निसर्गाच्या गप्पा (भाग - ५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 December, 2011 - 06:16

सर्व निसर्गप्रेमींच्या निसर्गमय माहीती व गप्पांनी निसर्गाच्या गप्पांचा पाचवा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू, ५ व्या भागाबद्दल अभिनंदन!!
मनीमाऊ, अगं कित्ती सुंदर फूल आहे ते...... क्यूटच!
जिप्सी, स्वारीवरून परतलास वाटतं!

दिनेशदा, तुम्ही आज ईतक्या उशिरा कसे? आणि मुख्य म्हणजे निर्माती (जागू) ती कुठे?
चला, या सगळे नव्याने गप्पा मारायला..............:)
<<<अरे वा, जागूला कोलाजही जमते तर.>>>>> जागु सर्व कलात पारंगत आहे..!

अरे माझ अभिनंदन काय करताय ? तुम्हा सगळ्यांच अभिनंदन तुम्ही सगळेच ह्या धाग्याचे चालक-मालक आहात.

जिप्स्या कशी झाली सफर ? फोटो टाक लवकर.

मनी खुपच सुंदर फुल. दुसर्‍या फुलामध्ये मला गावठी गुलाबाचा सुगंध जाणवला.

माधव ती कुयलीची फुले आहेत.

पद्मजा फुले सुंदर आहेत.

सगळ्यांचे अभिनंदन.

सुंदर कोलाज, सुंदर फुले, सुंदर नि ग.......
कोकणातील एक समुद्रकिनारा - बहुतेक रत्नागिरीशेजारील.......

bhatye1.jpg

पंचहजारी मनसबदार Happy >>> +१

सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन आणि शुभेच्छा Happy

रायगडाच्या वाटेवर टिपलेला हा प्रचि

जागु, ५व्या भागाबद्दल तुझे आणि सगळ्यांचे खुप खुप अभिनंदन.. Happy
खरचं कोलाज अप्रतिम जमलयं...
पुरंदरे, स.किनारा सुरेखच... ईन मीनतीन : तुमचाही प्रचि. मस्तच फुलांचा. Happy
आशुतोश, अप्रतिम प्रचि..

खुपदा झाडाच्या आडव्या फांदीवर काही छोटी छोटी झाडे उगवतात (बांडगुळे नाहीत) इंग्लिशमधे त्यांना एअर प्लांटस असा एक शब्द आहे.
तर या झाडांना मराठीत काही शब्द आहे का ? किंवा त्यांचा एखादा जनरल फोटो आहे का ? मला दोन्ही हवेत. माझ्याकडे काही फोटो आहेत आणि बरीच माहिती आहे. हे मिळाले कि एक छोटा लेख लिहायचा आहे.

मी कालच एक वीज पडुन मेलेल ताडाच झाड पाहील.फक्त त्याचे खोड उरल होतं. त्याच्या माथ्यावर दुसरच कसल तरी झाड उगवल होत. बघायला तर अजबच वाट्त होतं.

तेच ते. तसेच काही फोटो मला हवे आहेत ! पण या बाबतीत पाम वर्गात सहसा असे दिसत नाही, कारण एकतर त्यांना फांद्या नसल्याने बेचके नसतात. दुसरे खोडं सहसा गुळगुळीत असतात, तिसरे नारळाच्या वगैरे झावळ्या पडताना, खोडाला घासून जातात त्यामूळे तिथली झाडे आपोआप साफ केली जातात.
(तरीपण खास माडावरच ऊगवणारे एक अळू, खास भाजीसाठी निवडतात.) त्यामूळे हि झाडे आडवी झाल्याशिवाय किंवा त्यांचे शेंडे उडल्याशिवाय, बाकिची झाडे त्यावर जगू शकत नाहीत.

Pages