निसर्गाच्या गप्पा (भाग - ५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 December, 2011 - 06:16

सर्व निसर्गप्रेमींच्या निसर्गमय माहीती व गप्पांनी निसर्गाच्या गप्पांचा पाचवा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक सांगू का सगळ्यांच्या खिडकीतून पक्षी घरात येत आहेत. माझ्याही खिडकीत बसतात. त्यांना निसर्गाच्या गप्पांचा सुगावा लागला असणार म्हणून ते येत असतील Happy

.

पावडरपफची फुलं पाहून शेव्हींगब्रशची फुलं आठवली त्याचा तुराही मस्त दिसतो. मी आत्तापर्यंत फेंटजांभळा आणि पांढरा रंग पाहिले आहेत. ३,४ इंच तंतू असतात , फेब्रुवारी मार्च कडे येतात.

शोभा, पौड रोड सुरु झाल्यावर थोडेसे पुढे आले की टीव्हीएसची शोरुम आहे. त्याच्या शेजारच्या बंगल्यात. फुट्पाथजवळच आहे.
जमले तर नक्की काढ फोटो.

हे खरेच अनोखे आहे, कावळे घरात येणे म्हणजे. कावळा अत्यंत सावध अंतर राखून असतो माणसापासून. त्यांना खाणे पण बाहेर भरपूर मिळते, त्यामूळे खाण्यासाठी आले असेही म्हणता यायचे नाही.
वर शशांकने लिहिले आहेच. कावळयापासून सावध रहावे असे.
भटकी कुत्री माजलीत तसेच कावळेही माजले कि काय ?

कधी कधी वटवाघळे आणि त्यांचे वाजते. नाईट ड्यूटी करुन आलेल्या वटवाघळांची जागेवरुन वादावादी होते, पण इथे ते कारण नसावे.>>>>>>>>>>>>> Lol

ईन मीन.. कस्लं गोड दिसतंय ते घुबड. आणि खरंच ते अगदी रुबाबदार दिसतंय! त्याची माहिती पण मस्त.

मानुषी, अगं मी आत्ता वाचली तुझी पोस्ट. आणि तसंही मला ऑफिसमधे नेट अ‍ॅक्सेस नाही. ती बातमी वाचली आत्ताच. खरंच तो क्रौंच वाचायला पाहिजे आणि शिवाय त्याला जोडीदारीणही मिळाली पाहिजे.

शोभा, कर्वेरोडवरील झाड मी उद्या परवा बघून सांगते.

जो_एस, शेव्हिंग ब्रशचे लोकेशन सांगू शकाल का? एक पांढर्‍या रंगाचा स्वानंद सोसायटी,सहकार नगर नं २ इथे आहे. पण दुसरा कुठे आहे ते कळालं तर बरं होईल.

आस, म्हणजे "येना" बंगल्याच्या तिथे का?
शोभा, तुझी फोटोग्राफी त्या पावडर पफप्रमाणेच बहरत चाललेय वाटते. छान. असेच चालू ठेव.

आमच्या घराभोवती ह्या पाणकोंबडीचा संचार सदैव चालूच असतो. त्यांचे घरटेच असावे ह्या झुडूपात.

शोभा, पौड रोड सुरु झाल्यावर थोडेसे पुढे आले की टीव्हीएसची शोरुम आहे. त्याच्या शेजारच्या बंगल्यात. फुट्पाथजवळच आहे.
जमले तर नक्की काढ फोटो.>> मी आज जाणार आहे तिकडे... जमलं तर काढते फोटो.. Happy

ईन मीन तीन - ती फुले Verbenaceae या कुळातील वाटत आहे. Bridal veil हे नाव असावे. कोणी जाणकार शिक्कामोर्तब करतील तर बरे. Nodding clerodendrum या नावाने सर्च केल्यासही अशी फुले मिळतील.

गेले ४ भाग (निसर्गाच्या गप्पा (भाग १ ते ४ )) मी नुसता वाचक आहे. हा माझा पहिला लेखी प्रतिसाद..... इथल्या काही ( सर्वच) लोकांचा मी ग्रेट fan आहे. त्यांचे निसर्गा बद्दलचे knowledge बघता चूप्प राहून न बोलता ( लिहिता) ऐकत रहवासे वाटते
आज ईनमीन तीन ज्या फुलांचे फोटो अपलोड केले ते लाल रंगात सुद्धा येते , त्याचे हे फोटो ( मोबाइल वरना घेतले आहेत )
Flower.jpg

दिनेशदा, मी पण पुस्तकात बघूनच सांगणार.....:स्मित:
शोभा, अगं मी आज गेले होते, कर्वेरोडच्या बी एस एन एल च्या ऑफिसपाशी. पण मला गुलाबी फुलांचा वृक्ष दिसला नाही. नाही म्हणायला ऑफिसकडे तोंड करून उभे राहिले की डाव्या हाताच्या मागच्या छोट्या गल्लीत एक वृक्ष आहे त्यावर गुलाबी रंगाची बोगनवेल चढलीये तेवढीच गुलाबी फुलं दिसली........

मधे एकदा गप्पांच्या ओघात सेमला कांचना बद्द्ल लिहिले होते, आज त्याच्या फुला पानांचे फोटो मी स्वतः काढलेत आणि इथे अपलोड करतिये..........(दिनेशदा वाचताय ना! फोटोंना प्लीज कुणी हसू नका हं!!)
सेमला कांचन म्हणजे बॉहिनिया कुळातलाच पण थोडा फुटीर, कारण याची पानं! ती द्विखंडी नसतात. तर टोकाच्या बाजूला थोडासा आत वळलेला गोलसर भाग असतो. आणि याची फुलं सुद्धा अगदी छोटी झुपक्याने येणारी पिवळसर रंगावर छोटे छोटे जांभळे ठिपके असणारी अशी असतात.
मी काढलेले फुलाचे फोटो हे खाली पडलेल्या थोड्याशा सुकलेल्या फुलाचे असून ते मोबाईलवर काढलेत आणि पानाचे फोटो डिजीकॅमने काढलेत.

ज्ञानेश, तुमचं स्वागत ! अहो आम्ही पण खरे तर वाचकच आहोत. पण नियमीत वाचक. कारण एखादा दिवस सुद्धा नि.ग. वर आलो नाही तर करमत नाही.

हे फोटो..........

सेमला कांचन Bauuhinia retusa याचं फूल असतं जेमतेम १ इंच आकाराचे.

Image0825.jpg

आणि पानं मात्र चांगलीच मोठी असतात.

IMG_8645.jpg

शांकली, जमलं कि. मला हे फूल बघून चिंचेच्या फुलाची आठवण आली (हो मला फुलांच्या आठवणी येतात.)
दसर्‍याच्या आपट्याची फुले पण अशीच असतात, असे वाटतेय. पण त्यावर नक्षी नसते.

ईन मीन, फुलांचा फोटो मस्त आलाय. आपल्याकडे आपण बर्‍याचदा कुंपणाला जी कोयनेल लावतो त्याची फुलं अशीच असतात. पण कोयनेल ला एक सुंदर नाव आहे ते म्हणजे 'वनजाई'..... आणि हे नाव अगदी सार्थ वाटतं नाही?
ज्ञानेश राउतांनी टाकलेले फोटो Bleeding Hearts चे आहेत. छान आलाय फोटो.

(हो मला फुलांच्या आठवणी येतात.)>>>>>>>>>> Happy
सेम दिनेशदा,मलापण चिंचेच्याच फुलांची आठवण झाली होती जेव्हा मी प्रथम हे फूल बघितलं तेव्हा.
आपट्याची फुलं मात्र मी कधी पाहिली नाहीयेत..:अरेरे:

जागूतै
कसले कसले पाहुणे येतात गं तुझ्याकडे! मस्तच!
बरं आज पौर्णिमा प्रारंभ आहे ना......हा पहा दारातून दिसणारा चंद्र. शेजार्‍यांच्या घरावर.

DSCN1245.JPG

आणि हा दारातला दिवा आणि शेजारी चंद्र.

DSCN1247.JPG

Pages