स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सामसंग कुणी वापरलाय का??

प्रिन्सेस, मी सॅमसंगच्या शोरूमम धे बघून आले. पण सेल्समनची बडबड जास्त समजली नाही. १२,९९० किंमत सांगितलेय. प्राईस रेंजपण माहिती द्या ना.

नंदिनी माझ्याकडे LG ३० लिटर, ९०० पॉवर वॅट (फिदर टच) मॉडेल आहे. मी अडीच तीन वर्षापुर्वी रु.१०,०००/- ला घेतला

अतीवापरानेच दुष्परिणाम होतील अस पुनमसारखच वाटत मलाही.. Happy तसही सारख उलटसुलट चालुच असत की, अ‍ॅल्यूमिनीयम(हिंदालियम) नका वापरू, म्हणून स्टीलचे कढया इ.इ. कच्चं खा, अती कच्चं नका खाऊ इ.,तांबं वापरा, कल्हईवालं वापरा, न वापरा, लोखंडी कढया, तवे इ.इ.. असो.. Happy

माझ्याकडे पण कविताकडे असलेला मायक्रोव्हेव आहे.अडीच वर्षापूर्वी मोठ्या दीरांनी गिफ्ट दिला वाढदिवसाला. त्यामूळे किंमत वैगरे माहित नाही.
माझ्या मायक्रोमध्ये कन्वेंशन मोडवर केलेल्या चॉकलेट केकचा फोटो
16-08-09_1922.jpg

अन हा बनाना ब्रेड पहिल्यावेळी केलेला (अर्धच प्रमाण घेतलं अन मोठ्या भांड्यात केला म्हणून थोडा बसका दिसतोय पण साध्या ओव्हनसारखा स्पॉंजी झाला होता) Happy
25-02-09_1848.jpg

अल्पना मला रेसिपी धाड Happy टेंपटिंग आहे केक एकदम
कन्व्हेक्शन मोड वर अ‍ॅल्युमिनियमची केकची भांडी चालतात अस ऐकल. कुणाला त्याबद्दल माहिती आहे का? कोणी वापरली आहेत का? असतील तर कशी वापरायची? नेहमीच्या otg मधे वापरतो तशीच वापरायची का?
(मी कन्व्हेक्शनवर केलेला केक (वर फोटो टाकलाय तो) काचेच्या भांड्यातच केलाय)

अनघा तुला इमेल केलय बघ नुसत्या मायक्रो मोड वर केक कसा करयचा त्याच.

मायक्रो सेटिंग अस ठेव

मायक्रो मोड ऑन (start च बटण न दाबता पुढच सेटिंग पुर्ण करायच मग शेवटी स्टार्ट च बटण दाबायच)---> ९०० पॉवर (माझ्याकडे हिच हाय पॉवर आहे) किंवा १००%---->३ मिनिट--->७५० पॉवर किंवा ८०%---->२ मिनिट--->आता स्टार्ट बटण दाबा
अस केल्याने केकच भांड आधी हाय पॉवर वर ३ मिनिट फिरेल नंतर ऑटोमॅटिकली ७५० पॉवर वर २ मिनिट फिरेल.

येव्हढ करुन केक झाला नाही अस वाटल तर पुन्हा ३० सेकंद/१ मिनिट गरज असेल त्या प्रमाणे फिरवा.

बरं,, बघते मेल.. पुस्तिकेतल्या सूचना मेल्या इंग्रजीत नसल्याने फार भिती वाटते हे यंत्र वापरण्याची.. Sad
बघते, काहीतरी मार्ग काढते. Happy

मी रेगुलर अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यात केला केक. अन बनाना ब्रेड एकदा काचेमध्ये केला. आता नंतर मात्र दरवेळी अ‍ॅल्युमिनियम्चं आइसक्रिमचं लांबट ब्रेड बॉक्ससारखं भांड असतं ना त्यात केला. अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यात जास्त चांगला होतो केक काचेच्या भांड्यापेक्षा असा माझा अनुभव.
कविता चॉकलेट केक अन्नपुर्णा अन एलजी चे कुकबुक या दोन्हीच्या रेफरंसनी केलाय. धाडते रेसेपी.
अ‍ॅना, मी अजून केला नाही केक मायक्रो मोड मध्ये. पण होतो चांगला असं ऐकलय. ७-८ मिनिटातच होतो म्हणे. त्या केकची रेसेपी वेगळी असते. कविताकडे आहे बहुतेक.. Happy

अल्पना रेसिपी तिच फक्त मिश्रण जास्त पातळ करायच नाही. आणि अ‍ॅने इमेल काय चेकतेस आता वर दिलय ना मी सेटींग तेच वापरायच बाकी काही नाही

अल्पना धन्स मी अ‍ॅल्युमिनियनच भांड नाही वापरल अजुन कन्व्हेक्शन मधे आता करुन बघते Happy

हे भारतातले मायक्रोवेव्ह आणि इथे मिळणारे मायक्रोवेव्ह यात जमिन आसमानाचा फरक दिसतोय.

आणि वरती अभिजित ने दिलेल्या लिंक्स मधे तथ्य आहे. तुम्हाला पटत नसेल तर लोकांची माहिती चुकीची आहे असा निष्कर्ष कृपया काढु नका. प्लास्टीकचे अत्यंत घातक परिणाम शरिरावर होतात हे सत्यच आहे. इथे निदान बिपीए वगैरे माहिती देणे आजकाल गरजेचे आहे त्यामुळे कळते तरी. देशात सगळाच सावळा गोंधळ असतो Sad

१ ते २ वर्षांखालील लहान मुलांसाठी काही बनवताना अगदी पाणी गरम करण्यासाठी सुद्धा मावे अजिबात वापरु नये. त्याची अनेक कारणे आहेत. मी इशान साधारण दीड वर्षाचा होइपर्यंत त्याचे सर्व खाणे स्टीम कूक/हीट करायचे पथ्य कसोशीने पाळले. मग एकदा केले तर काय होते असे करुन कधीतरी पुर्णच सुटली ती सवय Sad पण तरीसुद्धा पदार्थ बनवण्यासाठी नाहीच वापरत. तसेच मायक्रोवेव मधुन होणारे लीकेज (विशेषत: expecting mothers ना) घातक असते असे वाचले होते. लीकेज तपासायची एक सोपी पेपर पद्धत आहे. ही सर्व माहिती शोधुन टाकते इथे.

मावेचा वापर किती कमी ठेवावा ह्याची लिटमट टेस्ट म्हणजे वापरायच्या आधी त्याच्या टॉपवरील धुळीत जो पदार्थ करायचा आहे त्याचे नाव लिहिता आले पाहिजे Proud

अरे वा.. इथे भरपुर माहिती मिळाली की...सगळ्यांना धन्यवाद. (नीधप, अल्पना, कविता - यांना सजेशन्स बद्दल; अभिजा, कराडकर आणि आर्च ला माहिती पूर्ण लिंक्स बद्दल)

मायक्रोवेव्ह वापरावा की न वापरावा.... हं मलाही हा प्रश्न आहेच. खरे सांगायचे तर, आज पर्यंत मी एकदाही माझ्या मुलांच्या कुठल्याच खाद्य पदार्थाला मावे वापरलेला नाही. त्यांचे जेवण मी नेहमीच गॅस वर बनवते / गरम करते. सासरी शार्पचा होता पण सिंडी म्हणते तसे त्याच्या टॉपवर भरपूर धुळ जमा झाल्यावरही मी काहीच वापर केला नाही म्हणुन साबांनी तो नणदेला देऊन टाकला Happy पूर्वी नोकरी करत असतांना ऑफिसातल्या मावेत जेवण गरम करणे आणि कधीतरी पापड भाजुन घेणे एवढेच केलय.

मायक्रो वेव्ह घेण्याचे काही कारणे म्हणजे,
१. नेहमी फसणारा केक Sad
२.तेल कमी वापरुन नॉन वेज बनवता येते, असे ऐकलय.
३. जे पदार्थ हॉटेल मध्ये खातो ते कधीतरी घरी करुन बघायची हौस पूर्ण करण्यासाठी (तंदुरी, टिक्का, ग्रिल्ड ई.)

यावर मावे व्यतिरिक्त दुसरा काही उपाय सुचवलात तर मावे कँसल Happy

मायक्रोवेव्ह हानीकारक आहे, याबद्दल मला शंका नाही. पण महिन्या दोन महिन्यात कधीतरी वापरायला हरकत नसावी असे वाटते.

यावर चर्चा व्हावी असे वाटते.

आर्च खुप छान लिंक. पण ह्यात फक्त प्लास्टिक भांडी मा.वे मधे वापरण्याबद्दल लिहीलय. मा.वे. सेफ ग्लास कुकवेअरस चालतील असा रोख वाटला. मी प्लास्टिक वापरतच नाही मा.वे. मधे

पण अभिजीत ने ज्या लिंक दिल्यात, मुंबई मिरर मधे मागे एक आर्टिकल आल होत त्या अनुषंगाने कोणी अधिक माहिती देऊ शकेल का मा.वे. च्या रेज मुळे काय अपाय होतो त्याबद्दल?

<मायक्रोवेव्ह हानीकारक आहे, याबद्दल मला शंका नाही. पण महिन्या दोन महिन्यात कधीतरी वापरायला हरकत नसावी असे वाटते,>
अगदि अगदि. मा.वे अति वापर हा हनिकारकच असतो. पण कधितरी वापरायला कहीच हरकत नाहि.

मुलींनो, मा.वे. वापरा किंवा न वापरा पण त्या वरील धूळ मात्र पुसुन टाकत जा. नाहीतर गॅसवर शिजणार्‍या पदार्थात ती जाईल आणि ते मात्र नक्कीच चांगले नाही. Happy ..
पण एक आहे, मा.वे खुप उपयोगी वाटतो मला. मी अन्न शिजवत नाही त्यात पण एखादा पदार्थ थोड्या प्रमाणात थोडासाच गरम करण्यासाठी नेहमीच गॅस लावण्यापेक्षा मी मा.वे मधे गरम करते. हल्ली दाणे,धणे,जीरे,रवा,खोबरे असे काय काय कोरडे पदार्थ भाजण्यासाठी मी वापरते (इथेच टिप मिळाली होती). ३ मिनिटात तयार. काचेमधे गरम करते.

पदार्थ माय्क्रोवेव्ह मधे नुसता तापवायचा आसेल तर त्यावर झाकण ठेवले पहीजे का? (तापवताना काचेच्या भान्ड्यात तापवणे हे लक्षात घेउन).जाणकारान्नी माहीती द्यावी.

हो, पदार्थ गरम करताना झाकण ठेवावे पण पुर्ण बंद करु नये. मा वे मधे ठेवायची जाळीची झाकणी मिळतात. दाणे, रवा इ इ भाजताना त्यावर पेपर टॉवेल टाकावा.
झाकण ठेवल्यामुळे पदार्थ जास्त गरम झला तर बाहेर उडुन मा वे खराब होत नाही.
एखादा पदार्थ गरम करायचा असेल तर शक्यतो इंटर्व्हल्स मधे करावा कारण मा वे मधे कधी कधी एकसारखा गरम होत नाही. वरती गरम पण आत थंड राहु शकतो. पदार्थ बाहेर काढुन, नीट ढवळुन परत गरम करावा.

डिशवॉशर घ्यायचा आहे. (इथे मुंबईत) घेतांना काय काय बघून घ्यावा? जुन्या हितगुज वर आहे थोडी माहिती, ती वाचली; अजुन काही असेल तर प्लीज सांगा.

काल सॅमसंगचा मायक्रोवेव्ह घेतला.

बहुतेक सर्व फीचर्स आणि अ‍ॅक्सेसरीज आहेत. आता ठेवाय्चा कसा आणि वापरायचा कसा एवढाच प्रश्न!!

माझ्याकडेही कवितासारखाच एलजी चा मायक्रोवेव्ह आहे आणि सध्या तरी माझ्याकडे तो प्रचम्ड प्रमाणात वापरला जातोत. त्याचाच आधार आहे सध्या Happy एल जी च हे मॉडेल छान आहे.
यात सा. खिचडी मी सारखीच करते. [मला थंड नी दिली होती ती रेसिपी...आणि काही कवितानी][यांच्याकडे मागा रेसिपीज त्या देतील...आणि मलाही त्या मेला लागल्या हाती]

मीही घेतला मावे- एलजी, २६ लिटर. सध्या पदार्थ गरम करणे सुरू केलंय. काल ग्रिलवर पापडही भाजला. आता काचेची भांडी आणली की शिजवायला सुरूवात करेन. बरोबर 'नीता मेहता' या बाईचं कूक-बूकही मिळालंय. काय सुंदर फोटो आहेत त्यात पदार्थांचे! Happy

कविता, मनिषा, इतर- तुम्ही 'मायक्रोवेव्हमधले पदार्थ' असा धागा सुरू करून त्यात तुम्हाला जमलेल्या रेसिप्या लिहिणार का?

पुनम त्या पुस्तकातही सगळ नीट लिहिलेल आहे. आणि एल जी चे कुकिंग क्लासेसही असतात. त्याचीही कुपन्स तुला मिळाली असतीलच ना बरोबर??

हो कूपन्स मिळाली, पण ती कधी वापरायची हे त्या डेमोवाल्याने नाहीच सांगितलं Sad मीही विचारायची विसरले आणि Sad कशी वापरायची असतात ती?

माझ्याकडेही कविताकडे आहे तोच मा.वे. आहे. ३ वर्ष झाली घेऊन, पण मी फारसा उपयोग करत नाही, म्हणजे जेवायला बसताना पोळ्या, भा़जी गरम करते, त्यासाठी मा.वे. बरोबर मिळालेली प्लॅस्टिक भांडी वापरते. कालच मी भरपुर सुके खोबरे भाजुन ठेवले, आणि काही दिवसांपुर्वी मी यात २ किलोची थालिपिठाची भाजणी भाजली, अजिबात हात दुखले नाहित. Happy आता दिवाळीची बरीच तयारी आधी करता येते. चिवड्याकरता शेंगदाणे, पोहे भाजुन घेते, बेसन लाडूचेपण बेसन थोडे मा.वे. मध्ये भाजते, मग थोडे गॅसवर भाजते.

केक साठी मला एक नॉन-स्टिक पॅन सारखे पॅन मिळाले आहे, त्यात केक केला पण माझा बिघडलाच. कविता मला सांगशील का प्रमाण आणि टेंपरेचर सेटींग तु वर दिलेले मी लिहुन ठेवते.

माझ्या माहितीप्रमाणे यात प्लॅस्टिक भांडी रिहिट साठी चालतात, पण शिजवण्यासाठी काचेचीच भांडी वापरावीत.
मी तर श्रीखंडाच्या रिकाम्या ड्ब्यातही गरम करते पण १ मिनिटाच्यावर नाही. मला सगळ्यात जास्त याचा उपयोग defrost साठी होतो, सकाळ्च्या घाईत खोबरे, कांदा-खोबरे वाटण फ्रिजरमधुन काढलेले यात defrost करुन घेतले की लगेच वापरता येते.

पूनम, मी केलाय तो क्लास, त्यावर फोन नं. दिला असेल तिकडे फोन करुन वेळ घे. साधारणपणे त्यांचे दिवस ठरलेले असतात, त्या दिवशी जायचे त्या तीन पदार्थ करुन दाखवतात आणि खायला पण देतात. Happy मला त्याची ३ कुपन मिळाली होती, तीन वेळा काय कप्पाळ जाणार ते बघायला म्हणुन मी माझ्याबरोबर २ मैत्रिणींना घेऊन गेले होते, तीन्ही कुपन एकाच दिवशी वापरुन टाकली. Happy पुण्याला एक पुस्तक मिळते त्यात सगळ्या रेसिपीज थोड्या मा.वे. मध्ये तर थोड्या गॅसवर कशा करायच्या ते दिले आहे. नाव मी विसरले, घरी गेल्यावर बघते, मी अ.ब. चौकातुन आणले होते.

Pages