भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.
भारताचा कसोटी संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, कोहली, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रग्यान ओझा, अभिमन्यू मिथुन, झहीर खान
भारताचा ट-२० आणि एकदिवसीय सामन्यांचा संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, रैना, सचिन, मनोज तिवारी, कोहली, रोहीत शर्मा, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, अश्विन, राहुल शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रवीणकुमार, इरफान पठाण, झहीर खान
ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), एड कोवॅन, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, डेव्हिड वॉर्नर, मायकेल हसी, डॅनियल ख्रिस्तियन, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), पीटर सिडल्, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, मिचेल स्टार्क, नेथन लॉयन
ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग, पीटर फॉरेस्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, डेव्हिड हसी, मायकेल हसी, मॅथ्यू वेड, ब्रेट ली, रायन हॅरिस, मिचेल स्टार्क, झेव्हिअर डोहेट्री, क्लिंट मॅके, मिचेल मार्श
ऑस्ट्रेलियाचा T20 चा संघ असा आहे -
जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), ट्रेव्हिस बर्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, झेव्हिअर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॉग, डेव्हिड हसी, ब्रेट ली, मिशेल मार्श, शॉन मार्श, क्लिंट मॅके, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक)
श्रीलंकेचा एकदिवसीय संघ असा आहे -
जयवर्धने (कर्णधार), अॅन्जेलो मॅथ्यूज (उपकर्णधार), उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगक्कारा (यष्टीरक्षक), दिनेश चंडिमाल (यष्टीरक्षक), लाहिरू थिरिमान्ने, थिसारा पेरेरा, फरवीज महारूफ, रंगना हेराथ, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा, चनका वेलेगेदेरा, धम्मिका प्रसाद, थिलान समरवीरा (अजून समावेश नक्की नाही)
_________________________________________________
हा आहे दौर्याचा कार्यक्रम -
ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१५-१६ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)
ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१९-२१ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)
_________________________________________________
पहिला कसोटी सामना -
२६-३० डिसेंबर, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी (धावफलक इथे आहे)
दुसरा कसोटी सामना -
३-७ जानेवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)
तिसरा कसोटी सामना -
१३-१७ जानेवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ८:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)
चौथा कसोटी सामना -
२४-२८ जानेवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया २९८ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
मालिकावीर : मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाने मालिका ४-० अशी जिंकली.
_________________________________________________
पहिला T20 सामना -
१ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
दुसरा T20 सामना -
३ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ८ गडी व २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
मालिका निर्णय: १-१ अशी बरोबरी
_________________________________________________
सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असे खेळले जातील.
पहिला एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
५ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ६५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
दुसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
८ फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ४ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, भारत ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ५, भारत ४, श्रीलंका 0
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१० फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, ऑस्ट्रेलिया ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ४, श्रीलंका 0
तिसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१२ फेब्रुवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ८, श्रीलंका 0
चौथा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
१४ फेब्रुवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: बरोबरी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत २, श्रीलंका २
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका २
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१७ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ८ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया 0, श्रीलंका ५
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया -0.११६, भारत -0.२४५, श्रीलंका +0.३२३
पाचवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१९ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ११० धावांनी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.६७२, श्रीलंका +0.३२३
सहावा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२१ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ५१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ११
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४८१
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२४ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ३ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका १५
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.३१८, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४२६
सातवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
२६ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
आठवा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२८ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२ मार्च, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
पहिला अंतिम सामना
४ मार्च, स्थळ - ब्रिस्बेन
दुसरा अंतिम सामना
६ मार्च, स्थळ - अॅडलेड
गरज भासल्यास तिसरा अंतिम सामना खेळवला जाईल.
तिसरा अंतिम सामना
८ मार्च, स्थळ - अॅडलेड
_________________________________________________
मला नाही वाटत की सचिन स्वत:
मला नाही वाटत की सचिन स्वत: महाशतकाबद्दल एवढा कासावीस झाला असेल. त्याच्या महाशतकाचा मोठा इश्यू मिडीयानेच जास्त केला आहे.>> अनुमोदन. मीडियाच कशाला, मागचे इथले archives खोदलेत तर दिसेल कि प्रत्येक मॅचच्या आधी "होउन जाउ दे रे बाबा" वाली खंडीभर पोस्ट्स.
पण तो सचिनबद्दल योग्य बोलला आहे - गेली १-२ वर्षे सचिन फक्त अधूनमधून वन डे खेळतोय. आधी त्याला वर्ल्ड कप पर्यंत फिटनेस ठेवायचा होता तोपर्यंत ठीक होते. पण आता त्याने(च) ठरवायला हवे की वन डे खेळायचे की नाही. टीम एक दोन सिरीज खेळते आणि मग अचानक तेंडुलकर लाईन-अप मधे दिसतो. त्याने इतरांचाही गोंधळ होत असेल. त्याने वन डेत ती राहिलेली दोन शतके मारून मोकळे व्हावे व मग फक्त टेस्ट्स खेळाव्यात. नाहीतरी आता वन डे मधे अजून काय करणे बाकी आहे?>> मलाही असेच वाटले होते पण हि लिंक बघ,
http://stats.espncricinfo.com/ci/engine/player/35320.html?class=2;templa...
२०१० च्या सुरूवातीला RSA विरुद्ध देशातली सिरीज, नंतर २०११ मधे सुरूवातीला RSA विरुद्ध दोन मॅचेस, World Cup नि थेट २०१२ मधे Austrialia. मधे दोन West Indies मालिका नि England झाले. त्यात तो खेळला नाहिये. ज्या प्रमाणात गांगूली म्हणतोय त्या प्रमाणात बदल होत नाहियेत. इथे मुद्दा काही वेगळाच आहे. मूलात कपिल किंवा गांगूली ह्यांचे शेवटी जे झाले तसे सचिनचे नक्कीच झाले नाहिये. त्याला substitute मिळणे निव्वळ अशक्य आहे. पण अजूनहीशत्याचा रोल एकत्रपणे सांघिक कामगिरीने करु शकतील असेही कोणी दिसत नाहित तेंव्हा ......
गांगुलीने सचिनला निवृत्त
गांगुलीने सचिनला निवृत्त व्हायला सांगितलेले नाही. मुख्य म्हणजे टेस्ट बद्दल तो काहीच बोललेला नाही. वन डे मधे खेळायचे की नाही ते एकदा ठरव असे म्हणाला - कधी कधी खेळतो आणि मग २-३ सिरीज खेळत नाही, याने कोणालाच फायदा होत नाही असे त्याचे म्हणणे आहे. मला ते पटले.
सचिनच्या निवृत्तीबद्दल सहमत. ते त्यानेच ठरवायचे आहे. सिडनी आणि मेलबोर्न सोडले तर त्याचा खेळ सध्या बोअर होतो आहे - २००५-०६ प्रमाणे- हे फॅन म्हणून सांगायचा आपल्याला हक्क आहे. त्याचे सध्या वन डेत खेळतो आहे तसे खेळणे बघायलाही बोअर आहे आणि टीमलाही काही उपयोग नाही. मधे चांगली २-३ वर्षे तो असा खेळत होता. त्यातून बाहेर आला तसा आताही यायला हवा. पहिल्या दोन टेस्ट्स इतका मस्त खेळल्यावर नंतर काय झाले कोणास ठाऊक!
टीमचे एकूणच काहीतरी बिनसलेले आहे हे नक्की. अजिबात पॅशन्/खुन्नस काही दिसत नाही. सगळे जण सध्या उरलेल्या काही मॅचेस उरकून एकदाचे भारतात जाउ, मग दोन वर्षे बाउन्स नाही नी स्विंग नाही, सगळे एकदम किंग होतील अशा विचारात दिसत आहेत.
२००३ व २००७ च्या ऑस्ट्रेलिया टूर्समधे जाम मजा आली होती. ही फारच बोअर झाली आहे.
असामी - मी पोस्ट लिहायला लागून पोस्ट केल्यावर तुझी बघितली. त्यावर हे - गांगुलीचे म्हणणे योग्य आहे. गेल्या दोन तीन वर्षात सचिन अधूनमधूनच खेळला आहे वन डेत. त्यातही मला वर्ल्ड कप पूर्वी तसे करणे योग्य वाटत होते. आता काय गरज आहे? फिटनेस आहे तोपर्यंत दोन्ही खेळावे. मला तर तो खेळायला हवाच आहे.
आणि गांगुलीचे काय झाले? चांगला परत येउन दोन वर्षे फॉर्ममधे खेळला की. शेवटच्या सिरीज मधे शतक, शेवटच्या मॅच मधे ८० मारले.
>> मला नाही वाटत की सचिन
>> मला नाही वाटत की सचिन स्वत: महाशतकाबद्दल एवढा कासावीस झाला असेल.
तो नक्कीच झाला आहे. ते त्याच्या खेळावरूनच समजतंय. सुरुवातीला नसेल कदाचित! पण जसजश्या बर्याचशा मॅचेस शतकाशिवाय जायला लागल्या तसतसं टेन्शन नक्कीच वाढणार यात शंका नाही. ऑल टाईम ग्रेट रेकॉर्डचं प्रेशर आहे ते आपल्याला नाही समजणार! त्यातून तो पडला फार सुपरस्टिशस! दोन तीन वेळा ९०च्या आसपास आउट झाल्यामुळे आणखी खचला असणार! गावसकरला पण मला वाटतं ब्रॅडमनचं रेकॉर्ड मोडताना आलं होतं!
अमोल, तो मह्त्वाच्या सिरीज
अमोल, तो मह्त्वाच्या सिरीज खेळतो आहे उघड आहे, जे चांगलेच आहे ना. तोवर इतर तयार होतील. Baptism by fire हा प्रकार आपल्या इथे चालत नाहि हे तर उघड आहे.
गांगूली आधी form मधे नव्हता, चॅपेल बरोबर अडकला, संघातून बाहेर गेला, रणजी खेळला, वैगरे गोष्ती त्याच्या बाबतीमधे घडल्या तशा सचिनबाबत होत नाहियेत. तो अजूनही out of form वाटत नाहिये जरी त्याचा score होत नसला तरी. कपिलबाबत काय झाले ते लिहित नाहि.
म्हणून मी आधी म्हटले तसे कि हे सगळे कुठले तरी कोणाबरोबरचे जुने हिशेब इतरांच्या माध्यमातून चुकवणे सुरू आहे असे वाटतेय
ज्येष्ठ खेळाडूंच्या
ज्येष्ठ खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणाबद्दलः
मी मागे अनेकदा सुचवले होते की क्षेत्ररक्षणाचेहि गुणांकन करावे. आणि त्यानुसार ठरवावे की ज्येष्ठ खेळाडू खरोखरच इतके वाईट आहेत का. उदा. बेसबॉलमधे एरर्स देतात, मोजतात. तसे काही क्रिकेटमधेहि करायला हरकत नाही. नुसतेच वय झाले म्हणून क्षेत्ररक्षण वाईट असे नसते, थोडा अनुभवाचाहि भाग असतो. नि ज्येष्ठ खेळाडू अनुभवानुसार, किती जवळ, किती लांब, थोडे डावीकडे, थोडे उजवीकडे असे उभे राहू शकतात.
खरे तर मला या सर्व खेळाडूंची
खरे तर मला या सर्व खेळाडूंची फार कीव येते.
बिचारे दोन महिने घरापासून दूर. घरच्या काळज्या असतीलच, आईवडीलांची तब्येत, इतर आवडत्या नातेवाईकांची काळजी. घरी काही समारंभ असतील तर त्यात भाग घेता येत नाही.
सचिनला भीति की मुलगा फेरारी घेऊन कुठे अपघात तर करणार नाही. त्याच्या मुलाचे वयच आहे असले काही करण्याचे, कुणितरी लक्ष ठेवायला पाहिजे. तो मुलगा इतका चांगला खेळतो हे पहायला आपण तिथे नाही. इ.
त्यात हे जिंकण्याचे प्रेशर, मिडिया वाले!
मला कसल्याहि काळज्या नाहीत. कुणाच्या काही अपेक्षा नाहीत माझ्याकडून,
तरी, भारतात आल्यावर माझे मन तर एकाच आठवड्यात सैरभैर होते.
ज्येष्ठ खेळाडूंच्या
ज्येष्ठ खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणाबद्दलःआहे > जेष्ठ म्हणून का. एकच फूटपट्टी सगळ्या देशांमधे लागू पडत नाहि.
जुने हिशेब असतील पण गांगुली
जुने हिशेब असतील पण गांगुली आणि सचिनमधे काहीच नव्हते. धोनी, सेहवागला ही त्यानेच आणलेला/टिकवलेला आहे. त्याला काही पुरानी दुश्मनी असेल तर ती फक्त द्रविडबद्दलच असू शकते.
मात्र गांगुली धोनीला काही खेळाडूंना झुकते माप देण्याबद्दल बोलतो ते मात्र तो स्वतःही तसे करायचा हे विसरतो. प्रत्येक कॅप्टनचे असे विश्वासू लोक असतातच. गांगुलीने इतरांचा विरोध पत्करूनच युवराज, हरभजन, दिनेश मोंगिया, संजय बांगर इत्यादींना सतत संधी दिली होती. फक्त सध्या फरक एवढाच आहे की धोनी चे चेले अजून चमकले नाहीत. कदाचित एक दोन वर्षे देशात अनुभव घेतल्यावर चमकतीलही.
गावसकरला पण मला वाटतं ब्रॅडमनचं रेकॉर्ड मोडताना आलं होतं!>> चिमण, बहुधा त्याला ते मोडल्यावर काही दिवस आलं असेल :), कारण नंतर १९८४-८५ मधे त्याचा फॉर्म ढासळला होता. उलट जसा तो बॉयकॉट, सोबर्स वगैरेंना पार करत गेला तसा पटापट शतके करत गेला. ८२-८३ च्या पाक टूर मधे एक, ८३ च्या विंडीज टूर मधे एक आणि विंडीज विरूद्धच्या भारतातील टूर मधे दोन शतके (व एक ९०) मारून त्याने तो मोडलाही.
महाशतकाचं टेन्शन हे सचिनच्या
महाशतकाचं टेन्शन हे सचिनच्या सध्याच्या 'बॅड पॅच्'चं कारण नसावं असं मला राहून राहून वाटतं. तो ८०-९०च्या वर जाऊन बाद होत राहिला असता तर कदाचित तसं म्हणतां आलं असतं. डावाच्या सुरवातीलाच, व तेही 'सेट' झाल्यावर, १५-२० धांवा झाल्यावर त्याच्यासारखा कसलेला व 'प्रेशर 'सिच्युएशन्स'ना सरावलेला फलंदाज असलं टेन्शन स्वतःवर येऊं देईल व बाद होईल , हे संभाव्य नाही वाटत. प्रश्न एवढाच आहे कीं हा तात्पुरता "बॅड पॅच"च आहे कीं .... ! पण हें ठरवणं त्याच्यावरच सोपवणं हें त्याच्या आतांपर्यंतच्या अभूतपूर्व कामगिरीला व त्याच्या निर्विवाद परिपक्वतेला खरी दाद देण्यासारखं होईल, असं माझं प्रामाणिक मत. 'बॅड पॅच' कारकिर्दीच्या कोणत्याही टप्प्यावर, कोणत्याही कारणाने येऊं शकतो व त्यातून खेळात तंत्रशुद्धता असेल तर फलंदाज बाहेर येऊन पुन्हा तळपूंही शकतो याची गावसकरसारखीं उदाहरणं आहेतच.
पण ,त्याचबरोबर, जर माझं मत मी इथं व्यक्त करतों तर कपिल, गांगुली व वेंगसरकर इत्यादीनी याबाबत आपलं मत व्यक्त करण्यात कांहीं वावगं नसावं, हेंही आहेच.
पण हें ठरवणं त्याच्यावरच
पण हें ठरवणं त्याच्यावरच सोपवणं हें त्याच्या आतांपर्यंतच्या अभूतपूर्व कामगिरीला व त्याच्या निर्विवाद परिपक्वतेला खरी दाद देण्यासारखं होईल, असं माझं प्रामाणिक मत. >> ++१
पण ,त्याचबरोबर, जर माझं मत मी इथं व्यक्त करतों तर कपिल, गांगुली व वेंगसरकर इत्यादीनी याबाबत आपलं मत व्यक्त करण्यात कांहीं वावगं नसावं, हेंही आहेच.>> त्यांनी खेळाडूपेक्षा खेळाबद्दल मत व्यक्त केले तर मला वाचायला अधिक आवडेल.
जुने हिशेब असतील पण गांगुली आणि सचिनमधे काहीच नव्हते. >> मी त्यांच्यात होते नाहिच म्हणतोय रे. "सगळे कुठले तरी कोणाबरोबरचे जुने हिशेब इतरांच्या माध्यमातून चुकवणे सुरू आहे "
>>> तो मह्त्वाच्या सिरीज
>>> तो मह्त्वाच्या सिरीज खेळतो आहे उघड आहे, जे चांगलेच आहे ना.
सचिन विंडीज, बांगला इ. देशांविरूद्ध न खेळता फक्त दादा देशांविरूद्धच खेळतो हे योग्यच आहे. त्यामुळे त्याच्याबाबतीत अतिक्रिकेटही होत नाही, तसेच काही नवोदितांनाही संधी मिळत आहे.
या सगळ्या तमाशात आता धोनीच्या बायकोनेही एंट्री केली आहे. तसेच "सचिनने निवृत्त व्हावे" या वगनाट्यात आता कीर्ति आझादसारखेही सल्ला देऊ लागले आहेत. कीर्ती आझादने सचिनला निवृत्त होण्यास सांगणे म्हणजे, पुलंच्या शब्दात (संदर्भ - नाथा कामत, व्यक्ती आणि वल्ली) बोलायचं झालं तर, रामायणात सेतू बांधताना त्यात मुरूम टाकता टाकता एखाद्या वानराने प्रभू श्रीरामाला 'बायको कशी सांभाळावी' यावर उपदेश करण्यासारखं आहे.
>>> म्हणून मी आधी म्हटले तसे कि हे सगळे कुठले तरी कोणाबरोबरचे जुने हिशेब इतरांच्या माध्यमातून चुकवणे सुरू आहे असे वाटतेय
१९८४ मध्ये इंग्लंडविरूद्ध भारतात झालेल्या कसोटी मालिकेत साधारण अशीच परिस्थिती होती. मालिकेतला पहिला सामना भारताने जिंकल्यावर (एल शिवरामकृष्णनचा तो पहिलाच सामना व त्यात त्याने बर्याच विकेट्स घेतल्या होत्या), दुसर्या व चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा आपल्याच गल्लीत पराभव होऊन मालिका १-२ अशी गमावली होती. ती मालिका सुनील वि. कपिल या वादाने गाजली. त्या मालिकेसाठी कपिलचे नेतृत्व काढून घेऊन गावसकरला कर्णधार केले गेले होते. दुसरा कसोटी सामना अनिर्णित होण्याच्या मार्गावर असताना अत्यंत बेजवाबदार फटके मारून संदीप पाटील व कपिल बाद झाल्याने भारताचा डाव कोसळून इंग्लंडला सहज विजय मिळाला. त्यामुळे संतापलेल्या सुनीलने तिसर्या कसोटीतून संदीप पाटील व चक्क कपिलला वगळले होते. खरं तर संदीप पाटीलने पहिल्या डावात ४२ व दुसर्या डावात ३० अशी बरी कामगिरी केली होती. पण त्यालाही कपिलच्या बरोबरीने हाकलण्यात आले.
हा निर्णय झाल्याच्या दुसर्या दिवशी कपिलने आपण काँग्रेस (आय) मध्ये प्रवेश करून राजकारणात प्रवेश करत आहोत अशी पत्रकार परिषदेत घोषणा केली. कपिलचे चौथ्या कसोटीत पुनरागमन झाले, पण तोही कसोटी सामना भारत हरला (त्या मालिकेत अझरूद्दीनने पदार्पणात लागोपाठ तीन कसोटी सामन्यात शतक केले होते). ती मालिका कपिल व सुनीलचे आपापसातले मतभेत, कपिलची तिसर्या कसोटीतून हकालपट्टी, कपिलचा कॉंग्रेसच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न आणि मालिकेत आघाडी घेतली असताना घरच्या मैदानांवर मालिकेत झालेली हार अशा अनेक गोष्टींमुळे गाजली होती. एल शिवरामकृष्णन व अझरूद्दीन हे दोन नवीन खेळाडू त्या मालिकेत भारताला सापडले.
सध्या गेले काही महिने धोनी वि. वरिष्ठ खेळाडू यांच्यात शीतयुद्ध चालू आहे असे वाटते व त्याचाच परीणाम म्हणून भारत हरत असण्याची शक्यता आहे.
आजच्या सामन्यात ऑसीज ५०
आजच्या सामन्यात ऑसीज ५० षटकांत ६ बाद २८० आणि श्रीलंका आतापर्यंत २४ षटकांत २ बाद १४३. श्रीलंका अत्यंत मजबूत स्थितीत असून सामना जिंकण्याची दाट शक्यता आहे. आजचा सामना लंका जिंकले तर श्रीलंका १५, ऑसीज १४ व भारत १० अशी गुणस्थिती असेल व सर्व संघांचे शेवटचे दोन सामने शिल्लक असतील. भारताला कोणत्याही परिस्थितीत हे दोन्ही सामने जिंकावेच लागतील.
थिसारा परेरा! थिस्सारा परेरा!
थिसारा परेरा! थिस्सारा परेरा! थिस्सारा पर्रेरा!!! आणि कुलसेखरा!!!!
शेवटच्या ९ चेंडूत मधे १९ धावा. एक सिक्स, दोन फोर.
भल्या पहाटे पाच वाजल्यापासून सामना पाहिला. धन्य तो चंदीमल. नि मॅथ्यूज. बिचारा चंदीमल, तो एकदम वेडा वाकडा नाचायला लागला, आणि पायचित झाला! तो त्या चेंडूवर काय करत होता याचे एकच एक्स्प्लनेशन आहे - माझी खात्री आहे ऑस्ट्रेलियाने त्याच्या पँटीत खाजकुयली टाकली असणार.
चला. आता भारताला काय करायला पाहिजे हे सगळयांनी सांगून झाले आहे, पण कुणि धोणी, वगैरे लोकांना सांगितले आहे का? सेहवाग, गंभीर यांना माहित आहे का? म्हणावे जरा आठ दहा दिवस कळ काढा, मग बोला काय बोलायचे ते!तोपर्यंत जिंकून दाखवलेत तर वाट्टेल त्याला नावे ठेवा, काहीहि बोला. कुणि लक्ष देणार नाही तिकडे.
श्रीलंकेने जबरी पाठलाग करून
श्रीलंकेने जबरी पाठलाग करून सामना जिंकला आणि गुणतक्त्यात व निव्वळ धावगतीत प्रथम स्थानावर पोहोचले. दिनेश चंदीमल प्रत्येक सामन्यात धावांचा रतीब टाकतो आहे.
भारताने श्रीलंकेचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलियाविरूद्ध घरच्या मालिकेत, इंग्लंडविरूद्ध इंग्लंडमध्ये, पाकिस्तान विरुद्ध दुबईत व द. आफ्रिकेविरूद्ध द. आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या सर्व मालिका श्रीलंका हरले व त्यामुळे दिलशानला कर्णधारपद सोडावे लागले. यातल्या बहुतेक सर्व सामन्यात जयवर्धने फ्लॉप होता. तो बहुतेक वेळा २० ते ३० च्या दरम्यान बाद झाला. पण त्याच्यावरचा विश्वास ढळू न देता श्रीलंकेने त्याला जवळपास प्रत्येक सामन्यात खेळविले व दिलशानने कप्तानपद सोडल्यावर त्याला पुन्हा एकदा कर्णधार केले. या एकदिवसीय मालिकेत तो पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आला असून आजच्या सामन्याचा तो "सामनावीर" ठरला. जीनियस खेळाडू काही काळ अपयशी ठरल्यासारखे वाटले तरी ते कोणत्याही क्षणी फॉर्मात येऊ शकतात.
आजच्या सामन्यानंतर अशी स्थिती आहे.
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका १५
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.३१८, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४२६
आता अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताने उर्वरीत दोन्ही सामने जिंकलेच पाहिजेत. पण संघातले सध्या सुरू असलेले शीतयुद्ध पाहता ही कामगिरी अशक्य आहे. आपल्यातले मतभेद तात्पुरते विसरून निदान आता तरी भारतीय संघ पेटून उठावा व लाज राखावी हीच त्या आकाशातल्या बापाकडे विनवणी!
आमेन!!!
छे आपण बाहेर आहोत. Pretty
छे आपण बाहेर आहोत. Pretty next to impossible for us to qualify.
छे आपण बाहेर आहोत नका हो असे
छे आपण बाहेर आहोत
नका हो असे म्हणू. उरलेले दोन्ही सामने बोनस सकट जिंकले की बीसीसीआय चा पहिला नंबर!
मास्तरा तू आपण हरणार म्हणतो
मास्तरा तू आपण हरणार म्हणतो आहेस का रविवारची मॅच? तसं असेल तर मी आपण जिंकणार असं म्हणणार!
माझ्या मते सेहवागला फक्त भारतातच घ्यावा. बाहेर त्याचा फारसा उपयोग होत नाही.
मला आता सचिनच्या नशिबी १०० वी सेंचुरी नाही असं वाटायला लागलं आहे. ब्रॅडमनला १०० सरासरी साठी शेवटच्या सामन्यात ४ धावा हव्या होत्या पण त्याही त्याच्या नशिबात नव्हत्या. तसं काहीसं होणार असं दिसतंय! त्यानं विंडीज विरुद्ध भारतात वनडे न खेळण्याची चूक केली असं माझं प्रामाणिक मत!
तेंडुलकर वर अॅण्डी झाल्टमनने
तेंडुलकर वर अॅण्डी झाल्टमनने लिहीलेला हा मस्त लेख
http://blogs.espncricinfo.com/andyzaltzman/archives/2012/02/_xxxxxx_is_t...
श्रीलंकेबरोबरचा या मालिकेतला
श्रीलंकेबरोबरचा या मालिकेतला दुसरा सामना आठवा. शेवटच्या १० षटकांत भारताला विजयासाठी फक्त ५९ धावा हव्या होत्या. फक्त ४ च गडी बाद झाले होते. गंभीर नाबाद ९१ होता. दुसर्या कोणत्याही संघाने हा सामना २-३ षटके राखून आरामात जिंकला असता.
पण ४१ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर धोनीच्या चुकीमुळे गंभीर धावबाद झाला आणि नंतर आलेल्या जडेजाने (१० चेंडूत ३ धावा) व धोनीने उरलेली षटके अत्यंत टुकुटुकु खेळून विजय अत्यंत अवघड करून ठेवला. ४८ षटके संपली तेव्हा विजय जवळपास अशक्य झाला होता. उर्वरीत २ षटकात धोनीला सुबुद्धी सुचुन त्याने मारामारी केली व शेवटी जो सामना अगदी सहज जिंकता येत होता तो सामना पराभवाच्या सीमारेषेवरून मागे खेचून बरोबरीत सुटला.
चिमण, आता तुझ्या लक्षात आलं असेल की त्या सामन्यात आपण हकनाक घालविलेल्या २ गुणांनी व श्रीलंकेला अक्षरश: दान दिलेल्या २ गुणांनी गुणतक्त्यात किती मोठा फरक पडला आहे. तो सामना भारताने जिंकला असता तर आज भारताचे १२, ऑस्ट्रेलियाचे १४ व लंकेचे १३ गुण असते व शेवटच्या २ सामन्यात दोन्ही सामने जिंकण्याची अशक्य जबाबदारी भारतावर येऊन पडली नसती व त्यापैकी एक सामना जिंकला असता तरी अंतिम फेरीत जाण्याची शक्यता शिल्लक राहिली असती.
उर्वरीत दोन्ही सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश करणे भारतासाठी अशक्य आहे. रविवारीच हे स्पष्ट होईल. जर तो श्रीलंकेचा सामना भारताने जिंकला असता तर या दोनपैकी १ सामना हरूनसुद्धा भारताला संधी राहिली असती.
अर्थात, भारत हरला तरी उर्वरीत सामन्यात धोनी नेमका चांगला खेळेल व विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातल्या त्याच्या खेळीमुळे आधीच्या ८ सामन्यातले त्याचे अपयश जसे झाकले गेले होते, तसेच याही वेळी होईल.
उद्या वरचे तिघेही खेळतील असे
उद्या वरचे तिघेही खेळतील असे दिसते.
माझा चॉईस - जडेजाला व रैना बाहेर काढून रोहित शर्मा किंवा मनोज तिवारी आणि राहूल शर्मा
रैना - असून फारसा फरक अजून तरी दिसला नाही. अर्थात फिल्डींग मध्ये कदाचित १०-१५ धावा वाचत असतील पण जिथे १०० धावांनी हरतो तिथे ११५ असे गणित होईल.
१. सचिन, २. सेहवाग, ३.गंभिर, ४.विराट, ५.धोणी, ६.पठाण, ७.प्रविण कुमार, ८.यादव हे नक्की. (खरे तर यादव पण वनडेत चालत नाही, पण पर्यायच नाही.)
९.जडेजा ऐवजी राहूल शर्मा कारण जडेजाने अजून तो ऑलराउंडर आहे असे ह्या सिरिज मध्ये प्रुव्ह केलेले नाही.
१० रैना ऐवजी मनोज तिवारी कारण तो पण चांगला फिल्डर आहे, तसेही रैना २०-२५ धावा निघाल्या तर काढतो मग तिवारीला संधी दिली आणि तो चालला तर?
११. रोहित शर्मा.
५ व्या बॉलर साठी मग रोहित, सेहवाग आणि विराट ह्यांना विभागून काम करावे लागेल.
६ स्पेशॅलिस्ट बॅटसमन, १ ऑलराउंडर (पठाण), ३ सेमी फास्ट आणि एक स्पिन आणि हो टॉस आपल्या बाजूने अन पहिली बॅटिंग. - तरच चान्स दिसत आहेत.
सचिन - नॅचरल गेम आवश्यक. मग भले तो ३० धावात आउट झाला तरी चालेल पण तो सचिन वाटला पाहिजे. विकेट टाकने, अनावश्यक फटके मारणे हे अपेक्षित नाही.
सेहवाग - निदान ५ ओव्हर्स आउट व्हायचे नाही ही (भिष्म) प्रतिज्ञा
धोणी - डेथ ओव्हर्स मॅनेज कराव्या लागणार. आपण ४० ओव्हर्स पर्यंत गेम आपल्याकडे ठेवतो नंतर १०० धावा निघतात.
जरा जास्तच अपेक्षा आहेत. पण आहे हे असे आहे, मॅच बघणारच
<< मॅच बघणारच >> "जिंका किंवा
<< मॅच बघणारच >> "जिंका किंवा मरा" या परिस्थितीत पूर्णपणे हताश झालेला संघ नांगी तरी टाकतो किंवा उसळून वर तरी येतो; उद्यां हे बघणं खरं मजेचं !
तिन्ही संघ एकमेकांशी एकदा
तिन्ही संघ एकमेकांशी एकदा खेळतील. म्हणजे एकूण ३ सामने शिल्लक आहेत. भारत वि ऑस्ट्रेलिया, भारत वि श्रीलंका आणि श्रीलंका वि ऑस्ट्रेलिया. भारताचे १०, ऑस्ट्रेलियाचे १४ व श्रीलंकेचे १५ गुण आहेत. सर्वात जास्त संधी श्रीलंकेला आहे, तर सर्वात कमी संधी भारताला आहे. तरीसुद्धा कोणाचीही अंतिम फेरीतला जागा अजून १०० टक्के नक्की नाही.
पाठलाग करताना २० टक्के षटके राखून विजय मिळविला किंवा प्रथम फलंदाजी करताना दुसर्या संघाला किमान २० टक्के धावांनी हरविले तर १ बोनस गुण मिळतो. साध्या विजयाचे ४ गुण, बोनस गुण असेल तर ५ गुण, बरोबरी झाली किंवा पावसाने सामना अनिर्णित राहिला तर दोन्ही संघांना २ गुण व पराभूत संघाला O गुण मिळतात. गुणांची बरोबरी झाली तर दोन्ही संघांपैकी ज्या संघाने दुसर्याविरूद्ध जास्त गुण मिळविले असतील तो संघ पुढे जाईल. निव्वळ धावगती बघितली जाणार नाही.
कोणते २ संघ अंतिम फेरीत जातील? या आहेत वेगवेगळ्या शक्यता.
शक्यता १) भारत ऑस्ट्रेलियाविरूद्ध विजयी, भारत श्रीलंकेविरूद्ध विजयी आणि ऑस्ट्रेलिया श्रीलंकेविरूद्ध विजयी - भारत १८, ऑस्ट्रेलिया १८, श्रीलंका १४. यामुळे भारत व ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत जातील.
शक्यता २) भारत ऑस्ट्रेलियाविरूद्ध विजयी, भारत श्रीलंकेविरूद्ध विजयी आणि ऑस्ट्रेलिया श्रीलंकेविरूद्ध पराभूत - भारत १८, ऑस्ट्रेलिया १४, श्रीलंका १९. यामुळे भारत व श्रीलंका अंतिम फेरीत जातील.
शक्यता ३) भारत ऑस्ट्रेलियाविरूद्ध पराभूत, भारत श्रीलंकेविरूद्ध विजयी आणि ऑस्ट्रेलिया श्रीलंकेविरूद्ध विजयी - भारत १४, ऑस्ट्रेलिया १८, श्रीलंका १५. यामुळे श्रीलंका व ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत जातील.
पण जर भारताने श्रीलंकेविरूद्ध बोनस गुण मिळविला, तर भारत व श्रीलंकेचे समान १५ गुण होतील पण भारत व ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत जाईल कारण भारताने श्रीलंकेविरूद्ध जास्त विजय (२ विजय, १ बरोबरी व १ हार) मिळविलेले असतील.
शक्यता ४) भारत ऑस्ट्रेलियाविरूद्ध विजयी, भारत श्रीलंकेविरूद्ध पराभूत आणि ऑस्ट्रेलिया श्रीलंकेविरूद्ध पराभूत - भारत १४, ऑस्ट्रेलिया १४, श्रीलंका १९. यामुळे ऑस्ट्रेलिया व श्रीलंका अंतिम फेरीत जातील कारण ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत २ सामन्यात बोनस गुण मिळविलेले आहेत, पण भारताने एकही बोनस गुण मिळविलेला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया पुढे जाईल.
पण जर भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्ध बोनस गुण मिळविला (भारत १५, ऑस्ट्रेलिया १४, श्रीलंका १९), तर भारत व श्रीलंका अंतिम फेरीत जातील.
थोडक्यात भारताला अंतिम फेरीत जायचे असेल तर (१) दोन्ही सामने जिंकावे लागतील किंवा (२) दोनपैकी एक सामना हारला तर दुसरा बोनस गुणासह जिंकावा लागेल व ऑस्ट्रेलिया व श्रीलंका सामन्याकडे डोळे लावून बसावे लागेल.
वरील सर्व शक्यता पाहता, भारत अंतिम फेरीत प्रवेश करण्याची शक्यता जवळपास शून्य आहे.
>>> उद्या वरचे तिघेही खेळतील
>>> उद्या वरचे तिघेही खेळतील असे दिसते.
माझा चॉईस - जडेजाला व रैना बाहेर काढून रोहित शर्मा किंवा मनोज तिवारी आणि राहूल शर्मा
झहीर अजूनही जखमी असल्यामुळे खेळणार नाही. विनयकुमार सुद्धा जखमी आहे.
माझा चॉईस - सचिन, गंभीर, तिवारी, कोहली, रोहीत शर्मा, रैना, धोनी, पठाण, अश्विन, प्रवीणकुमार, उमेश यादव
रैनाला काढू नये असे मला
रैनाला काढू नये असे मला वाटते, तिवारी पूर्णपणे unknown factor आहे आणि aus तरी तो अजून खेळलेला नाहिये. अशा वेळी त्याच्यावर नाहक दडपण येईल नि हरलो तर बळीचा बकरा बनेल. तसेच death overs करु शकण्याचा explosiveness रैना आणि धोनीएव्हढा तिवारीमधे नाही. रैना नि पठाण ह्यांना floaters म्हणून वापरुन बघायला हरकत नाही. तिवारीला घ्यायचेच असेल तर शर्माऐवजी घ्यावे, तोही पूर्णपणे हरवलेला दिसतोय.
मास्तुरेजी,<< वरील सर्व
मास्तुरेजी,<< वरील सर्व शक्यता पाहता, भारत अंतिम फेरीत प्रवेश करण्याची शक्यता जवळपास शून्य आहे >> हा तुम्हीच अभ्यासपूर्वक निष्कर्ष काढल्यावर, कोणाला संघात घ्यावं , घेऊं नये यावर डोकं खाजवणं खरंच आवश्यक आहे का ?
भाऊ तुम्ही डोकं खाजवू नका!
भाऊ तुम्ही डोकं खाजवू नका! चित्रावर लक्ष द्या! धोणीस १२वा म्हणून दाखवा.
किन्चित विषयांतर .. लोकसत्तेत
किन्चित विषयांतर ..
लोकसत्तेत पी.टी.आय. च्या सौजन्याने म्हणून आलेला हा लेखः
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=212895:...
आणि क्रिकइन्फोवरील हा सिद्धार्थ रविन्द्रन्चा लेखः
http://www.espncricinfo.com/commonwealth-bank-series-2012/content/curren...
आठवड्याभरापूर्वीही असाच योगायोग (?) दिसला होता...
<< आठवड्याभरापूर्वीही असाच
<< आठवड्याभरापूर्वीही असाच योगायोग (?) दिसला होता... >> अहो सर्कीटजी, हॉलीवूडचे अगणित सिनेमे हिंदीत भाषांतरित झाल्यासारखे वाटतात; त्यालाही आपण योगायोग म्हणतोच ना !!

<< धोणीस १२वा म्हणून दाखवा. >> मग तरी तो तसं कां होईना पण मैदानावर 'पाणी पाजायला' येईल, असं का ?
So Virender Sehwag gets
So Virender Sehwag gets rotated out of a match. He comes back and becomes captain. MS Dhoni gets banned for slow over-rates. He comes back and becomes captain. Michael Clarke misses a game with a calf strain. He comes back and becomes captain. Shane Watson misses a few months of cricket with an injury. He comes back and becomes captain. Spare a thought for Ricky Ponting - for him, the fortunes have swung the other way. Welcome to Game 10 of the Rotation, Rifts and Revolving-door captaincy Series.
Australia are set to play their third captain in three games. Michael Clarke is out again today with a sore back. Shane Watson will lead in his comeback game.
>>
कॅप्टन्सीबाबत '
कॅप्टन्सीबाबत ' Revolving-door captaincy Series " भारतालाही लागू होत असलं तरी सामन्यांच्या निकालाबाबत मात्र भारताने या ऑस्ट्रेलिया दौर्यात दुर्दैवाने ' " Exit Only " Door ' पॉलिसी अवलंबलेली दिसत्येय !!
Pages