निसर्गाच्या गप्पा (भाग - ५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 December, 2011 - 06:16

सर्व निसर्गप्रेमींच्या निसर्गमय माहीती व गप्पांनी निसर्गाच्या गप्पांचा पाचवा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा माझ्याकडे आहेत काही फोटो ते मी देते आणि अजुन कुठे अशा वनस्पती दिसल्या तर शोधते.
फोटो जुन्या कॅमेर्‍यातील आहेत त्यामुळे क्लियर नाहीत.
१) आंब्याच्या झाडाला लागलेले.

२)

जागू, हाच फोटो मला हवा होता.
याला वाघरी म्हणतात आणि वाघाच्या अंगासारखीच फुले येतात.

जागू माझ्या घरा जवळ सिल्व्हर ओक च्या झाडावर अशीच बांडगुळे आहेत. वेला सारखी दिसतात. त्याना पांढरी फुलं येतात. बारके पक्षी त्यात काहीतरी खात असतात.

ससा काय सुंदर आहेत ती फुले.

जो एस बरोबर ह्याला पांढरी फुले येतात नंतर फळेही लागतात.

हे घुबड रोज सकाळी श्रावणी आणि माझा टाईमपास करून ऑफीसला जायला उशीर करतात.

वाघरी >>> याला बांध सुद्धा म्हणतात, खास करुन कलमी आंब्याच्या झाडावर हे वाढतात, ज्या फांदीवर हे वाढ्तात कालांतराने त्या फांदी फळांचे प्रमाण कमी होऊन नंतर कायमचे थांबते आणि ती फांदी सुकुन जाते, हे स्लो पॉयझन सारख काम करत. ( हे माझे निरीक्षण)

दिनेशदा, अशा वनस्पतींना epiphyte= अधिपादप असा शब्द आहे. पण हा मराठी शब्द जरा समजायला अवघड जाईल का? एपिफाईट त्यामानाने जरा सोपा वाटेल का?
मधे कोकणात आंब्याच्याच झाडावर अशा वनस्पती (ऑर्किड्स) बघितली होती. पण त्यावेळी त्यांना फुलं आलेली नव्हती.
सर्वांचे फोटो मस्त आलेत.
नितीन, त्या ताडाच्या झाडाचे फोटो इथे दिले तर आम्हालाही बघता येतील.

वेडा राघू छानच.

राघु आणि पोपट यात फरक काय. ( जरा बावळट प्रश्न आहे) , मला वाटत होत ही दोन्ही समानार्थी नाव आहेत.

प्रज्ञा, परोपजीवी पण नाही म्हणता येणार. ते वेगळंच प्रकरण आहे.
जागू, मधमाशीचा पाठलाग करतानाचे याचे उडणे, अचानक घेतलेली वळणे आणि ती मिळाल्यावर परत त्याच जागी येऊन बसणे.. सगळे बघत बसावे असे असते.

आज सुट्टीमुळे घरीच आहे. बागेत बरीच मंडळी भरभरून फुलली आहेत. त्यातली ही काही............ मधे एकदा छाटणी केली होती. आणि काही दिवसातच नवीन पालवी येऊन फुलं फुलली. रानजाई तर बहुतेक ३ महिन्यांनी एकदा फुलतेच फुलते. नि ग वाल्यांसाठी हे फोटो...........

पानाआडून लाजून बघणारं हे पावडर पफ.

IMG_8605.jpgIMG_8616.jpg

आणि ही नाजुका श्वेतांबरा, रानजाई................

IMG_8620.jpg

फोटो लेकीने काढलेत. मी नाही.

केव्हाही, मने; आज आलीस तरी चालेल........... (आणि मला मनीमाऊ दोन पायांची! चार पायांची!) आवडते. भिती तर बिल्कूल वाटत नाही. Wink Lol

शांकली, ज्या व्यक्तीने फोटो काढलेत तिला नि.ग. चे सभासद झालेच पाहिजे. आणि प्रत्येक नि.ग. सभासदाला फोटो टाकणे आलेच पाहिजे.. असा नियम करणार आहेत.

ते असो, या पावडर पफ वर कुठले किटक आलेले बघितलेत का ? न्यू झीलंडचे राष्ट्रीय फुल, पोहोतुकावा असेच असते पण त्यावे परागीवहन एक पाल करते !

घुबडं जाम गोड दिसतायत Happy

ते आंब्यावरचं बांडगूळ चिपळूणला पाहिलं होतं. त्याच्या बंद कळ्या खाली पडायच्या. चिमटीत घेऊन दाबल्या की उलगडायच्या.

Pages