उपासना

Submitted by हसरी on 3 February, 2010 - 23:00

उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हसरी,
>>>आता स्मरणाविषयी सांगा.
स्मरण म्हणजे मंत्र कि परमेश्वराच्या कोणत्याही नामाचा जप?

याचे 'उत्तर' मिळाले काय? Happy प.पू.श्रीब्रह्मचैतन्यमहाराज उपदेश करतात तेच 'सत्य' आहे. स्वतःचे 'दोष' ठळकपणे दिसू लागणे.. ते कबूल करणे.. हाच सर्वात महत्त्वाचा अनुभव आहे. अनुभव-अनुभव म्हणतात तो हाच.

श्रीमहाराज.. परमार्थाची व्याख्या फार सुरेख करतात.. 'श्रीवचन' म्हणते..."वास्तविक, काही न करणे,आपण काही करतो आहोत किंवा आपल्याला काही करायचे आहे असे न वाटणे, हाच परमार्थ."

श्रीमद्भगवतगीतेत श्रीभगवंतानी जे 'निष्कामकर्म' सांगितले आहे ते म्हणजेच श्रींचा अनमोल उपदेश आहे... जसे सुर्यामुळे पृथ्वीवरचे सर्व व्यवहार होतात... हे कर्तेपण निर्विवाद आहे. पण असे असतानाही.. सुर्याच्या आस्तित्वामुळे सर्व घडत असतानाही.. सुर्याला हेही माहीत नाही की 'दिवस आणि रात्र' हे आपल्यामुळे होत आहेत... मग त्या पृथ्वीवरील दिवसाच्या प्रकाशात एखाद्याने मंदिर बाधले किंवा त्या रात्रीच्या अंधारात एखाद्याने चोरी केली तर, त्याचे कर्तेपण सुर्याकडे कसे जाईल बरे?

कर्माकर्मात फरक आहे. अजून एक उदाहरण घेऊयात... समजा माणसांची गर्दी जमली आहे, गोंधळ आहे.. त्यावेळी एखादा माणूस मोठ-मोठ्या आवाजात धमकावत येतो आणि गर्दीला शांत बसवतो... अशा प्रसंगात दुसरा एखादा येतो.. नुसते बोट वर करतो आणि त्यामूळे गर्दीत शांतता पसरते... तर तिसरा माणूस नुसता प्रवेश करतो आणि गर्दी शांत होते.

या तीनही उदाहरणात, गर्दी शांत होणे, हे प्रत्यक्ष कार्य तर होतेच.. परंतू कर्म झाले असले तरिही.. कर्ता आणि त्याने केलेली कृती वेगवेगळी आहे. एखाद्याला प्रत्यक्ष कृती करावी लागते तर.. एखाद्याचे हजर असणे.. हेच कृतीसम असते. एखादा स्वतःकडे कर्ताभाव घेऊन कार्य पार पाडतो.. तर एखादे कार्य पार पडूनही.. त्या कर्त्यात, 'मी' काही करत आहे किंवा मला काहीही करायचे आहे, असे वाटत नाही.. आणि तरीही 'कार्य' पार पडलेले असते... !

एखादा अविरत कर्म करत असेल आणि त्याची, झालेल्या कर्माच्या फळात आसक्ती नसेल, आणि दुसरा एखादा नुसता 'हजर' असेल आणि त्याच्या फक्त आस्तित्वामुळेच.. त्याने न करताही अनंत कर्मे होत असतील.. तर या दोन्हीत फरक तो काय?

जा'मोहन'प्या.....आपल्याला काय वाटते, हे वाचायला आवडेल! Happy

धन्यवाद!

महेश,
नमस्कार! कसे आहात?

सावट, आज बरेच दिवसांनी? Happy

एखादा अविरत कर्म करत असेल आणि त्याची, झालेल्या कर्माच्या फळात आसक्ती नसेल, आणि दुसरा एखादा नुसता 'हजर' असेल आणि त्याच्या फक्त आस्तित्वामुळेच.. त्याने न करताही अनंत कर्मे होत असतील.. तर या दोन्हीत फरक तो काय?

>>>> यावर जामोप्यांनी त्यांना काय वाटते ते सांगितल्यानंतर तुमच्याकडूनही काही वाचायला आवडेल.

नमस्कार, सावट. Happy

स्मरण म्हणजे मंत्र कि परमेश्वराच्या कोणत्याही नामाचा जप? >>>>>>> दोन्हीही कारण दोघांमध्ये ही इश्वराचे नाव असते त्यामुळे या दोन्ही प्रकारे स्मरण केले जाते.
मंत्रा पेक्षा नाम जर उच्चार करायला सोपे वाटत असेल तर ते ही योग्यच.

माझे चुकले तर सांगा प्लिज.

सावट, मी बरा आहे पण बराच बरा नाहीये अजुनही.
आज खुप काळानंतर "उपासना" मधे आपले लिखाण पाहून खुप छान वाटले. Happy

सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा.

गुरु परमात्मा चराचर | भरला असे सबाह्याभ्यंतर |
ऐसा व्हावया निजनिर्धार | निष्ठा अपार आवश्यक ||
(श्री साईसच्चरित अध्याय ३२ वा)

अश्विनी, श्रीभगवंताच्या निष्कामकर्माविषयी, जा'मोहन'प्याना काही प्रश्न आहेत... म्हणूनच आपणही त्यांच्या अभिप्राय-प्रश्नांची-उत्तराची वाट पाहूयात.! Happy

प.पू. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची सर्व उपदेशपरप्रवचने नित्यवाचनीय-स्मरणीय आहेत. हा उपदेश म्हणजे 'आप्तवाक्य' आहे... ज्याला आपल्या..सर्वांच्या पारमार्थिक उन्नतीची काळजी-तळमळ आहे.. असा जो.. तोच आपला 'आप्त'!

मग... असा प्रत्येकजण स्वतःला... स्वयंघोषीत.. 'आप्त' समजू लागला तर... काय होईल? हे जाणण्यासाठी परत आप्तवाक्यच उपयोगी पडेल... यावर श्रीमहाराज काय म्हणतात ते पाहू...

श्रीसंत हे संसाररूपी.. जगतरुपी दृष्याच्या पार गेलेले असतात... आणि आपण अजूनही दृष्यच सत्य मानत असतो.. त्यामूळेच एखाद्या गोष्टीकडे पहाण्याची, आपली आणि श्रीसंतांची दृष्टी यात दोन ध्रुवाचा फरक असतो.
जी गोष्टाआपल्याला बरोबर वाटते, ती श्रीसंताच्या सूक्ष्मदृष्टीला कशी दिसते? याचे चिंतन आपल्या पारमार्थिक उन्नतीस निश्चितपणे उपयोगी पडते, म्हणूनच श्रीमहाराजांची प्रवचने 'अनमोल' आहेत... चिंतनरुपाने अखंड मस्तकावर धारण करायला हवीत....!

परोपकाराविषयी, श्रीमहाराज काय म्हणतात हे पहाण्यासारखे आहे... ते म्हणतात...

प्रत्येक मनुष्याला परोपकाराची बुद्धी असणे अत्यंत जरूर आहे. पण तो कुणाला शक्य आहे आणि कुणी करावा, याचा विचार करायला पाहिजे. ज्या शेतात पाणी भरपूर पुरून उरत असेल त्याच शेतातले पाणी बाहेत टाकता येते, आणि ते हितावहही होते. इतर शेतांच्या बाबतीत ते होत नाही, अशा शेताला पुरेसे पाणी कसे मिळेल याचाच आधी विचार करणे जरूर आहे. हीच दृष्टी परोपकार करणार्‍या व्यक्तीने ठेवावी. ज्या महात्म्यांनी स्वतःचा उद्धार करून घेतला, जगाच्या कल्याणाकरिताच जन्म घेतला, त्यांनाच परोपकाराचा अधिकार.

यात.. परोपकाराचा खरा अधिकारी कोण? याचे पुर्णउत्तर आले आहे. 'पर-उपकार' याकडे श्रीसंतवेगळ्या नजरेने पहातात. त्यांच्या नजरेने.. जो स्वतःवर उपकार करू शकत नाही.. तो दुसर्‍यावर काय उपकार करणार? किंवा त्याचा त्याला अधिकारच नाही. आजकाल हा.. 'अधिकार' हा शब्द फार जपून वापरावा लागतो... या शब्दाचे कसेही अर्थ निघू शकतात...पण श्रीसंत याकडे वेगळ्याच नजरेने पहातात. ते म्हणतात...

मग प्रश्न येतो की, इतरांनी परोपकाराची बुद्धी ठेवू नये आणि तसा प्रयत्‍नही करू नये की काय ? तर तसे नाही. परोपकाराची बुद्धी आणि प्रयत्‍न असणेच जरूर आहे. परंतु परोपकार म्हणजे काय, आणि त्याचा दुष्परिणाम न होऊ देता तो कसा करता येईल, हे पाहणे आवश्यक आहे. भगवंताची सेवा या भावनेने दुसर्‍याकरिता केलेली मेहनत याला परोपकार म्हणता येईल, आणि त्यापासून नुकसान होण्याची भिती नाही.

हे वाचल्यावर आपल्याला साहजिकच प्रश्न पडतो.. असे कसे काय होईल? आपण इतरांच्यावर उपकार करतोय.. आणि अशा कर्माचे..कृतीचे आपल्यावरच दुष्परिणाम कसा होईल? त्या पासून आपलेच नुकसान कसे होईल? अगोदरच आपल्याकडून पर-उपकार होण्याची मारामार.. त्यात चूकूनमाकून झालाच तर परत आपलेच नुकसान! म्हणूनच हे अजून स्पष्ट करण्यासाठी 'श्री' पुढे म्हणतात....

परंतु हे वाटते तितके सोपे नाही. कारण मनुष्याची सहज प्रवृत्ती अशी की, थोडेसे काही आपल्या हातून झाले की, "ते मी केले, मी असा चांगला आहे," अशा तर्‍हेचा विचार येऊन तो अभिमानाला बळी पडतो. सबब, ज्या ज्या वेळी दुसर्‍याकरिता काही करण्याची संधी मिळेल त्या त्या वेळी तिचा फायदा घेऊन मनाला शिकवण द्यावी की, "देवा, तुझ्या सेवेचा लाभ मला दिलास ही कृपा झाली. अशीच कृपा ठेवून आणखी सेवा करवून घे."

श्रीमहाराजांनीच, "हे वाटते तितके सोपे नाही", असे अगोदरच सांगितले आहे. पर-उपकार केल्यावर आपल्या 'आत' काय वृत्तिबदल होतो ते महत्त्वाचे... बाहेरचे 'कर्म' होऊन जाते... पण,आत.. चित्तात आपला 'ठसा' ठेऊन जाते.. ! बाहेरचे 'कर्म' हे पूर्वसंचित,प्रारब्ध... आतला 'ठसा' हे क्रियमाण.. पुढचे प्रारब्ध! म्हणूनच श्रीमहाराज.. पुढे.. धोक्याचा इशारा देत आहेत...

ही विचारसरणी जागृत राहिली नाही, तर आपला कसा घात होईल याचा पत्ताच लागणार नाही. म्हणून अत्यंत जपून वागणे जरूर आहे. परोपकार याचा सरळ अर्थ पर-उपकार; म्हणजे दुसर्‍यावर केलेला उपकार. यावरून असे लक्षात येईल की, परोपकाराला दोन व्यक्तींची गरज लागते. एक उपकार करणारा, आणि दुसरा उपकार करून घेणारा. जगातल्या सर्वसामान्य व्यक्ति पाहिल्या, तर आपल्या स्वतःवरून असे दिसते की, मी एक निराळा, आणि प्रत्येक व्यक्ति आणि वस्तुमात्र गणिक सर्व जग निराळे. मनाच्या या ठेवणीमुळेच जर आपल्या हातून दुसर्‍याचे कधीकाळी एखादे काम होण्याचा योग आला, तर 'मी दुसर्‍याचे काम केले' ही जाणीव होऊन अहंकार झपाट्याने वाढू लागतो. म्हणून परोपकाराच्या बाबतीत अत्यंत सावध राहण्याची सूचना सर्व संतांनी दिली आहे.

म्हणजेच तुमच्या कडून कर्म कसेही होवो... पण त्या कर्माने जर 'अहंकार' वाढीला लागला, तर तेच 'कर्म' परमार्थात मार्गात धोंड म्हणून कार्य करते.

मग काय करायचे? आपल्याकडून 'पर' तर उपकार सोडा.. पण उठल्यापासून.. झोपे पर्यंत काहीना काही 'कर्म' अखंड होतच असते. यावर उपाय काय? 'उपाय' न सांगतील ते संत कसे होतील? म्हणूनच श्रीसंत पुढे म्हणतात...

नामात राहिले म्हणजे अहंकार नाहीसा होऊन सावधानता येते आणि चित्त शांत होते.

श्रीमहाराज म्हणतात... श्रीभगवंताचे.. आपापल्या आवडीनुसार 'नाम' घ्या... आणि मग 'नामात' रहाता येईल...म्हणजेच एखादे काम करतानाही नामात राहून ते काम करता येईल. मग त्यामूळे काय होईल? असा काय फरक पडेल?

तर महाराज म्हणतात.. त्यामुळे अहंकार नाहीसा होईल. म्हणजे काय होईल? इथे 'अहंकार' म्हणजे 'मी' इतरापेक्षा कोणीतरी वेग़ळा आहे, वरचढ आहे, अशी भावना वाढीला लागणे. हा 'अहंकार' जसा पोकळ... अनुभुतीहीन शब्दज्ञानाने वाढतो.. तसाच.. कर्माचे ज्ञान नसताना.. केलेल्या अंध कृतीनेही वाढतो. श्रीमहाराज म्हणतात... जसा जसा 'अहंकार' कमी होत जातो .... तसतसा... कर्माविषयी सावधानता वाढू लागते.. म्हणजेच 'विवेक' वाढतो. एखादे कर्म करायच्या अगोदरच त्याची चांगली-वाईट बाजू तपासून पाहिली जाते.. सारासार-नित्यानित्य निर्णय घेण्यास बुद्धि सक्षम-सूक्ष्म होते.

श्रीमहाराजांच पुढे काय म्हणतात ते फार महत्त्वाचे आहे... ते म्हणतात... अशी सावधानता आल्यावर जे कर्म होते.. त्यावेळी किंवा त्यामूळे 'चित्त' शांत होते. म्हणजे काय? झालेल्या कर्माविषयी चित्तात काहीही वृत्ती.. चांगल्या अगर वाईट उमटत नाहीत.... आणि हेच ते श्रीभगवंतानी श्रीअर्जुनांस सांगितलेले 'निष्कामकर्म'. Happy

धन्यवाद!

सावट उत्तम पोस्ट! आता नियमीत पोस्ट टाकत जा या धाग्यावर. तुमची पोस्ट नसल्याने धागा बंद पडल्यागत झालेला मध्यंतरी!

लिंबू स्वागत !

LT, नमस्कार!

महेशा,माधवा.... धन्यवाद!

मनुष्य शरीर जसे मिळाले(आपसुक).. त्याचबरोबर, या शरीराबरोबर, स्वाभाविकपणे या शरीराकडून होणारे कर्मही आपसुकच येते... म्हणजेच तसा कर्माधिकारही आपसुकच त्या शरीरास मिळतो. मग असे नैसर्गिकपणे, अधिकारवाणीने, स्वभावत:च हजर असणार्‍या, आपल्याकडून जाणता-अजाणता केल्या जाणर्‍या-होणार्‍या कर्माचा.... परमार्थात एक 'साधन' म्हणून उपयोग करता येतो का? किंवा याचा उपयोग न करता 'परमार्थ' होऊ शकतो का? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.

श्रीभगवंतानी... श्रीअर्जुनास पहील्यांदा कर्ममार्गाचा उपदेश केला... आणि त्यांच्या समोर आपसुकपणे उभे ठाकलेले युद्धजन्य कर्म लढण्याचे फायदे-तोटे ही सांगितले. श्रीभगवंत म्हणतात... हे वीरश्रेष्ठा, जर युद्धात वीरगती पावलास तर तुला मरणोत्तर स्वर्गाचा लाभ होईल... आणि जर का तू हे युद्ध जिंकलेस तर ...जेत्यास मिळणार्‍या पृथ्वीचा राजा होशील! दोन्हीही बाजूने तुझाच फायदा आहे, असे असताना तू युद्ध न करण्याचा निर्णय, अविचार का करतो आहेस?

पण श्रीअर्जुनास हा श्रीभगवंताचा युक्तिवाद पटला नाही... स्वर्गातले सुख किंवा पृथ्वीवरचे राज्यसुख या दोन्हीची भुरळ श्रीअर्जुनास पडली नाही.मग यातून बरेच प्रश्न उभे झाले. कर्म म्हणजे काय? कोणते कर्म करावे... कोणते टाळावे..? मग एखादे कर्म करायचे तर.. ते कोणत्या प्रकारे करावे? जर टाळले तर ...कोणत्या प्रकारे? असे काय घडले की ज्याच्यामुळे श्रीअर्जुन लढायला तयार झाले? हा प्रवास खरेच अभ्यासण्यासारखा आहे. श्रीअर्जुनांनी श्रीभगवंताच्या कोणत्या उपदेशानुसार युद्ध केले? किंवा आपल्या प्रत्येकाच्या रोजच्या जीवनात अखंड चालू असणारे नित्ययुद्ध... श्रीभगवंत कशा प्रकारे करण्यास सांगत आहेत.. श्रीभगवंताना नक्की काय आवडते? याचे नित्यचिंतन आपल्याकडून व्हायला हवे.

धन्यवाद!

सावट खुप काळानंतर आपले लिखाण पाहून प्रसन्न वाटले. Happy
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम् जित्वा वा भोक्ष्यसे महिम् |
तस्मात उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः |

श्रीसंतशिरोमणी, थोर भगवद्भक्त, प.पू. श्रीसदगुरु तुकाराममहाराजांचे काही उपदेशपरअभंग त्यांच्याचकृपेने, त्यांच्याच सुकोमल श्रीचरणी, अगर्वता धारण करून,शरणागतीपूर्वक पाहूयात... बॊला श्रीसंततुकाराम महाराजकी जय!

परमार्थ मार्गावर... जीवाचे मार्गक्रमण होत असताना... जीवनात अनेक प्रसंग दबा धरून बसलेले असतात...! अशा प्रसंगात जीवाची जीवघेणी घालमेल होते... पुढे काय करायला पाहीजे.. आपले काय होणार आहे.. जग कुठे चालले आहे...काय चूक, काय बरोबर या विषयी मती कूंठित होते... अशा वेळी.. जीवाने आपला कतृत्त्वभाव सोडून अनन्यभावाने... परमेश्वरावर दृढ श्रद्धा ठेऊन... श्रीसंताच्या प्रवचन-अभंगरुपी उपदेशाचे मनन-चिंतन केले पाहीजे.. म्हणजे श्रीसंतानी ज्या प्रगाढ-अखंड शांततेचा अनुभव आला.. तो अनुभव त्या जीवालाही येईल... असे शास्त्रवचन आहे.

'श्री’ म्हणतात...

भूती भगवद्भाव । मात्रासहित जीव । अद्वैत तो ठाव । निरंजन एकला ॥ १ ॥
ऐसी गर्जती पुराणें । वेदवाणी सकळ जन । संत गर्जतील तेणें । अनुभवें निर्भर ॥ २ ॥
माझे तुझे हा विकार । निरसतां एक कार । नलगे कांही फ़ार । विचारचि करणें ॥ ३ ॥
तुका म्हणे दुजे। हे तो नाहीच सहजे । संकल्पाच्या काजे । आपेआप वाढले ॥ श्रीतु.गा.१५६२.४ ॥

’तो’.. निरंजन.. एकटा परमात्मा.. एकरुपाने..एकाकाराने.. सर्व भूतात..जीवमात्रात.. भगवद्भावाने व्यापला आहे. जेथे भेदाचा ठावठिकाणा नाही... मायेचा मागमूसही नाही... असा परमात्मा या मायारूपी... भेदरुपी जगाचे अधिष्टान आहे. असे अठरापुराणे.. चारवेद..सर्व ज्ञानीजन... तसा अपरोक्षानुभव आल्यामूळे, निर्भर झालेले श्रीसंत.. गर्जून-गर्जून सांगत आहेत आणि अशा भेदरुपी जगाचा आपण एक भाग आहोत.

मग आपल्याला.. आपण या, ’भेद’ हेच स्वरूप असणार्‍या जगाचा भाग असताना.. त्या ’अभेद’ अधिष्ठानाचा अनुभव कसा बरे येऊ शकेल? असा जर विचार-विवेक केला तर असे दिसून येते.. 'मी’ आणि या 'मी’ या अधिष्ठानावर आधारलेला 'माझे आणि तुझे’ हा विकार दूर केला की झाले... त्या साठी अजून फ़ार काही करायची जरूरत नाही.

पण असे जर न हॊता...म्हणजे मी-माझे हजर असताना, ते दूर करायचे सोडून..जर दुसरे अजून काही करावयास जाल, तर मात्र असा अनुभव येणार नाही.. भलताच अनुभव येईल. कारण 'मी आणि माझे’ हे असताना जे जे संकल्प केले जातील, जी जी कृती होईल, त्यामूळे भेद कमी न होता.. तो 'भेद’ आपोआप अजून वाढायला लागेल.

या 'विवेकावर’ आधारलेला श्रीमहाराजांचा अजून एक अभंग पाहूयात... म्हणजे हा विवेक अजून थोडा पक्का होईल. ते म्हणतात...

ग्रंथाचे ते अर्थ नेणता हे खळ । बहु अनर्गळ जाले विषयीं ॥ १ ॥
म्हणून भलतेचि आचरे । मोकळा विचरे मनासवे ॥ २ ॥
तुका म्हणे विषा नांव ते अमृत । पापपुण्या भीत नाही नष्ट ॥ श्रीतु.गा.१५४०.३ ॥

जो विषयात आकंठ बुडालेला खळ असतो, तो या सद्ग्रंथांचे,श्रीसंतांच्यावचनाचे अर्थ भलतेच काढतो.तो 'खळ’ म्हणतो, हे जग एकाच परमात्म्यापासून उत्पन्न झाले आहे... म्हणून त्यात काहीच भेद नाही... लहान थोर सगळे एकच आहे.... असा उपदेश करून 'तो’ अविवेकी, विधी आणि निषेधाचे.. सर्व नियम-बंधने धाब्यावर बसवून स्वातंत्र्याच्या नावाखाली... मन मानेल तसा स्वैराचार करीत फ़िरत असतो. अशी कृती करून...पाप-पुण्याला न भिता,त्याची तमा न बाळगता, समोर आलेल्या विषयावर तूटून पडतो आणि त्याच्या लक्षातच येत नाही.. ज्याला तो अमृत समजून आकंठ उपभोगतो आहे, प्रत्यक्ष ते ’विष’ आहे.

श्रीमहाराजांच्या प्रत्येक उपदेशाचे मुमुक्षूने काळजीपूर्वक अध्ययन केले पाहीजे... आणि तो उपदेश आपल्या आचरणात यावा म्हणून त्यांनी सांगितलेली ’साधना-उपासना’ काटेकोरपणे केली पाहीजे किंवा... अगोदर ’साधना’ केली पाहीजे... मग तसे ’आचरण’ पण आपोआप होईल.. अन्यथा त्या ’अभेद’ परम्यात्म्याचा अनुभव आपल्याला येणार नाही. आणि महत्त्वाचे म्हणजे...

आपल्याला मनुष्य देह मिळाला आहे... याचाच अर्थ, असा अनुभव प्राप्त करण्याचा...म्हणजेच मोक्षाचा अधिकारही आपणा सर्वांना जन्मत:च मिळाला आहे... फ़क्त आपण त्याचा वापर केला पाहीजे.

धन्यवाद!

माधव,

>>>१. मनुष्य जन्म हा randomly मिळतो. म्हणजे जीवाला जेंव्हा मनुष्य जन्म मिळेल तेंव्हा त्याने योग्य ते कर्म करून मुक्ती मिळवावी. तसे न झाल्यास परत एक random जन्म-मृत्युचा फेरा घेत पुढचा मनुष्य जन्म मिळण्याची वाट बघत रहावी. तो मनुष्य जन्म १० किंवा १००० किंवा ८४ लक्ष योनींनतर मिळेल किंवा कदाचीत तो लगेच पुढचाच जन्म असेल. पण जर जन्म randomly मिळत असतील तर मग मनुष्य जन्माचे मुक्तीच्या दृष्टीने महत्व उरत नाही. म्हणजे randomly मनुष्य जन्म मिळण्याऐवजी एकदम मुक्तीच का मिळू नये?

>>>२. प्रत्येक योनीत कर्ताभाव हा असतोच आणि त्यानुसार पुढील जन्म ठरत जातो. अर्थात हा कर्ताभाव आणि त्याने मिळणारे पाप-पुण्य हे प्रत्येक योनीनुसार ठरते. पण मग यातही इतर योनीत असताना जीवाचे पाप-पुण्याचे पारडे समसमान होऊन त्याला त्या योनीतच मुक्ती मिळू शकते.

वरच्या ठळक गोष्टींचे उत्तर मिळाले काय?

धन्यवाद!

हसरी,

ज्याच्यामूळे श्रीभगवंताचे सहज स्मरण रहाते... अशी गोष्ट निवडावी लागेल. असे स्मरण श्रीभगवंताचे 'नाम किंवा रुप किंवा नामरुप दोन्हीही' अशा प्रतिकांनी-आलंबनानी होऊ शकते. श्रीभगवंताचे नाम हे उपाधी रहीत आहे .म्हणजेच कोणतेही सोपस्कार त्यासाठी नाहीत.उलट ते सर्वकाळ, देहाच्या कोणत्याही स्थितीत व्हावे अशी अपेक्षा आहे.

पण, मनुष्य प्राण्याचा स्वभाव असा आहे की, त्याला काहीतरी प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय, आपण देवाचे काही करतो आहोत, असे वाटत नाही. मनात काही सकाम कामना बाळगून,काहीतरी करण्याच्या कामनेत सकळ उपाधीचा जन्म होतो.

उदा. जर पिठलेच खायची इच्छा झाली तर, पिठले हे पिठल्याप्रमाणेच होण्यासाठी सगळ्या कृती तंतोतंत पाळल्या पाहीजेत. या कृती म्हणजेच, मला पिठलेच पाहीजे.. असे अगोदरच, स्वतःच्याच मनाप्रमाणे ठरवून, त्या इच्छेच्या पूर्तीसाठी सर्व साधणे जमविण्याचा आटापीटा करणे. पण समजा नुसते हरभरे खाऊन पोट भरू शकते, हे जर लक्षात आले तर... काहीही इतर साधने न जमवता, नुसत्या हरभर्‍यावरही मूळ हेतु सहज साध्य होतो. पण हे दिसते तेवढे सोपे नाही. म्हणूनच परमार्थ 'सहज' आहे, पण तरीही 'सुलभ' नाही. त्यात 'गुढ' असे काहीच नाही, पण आपल्याला अनुभवाला येत नाही म्हणूनच तो आपल्याला गुढ झाला आहे... अन्यथा तो 'सहज' आहे.

म्हणूनच जसे 'गाय' असे नाव जर आपण उच्चारले तर, लगेच आपल्याला गायीच्या रुपाचे स्मरण तात्काळ होते, तसेच श्रीभगवंताचे स्मरण करून देणारे कोणतेही एकच 'नाम' आपण स्वतःहून निवडले तरीही चालते, मग त्याच नामाच्या सतत स्मरणातून श्रीभगवंताच्या 'रुपाचेही' दर्शन होईल.

एक उदाहरण घ्यायचे झाल्यास प.पू. श्रीतुकारामांचे घेता येईल, त्यांनी 'विठ्ठल' हे श्रीनाम निष्ठेने सतत १८ वर्षे घेतले, त्यानंतर त्यांना स्वप्नामध्ये श्रीसद्गुरु बाबाचैतन्यांची भेट झाली आणि त्यांनी स्वप्नातच, 'रामकृष्णहरि' या वारकरीसंप्रदायाच्या महामंत्राचा उपदेश केला... त्यामूळेच 'तुका' आकाशाएवढा झाला.

धन्यवाद!

माधव,

>>>पण जर जन्म randomly मिळत असतील तर मग मनुष्य जन्माचे मुक्तीच्या दृष्टीने महत्व उरत नाही. म्हणजे randomly मनुष्य जन्म मिळण्याऐवजी एकदम मुक्तीच का मिळू नये?

>>>पण मग यातही इतर योनीत असताना जीवाचे पाप-पुण्याचे पारडे समसमान होऊन त्याला त्या योनीतच मुक्ती मिळू शकते.

माधव, मुक्ती म्हणजे काय? 'मुक्ती' हा शब्दप्रयोग कशाचे तरी 'बंधन' आहे हे दर्शवितो आणि त्या 'बंधनाच्या' सापेक्षतेने 'मुक्ती' आहे, हे अगोदर लक्षात घेतले पाहीजे. म्हणजे मुक्ती च्या ऐवजी बंधनाचे स्वरुप काय? असा प्रश्नात बदल होईल. हे बंधन दूर झाले तर मग अर्थातच 'मुक्त' झाला असेच म्हणावे लागेल.

'पाप-पुण्य' हेच बंधनाचे स्वरुप आहे. ते समान होणे म्हणजे मुक्ती नव्हे...तर नष्ट होणे म्हणजे मुक्ती. अर्थात 'पाप-पुण्याने' कोणताही जन्म मिळाला तरीही, जो प्रर्यंत स्वस्वरुपाचे अज्ञान आहे तो पर्यंत बंधनही आहे. म्हणजेच अज्ञान असताना होणारे पाप असो वा लौकिक-अर्थाने पुण्य असो, ते बंधनालाच कारणीभूत होते.

म्हणूनच 'बंधन' जर नाहीसे व्हावयाचे असेल तर, अगोदर 'ज्ञान' झाले पाहीजे. मग वरच्या प्रश्नात अजून बदल करावा लागेल, बंधन नाहीसे होण्यासाठी जरूरी असणारे ज्ञान कसे मिळवायचे?

जर 'ज्ञान' नसेल, तर अर्थात बंधन आहे, म्हणजेच मुक्त नाही.... मग जन्म कोणताही असो. म्हणूनच हे 'ज्ञान' मिळण्याची (प्रयत्नाने) शक्यता असणारा मनुष्य जन्म महत्त्वाचा आहे, अन्यथा बंधन आहेच आहे. Happy

धन्यवाद!

नमस्कार,
सावट फार सुंदर समजावून सांगितलेत.
जर एखाद्या व्यक्तीच्या मरणोत्तर काही कर्म केले तर त्या व्यक्तीच्या सन्चितामधे फरक पडतो का?
धन्यवाद!

खूप सुरेख पोस्ट सावट. धन्यवाद.

मुलांसाठी चतुर्थ्या करतात असे ऐकले म्हणून या संकष्टी पासून चतुर्थीचा उपास करणार आहे. असे चालते का?
याची प्रोसीजर काय म्हणजे चंद्रोदयानंतर उपास सोडायचा एव्ढेच ना. कि अजून काही पाळावे लागेल?

गौरी,
नमस्कार! कशा आहात? धन्यवाद!:)

>>>जर एखाद्या व्यक्तीच्या मरणोत्तर काही कर्म केले तर त्या व्यक्तीच्या सन्चितामधे फरक पडतो का?

'संचित' म्हणजे साठलेले. एखाद्याचा मृत्यू झाला, म्हणजेच त्याचे त्या देहाशी असलेले प्रारब्ध 'कर्म-फळ' संपले. इथे 'कर्म-फळ' असा शब्द प्रयोग आहे. म्हणजेच क्रिया अगोदरच होऊन गेली आहे आणि त्या क्रियेची प्रतिक्रिया, म्हणजेच 'प्रारब्ध' भोगून झाले आहे. एकदा प्रतिक्रिया उमटल्यावर... ती प्रतिक्रिया थोपवता येत नाही... म्हणूनच प्रारब्ध हे भोगून संपपावे.. असे म्हणतात.

म्हणजेच संचितातले साठलेले... फलोन्मुख असे कर्मच.. 'प्रारब्ध' रुपाने 'देह' धारण करून भोगावे लागते. अशा विविध देहात.. जर मनुष्य देह मिळाला तर त्यात अजून एक 'सोय' असते.. ते म्हणजे..फळ रुपी प्रारब्ध भोगताना ... राहीलेले, पण अजूनही 'फलोन्मुख न झालेले' संचित संपवता येते... या करीता जे 'प्रयत्न' करावे लागतात.. त्यालाच 'पुरुषार्थ' म्हणतात. हा पुरुषार्थ ज्याचा त्याने... जिवंतपणीच करावयाचा असतो.

मग असा प्रश्न येतो की 'संचित' न संपवता जर एखादा मृत्यू पावला, तर असे संचित मरणोत्त्तर संपवता येते काय?...त्याला त्याच्या मृत्यू नंतर तसा 'देह' नसल्यामूळे स्वतःहून, तसे कर्म करता येत नाही.. म्हणूनच तो मरणोत्तर स्वतः संचित संपवू शकत नाही... हा झाला एक भाग!

मग अजून एक प्रश्न येतो.. एखाद्याने.. त्या संचितासहीत मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या नातवाईकाने.. त्या मृत व्यक्तीकरता काही कर्म केले तर.. त्या व्यक्तीच्या संचिता मध्ये काही फरक पडतो काय? हो फरक पडतो..पण मृत व्यक्तीच्या संचितात नाही.. तर त्या नातेवाईकाच्या संचितात पडतो! कारण त्याने, त्या मृत व्यक्तीने केलेल्या उपकाराचे स्मरण ठेवून कर्तव्य (निष्काम)भावनेने .. , केलेले 'कर्म' आहे म्हणून!

'अधिकारी' पुरुष अशा संचितामध्ये... काही प्रसंगी प्रारब्धातही, ढवळाढवळ करू शकतात. खरे सांगायचे तर एखाद्याचे 'प्रारब्ध' संचितातून बाजूला काढताना.. ते श्रीभगवंताच्या संकल्पानेच होते.. म्हणून त्यात नक्कीच, जीवाला संचित संपवता येण्याची सोय-संधी असते.. म्हणजेच त्याला 'मनुष्य' जन्म मिळतो.

धन्यवाद!

अश्विनीमामी,
नमस्कार, धन्यवाद! Happy

>>>मुलांसाठी चतुर्थ्या करतात असे ऐकले म्हणून या संकष्टी पासून चतुर्थीचा उपास करणार आहे. असे चालते का?
याची प्रोसीजर काय म्हणजे चंद्रोदयानंतर उपास सोडायचा एव्ढेच ना. कि अजून काही पाळावे लागेल?

अवश्य करा! 'आई आणि तिचा मुलासाठी असणारा वात्सल्यभाव' हा नितांत सुंदर भावापैकी एक आहे. उपवास म्हणजे, आपल्या उपास्याच्या समवेत वास करणे... म्हणजेच उपवासाच्या दिवशी..आपल्या उपास्याचे सतत 'स्मरण' ठेवण्याचा प्रयत्न करावा! खाणे सात्विकभाव (स्मरण) वाढवणारे असावे.

उपवास..म्हणजेच उपासना, जर निष्काम असेल, तर फळ 'अनंत' मिळते.

धन्यवाद!

सावट, नेहमीप्रमाणेच मस्त पोस्ट. आपण जे पंचपुरुषार्थ म्हणतो (धर्म, अर्थ, काम, मोक्ष, भक्ती - सहावा "मर्यादा" ) ते आणि वर तुम्ही उल्लेख केलेला पुरुषार्थ एकच का?

--
'अधिकारी' पुरुष अशा संचितामध्ये... काही प्रसंगी प्रारब्धातही, ढवळाढवळ करू शकतात. खरे सांगायचे तर एखाद्याचे 'प्रारब्ध' संचितातून बाजूला काढताना.. ते श्रीभगवंताच्या संकल्पानेच होते.. म्हणून त्यात नक्कीच, जीवाला संचित संपवता येण्याची सोय-संधी असते.. म्हणजेच त्याला 'मनुष्य' जन्म मिळतो. >>> अगदी अगदी. म्हणूनच सद्गुरुंची आवश्यकता.

गौरी, आज बरेच दिवसांनी दिसलीस ! Happy

अमा, उपवासात सावट यांनी जे म्हटलंय तेच जास्त महत्वाचे आहे Happy उपवासाच्या दिवशी चुकून, अनवधानाने काही बिनउपासाचं खाल्लं गेलं तर मनाला लावून घेऊ नकोस. प्रोसिजरपेक्षा भाव जास्त महत्वाचा.

अश्विनी,
हो, एकच आहे.

>>>प्रोसिजरपेक्षा भाव जास्त महत्वाचा.

खरे आहे! याच्या उलट अर्थही छान आहे, म्हणजे भाव असेल तर प्रोसिजर सहजभावाने पाळली जाते. जसे आईचे आपल्या मुलावर प्रेम आहे... हा 'वात्सल्यभाव', ही 'आई' या भूमिकेची सहज प्रवृत्ती(भाव) आहे. या भावाने युक्त असणारी आई, आपल्या मुलाचे सर्व काही आनंदाने.. न कुरकुरता करते, म्हणजेच प्रोसिजर आपोआप (सहजपणे-आपण वेगळे काही करत आहोत हा भाव मनात न येता.)पाळली जाते. म्हणजेच 'भाव' महत्वाचा आहे खरेच आहे, पण तशी 'कृती' घडलीतरच 'भाव' आहे हे ठरते, हे ही लक्षात येते.

म्हणजेच 'प्रेम' हे कृतीयुक्त आहे... किंवा 'कृती' आहे, पण ती भावासहीत(प्रेमासहीत) आहे. नुसतेच प्रेम आहे, श्रद्धा आहे असे म्हणणे, आणि तसे कार्य न होणे किंवा यांत्रिकपणे कार्य होणे, पण 'भावाचा' पत्ता नाही, ही दोन टोके आहेत.

एक सिद्धांत असा आहे की... प्रेमाने(श्रीभगवंताच्याप्रेमाने... विषयाच्या प्रेमाने नाही) झालेले.. काहीही श्रीभगवंताना चालते. पण असा प्रेमभाव उत्पन्न होण्यासाठी, श्रीभगवंताचीच कृपा व्हावी लागते...! आणि दुसरा सिद्धांत असा आहे की, 'प्रेम' हे सहवासाने वाढते. म्हणूनच श्रीभगवंताची कृपा होण्यासाठी, म्हणजेच श्रीभगवंताच्या प्रेमाची प्राप्ती होण्यासाठी, श्रीभगवंताचा अखंड सहवास पाहीजे... आणि असा सहवास श्रीभगवंताच्या नामाने सहज घडतो.

काय गंमत आहे नाही! प्रेम वाढावे म्हणून 'नाम' घ्यायचे, मग(प्रेम प्राप्त झाल्यावर, अगोदर नाही) तेच 'नाम', पण आता 'प्रेमा'सहीत घेतले जाते, म्हणजेच ते आईच्या वात्सल्यभावासारखे सहज होते, घ्यावे लागत नाही!:)

धन्यवाद!

सावट तुम्ही आय्डी बदलून ज्ञान प्रकाश अशी काहीतरी घ्या. विवेचन वाचून खूप आधार आणि ज्ञान मिळते आहे. तुम्ही खूप सुरेख समजावून सांगता. Happy उपास चालू केलेत. तिच्या लग्नापर्यंत नक्की करेन.

श्रीभगवंताचा अखंड सहवास पाहीजे... आणि असा सहवास श्रीभगवंताच्या नामाने सहज घडतो.
>> अगदी अगदी Happy

म्हणजेच 'प्रेम' हे कृतीयुक्त आहे... किंवा 'कृती' आहे, पण ती भावासहीत(प्रेमासहीत) आहे. नुसतेच प्रेम आहे, श्रद्धा आहे असे म्हणणे, आणि तसे कार्य न होणे किंवा यांत्रिकपणे कार्य होणे, पण 'भावाचा' पत्ता नाही, ही दोन टोके आहेत. >>> Happy कृती करत असताना अनवधानाने काही चूक झाली तर ती माउली समजून घेतेच, पण मी मुद्दामहून चुकीचे आचरण, आहार, विहार, विचार करत असेन आणि भाव आहे ना, मग झालं तर, तोच फक्त महत्वाचा असं म्हणत असेन तर तीच माउली त्याच प्रेमापोटी दोन फटके द्यायलाही कमी करणार नाही. आणि हेच कंटिन्यू राहिलं तर ती माउली फटके देणं सोडून देईल म्हणजेच फक्त साक्षीभावाने उरेल.

सावट तुम्ही आय्डी बदलून ज्ञान प्रकाश अशी काहीतरी घ्या >>> अमा, सावटांचं बारसं? Happy

हसरी कर्म नेहमी 'मी'च करतो.
पण जो पर्यंत खर्‍या मी ची ओळख पटत नाही तोपर्यंत मला कर्तेपणा न घेण्याची साधना करावी लागते. 'मी'ची ओळख पटल्यावर आपसूकच फक्त साक्षीभाव उरतो.
श्री गजाननविजय मध्ये दोन सुंदर उपमा वापरल्या आहेत हे कळण्यासाठी - पाण्यात रहाणारी गार (दगड) आणी कमलपत्र. दोघांच्या प्रारब्धाने त्यांना पाण्यात रहावे लागते पण दोघेही पाण्यापासून अलिप्तच असतात.

मला एक बारकेसे नवीन जाणवले. आपण हे जे उत्सव साजरे करतो व मग देवाचे विसर्जन वागैरे करतो. तसे असले तरी येतो जातो ते आपण. क्षुद्र मानव लोक. देव किंवा दैवी अस्तित्व आदि पासून अंतापर्यंत असतेच इथे. त्यांचे काय येणे व जाणे. आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर हे दैवी अस्तित्व आपल्याला जाणवते.

देवीच्या देवळात जावून कुंकु लावून घेताना मला वाटले हे तर आईच कुंकू लावत आहे आपण विधवा- सधवा असण्याचा इथे काहीही प्रश्न नाही. संबंधच नाही. आपण एक मुलगी व त्या दोघी देव्या आपल्या माता. कृष्ण हनुमान भाऊ सर्व डिवाइन एस्टॅब्लिशमेंट आपल्याला सामावून घ्यायला सज्ज अस्ते आपलीच वेळ यावी लागते. इथून पुढे खूप शिकायचे आहे.

देवीच्या देवळात जावून कुंकु लावून घेताना मला वाटले हे तर आईच कुंकू लावत आहे आपण विधवा- सधवा असण्याचा इथे काहीही प्रश्न नाही. संबंधच नाही. आपण एक मुलगी व त्या दोघी देव्या आपल्या माता. कृष्ण हनुमान भाऊ सर्व डिवाइन एस्टॅब्लिशमेंट आपल्याला सामावून घ्यायला सज्ज अस्ते आपलीच वेळ यावी लागते.>>> अगदी गोड भाव आहे तुझा Happy

अश्विनीमामी, सर्व 'ज्ञानी' संतांचे धन्यवाद! हे सर्व विचारधन त्यांचेच आहे.

माणूस हा शरीराने 'पशूत्व' असणारा आहे, पण विचाराने त्याला 'देवत्वाकडे' जाता येते. म्हणूनच विचाराला एवढे महत्त्व आहे... आणि तुम्ही अतिशय योग्य विचार करत आहात!

>>>मला एक बारकेसे नवीन जाणवले. आपण हे जे उत्सव साजरे करतो व मग देवाचे विसर्जन वागैरे करतो. तसे असले तरी येतो जातो ते आपण. क्षुद्र मानव लोक. देव किंवा दैवी अस्तित्व आदि पासून अंतापर्यंत असतेच इथे. त्यांचे काय येणे व जाणे. आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर हे दैवी अस्तित्व आपल्याला जाणवते.

पाप-पुण्याचा हिशोब माणसागणीक..त्याच्या विचारागणीक बदलतो, म्हणूनच योग्य काय आणि अयोग्य काय याचा निवाडा करण्यास अशा अनेक 'अस्थिर' मताचा उपयोग होत नाही. म्हणूनच ज्याला परमार्थ काय हे समजून घ्यायचे असेल त्यांनी श्रीसंताचे बोट धरूनच चालले पाहीजे. याविषयी श्रीसंताचे मत पाहील्यास ते आपण्(तुम्ही) करत असलेल्या विचारासारखेच आहे हे लक्षात येईल, ते म्हणतात... श्रीभगवंताचे विस्मरण हेच 'पाप', आणि जे जे त्याच्या स्मरणात असताना केले जाईल तेच 'पुण्य'.

>>>देवीच्या देवळात जावून कुंकु लावून घेताना मला वाटले हे तर आईच कुंकू लावत आहे आपण विधवा- सधवा असण्याचा इथे काहीही प्रश्न नाही. संबंधच नाही. आपण एक मुलगी व त्या दोघी देव्या आपल्या माता. कृष्ण हनुमान भाऊ सर्व डिवाइन एस्टॅब्लिशमेंट आपल्याला सामावून घ्यायला सज्ज अस्ते आपलीच वेळ यावी लागते. इथून पुढे खूप शिकायचे आहे.

'प्रारब्धाचे भोग' हे देहाला आहेत, आणि 'मी' म्हणजे 'देह' नाही, हे जाणणे परमार्थाचे 'ध्येय' आहे. देहाला प्रारब्ध भोगून द्यावे,त्याला चांगले-वाईट म्हणू नये... 'मन' मात्र श्रीभगवंताच्या स्मरणाला 'कामी' आणावे... म्हणजे पाप-पुण्याचा हिशोब ठेवायची गरज नाहीशी होईल. Happy

धन्यवाद!

Pages