स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंबर धन्स, माझाही विचार बॉटम माउंट घ्यायचाच होता, पण मग विचार केला की लेक सारखी उघडत बसेल. >> एव्हढा सहजासहजी उघडत नाही, विशेषतः भरल्यावर.

तुम्हाला मध्यम मार्ग हवा असेल तर bottom freezer with french doors घेउ शकतेस, पण दरवाज्यातील shelf space फुकट जाते.

कढईबद्द्ल माहित नाही, पण त्यांचा आत्ताच मी नवा कुकर घेतला. सही आहे, आणि माझ्या जुन्या कुकरपेक्षा अर्ध्या वेळात काम होतंय.

futura चा कुकर एकदम बेस्ट आहे. हा कुकर वापरायला लागल्यापासुन मला इतर कुठलेच कुकर आवडत नाहीत. कढई नाही पण मी एक भांडे आणले आहे futura चे भाज्यांसाठी. ते नॉन स्टिक नाहीये. त्यामुळे पातळ भाज्या/आमटी करायला चांगले आहे पण कोरड्या भाज्या जरा बुडाला लागतात.

रुनी, भाग्या धन्यवाद. कोरड्या भाज्या ज्याअर्थी लागतात त्याअर्थी ती कढई काही रोजच्या भाजीला उपयोगी पडणार नाही.

बाजारात ओवनप्रुफ काचेची भांडी मिळतात ती साध्या otg मध्ये वापरता येतात का? मला भिती वाटते तडकतील की काय म्हणुन... (माझ्याकडे लाईफलाईनचा ओटीजी आहे)

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

हो साधना ती वापरता येतात. पण वापरताना थोडी काळजी घ्यायची. म्हणजे गरम भांडे एकदम थंड पाण्यात वगैरे नाही बुडवायचे. तशी हि भांडी खास काचेपासुन बनवली असतात. जाड असतात.

अगदी गहन प्रश्न आहे माझ्यापुढे. रोजच्या वापराला चांगला चाकू कुठला ? आठ अन दहा चाकूंचा सेट नकोय मला . भाज्या, फळे, मासे , चिकन हे सगळं कापण्यासाठी एक अन ब्रेडचे स्लाइसेस करण्यासाठी एक असे दोनच हवेत. नुस्तं हेंकल्स किंवा वूस्टॉफ असं सांगू नका प्लीज . हेंकेल्सच्या साइटवर १०-१२ प्रॉडक्ट लाईन्स आहेत. नेमकं मॉडेल, पात्याची लांबी सांगा . सांतोकू चाकू वापरले आहेत का कोणी ? हॉलो एज चाकू खरंच चांगले चालतात का ? त्यांचं एक सळईसारखं उपकरण असतं त्याने चाकूची धार खरंच चांगली टिकते का ? बरेच लोक चाकू किचन केपर्स किंवा सोनोमा सारख्या दुकानात नेऊन धार लावून आणतात असे ऐकलेय. इथल्या कोणाला त्याचा अनुभव आहे का ?

आकृती १.
suntigerbrand1.jpg
आकृती २.
bread.jpg
आकृती ३.
deba1_0.jpg
बाकी चाकू धुवायला असल्याने आता इतकेच फोटो आहे, Happy
chaku.jpg
मी बरीच वर्षे सांतोकू च्या प्रेमात आहे.
आकृती १. सांतोकू हे चाकू एकदम मस्त. मी जवळपास सर्व गोष्टींसाठी वापरते. भाजी कापणे, जुलियन स्टाईलने कापणे भाज्या, चिकन कापणे हि कामे करते. आधीचे दोन खराब झाले म्हणून नवीन आणले suntiger चेच. मस्त होतं काम. ह्याच्यात दोन प्रकारची लांबी मिळेल. नाहीतर standard size असते. सांतोकू मध्ये ठसे असलेला मिळतो, तो मी भावाकडे वापरलाय त्याने सणकन टोमॅटो कापला जातो नरम चिरगळलेला असेल तरीही.
दुसरा चौकोनी टोक असलेला आहे तो त्याने मी चॉप्स करायला, मटण तुकडे करायला एक व हाणायला(नारळ फोडायला एक वेगळा ठेवलाय त्याने धार खराब होते म्हणून) वापरते.
आकृती २. आहे फळे कापायला मी दोन असे ब्रेड्चे नाईफ आणलेत, एकाने स्ट्रीकली फळे तर दुसर्‍याने ब्रेड.
आकृती ३. मध्ये आहे तो देबा टाईपचा ह्याने मी सुरुवातीला बरीच कामे करायची. पण ह्याचे टोक सांतोकू पेक्षा ज्यास्त निमूळते असल्याने फटकन कापायची भिती असते. ज्यास्त धारदार पण बसतो तो. लसणीवर एक फटका मारला की वरील्(सांतोकू व देबा नी एकदम चिरगळणार).
देबा नी सांतोकू मध्ये 'टोक' हाच फरक आहे. देबाचे टोक ज्यास्त निमुळते आहे. हात कापायची भिती सांतोकू मध्ये कमी वाटते. देबाने एकदा अक्खे नख कापले व बोटाचा वरचा भाग कापला होता. बोटाचा भाग पुर्ण कापला नाही हेच नशीब. Happy
बाकी दोन तीन लहान जुन्या सुर्‍या आहेत त्याने असेच साली सोलायला फळांची वगैरे ठेवलेत.

त्यामुळॅ बेसीकली ६ मस्त चाकू व १ छोटा चाकू (फळांची साल, हातानेच हातामध्ये धरून भेंडी वगैरे भाजी कापणे) मध्ये काम होते मस्त.

मी सर्व चाकू एकदम घेतले नाहीत. बर्‍याच ठिकाणी शोध घेवून वगैरे घेतले. ह्यात भावाचे ज्ञान उपयोगी पडले. तो धार तर घरीच काढतो. चायनीज दुकानात ती सळी मिळते. माझ्याकडे नाहीये. actually वरील तिन चाकूत काम होते पण घासायला पडला असेल तर extra बरा.जेवणाची आवड असेल तर हि आयुधे हवीच. इति चाकू पुराण पुर्ण. Happy

स्वयम्पाकघर आहे की खाटिकखाना? >>> Lol
१००% बायकांना किचनमध्ये पदार्थ कापावे लागतेत. पुरूष किती टक्के किचनमध्ये पदार्थ कापतात?
अवांतर : रोज सकाळी चालायला जाते तेव्हा झोपडपट्टीतले पुरूष भाजी कापताना, काही भांडी घासताना दिसतात, कपडे धुताना किंवा भाकरी हातावरच थापताना सुध्दा दिस्ले आहेत. जीव निवला पाहून.. Happy

माझ्याकडे चित्र क्र. ३ मधे दाखवलेला चाकू आहे.. एकदा असाच स्वयंपाक करताना ख्रिश्चन धर्म प्रसारक आणि बायबल ची माहीती देणारा एक मनुष्य आला.. मी आत कांदा चिरत होतो..आणि तोच चाकू घेउन दार उघडले Proud .. तो पाहिल्यावर त्याने पटकन एक पत्रक दिले आणि धूम ठोकली ..तो परत आलाच नाही घरी.. आता असे कुणी लोक आले की मी मुद्दाम तो चाकू घेउन दार उघडतो..

छान माहिती मनःस्विनी. सांतोकू बद्दल अनुमोदन!
शोनू, अगदी २ नाही गं, ३-४ तरी लागतील. सांतोकू, ब्रेड कापायला, एक साधी छोटी सुरी आणि एक मासे-चिकनसाठी.

अ‍ॅना, ते वाक्य जरा फेरफार करून माझ्या आजीचे तोंडचे आहे बरे. ते ही घराच्या आजूबाजूला रहाणारे सौदिंडियन पुरुषांकडे पाहून. तिच्या मते सौदिंडीयन पुरुष बरेच पूर्वीपासून(जुन्या काळापासून) स्वंयपाकाची काम त्यांच्या बायकापेक्षा मस्त करतात. स्वंयपाक पण चवीष्ट असतो. (वाद नको मराठी पुरुष Vs सौडींडीयन ,गमतीने लिहिलेय). Happy

ते लिहीण्याच्या भरात चाकुमाहिती छान आहे ते विसरले लिहायचे.. Happy भारतात कुठल्या सुर्‍या चांगल्या ग पण? ह्या वरच्या सुर्‍या फारतर मुंबई-पुणे मिळत असतील - चायनीज आहेत का?
मराठी बाई आता फारशी दु:खी राहिली नाही, पण तरीही थोडीशी सुध्दा मदत करणार्‍या पुरूषांचं प्रमाण अगदी नगण्य आहे, त्याची खंत वाटते.. Sad

पायरेक्सच्या बोल्सची प्लास्टिकची रेप्लेसमेंट झाकणं कुठे मिळतात माहित आहे का?

आयकीयात मिळाली होती मला. मी एक झाकणासकट MV मध्ये गरम करून खराब केले होते. माझ्या मैत्रीणीला बेड बाथ मध्ये सुद्धा मिळाली होती असे 'ती' सांगत होती.(मला नाही मिळाली मात्र...).

शेवटचा उपाय म्हणून pyrex site वर जावून ऑर्डर करायचा होता पण एका झाकणासाठी कशाला मगजमारी करा.(बर्‍याच दिवसाने हा गुज्जु शब्द वापरला... टिपीकल मुंबई हिंदी) Happy

पायरेक्स्/कॉर्निंगच्या दुकानात पाहिली आहेत. आयकिया चे साईझ वेगळे पडतात त्यामुळे एकमेकांचे एकमेकाना फिट होणार नाही.

मला खलबत्ता घ्यायचाय. भारतातून स्टीलचा आणला तो गंजला त्यामुळे फेकून दिला. इथे लाकडाचे वाटावेत असे खलबत्ते पाहिले. हलके आहेत. त्यात चांगलं जाईल का कुटलं? मला वेलची कुटण्यासाठीच हवा आहे.

सायुरी,माझ्याकडचा मार्शल मधून आणलेला लाकडी खलबत्तात वेलची मस्त कुटली जाते,थोडीशीच साखर टाकून. बाहेरून गरम तेलाने पुसते कधी कधी त्यामुळे पॉलीश टिकलेय. आतून जरासा ओलसर कपड्याने पुसते काम झाले की. ३ वर्षे झाली अजून तरी ठिक आहे.

Pages