसार केली आहे. उदाहरणार्थ पहायचे झाल्यास... देवांचे राजेपद भोगणारा... इंद्रपदावरचा हक्कदार हा प्रगत(सात्विक) अवस्थेतला मनुष्यच आहे... पण असे असतानाही 'जन्म आणि मृत्यू', या चक्राआतलाच आहे... प्रगत आहे म्हणून..बाहेरचा नाही... हे लक्षात घ्यायला हवे.
तुमचा दुसरा मुद्दा... ८४ लक्ष योनींचा. नरजन्मातील मृत्यू नंतर परत ८४ लक्ष फेरे मारावे लागतात का? शास्त्रानुसार... 'नरयोनी' हीच मूळात ८४लक्ष फेर्यांच्या शेवटी मिळते... इथे डार्विनची उत्क्रांती लागू व्हायला हरकत नाही.
पण नुसतीच प्रगती(उत्क्रांती) नाही, तर अधोगती ही शक्य आहे... हे उत्क्रांतीच्या विरुद्ध आहे.
थोडक्यात सांगायचे तर... गती कोणतेही असो... परत 'नरजन्म' यावाच लागेल. हा जन्म म्हणजे पुढची गती ठरविणारे जंक्शन आहे.... आणि गतीहीन अवस्था प्राप्त करणे हे या जन्माचे 'लक्ष्य' आहे.... अन्य कोणतेही नाही.
धन्यवाद!
अश्वीनी के, कायतरीच लिहितेय
अश्वीनी के,
कायतरीच लिहितेय का मी? छे छे. संतांचे अभंग काही वेळा संभ्रम निर्माण करतात. पण या दोन्ही अभंगाचे योग्य विश्लेषण आपण केले आहे.
प.पू.श्रीतुकाराम महाराजांचा
प.पू.श्रीतुकाराम महाराजांचा अजून एक अभंग पाहू...
नको काही पडों ग्रंथाचे भरीं | शीघ्र व्रत करीं हे चि एक || १ ||
देवाचिये चाडे आळवावें देवा | ओस देहभावा पाडोनिया || ध्रु. ||
साधने घालिती काळाचिये मुखी | गर्भवास सेकीं न चुकती || २ ||
उधाराचा मोक्ष होय नव्हे ऐसा | पतनासी इच्छा आवश्यक || ३ ||
रोकडी पातली अंगसंगे जरा | आतां उजगरा कोठवरि || ४ ||
तुका म्हणे घाली नामासाठी उडी | पांडुरंग थडी पाववील || ५ ||
'मोक्ष' म्हणजे काय ? आणि श्रीसंतानी त्याकरिता काय केले.. काय करावयास सांगितले? इ. अमूल्य उपदेश श्रीमहाराज करत आहेत.
श्रीमहाराज म्हणतात... अनेक ग्रंथाचे नुसतेच 'वाचन' करीत बसू नकोस. नुसत्या वाचनाने तुझ्या अंगी वाचलेल्या शब्दज्ञानाचा 'अहंकार' निर्माण होईल... आणि तोच अहंकार परत तुला काळाच्या जबड्यात जबरदस्तीने अडकवेल.. ब्रह्मराक्षसासम तूझी स्थिती होईल.
त्यापेक्षा... असे करण्या ऐवजी.. तू एक 'व्रत' अतिशय तत्परतेने का अंगिकारत नाहीस..ते म्हणजे तू तुझा 'देहभाव'... देहबुद्धी ओस पाडण्यासाठी.. देवाकरीताच.. देवाच्या आवडीने देवालाच का आळवत नाहीस?
असे नाही केले तर काय होईल? हे सांगताना श्रीमहाराज म्हणतात....
अरे.. देहभावात असताना.. जर देहभावासहीत असलेल्या श्रद्धेने, तू जर ना ना साधने करावयास जाशील तर.. तुझा देहभाव कमी न होता वाढतच जाईल हे तुझ्या लक्षात कसे येत नाही? आणि मग तुझा गर्भवास असा काय चुकेल?
जर तू उधारीच्या.. मेल्यानंतर मिळणार्या..किंवा आता नाहीतर पुढच्या जन्मात मिळेल.. अशा आशेने उधारीवर... उद्यावर टाकलेल्या मोक्षाच्या इच्छेने जर साधना करशील.. तर तूझ्या देहभावाचे पतन कसे होईल? आणि मग या 'देह'भावात असताना... जर मृत्यू आला तर हा देहाला चिकटलेला भाव... परत तुला नवीन 'देहच' धारण करावयास लावेल... जसा भाव.. तसा देव.. तसा देह..असेच होते.
जर तुला 'रोकडा' आत्मसाक्षात्कार पाहीजे असेल... याची देही याची डोळा... स्वतःच्या मोक्षाचा सोहळा जिवंतपणीच अनुभवायचा असेल, जर आत्मभावात जायचे असेल, तर एकच सहज साधन आहे.. केवळ देवासाठीच देवाला आळव.. त्याच्या अखंड स्मरणाची इच्छा धरूनच त्याचे स्मरणकर. असे जर केलेस.. तर त्या श्रीपांडुरंगाची 'कृपा' होइल... आणि मगच तुला देहभावातून.. आत्मभावात जाता येईल.
त्याच्या कृपेशिवाय.. ती संपादन केल्याशिवाय.. त्याच्या प्रेमाशिवाय केलेल्या साधनांचा उपयोग, श्रीसंतांच्या रोकड्या मोक्षासाठी होणार नाही.
धन्यवाद!
खूप सुंदर
खूप सुंदर
छान संत सावटा (माळी)
छान संत सावटा (माळी)
सावट, खूप छान उलगडून सांगितले
सावट, खूप छान उलगडून सांगितले आहे.
'८४ लक्ष' बद्दल अजून एक शंका - तुम्ही मनुष्यजन्माला 'जंक्शन' म्हटले आहे. तिथून वर देवयोनीकडे जाता येते आणि खाली तिर्यकयोनीकडे! पण मुक्तीकरता मनुष्यजन्म आवश्यक आहे. म्हणजे एखाद्या पशूला मुक्ती मिळवण्याकरता मनुष्यजन्म मिळवणे आणि त्याकरता पापापेक्षा जास्त पुण्य करणे गरजेचे आहे.
२१ व्या पानावर हसरी यांच्या प्रश्णाला उत्तर देताना अश्विनी यांनी "प्राणी योनी ही भोग योनी आहे. ते जसे वाईट कर्म करत नाहीत तसं चांगलंही करत नाहीत. त्यांना कर्मस्वातंत्र्य नसते. जे काही असते तो त्यांचा नैसर्गिक स्वभाव असतो. त्यांना त्यांच्या वागण्याचं ना पाप लागतं ना पुण्य." असे म्हटले आहे. मग त्या पशूला मनुष्यजन्म कसा मिळणार?
सावट धन्यवाद आज खुपच छान आणि
सावट
धन्यवाद आज खुपच छान आणि सुंदर सांगितले.
कोSहम - एक छोटा पण सुंदर लेख!
कोSहम - एक छोटा पण सुंदर लेख!
असे म्हटले आहे. मग त्या पशूला
असे म्हटले आहे. मग त्या पशूला मनुष्यजन्म कसा मिळणार?
हीच शंका मलाही आहे. इथे मागे कधीतरी डिस्कशन झाले होते.
आपणा..सर्व श्रीसंतांचे
आपणा..सर्व श्रीसंतांचे धन्यवाद!
हसरी,
वाचन कोणते करू?
असा प्रश्न तुम्हाला पडला आहे. वाचन करायचे असेल तर ज्यांना 'आत्मज्ञान' झाले आहे.. अशांचेच चरित्र.. उपदेश वाचावा. इतर काही वाचू जाल... तर बुद्धीभेद होईल.
मग आपणास कुठे कळते..की एखाद्याला आत्मज्ञान झाले आहे का ते. ज्यांना 'आत्मज्ञान' झाले आहे.. ते दोन भुमिकेत दिसतात... एकतर त्यांची वाचा मौन बाळगते.... किंवा अखंड परमेश्वराविषयी बोलते.
परत आपला संशय मध्ये येतो... आपण म्हणतो..आजकाल खरे साधू दिसतच नाहीत. ( खरेतर आपल्याला ओळखता येत नाहीत.. हेच सत्य आहे.) असे असले तरिही... जे 'साधू' होऊन गेले... त्यांच्या उपदेशपर लिखाणावर, आपण विश्वास बसायला काहीच हरकत नाही.
याच्यात अजून एक भाग आहे.. तोही पाहूयात. एकतर आपल्याला कळत नाही की काय वाचले पाहीजे, बरे दुसर्यास विचारायला जावे तर.. ते आपल्याला आवडेलच असे नाही किंवा वाचायला उपलब्ध होइलच असे नाही. (याचा अनुभव तुम्हाला आला आहेच
) मग अशा वेळी एक उत्तम मार्ग आहे... वरचा श्रीमहाराजांनी केलेला 'स्मरणाविषयीचा' उपदेश लगेच अमलात आणायचा... म्हणजे 'योग' त्या क्षणी सुरू होतो. 'योग' याचा अर्थ परमेश्वराशी जोडले जाणे हाच आहे... ते स्मरणाने सहज शक्य होते... आणि मग त्याच जोडल्या गेलेल्या परमेश्वराला आळवायचे... की हा 'जोड' घट्ट व्हावा म्हणून जेजे योग्य असेल... जो 'बोध' जरूरी आहे.. ते ते माझ्याकडून करवून घे. मग त्यात काय वाचायचे? हे पण येते..! माधवांनी विचारलेली.. श्रीसद्गुरुभेटही येते! ...
'स्मरणाची' सुरुवात तर करा... आणि बघा 'श्रीसंताचा मार्ग आणि त्याचे बळ', किती सहज आहे ते ! उधारीचा व्यवहारच नाही... रोकडा साक्षात्कार आहे.
धन्यवाद!
धन्यवाद सावट आता स्मरणाविषयी
धन्यवाद सावट
आता स्मरणाविषयी सांगा.
स्मरण म्हणजे मंत्र कि परमेश्वराच्या कोणत्याही नामाचा जप?
माधव, जा'मोहन'
माधव, जा'मोहन' प्या,
>>>म्हणजे एखाद्या पशूला मुक्ती मिळवण्याकरता मनुष्यजन्म मिळवणे आणि त्याकरता पापापेक्षा जास्त पुण्य करणे गरजेचे आहे.
'पुण्य आणि पाप' याची निर्मिती... 'मी' कर्ता या भावाने आणि कर्मफळाच्या आशेने होते. असा 'भाव' फक्त मनुष्य जन्मातच असतो. मग असे असेल तर.... आणि ८४ लक्ष योनींच्या शेवटी मनुष्य जन्म मिळत असेल तर... अगोदरच्या जन्मातला कर्ताभाव नसणारा पुण्यहीन पशू... मनुष्य जन्माला कसा येणार? ही आपली शंका आहे.
थोडक्यात पाहू....
८४ लक्ष जन्माच्या शेवटी मिळणारा मनुष्य जन्मापर्यंतचा प्रवास हा वेगळा पहावा लागेल आणि त्यानंतर या मनुष्य जन्मात 'कर्ताभाव' येतो म्हणून.. या जन्मानंतरचा पुढचा प्रवास... वेगळा पहावा लागेल. सगळ्यात सुरुवातीला मिळालेला मनुष्य जन्म हा मिळतो... तर.. त्या मिळालेल्या मनुष्य जन्मानंतरचा प्रवास हा त्या मनुष्य जन्मातल्या कर्मानुसार ठरतो.
उदा. पाहूयात....
एखादे बालक.. निष्पाप असते.. म्हणजे काय तर... त्याच्यात कर्त्याचा भाव नसतो. अशा बालकाचा जर मृत्यू झाला... तर कर्ता भाव नसल्यामुळे.. नवीन कर्मफळ तयार होत नाही. पण ज्यावेळी ते बालक मोठे होते... त्यावेळी कर्ताभाव वाढू लागतो... आणि कर्म ... आणि कर्मफळ याच्या बंधनात तो अडकतो.
म्हणजेच मनुष्य पिंडाची उत्क्रांती पाहीली... तर या उत्क्रांतीमध्ये दोन स्पष्ट अवस्था दिसतात... एक कर्ताभाव नसणारा बालक आणि दुसरी..कर्त्याभावासहीत असणारे.. तारूण्य सहीत पुढील अवस्था.
'पिंडी ते ब्रह्मांडी' या न्यायाने... आपण ब्रह्मांडाकडे पाहीले तर या दोन स्पष्ट आणि वेगवेगळ्या अवस्था आपल्याला तर्कानेही कळू शकतात.
८४ लक्ष जन्मानंतरच्या कर्त्या मनुष्यजन्मानंतर.. पुढचा जन्म हा मनुष्याचाही असू शकतो... किंवा पुढचे अनेक जन्म इतर मिळून.. परत मनुष्याच जन्म मिळू शकतो... किंवा हाच जन्म शेवटचाही असू शकतो.
धन्यवाद!
सावट, पहिला मनुष्य जन्म
सावट, पहिला मनुष्य जन्म 'मिळतो' हे समजले/पटले.
त्या पहिल्या मनुष्य जन्मात पाप अधिक घडल्याने जीवाला पुढचा जन्म पशूचा मिळाला हे पण समजले / पटले.
आता त्या पशू जन्मापासून परत मनुष्य जन्म कसा मिळेल हा प्रश्ण होता. त्याचे उत्तर नाहि मिळाले. एकदा का जीव मनुष्य जन्मातून पशू जन्मात गेला की त्याला कर्ताभाव उरत नाही मग त्याची उत्कांती (पशू ते मनुष्य हा प्रवास) कसा होणार?
म्हणजे पुढीलपैकी एक पर्याय स्विकारावा लागतो...
१. मनुष्य जन्म हा randomly मिळतो. म्हणजे जीवाला जेंव्हा मनुष्य जन्म मिळेल तेंव्हा त्याने योग्य ते कर्म करून मुक्ती मिळवावी. तसे न झाल्यास परत एक random जन्म-मृत्युचा फेरा घेत पुढचा मनुष्य जन्म मिळण्याची वाट बघत रहावी. तो मनुष्य जन्म १० किंवा १००० किंवा ८४ लक्ष योनींनतर मिळेल किंवा कदाचीत तो लगेच पुढचाच जन्म असेल. पण जर जन्म randomly मिळत असतील तर मग मनुष्य जन्माचे मुक्तीच्या दृष्टीने महत्व उरत नाही. म्हणजे randomly मनुष्य जन्म मिळण्याऐवजी एकदम मुक्तीच का मिळू नये?
२. प्रत्येक योनीत कर्ताभाव हा असतोच आणि त्यानुसार पुढील जन्म ठरत जातो. अर्थात हा कर्ताभाव आणि त्याने मिळणारे पाप-पुण्य हे प्रत्येक योनीनुसार ठरते. पण मग यातही इतर योनीत असताना जीवाचे पाप-पुण्याचे पारडे समसमान होऊन त्याला त्या योनीतच मुक्ती मिळू शकते.
माधव, >>>त्या पहिल्या मनुष्य
माधव,
>>>त्या पहिल्या मनुष्य जन्मात पाप अधिक घडल्याने जीवाला पुढचा जन्म पशूचा मिळाला हे पण समजले / पटले.
आता त्या पशू जन्मापासून परत मनुष्य जन्म कसा मिळेल हा प्रश्ण होता. त्याचे उत्तर नाहि मिळाले.
कर्त्या मनुष्याच्या मृत्यू नंतर जे भोगायचे राहीलेले सकळ कर्मफळ असते... ते बीज रुपात... म्हणजेच अव्यक्त रुपात असते.... याला 'संचित' म्हणतात. हे संचित गुंतागुंतीचे आणि अनेक बीज स्वरुपात असते. एकाच शरीराने हे भोगले जाऊ शकत नाही. म्हणूनच त्यातले काही बीज भोगण्यासाठी बाजूला काढले जाते... त्यालाच प्रारब्ध म्हणतात.
जुने संचित - प्रारब्ध = राहीलेले संचित्.(यात अजूनही अनेक बीज(जन्म) फळरुपात यायला वाट पहात असतात.)
वरच्या प्रारब्धाने(पाप-पुण्य भेसळ) मनुष्य व्यतीरिक्त देह मिळाला तर कर्ताभाव नसल्याने राहीलेल्या संचितामध्ये भर पडत नाही. या जन्मानंतर परत जे प्रारब्ध राहीलेल्या संचितामधून भोगण्यासाठी बाजूला काढले जाते... त्यानुसार समजा मनुष्य जन्म ( पाप-पुण्य सम) मिळाला तर ते प्रारब्ध भोगताना जे नवीन कर्त्याभावाने ..कर्मबीज तयार होते त्याला क्रियमाण म्हणतात... हे जुन्या.. संचितामध्ये राहीलेल्या बीजामध्ये या जन्मानंतर मिसळले जाते...
राहीलेले संचित + क्रियमाण( फक्त मनुष्य जन्मात असते.. हे ही प्रचंड असू शकते.) = नवीन संचित
मग परत ..नवीन प्रारब्ध, या नवीन संचितातून बाजूला केले जाते.. आणि परत जन्म..परत मरण हे चक्र चालूच रहाते.
धन्यवाद!
छान वाटले.
छान वाटले.
धन्यवाद सावट्जी, माधवजी, नवीन
धन्यवाद सावट्जी, माधवजी,
नवीन कर्मफल निर्माणच होऊ नये आणि आधिचे कर्म फल पक्व न होताच ( त्याचे फळ मिळण्यापुर्वीच ) ते संपावे अशी
योजना असलेला काही मार्ग आहे का ?
मध्यंतरी क्रियायोगावर जेव्हा वाचले त्यात हा तो मार्ग आहे असे वाचल्याचे स्मरते.
धन्यवाद! नितीनजी अतिशय सुंदर
धन्यवाद!
नितीनजी अतिशय सुंदर प्रश्न आहे!
मार्ग अवश्य आहे. किंबहुना श्रीभगवंतानीही श्रीमद्भगवतगीतेत याच विषयावर सखोल उपदेश केला आहे.
>>>नवीन कर्मफल निर्माणच होऊ नये आणि आधिचे कर्म फल पक्व न होताच ( त्याचे फळ मिळण्यापुर्वीच ) ते संपावे अशी योजना असलेला काही मार्ग आहे का ?
यातले.. कर्माविषयीचे दोन वेगवेगळे भाग जर पाहीले तर असे लक्षात येते.... 'प्रारब्धा'( बीजातून झाड..फूल..फळ इ. पायर्या पार पडलेल्या असतात.)...नुसार देह मिळतो... म्हणून ते भोगूनच संपवावे लागते. 'संचित' हे कर्मबीज स्वरुपात असते. पण जसे नुसते 'बीज' असेल तर त्यातून झाड येईलच असे नाही... माती,हवा.. पाणी वै. इतर बर्याच गोष्टीवर हे अवलंबून असते.
म्हणूनच... आपण विचारलेल्या नुसार... हे 'संचित'रुपी बीज... त्याचे झाड होण्यापुर्वीच संपवले पाहीजे.... आणि हे करत असताना... नवीन बीज, म्हणजेच 'क्रियमाण' होऊ नये अशी व्यवस्था ही झाली पाहीजे. हे दोन्हीही एकदम..एकाचवेळी...क्रमाक्रमाणे संपवता आले पाहीजे... तरच आणि फक्त तरच श्रीसंतानी सांगितलेला 'मोक्ष' मिळेल.
म्हणूनच कर्माविषयी श्रीसंत सांगतात... कर्ताभाव गेला पाहीजे आणि त्याच बरोबर कर्मफळात आसक्तीही नसली पाहीजे. या दोन एकच वाटणार्या पण वेगवेगळ्या स्थिती विषयी विचार करायला पाहीजे. 'मी' कर्ता नाही... हे तत्वतः जाणले म्हणजे... क्रियमाणाचा निकाल लागतो..म्हणजेच नवीन कर्मबीज थांबते.... कर्माच्या एकाभागाचा निकाल लागतो.
आता राहीले ते संचित..जुने गाठोडे. याकरीता तत्वतः कर्मफळाच्या आसक्तीतून मुक्त व्हावे लागेल... असे मुक्त होणे म्हणजेच संचित संपल्याचे लक्षण आहे. आसक्ती ही मोहातून येते.. मोहामुळे.. काम आणि त्यातून क्रोध असा प्रवास होतो. हे थांबवायचे असेल.. तर मुळावर घाव घातला पाहीजे.. मुळ काय आहे तर आसक्ती... म्हणजेच 'वासना'. आता वासना असतात... रहातात कोठे तर... अंतःकरण चतुष्टयातील(मन,चित्त,बुद्धि आणि अहंकार) चित्तामधे.
म्हणूनच चित्तशुद्धीला.. म्हणजेच अंतःकरण वासनारहीत.. होण्याला अतिशय महत्त्व आहे. म्हणूनच हे होण्याचा उपाय... उपासना काय आहे हे पहाणे नितांत जरुरी आहे... हे मनुष्यजन्मातच शक्य आहे.
धन्यवाद!
अनंत जन्मींचें पुण्य जोडे|
अनंत जन्मींचें पुण्य जोडे| तरीच परमार्थ घडे |
मुख्य परमात्मा आतुडे| अनुभवासी ||श्रीदासबोध १.९.२४||
जेणें परमार्थ वोळखिला| तेणें जन्म सार्थक केला |
येर तो पापी जन्मला| कुलक्षयाकारणें ||२५||
असो भगवत्प्राप्तीविण| करी संसाराचा सीण |
त्या मूर्खाचें मुखावलोकन| करूंच नये ||२६||
भल्यानें परमार्थीं भरावें| शरीर सार्थक करावें |
पूर्वजांस उद्धरावें| हरिभक्ती करूनी ||२७||
श्रीसमर्थ आपल्या बोधामृतात 'परमार्था'विषयी उपदेश करत आहेत.
'श्री' म्हणतात... मागल्या ...झालेल्या अनंत जन्मामधे जर शुद्धपुण्य जोडले गेले असेल... बलवान पुर्वसुकृत असेल तरच या मनुष्य जन्मात 'परमार्थ' घडतो... श्रीविट्ठलाची आवड निर्माण होते... त्यालाच खरा परमार्थ ओळखता येतो... आणि म्हणून त्याचाच जन्म सार्थकी लागतो.
'श्री' पुढे म्हणतात... बाकीचे राहीलेले... जे श्रीभगवत्प्राप्तिशिवाय.. इतर प्राप्तीच्या मागे लागतात.. ते 'पापी' आहेत... अशां मुर्खांचे 'तोंड' सुद्धा पाहू नये.
भल्या बुद्धीच्या मनुष्याने हे वेळीच ओळखून.. श्रीहरिभक्तीत तत्पर राहून.. आपल्याला मिळालेल्या मनुष्य जन्माचे सार्थक करून घ्यावे... आपल्या पुर्वजांचाही उद्धार करावा.
ही श्रीहरिभक्ती करायचे म्हणजे नेमके काय करायचे?कसे करायचे? श्रीहरिभक्तीच का करायची? उद्धार होतो म्हणजे काय होते? याचे चिंतन अवश्य झाले पाहीजे.
धन्यवाद!
सांग नरदेह जोडलें| आणी
सांग नरदेह जोडलें| आणी परमार्थबुद्धि विसर्ले |
तें मूर्ख कैसें भ्रमलें| मायाजाळीं ||श्रीमद दासबोध १.१०.३३||
श्रीसमर्थ म्हणतात...चांगला धट्टाकट्टा-धडधाकट असलेला नरजन्म मिळालेला असताना.. अशा देहातील तथाकथित.. कर्मानुसारि चालणारी.. निर्णय देणारी बुद्धी.. परमार्थाच्या अंगाने निर्णय देत नसेल.. तर तो 'प्राणी' या प्रपंचरुपी मायाजाळात भ्रमीत होतो. असा भ्रमीत काय म्हणतो.. काय कल्पना करतो...तर...
मृत्तिका खाणोन घर केलें| तें माझें ऐसें दृढ कल्पिलें |
जसे माती खणून.. त्याच्यात पाणी मिसळून चिखल केला जातो... त्याच्या विटा बनविल्या जातात.. वारा आणि सुर्यप्रकाश याच्या सहाय्याने त्या वाळवून.. त्या मोकळ्या जागेत एकावर एक विशिष्ठ पद्धतिने रचून त्याचेच घर बनते... आणि अशा घरात जो रहातो.. तो कल्पनेत रममाण होतो ते माझेच घर आहे. तसेच या शरीररुपी.. पुथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश अशा पंचमहाभूताने बनलेल्या घरात रहाणारा.. मायेच्या प्रभावाने हे शरीर म्हणजे माझेच घर आहे अशी दृढ कल्पनेत रममाण होतो. पण...
परी तें बहुतांचें हें कळलें| नाहींच तयासी ||३४||
हे शरीररुपी माझे एकट्याचे... अधिकारचे वाटणारे घर खरेतर बर्याच जणांचे वस्तीस्थान आहे हे त्याच्या लक्षातच येत नाही.
या मातीच्या घरावर अजून कोणकोण हक्क सांगते.. तर
मुष्यक म्हणती घर आमुचें| पाली म्हणती घर आमुचें |
मक्षिका म्हणती घर आमुचें| निश्चयेंसीं ||३५||
कांतण्या म्हणती घर आमुचें| मुंगळे म्हणती घर आमुचें |
मुंग्या म्हणती घर आमुचें| निश्चयेंसीं ||३६||
विंचू म्हणती आमुचें घर| सर्प म्हणती आमुचें घर |
झुरळें म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||३७||
भ्रमर म्हणती आमुचें घर| भिंगोर्या म्हणती आमुचें घर |
आळीका म्हणती आमुचें घर| काष्ठामधें ||३८||
मार्जरें म्हणती आमुचें घर| श्वानें म्हणती आमुचें घर |
मुंगसें म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||३९||
पुंगळ म्हणती आमुचें घर| वाळव्या म्हणती आमुचें घर |
पिसुवा म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४०||
ढेकुण म्हणती आमुचें घर| चांचण्या म्हणती आमुचें घर |
घुंगर्डी म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४१||
पिसोळे म्हणती आमुचें घर| गांधेले म्हणती आमुचें घर |
सोट म्हणती आमुचें घर| आणी गोंवी ||४२||
बहुत किड्यांचा जोजार| किती सांगावा विस्तार |
समस्त म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४३||
पशु म्हणती आमुचें घर| दासी म्हणती आमुचें घर |
घरीचीं म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४४||
पाहुणे म्हणती आमुचें घर| मित्र म्हणती आमुचें घर |
ग्रामस्त म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४५||
तश्कर म्हणती आमुचें घर| राजकी म्हणती आमुचें घर |
आग्न म्हणती आमुचें घर| भस्म करूं ||४६||
समस्त म्हणती घर माझें| हें मूर्खहि म्हणे माझें माझें |
सेवट जड जालें वोझें| टाकिला देश ||४७||
अवघीं घरें भंगलीं| गांवांची पांढरी पडिली |
मग तें गृहीं राहिलीं| आरण्यस्वापदें ||४८||
किडा मुंगी वाळवी मूषक| त्यांचेंच घर हें निश्चयात्मक |
हें प्राणी बापुडें मूर्ख| निघोन गेलें ||४९||
ऐसी गृहांची स्थिती| मिथ्या आली आत्मप्रचीती |
जन्म दों दिसांची वस्ती| कोठें तरी करावी ||५०||
अशा प्रकारे या आपल्या शरीरुपी घराचीही स्थिती आहे. या भ्रमाचे मिथ्या स्वरुप कधी कळते.. तर आत्मप्रचीती आल्यावर! मग कळते जन्म ही दोन दिवसांची वस्ती आहे.. या दोन दिवसाकरीता मिळालेले शरीर-घर हेही दोन दिवसांचेच आहे.
या वरच्या मातीच्या.. माझ्या भासणार्या घरात जसे बरेच जण रहातात, आपला हक्क सांगतात.. तसाच या देह-रुपी घरावर कोणकोण हक्क सांगते? तर...
देह म्हणावें आपुलें| तरी हें बहुतांकारणें निर्मिलें |
प्राणीयांच्या माथां घर केलें| वा मस्तकीं भक्षिती ||५१||
रोमेमुळी किडे भक्षिती| खांडुक जाल्यां किडे पडती |
पोटामध्ये जंत होती| प्रत्यक्ष प्राणियांच्या ||५२||
कीड लागे दांतासी| कीड लागे डोळ्यांसी |
कीड लागे कर्णासी| आणी गोमाशा भरती ||५३||
गोचिड अशुद्ध सेविती| चामवा मांसांत घुसती |
पिसोळे चाऊन पळती| अकस्मात ||५४||
भोंगें गांधेंलें चाविती| गोंबी जळवा अशुद्ध घेती |
विंचू सर्प दंश करिती| कानटें फुर्सीं ||५५||
जन्मून देह पाळिलें| तें अकस्मात व्याघ्रें नेलें |
कां तें लांडगींच भक्षिलें| बळात्कारें ||५६||
मूषकें मार्जरें दंश करिती| स्वानें अश्वें लोले तोडिती |
रीसें मर्कटें मारिती| कासावीस करूनी ||५७||
उष्टरें डसोन इचलिती| हस्थी चिर्डून टाकिती |
वृषभ टोचून मारिती| अकस्मात ||५८||
तश्कर तडतडां तोडिती| भूतें झडपोन मारिती |
असो या देहाची स्थिती| ऐसी असे ||५९||
ऐसें शरीर बहुतांचें| मूर्ख म्हणे आमुचें |
अशा प्रकारे हे माझे म्हणुन कोडकौतुकाने जपलेल्या शरीरात अनेक जण रहातात, अनेक जण हक्क गाजवतात... आणि मुर्खाला ते आपले वाटते.
परंतु खाजें जिवांचें| तापत्रैं बोलिलें ||६०||
देह परमार्थीं लाविलें| तरीच याचें सार्थक जालें |
नाहीं तरी हें वेर्थची गेलें| नाना आघातें मृत्यपंथें ||६१||
परंतु.. असे असतानाही जो जीव या त्रिविधतापानुसार चालणार्या शरीरामुळे त्रस्त होतो, पोळला जातो .. मग 'परमार्था पंथाला' लागतो.. त्याच्या शरीराचे सार्थक होते.
असे जर झाले नाही, तर तो जीव परत 'मृत्यू पंथाला'(जन्म-मरण) लागतो.
धन्यवाद!
मानसपूजा म्हणजे काय? ती कशी व
मानसपूजा म्हणजे काय? ती कशी व कुणाची करायची? गुरुने सांगितलेल्या नावाचे नामस्मरण करावे असे म्हणतात. गुरुच भेटला नाही तर नाव कुणाचे घ्यायचे? कुलदेवता वगळता इतरांचे नाव घेतले तर चालते का? ( सनातनवाले कुलदेवता आणि दत्तगुरु याबाबत अतिशय आग्रही आहेत, किंबहुना फक्त एवढेच केले तरी पुरेसे आहे, असे म्हणतात. )
सनतनवाले मनुष्याचे नाव ( उदा साईबाबा, ) यांचेही नाव शक्यतो घेऊ नका असे साम्गतात.
***********************
श्री भवानी देव्यै नमः /
श्री गुरुदेव दत्त /
http://www.bipinjoshi.com/art
http://www.bipinjoshi.com/articles/73728643-89fd-46af-9d5f-6ed45b4348b3....
नामस्मरणाऐवजी एखाद्या
नामस्मरणाऐवजी एखाद्या मंत्राचा ( उदा. गायत्री, ओम त्र्यंब्कं यासारखा) जप केला तर चालतो का? की नामजप आणि मंत्रजप यांची फळे वेगळी असतात?
कुणीतरी उत्तरे द्या प्लीज
सावट सद्ध्या सुट्टीवर आहेत
सावट सद्ध्या सुट्टीवर आहेत बहुतेक
नामस्मरणाऐवजी एखाद्या
नामस्मरणाऐवजी एखाद्या मंत्राचा ( उदा. गायत्री, ओम त्र्यंब्कं यासारखा) जप केला तर चालतो का? >>> दोन्ही चालतं.
नामजप हा नामस्मरणाच्या उद्देशाने असतो. मंत्रजप हा त्या त्या मंत्राच्या (बीजमंत्रांनी बनलेल्या) सिद्धतेचा जो उद्देश असेल त्यासाठी असतो. अर्थात गायत्री मंत्र हा कुठल्याही उद्देशाशिवाय म्हटला तरी चालतोच नाही तर धावतो, कारण तू मूळमंत्र आहे. मला नामजप आणि मंत्रजप ह्यातील हा फरक जाणवला. अजूनही असतीलच. जाणकारांनी कृपया सांगावेत.
------
उदा साईबाबा, ) यांचेही नाव शक्यतो घेऊ नका असे साम्गतात. >>> श्रीसाईबाबा हे सद्गुरु आहेत. आतापर्यंत सद्गुरुतत्वाने (ज्यांचा नंबर परमात्म्याबरोबरच आणि गायत्री/आदिमातेच्या खालोखाल लागतो) अनेकवेळा कार्यानुसार व कारणानुसार मानवी देह धारण केला आहे आणि त्यांनी श्रीकृष्णरुपात वचन दिल्याप्रमाणे (यदायदाही अधर्मस्य...) धारण करतच रहातील.
जे ओळखतील ते नाव घेतीलच, जे नाही ओळखणार ते नाही घेणार
श्रीरामांच्या बरोबर तरी अख्खं जग कुठे होतं? स्वामी समर्थांच्या चरणांशी स्वतःला बांधून ठेवू इच्छिणारे जसे लोक होते तसे त्यांची निंदा करणारेही होतेच की ! सद्गुरुतत्वाची निंदा केल्याने सद्गुरुंना काहीच फरक पडत नाही. फरक पडत असेल तर त्या निंदकाला पडत असेल. अजून एक, एखादे सद्गुरु प्रत्येकालाच ओळखता येतील असं नाही. त्यामुळे ज्याच्या हृदयी सद्गुरुंच्या ज्या रुपाने भक्तीभाव उमलला, भगवंताची खरी शिकवण कोरली जाऊ लागली, तेच रुप त्याच्यासाठीचे सद्गुरुस्थान असते. त्यामुळे एखाद्याला साईनाथ किंवा अजून कुठल्या रुपाचे प्रेम/भक्तीभाव/अनुभव/अध्यात्मिक उन्नती असा दृश्य्/अदृश्य कृपालाभ झाला असेल तर दुसर्या कुणी कसे म्हणावे की त्याचे नामस्मरण करु नकोस? इथे त्या नात्याचा समजा आदर करता नसेल येत तर निंदा / टवाळी / प्रतिबंध तरी करु नये असे माझे वैयक्तिक मत.
Pages