निसर्गाच्या गप्पा (भाग - ५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 December, 2011 - 06:16

सर्व निसर्गप्रेमींच्या निसर्गमय माहीती व गप्पांनी निसर्गाच्या गप्पांचा पाचवा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवनी, वैजयंती, शशांक मी एकदम फिट आहे काळजी नसावी. आज आमच्याकडे जत्रा आहे. धम्माल. मला आजार्‍यासारख पडून राहण नाही जमत. मग मला प्रचंड आजारी असल्यासारख वाटत Happy

जागू फिट आहत वाचुन बरं वाटलं... पण काळ्जी घ्या... Happy

वैजयन्ती... माझी आजी राहते पावसेला... मी पण तिकडचे फोटो टाकते... लवकरच... Happy

जागू, काळजी घे.
वैजयंती, खुप छानच आहे फोटो, गेंड्याचा असा समोरुन फोटो घ्यायला धाडस लागते !! राजापूरला अजून आमचे नातलग आहेत. माझी चुलतवहीनी पण तिथलीच. ती आणि चुलतभाऊ सध्या मालवणला एक रेस्टॉरंट चालवतात.

साधना, कुठे गेली ?

शांकली, उंडी साधारण समुद्राजवळच आढळतो. पुण्यात आहे हे नवलच. त्याच्या लाकडाला एकेकाळी जहाजबांधणीसाठी खुप मागणी होती.
त्याची पांढर्‍याच देठाची पांढरी फुले पण मस्त दिसतात.

वैजयंती आणि सर्वांचे फोटो मस्त.
जागू शशांक काळजी घ्या.
आता सांगायला हरकत नाही. मीही गेला आठवडाभर प्लॅस्टरात आहे. पावलापासून पिंढरीपर्यंत.
मागच्या गुरुवारी संध्याकाळी चालायला सुरुवात पण नव्हती केली तर रस्त्याच्या शोल्डरिंगवरून पाय अस्स्स्स्सा ट्विस्ट झाला, लगेच डॉ. गाठला त्यानेही लगेचच प्लॅस्टर टाकलं. १४ ता. चेकिंग आहे. मग ठरेल की प्लॅ. काढायचं की ठेवायचं.
घरात खूप ऐकून घ्यावं लागलं.
" या वयात पाऊल कसं वाकडं पडलं?"
" वैनी( हे अगदी आपले बांदेकर म्हणतात तस्संच म्हणायचं बर्का!) आता जरा वयाप्रमाणे धावपळ कमी करा."
दीराने त्याच संध्याकाळी लगालगा "वॉकर" आणला आणि म्हणाला," वैनी आता चाल चाल करून दाखवा बरं"
एका जागी बसण्यासारखी शिक्षा नाही.

आता मानुषी आणि जागू, या बीबीवर निसर्गावरच्या सविस्तर पोस्ट लिहा बरं. दुर्गाबाई भागवतांनी, सपुर्ण ऋतूचक्र, घरात बसल्या बसल्या लिहिले होते.

अरे काय हे जागू, मानुषी, शांकली -
धडाधड पडताय काय एवढ्या धडधाकट असताना...... धडपड जरुर करा पण धडपणे (धSड पणे), धडपडून नव्हे........ किती द(ध)डपण येते मग घरच्यांना (हे शांकली करता)......या वयात काय हा धांगडधिंगा.... ( धास्तावलेला, धाक्धूक होत असलेला, धडपून गेलेला बाहुला -)......धाड धाड धाड धाड धाड धाड धाड धाड धाड धाड...... (कृपया हलकेच घेणे - नाही तर पुन्हा धडपडाल हं.....)
शशांक काळजी घ्या.>>>> मानुषी - मी फार काय सतत काळजीतच असतो........... (काळजीत 'पडलेला' बाहुला)....

जागूतै, - मला वाटत तो क्रेनवाला सुध्धा ईकडे तिकडे बघत निसर्गाचा आस्वाद घेतच क्रेन चालवत असावा Wink - काळजी घे पहीले ४८ तास बर्फाने शेकायचे नि नंतर गरमपाण्याने लवकर आराम पडतो.
शांकली ,मानुषी - मजाच आहे तुमची या वयात पडल्याने अजुनही आपण लहान असल्यासारखेच वाटते निदान मलातरी Lol बाकी काळजी घ्या.

@ जागू, मानुषी, शांकली >>>>>मला वाटत साने गुरुजीं सारखं पुस्तकच लिहायला लागणार "धडपडणार्‍या मुली!! " लेखक म्हणून दिनेशदां इतकी योग्य व्यक्ती दुसरी कोणी असु शकत नाही. Happy

असो लवकर बर्‍या व्हा.

दोन आठवड्यांपूर्वी इथे सौदीत दोन दिवस भरपूर (इथल्या हिशोबाने) पाउस पडला अन वातावरण एकदम थंड झालय. आता बघताबघता काही झुडुपे उगवून गुढघाभर उंचीची होतील, अन त्यांना सुंदर गुलाबी कळ्या/ फुलं येतील, फोटो टाकेनच.

श्रीकांत, खरंच त्या बिया वर्षभर (किंवा त्याहून जास्त) वाट बघतात. आणि थोडक्या काळात आपला जीवनक्रम पुर्ण करुन नव्या पिढीच्या बिया मागे ठेवून जातात.
फोटोंची वाट बघतोय ! भरपूर हवेत !!

सध्या एक पावडरपफची फांदी माझ्या बेडरुमच्या खिडकीच्या दिशेने वाढत आहे, पण त्यावर फुले कमीच आहेत. येत्या महीन्याभरात कदाचीत मी त्या झाडाला स्पर्श करु शकेन आणि त्या वरच्या खारुताई खाऊ खायला घरात येतील, अपनी तो मजा है . Happy

उंडी सारखा किनारपट्टीवर वाढणारा वृक्ष असूनही हा पुण्यात छान वाढतोय, एवढंच नव्हे तर त्याची पिल्लावळ पण वाढतिये..... पण खूप उंच आहे त्यामुळे फोटो नाही काढता आले. त्याची फळं (उंडली) मात्र घेऊन आले येताना.

वैजयंती, खानवली-वाघ्रटला तर मी पण होते. साधारणपणे १९८१-८२ पर्यंत. लिंबूची वाडी, सापुचे तळे ,कोट नावाचे गाव. सर्व जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहिले. मला जरा सविस्तर तिकडचे ऐकायला खूप आवडेल. खूप रम्य काळ होता तो आमच्या आयुष्यातला.

व्वा, मस्त फोटो आहेत निसर्गाचे. फुलांच कोलाज खूप आवडलं. बंगलोरला लालबाग बोटॅनिकल गार्ड्न मधील दरवर्षी जानेवारीत होणारा (साधारण १४ जानेवारी किंवा आधी असेल पासून ते ३० जानेवारीपर्यंत असतो) फ्लॉवर शो पाहिला आहे का? फारच सुंदर असतो. माझ्याकडे जवळ जवळ त्याचे १०० च्या वर फोटो आहेत. ते टाकायचे असतील तर लाल बाग बोटॅनिकल फ्लॉवर शो असा नविन धागा करावा लागेल काय? सगळे फोटो सुंदर आहेत. तुम्हाला नक्की आवडतील.

शांतीसुधा, माझा तो शो एका दिवसांनी हुकला होता. नुसती आवराआवरच बघावी लागली होती. मला नक्की आवडतील ते फोटो बघायला, वेगळा धागा २/३ भागात करावा लागेल. म्हणजे लवकर पेज उघडेल.

त्यांच्या नजरेतून मी !!

दिनेशदा अप्रतिम फोटो आहेत.

मानुषी अग काय हे ? जप ग.

शांकली तुला काय झाल ? तू पण काळ्जी घे.

आज सकाळी जत्रेत एक फिरी मारली आणि पुर्ण दिवस आराम केला आहे. आता मला कालच्यापेक्षा कितितरी पट चांगल चालता येत आहे. उद्या धावपळीचा दिवस. माझी एक रिलेटीव्ह निवडणूकीसाठी उभी आहे. तिच्यासाठी उद्याचा दिवस ठेवला आहे. पण मध्येच आईकडे जाऊन फोटोग्राफी करण्याचा विचारही आहे.

नैरोबीतल्या पावसाचा अंदाज सांगताना खुपदा स्कॅटर्ड रेन्स असा शब्द वापरतात.
इथे अनेकदा असे दिसते, कि शहराच्या एका भागात पाऊस पडतोय, तर शेजारचा
भाग कोरडा आहे.
माझ्या घरातून असा देखावा दिसत राहतो.

दिनेशदा, मी असा देखावा नासिक जिल्ह्यातील वनवासी भागात पाहीला आहे. म्हणजे अशी पाऊस भरले ढगांची ओळ आणि कोरडे ढग.......ती रेषा स्प्ष्ट दिसते. फोटो मस्तच.
बाकी लालबाग बोटॅनीकलच्या फोटोंसाठी दिलेल्या सूचनेसाठी धन्यवाद. तसंच करते. साधारणतः एका धाग्यात किती फोटो चिकटवले तर धागा गंडत नाही? मी काही अगदी सगळेच नाही टाकणार पण त्यातल्यात्यात सिलेक्ट करून टाकेन.

शांतीसुधा मी नेहमी २० ते २५ टाकते. म्हणजे धागा लवकर ओपन होतो नाहीतर खुप वेळ लागतो.

दिनेशदा खुप छान नजारा. आमच्याइथेही असच होत. मी ऑफिसला जाते तिथे तर एका ठिकाणी कोरडा रस्ता तर जरा पुढे गेल्यावर ओला रस्ता असे चालूच असते.

आज सकाळीच साधनाचा मेसेज मिळाला की आजचे चंद्रग्रहण बघा. खुप वर्षांनी आल आहे. तिचा आदेश पाळून काही फोटो काढले. जिप्स्यानेही सुंदर फोटो काढलेत. त्याचा धागा आहे नक्की पहा.
हे मी काढलेले फोटो.
१)

२)

३)

४) '

५)

६)

७)

जागूताई, छाचि चटकन चढवण्यास काही शॉर्ट्कट आहे का? एक फोटो चढवायलाच फार वेळ लागतोय. एका वेळी अनेक चढवायला काही ट्रीक आहे का?

ग्रहणाचे फोटो मस्तच आलेत.

मी अत्तापर्यंत कधीच केले नाहीयेत. बघते माझं पिकासात खातं आहे का ते. बहुधा आहे. तिथे माबोचा ऑपशन आहे का? की माबोत पिकासाचा? मला काहीच माहीती नाहीये. Sad

शांतीसुधा जीमेल वर खाते करुन पिकासात खात ओपन करायच. मला दिनेशदा आणी योगेशने शिकवल ते लिखाण मिळाल तर शोधते आणि तुझ्या विपुत टाकते.

चालेल. माझं जीमेल अकाऊंट आहे. त्यामुळे पिकासात आता छाचि चढवते आहे. ते माबोवर कसे आणायचे याचं मार्गदर्शन मिळालं तर बरं होईल. धन्यवाद.

माझं फ्लिकर या छायाचित्रांच्या वेबसाईटवर खातं आहे. आणि तिथे हे लालबाग बोटॅनिकलचे चढवलेले आहेत. अगदी फेसबुकवर पण आहेत. तिथून टाकता येतील का माबोवर?

जागू, शांकली, मानुषी, तीन बायानो काळजी घ्या. लवकरात लवकर बर्‍या व्हा. तोपर्यंत इथे, आम्हाला मेजवानी द्या. Proud

दिनेशदा फोटो मस्तच.

व्वा मस्त फोटो दिनेशदा.
जागू, ग्रहणाच्या फोटोंबद्दल धन्यवाद. काल माहित असूनही अचानक नात आली रहायला, मग जाताच नाही आलं. ती आली की वेळ कसा नी कुठे गेला ते खरच कळत नाही. Happy

Pages