निसर्गाच्या गप्पा (भाग - ५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 December, 2011 - 06:16

सर्व निसर्गप्रेमींच्या निसर्गमय माहीती व गप्पांनी निसर्गाच्या गप्पांचा पाचवा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुप्रभात लोक्स!!! Happy

शुक्रवारी हापिसातुन थोडा वेळ काढुन मी आणि मायबोलीकर माधव पुन्हा पवईतील त्या उद्यानात गेलो आणि मुचकुंदासारख्या दिसणार्‍या फुलाचे फायनली फोटो काढले. Happy

कळी

फुल

शेंग

हे अजुन एक झाड आणि फुल दिसले. नाव माहित नाही (ओळख पटावी म्हणुन पानांचेही फोटो काढलेत Happy )

फुल

हे त्याचे फळ

हे अजुन एक (हि दोन्ही झाडे/फुले एकच आहेत का?)

दिनेशदा, तुम्ही जानेवारीत भारतभेटीवर आल्यास तुम्हाला किडनॅप करून या पवई उद्यानात नेण्यात येणार आहे याची कृपया नोंद घ्याच. Proud

जिप्सी - ती शेवटची लाल फुले - स्कार्लेट कॉर्डिया वाटताहेत - Cordia sebestena (family - Boraginaceae) .
मुचकुंदच आहे तो - कळी - फुल - पुण्यात चक्क "तुळशीबागेत" आहे हा वृक्षराज - टाकीन कधीतरी प्र चि याच्या..........

धन्यवाद शशांक
अरे व्वाह, म्हणजे मी मुचकुंदाचे झाड बरोबर ओळखले होते (पहिल्यांदाच आणि ते ही फुल नसतानाही :-), फक्त त्याच्या शेंगेला कळी समजलो होतो Proud )

स्कार्लेट कॉर्डिया वाटताहेत - Cordia sebestena (family - Boraginaceae)>>>>याच मराठी (प्रचलित) नाव काय आहे? आणि हि दोन्ही फुले/झाडे वेगवेगळी आहेत ना?

स्कार्लेट कॉर्डिया वाटताहेत - Cordia sebestena (family - Boraginaceae)>>>>याच मराठी (प्रचलित) नाव काय आहे? आणि हि दोन्ही फुले/झाडे वेगवेगळी आहेत ना?>>>>> ते पहिले फुल (गवतावरचे) व फळ कळत नाहीये - ते स्कार्लेट कॉर्डिया नाही. त्याचे एकंदरीत झाड कसे आहे ?
- शेवटचा स्कार्लेट कॉर्डिया - मराठीत नाव माहित नाही........... इथेही दोन वेगवेगळी झाडे एकत्र आहेत असे पानावरुन तरी वाटत आहे - जाणकार अधिक माहिती देउ शकतील..........

किडनॅप कशाला, सगळेच भेटू तिथे.
स्कार्लेट कॉर्डियाची फळे आधी हिरवी मग पांढरी होतात.
मुचकुंदाच्या फुलाचा फोटो सकाळी लवकर काढावा लागतो,
त्यावेळी ते छानच दिसते.
पण हे मुचकुंदाचे झाड, निदान पाने तरी वेगळी दिसताहेत.

व्वा दिनेशदा, काय प्रसन्न आणि टवटवीत गुलाब आहे. चिखलात कमळ उगवते तसं गटाराच्या कडेला हा टवटवीत गुलाब.

मस्तच फोटो आहेत जिप्सी. नविन माहीती बद्धल धन्यवाद जिप्सी आणि शशांक दोघांनाही.

चिटिंग आहे Wink
मी पवईत असताना नाही भेट्लं कोणी ....अर्थात दोष माझा

माझे आजोबा राजापूर हायस्कूलमधे १९६० पर्यंत मुख्याध्यापक होते >>

माझी आई होती ह्या शाळेत ह्या सुमारास :-). माझे आजोबा तलाठी होते..राजापूर मध्ये..आईच बालपण तिथेच गेलय Happy

मला जरा मदत करा. मला एक तुळसही सांभाळता येत नाहीय Sad निसर्ग, झाड, फुल बघायला फार आवडतात पण सांभाळायचे ज्ञान अगाध आहे Happy तर पक्ष्यांपासुन तुळस वाचवण्यासाठी काय करता येईल? ४ महीन्यात ३र्‍यांदा तुळशीच रोपट आणलय. कबुतर खुडुन खुडुन वाट लावतायत. मला यातल फारस काही कळत नाही पण अशा रोपट्यांसाठी, कुंड्यांसाठी जाळी मिळतात का पक्ष्यांपासुन वाचवण्यासाठी? मी सध्या पातळ कपडा आणि पुठ्ठ्यांनी उंच आडोसा केलाय तात्पुरता पण मग तुळशीला पुरेसे ऊन मिळत नाहीय. काय करु? खिडकीबाहेर पॅसेज मध्ये कुंडी ठेवलीय पण कबुतर हैराण करतायत.

हुश झाले वाचुन सगळे.

अरे धडपडणार्‍या मुलींनो जरा सांभाळा. काळजी घ्या. (आणि तुम्हाला मुलींनो म्हटले म्हणुन सरळ मस्त हवेत तरंगायला लागा म्हणजे चालायला नको)

जागु ती पिकासाची माहिती माझ्या वि. पु मधे पण टाक.

दिनेशदा आपल्या फुलाच्या राजाचा तिकडे काही म्हणजे काहिच मान नाहि का हो? सरळ गटाराच्या कडेला Sad

रच्याकने, खार गोकर्णाच्या बिया खाते का? काल माझ्याकडे ग्रिल वर बसुन ती मस्त शेंगा कुरतडत होती. का दाताला धार लावत होती तिच्या? नंतर पाहिले तर शेंगेत बिया तशाच होत्या. मग तिने फक्त कुरतडले की पोट भरले म्हणुन नंतर खाल्ले नाही?

आणि दुपारी २ पोपट वायरवर बसुन सर्कस करत होते. खाली डोके वर पाय Happy

दोन्ही फोटो मोबाईलवर आहेत. चांगले असले तर(च) टाकीन. (जागुने शिक वले तरच टाकीन Happy )

कित्ती ते नखरे नी नाटक Uhoh

साक्षीमी,
तरी बरं कबुतरचं खात आहेत. माझ्या घरी सध्या माझी लेक खाते तुळशीची पानं किती सांगुन झालं तिला(तुळशीला) भु होईल..पण नाही :-(...

कबुतरांचा राग राग येतो मला.

स्कार्लेट कॉर्डिया चे झाड साधारण केवढे असते म्हणजे ८-९ फुट असते का? पुण्यात हिमाली सोसायटीच्या बाहेर अशी फुले बघितली आहेत.

स्कार्लेट कॉर्डिया चे झाड साधारण केवढे असते म्हणजे ८-९ फुट असते का? >>>> चांगले २५ -३० फूट वाढते हे झाड.
याचाच भाऊ Beach cordia (Cordia subcordata) family -Boraginaceae म्हणून आहे ते ही असेच उंच वाढते, फुलेही अशीच दिसतात.

तुळस वाचवायला लोखंडी जाळीच लावावी लागेल. पण कबुतरांना तरी काय
गरज आहे तुळस खायची ?
खार, उंदीर यांसारख्या प्राण्यांचे पुढचे दात सतत वाढत असतात. त्यामूळे त्यांना
सतत काहीतरी कुरतडत रहावे लागते. खाणे कमी आणि नासधूस जास्त.

मी असा कडेला जाउन फोटो काढतोय बघितल्यावर माझ्या मागे एक माणूस
आला आणि माझ्या कॅमेरात डोकाऊन गेला. जाताना काय पण माणसं असतात
एकेक, चक्क फुलांचा फोटो काढतोय, असे भाव मी त्याच्या चेहऱ्यावर वाचले.

दिनेशदा लोखंडी जाळीला काही वेगळे नाव असते का म्हण्जे दुकानात्/नर्सरीत विचारायला?? सर्च करायला, मग फोटो पाहुन कळले असते मला Happy
अशी अतरंगी कबुतर आहेत ना, रोपटी खुडुन खुडुन नासधुस तर करतातच पण रिकामी कुंडी झाली की त्यात स्वतःची अंडी घालुन ठेवतात. प्रत्येक वेळी सगळ साहीत्य नवीन आणतेय मी, जाम वैताग आणलाय या कबुतरांनी..
निकिता Sad

जाळी हार्डवेअरच्या दुकानात मिळेल. पण तिचा साधारण पोपटाचा पिंजरा
असतो तसे काहीतरी करु्न लावावे लागेल.

दिनेशदा, जिप्सीने काढलेल्या फोटोंपैकी १ ला फोटो मुचकुंदाचाच असावा. ही सगळी चुलत भावंडं ना दिसायला खूपच सारखी दिसतात. आता बघा ना Pterospermum xylocarpum, Pterospermum canescens आणि कनकचंपा/ कर्णिकार - Pterospermum acerifolium यांचं कूळ एकच आहे Sterculiaceae. फक्त Pterospermum acerifolium ची पानं थोडी रुंद आणि मेपलच्या पानांसारखी दिसणारी आहेत.

जिप्सी ५ नं चे फूल रुएलियाचे असावे. फुलाच्या ठेवणीवरून तसं वाटतंय.

किडनॅप कशाला, सगळेच भेटू तिथे.>>>>>> नक्की नक्की!

अरे धडपडणार्‍या मुलींनो जरा सांभाळा. काळजी घ्या. (आणि तुम्हाला मुलींनो म्हटले म्हणुन सरळ मस्त हवेत तरंगायला लागा म्हणजे चालायला नको)>> Lol

साक्षीमी, कुंडीत रिकाम्या रिफिल्स खोचून ठेवल्या ना की कबुतरं बसू शकत नाहीत. आणि हा प्रयोग माझ्या अनेक मैत्रिणींकडे यशस्वीरित्या राबवला गेलाय.

साधनाचा खूप आवडता पक्षी आहे हा! Wink

किडनॅप कशाला, सगळेच भेटू तिथे.>>>>>> नक्की नक्की!>>>>नक्की या मुंबईला Happy पण या गार्डनची वेळ सकाळी ५ ते १० आणि संध्याकाळी ४ ते ८ पर्यंतच असते. Sad

सकाळी १० ते संध्याकाळी ४ पर्यंत बंद (बागेचे मालक नक्की कुणी "पुणेकर" असणार :फिदी:)

आमच्या ऑफिसाजवळच आहे हिरानंदानी बिजनेस पार्कात (पवई - मुंबई येथे). दरवेळेस येथे एक नविन झाड मला बघायला मिळत. Happy

मग तिथल्या अशाच वेगवेगळ्या झाडांचे फोटो इथे टाकत जा ना म्हणजे आम्हाला तिथले फोटो इथे बघायला मिळतील.

Pages