स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कितीही चांगल्यातला नॉन-स्टीकचा तवा आणला तरी साधारणपणे वर्षा-दिड वर्षात त्याची वाट लागते. बाहेर डोसेवाल्यांकडे जसे तवे असतात ते घरगुती वापरासाठी उपयोगात येतात का? घावन, डोसे घालण्यासाठी इतर कुठल्या प्रकारचे तवे उपलब्ध आहेत का? कोणी वापरले आहेत का? किंमत किती? कुठे मिळतात? कृपया सांगा.

मंजू, बिडाचा तवा चांगला असतो.. डोसेवाले कोणता वापरतात माहित नाही. पण निर्लेप तवा १ ते २ वर्षात खराब होतो असा माझाही अनुभव. बीडाच्या तव्याची भांड्यांच्या दुकानात चौकशी कर. बीडाला हिंदी/गुजराथीत काय म्हणतात माहित नाही, तरीही मी ही बाजारात गेले की करीन. Happy

हो मंजू, बिडाचा तवा असतो तो. तसेच आप्प्यांसाठीही माझ्या माहेरी बिडाचेच आप्पेपात्र होते. साधारण भुलेश्वर किंवा दादर स्टेशन समोरच्या मार्केट्मधे मिळायला हरकत नाही.
************
परमेश्वराचा संकल्प म्हणजेच आदिमाया, शुद्धविद्या, ललिता, राधा. तर इंद्रियशक्तींच्या सहाय्याने मानव ज्या वासना उत्पन्न करतो व वाढवतो, त्या वृत्ती म्हणजेच्'मन' म्हणजेच मानवी संकल्प म्हणजेच 'माया' - 'अविद्या'.

मीही बिडाचाच वापरते तवा..

फक्त नविन आणल्यावर आई त्याच्यावर पाव लिटर तेल आणि पाव किलो कांदे चिरुन टाकते आणि मंदाग्नीवर तासनतास ठेऊन देते. असे केल्यानंतरच तो वापरायला तयार होतो असे तिचे मत आहे.

*****&&&*****
What others think about me is none of my business Happy

तेल आणि कांदा. हम्म्म. काहीतरी हेतू असेल त्यामागे. आईला विचारुन बघ ना की असे केल्याने तो तयार होतो म्हणजे नक्की काय होते?
************
परमेश्वराचा संकल्प म्हणजेच आदिमाया, शुद्धविद्या, ललिता, राधा. तर इंद्रियशक्तींच्या सहाय्याने मानव ज्या वासना उत्पन्न करतो व वाढवतो, त्या वृत्ती म्हणजेच्'मन' म्हणजेच मानवी संकल्प म्हणजेच 'माया' - 'अविद्या'.

बिडाचे तवे, आप्पे पात्र चांगली खरी... खरपुस पणा त्यावर छान येतो, मात्र तेल खूप पितात.... आणी निर्लेप चे तवे न धुता, फक्त फुसून ठेवावेत अस ऐकल होत.

बिडाचा तवा जर नीट सिझन केला असेल तर तेल पीत नाही. आता सीझन केला असेल तर म्हणजे काय तर वरती साधना म्हणाली तसे तेल आणि कांदा पसरून मंद गॅसवर ठेवायचे. असे साधारण २ वेळा करावे लागते. तो कांदा आणि ते तेल मात्र स्वयंपाकात उपयोगाला आणायचे नाही कारण त्यात लोखंडाची खर असते. बीडाचा तवा कितीही सिझन केला तरी पहिल्या एक दोन डोस्यांना तेल लावावे लागतेच.

राहीली गोष्ट निर्लेपची. निर्लेपपेक्षा हॉकिन्स फ्युचुराचे तवे एकदम मस्त आहेत. नारळाचा चोथा किंवा प्लास्टिकची घासणी आणि साबणाचे पाणी याने घासला तरी स्वच्छ निघतो. माझ्या मम्मीकडे आहे साधारण ४ वर्षापूर्वी घेतला होता फ्लॅट सरफेस वाला अजुनही तंदुरुस्त आहे. मात्र निर्लेपच्या मानाने महाग आहेत आठशे रुपयाना वगैरे तवा म्हणाजे जरा महाग वाटला होता तेव्हा पण मी हट्टाने घेतला होता आणि खरोखर चांगला निघाला. दर दोन वर्षानी दोनधे आडीसशे रुपय घालवण्यापेक्षा मला ते एकदा गेलेले पैसे बरे असे वाटले.

आमच्याकडे आंबोळीला बिडाचाच तवा वापरते आई. मस्त चव येते. जूना आहे अगदी दणकट आहे.
हा तवा वापरायच्या आधी घासून घेतो आम्ही. वापरल्यावर घासून कोरडा करुन, त्याला तेल लावून ठेवतो.
मी पहिला जॉब हॉकिन्स मधे केलाय. त्यामूळे ते बेष्ट्च.

हॉकिन्स फ्युचुराचे तवा, कढई आणी पॅन वापरायला छान आणी टिकाऊ.
- मनी.

माझा अनुभव बीडाच्या तव्याबाबत वेगळा आहे. आईला तिच्या आईने जवळ जवळ वेगवेगळ्या आकारचे चार तवे दिले तिच्या लग्नात.(मी एकावर हक्क आधीच सांगून ठेवला :)) हे सांगायचे कारण की एकदम दणकट आहेत. पडला वगैरे कोणावर तर हरे राम होइल. असो.
तो तवा एकदम वापरायला मी इथे काढला तर फक्त एकदा गरम पाण्याने नुस्ता धुतला. मग कांदा कापून फक्त कांद्याच्या एका बाजूने तेल लावून पुसून घेतला. मला कधीच डोसा चिकटला वगैरे त्रास नाही झाला. साबण कधीच लावू नये. डोसे वा जे काही झाले की नुस्ते गरम पाण्याने धूवून झाले की थोडेसे नवीन गरम तेल लावून बांधून ठेवावा.
आंबोळी , घावनं बीडाच्या तव्यावरच मस्त लागते मलातरी. Happy मी पूपो पण करते.

मला कोणी मिक्सर बद्द्ल माहिती देऊ शकेल काय? म्हण्जे कोणत्या कंपनीचा मिक्सर चांगला आहे?
जे एम जी आणि फूड प्रोसेसर्स कोणते चांगले आहेत? माझ्याकडे फूड प्रोसेसर आहे इनाल्साचा. पण त्याचा अनूभव चांगला नाही. आता जे एम जी घ्यायचा विचार आहे. कोणता चांगला आहे?
................................
माझे जगणे होते गाणे...

माझ्याकडे महाराजा व्हाइटलाइन आहे. ८ वर्ष झालीत त्याला. गेल्या महिन्यात मोटर बदलावी लागली. त्यानंतर थोडा त्रास देतोय. पण तरीही मला आवडले महाराजाचे फुड प्रोसेसर.

प्राची
माझ्याकडे सिन्गरचा फू.प्रो. आहे. अप्रतीम सर्व्हिस दिली आणि देतो. कणिक भिजवणे, हलव्यासाठी गाजरं, दुधी खिसणे, पाव भाजीसाठी/एरवीही जेव्हा खूप कांदा लागतो तेव्हा कांदा कापणे व एरवीचे ताक करून लोणी काढणे , वगैरे लिक्विड गोष्टींसाठीही कमालीचा उपयोग होतो. पालक , मेथी पराठ्याची पिठे फार पटकन व विदाउट कटकट होतात. पालेभाज्या मस्त चिरल्या जातात.
७/८ वर्षांनी आता परवा बेल्ट बदलावा लागला.
तसा माझ्या वहिनीकडे क्रॉम्टनचा फू.प्रो. आहे. त्याचा ही रिपोर्ट उत्तम आहे.

धन्यवाद.
मी बराच सर्व्हे करून philips HL 1632, Morphy richards Maestro, Sumeet यांवर येऊन पोहचले आहे. यांबद्दल कोणाला अनूभव आहे का?
................................
माझे जगणे होते गाणे...

आमच्या गावाकडे फुप्रो घेताना, आम्ही ह्या कंपन्या बघितल्या होत्या. मला वाटतं Morphy richards Maestro ची क्षमता बाकीच्या कंपन्यांपेक्षा जास्त आहे.

मला फुप्रो नको आहे. नुसता मिक्सर हवा आहे. कारण, रोज वाटणघाटण लागतंच. कोरडे मसाले, प्युरीज,पेस्ट्स यांकरता वापरावा लागतो रोज. या दृष्टीने कोणता मिक्सर चांगला आहे?
...............................
माझे जगणे होते गाणे...

फिलिप्स आणि सुमीतचे मिक्सर चांगले आहेत. दुकानदारही सांगू शकेल, कोणता चांगला आहे ते.
(इनाल्साचा अनुभव तुला चांगला नाही आला? Sad माझा तोच आहे फुप्रो, आणि अजूनपर्यंततरी बरा चालतोय)
-----------------------------------
Its all in your mind!

पूनम, इनाल्साचे फुप्रो चांगले आहेत. पण माझ्याकडे मॅक्सी प्लस आहे, ते मॉडेल डिफेक्टीव आहे असे मला सर्व्हिस सेंटरच्या माणसाने सांगितले. माहित नसल्याने नेमके मी तेच घेतले. चार वर्षे झाली आणि आत्तापर्यंत सात-आठ वेळा तरी दुरुस्ती केली असेल. सगळे पार्टस बदलून झाले आहेत. आता नावालाच इनाल्साचा उरला आहे. Happy
आता परत बिघडलाय. Sad म्हणून नवा घ्यायचा आहे.
................................
माझे जगणे होते गाणे...

प्राची
तू जर फक्त मिक्सी म्हणत असलीस तर सुमीतला पर्याय नाही. माझ्याकडे पुण्याच्या घरात सुमीतच आहे. २८ वर्षे वापरला. अर्थातच चुकून कधीतरी दुरुस्ती लागली....पण मिक्सर बेस्ट.

कालच्या मुंबई मिरर मधे "मायक्रोव्हेव" संबंधी एका लेखात एक पॅरेग्राफ होता. मायक्रोव्हेव मधे शिजवलेले अन्न, गरम केलेले पदार्थ हे अपायकारक असतात, त्यांचे मुळ गुणधर्म नाहीसे होतात. एव्हढेच नव्हे तर नियमीत उपयोगाने कॅन्सर जन्य रोग होण्याची शक्यता वाढते.

ह्या संबंधी कोणाला काही माहीती आहे का? हे कितपत खरे आहे (लेख एका डॉ. चा आहे) वाचल्या पासुन वापरायला गेले की लेख आठवतो.

>>>>>>एव्हढेच नव्हे तर नियमीत उपयोगाने कॅन्सर जन्य रोग होण्याची शक्यता वाढते.

ह्याबद्दल काही नक्की माहिती नाही पण मी ही ऐकलंय की शक्यतोवर मायक्रोवेव्ह टाळावा. मायक्रोवेव्हमध्ये जेवण गरम करायचं झाल्यास काचेची भांडी वापरावीत. प्लॅस्टिकची अजिबात वापरु नयेत वगैरे...

मिक्सर - सुमित आणि केनस्टार बेस्ट Happy
फूडप्रो बद्दल माहिती नाही Sad

-प्रिन्सेस...

हाय,

मला नविन फ्रिज घ्यायचाय. कुठला घेऊ?

माझ्याकडे सध्या व्हर्लपूल च टॉप माऊंट फ्रीझर वाला फ्रिज आहे. आता नविन बॉटम माऊंट फ्रिझर घ्यावा की साइड बाय साइड घ्यावा? दोन्हीचे फायदे तोटे काय? आणि कुठल्या ब्रँडचा घ्यावा?

मला २ वर्षांची मुलगी आहे त्यामुळे सेफ्टी हा सुद्धा मोठा फॅक्टर आहे....

प्लीज तुमचे फ्रिज अनुभव शेअर करा.....

लाजो
फ्रीझचा वापर कसा होणार यावरून ठरवावे
जर नेहमी मोठ्या प्रमाणात केलेले पदार्थ फॉइल ट्रे मधे घालून ठेवायचे असतील, मोठाले केक्स बनत असतील, छोटे छोटे अपेटायझर्स तयार करून फ्रीझमधे ठेवायचे असतील तर फ्रीझचे शेल्फ रुंद हवेत. ते साइड बाय साइड मधे जमणार नाही.

फ्रीझरमधे जास्त वजनदार गोष्टी सतत ठेवल्या जात असतील तर तो खालचा फ्रीझर त्रासाचा पडतो.पण मोठाले लसान्या किंवा बेक्ड पास्ताचे ट्रेज, मोठे फ्रोझन पिझ्झा वगैरे ठेवायचे असतील तर खाली फ्रीझर असला तर तो चांगला रुंद असतो.

साईड बाय साईड मधे फ्रीझर मधल्या बहुतेक गोष्टी उभ्या उभ्या काढता/ घालता येतात.

दारातच पाणी अन बर्फाची सोय असलेले मॉडेल्स पण असतात. त्याकरता लक्षात घ्यायच्या गोष्टी :
पाण्याचं कनेक्षन द्यायला किती सोपं/ अवघड आहे, पाणी हार्ड आहे का सॉफ्ट आहे, घरचे थंड पाणी किती पितात , बर्फ किती वापरला जातो इत्यादी. जर अगदी जास्त उपयोग होणार नसेल तर हे ऑप्शन घेऊ नये. फारतर एक ऑटो आइस मेकर घ्यावा, पण दारातून बर्फ / गार पाणी असलेला घेउ नये. या काँट्रॅप्शन मधे जागा चिकार जाते.

आतले शेल्फ सहज बाहेर काढून धुता येतील का हे बघावे.

हाय शोनू,

धन्स, लगेच उत्तर दिलसं.

फ्रिज आपल्या रोजच्याच वापरासाठी. मी अन्न (पिझ्झा/पस्ता/लसन्या इ इ) फ्रिझ करत नाही. आणि एंटरर्टेनिंग ही फार नसत. त्यामुळे फार मोठठाले ट्रेज वगैरे ठेवण्याची शक्यता कमीच. फ्रिझर मधे फक्त फ्रोझन वाटाणे, पोटॅटो वेजेस, नगेट्ट्स, पालक, पेस्ट्री असल्याच गोष्टी असतात.

मला पाणी आणि आइस मेकर दरवाज्यात असणारा फ्रिज नकोय. आणि पाण्याचं कनेक्शन घेणही कठीण आहे.

साइड बाय साइड मधे कूलर सेक्शन (फ्रिझर नव्हे) दूध, दही, बटर, भाज्या, इ इ ठेवायला जागा पुरेशी पडते का?

लाजो, तुला या वीकेंडला फोन करणं झालं नाही गं! संदीप न्हवता त्यामुळे मला बरेच काम होते, आज करेन घरी गेल्यावर. ए, माझा फ्रीज साईड बाय साईड, आईसमेकर/वॉटर डिस्पेंसर असणारा आहे. एल जी चा आहे, लेफ्ट साइड पूर्ण फ्रीझर आहे (मला मासे/चिकन्/लँब, कापलेल्या भाज्या, कडधान्ये, भारतमध्ये मिळणारे पराठे/समोसे इ. बर्‍याच गोष्टी ठेवायच्या असतात), राईट साईडला पण बरीच जागा आहे. पण शोनुने सांगितल्याप्रमाणे खूप मोठे ट्रे मावत नाहीत. माझ्या गरजांसाठी पर्फेक्ट आहे. तू मायर्स्/हार्वी ला जाऊन प्रत्यक्ष बघशील तर आजकाल बरीच मॉडेल्स आली आहेत, ती बघता येतील.

हाय लाजो

मी सध्याच LG चा bottom mount freezer घेतला. जर फ्रीझरचा वापर जास्ती नसेल तर सर्वात सोईचा.परत फ्रीझर चा साईजही मोठा आहे(top mount peksha).
Sears मध्ये चा॑गले डील्स असतात परत ते price match ही करतात. तुम्ही ऑनलाईन जाऊन models,capacity in litres,colour,energy saver/efficient,reviews,etc वाचून 3-4 short list करुन ठेवू शकता.

हाय भाग्या,

अगं हो मी उद्या जाणारच आहे बघायला, पण इथे विचारल की बर असतं. सगळ्यांचे अनुभव, सल्ले बघताना उपयोगी येतिल.

अंबर धन्स, माझाही विचार बॉटम माउंट घ्यायचाच होता, पण मग विचार केला की लेक सारखी उघडत बसेल. काही बाही काढेल नाहीतर आत टाकेल. तुझ्या बॉटम माऊंटला चाइल्ड लॉक आहे का?

हाय लाजो,

नाही ,माझ्या फ्रीझरला चाइल्ड लॉक नाहीये. माझा मुलगा तसा मोठा आहे, म्हणून मी विचारल ही नाही.
Sears चा केनमोर ब्रॅ॑ड ही चा॑गला आहे. Consumer reports मधले रिव्यूज उपयोगी पड्ले. गुड लक !

मला Hawkins futura hard anodised च्या कढईबद्दल माहिती हवी आहे. त्याचा तवा मी मागच्या पाच वर्षांपासून वापरते आहे. छान आहे. कढई पण रोजच्या स्वयंपाकासाठी चांगली आहे का? सध्या मी निर्लेप ची किंवा आपली नेहेमीची अल्युमिनीअम ची कढई वापरते.

Pages