निसर्गाच्या गप्पा (भाग - ५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 December, 2011 - 06:16

सर्व निसर्गप्रेमींच्या निसर्गमय माहीती व गप्पांनी निसर्गाच्या गप्पांचा पाचवा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या ऑफिसमधे एक गंमतच चालु आहे. म्हणजे खरंतर भीतीदायक आहे, पण दुसर्‍याच्या बाबतीत झालं कि उरलेल्यांना हसु येतं आहे. मीपण शिकार झाले.

ऑफिसच्या ३र्‍या मजल्यावरचा ब्रेक आउट ( जो वरुन बंद नाही, मोकळी बसण्याची व्यवस्था आहे. थोडा निसर्ग बघता येतो आणि नैसर्गिक हवा घेता येते), तिथे पाणी आणि चहा-कॉफी वेंडिंग मशीन आहे. तिथवर बरीच उंच उंच झाडं पोचली आहेत. सध्या तिथे कोणीही गेलं कि एक कावळा झप्पकन येवुन अ‍ॅटॅक करतो. जे पुरुष Bald आहेत, त्यांना तर जखम होते, इतक्या जोरात नखं लागताहेत. मागच्या आठवड्यात मी मिटींगमधुन उठुन पाणी प्यायला आले. घाईमधे लक्षात राहिलं नाही आणि चुकुन गेले तर माझ्यावर अ‍ॅटॅक झाला. त्याच्या नखात माझे केस अडकुन जोरात ओढले गेले. जबरी दुखलं. शिवाय चोच कि नखं काही तरी जोरदार लागलं. कावळे का बरं असे हिंसक होत असतील? Sad

कुणीतरी कावळ्याचे घरटे उध्वस्त केले असेल. कावळ्याची अंडी लोक चोरतात (त्याचे काजळ करतात, ते लावले तर नजर कावळ्यासारखी तीक्ष्ण होते असा गैरसमज आहे.) पुण्याला स्वारगेट स्थानकाजवळ पण असा एक कावळा हल्ला करायचा.

दिनेशदा Happy

पावडर पफ वर काळ्या रंगाचे कुठले तरी कीटक दिसतात (नाव माहीत नाही), कधी कधी मधमाशा पण दिसतात. पोहोतुकावा फुलाच्या परागीवहनाचं मात्र आत्ताच कळालं. त्या फुलाबद्द्ल जरा माहिती द्या की. हे नावसुद्धा पहिल्यांदाच वाचलं. त्यामुळे काहीच माहिती नाहीये.

हं बरोबर, त्या कावळ्याला कुणीतरी त्रास दिला असणार, त्याशिवाय तो असा वागणार नाही. कारणाशिवाय दुसर्‍याला त्रास द्यायला तो काय माणूस आहे? Wink
आस, पावडर पफ ५/६ फूट उंच वाढतं. याच्यात एक गुलाबी रंग पण असतो. तो फारच सुंदर दिसतो.मला आणायचं आहे त्या रंगाचं रोप.

मनीमाऊ मी हे सगळ लहानपणी अनुभवलय Happy

शांकली फोटो खुप सुंदर आलेत लेकीने काढलेले. तिला शाब्बासकी दे.

कावळे का बरं असे हिंसक होत असतील?>>>>> त्या तिथे जवळपास झाडावर घरटे असणार नक्कीच त्या कावळा-कावळीचे...... माझ्या ऑफिसमधेही एका बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरील ओपन कॉरिडॉरमधून जाताना एक कावळा-कावळी असाच अटॅक करायचे - तेथील शेजारच्याच झाडावर त्यांनी घरटे केले होते - त्या घरट्यातील ती पिल्ले मोठी होईपर्यंत हा त्रास प्रत्येकाला (त्या कॉरिडॉरमधून जाणार्‍याला) होत होता....
जरा जपूनच तेथे जाणे... कधी कधी एकदम डोळ्यांवर ही हल्ला करतात हे कावळे - आपले रिफ्लेक्सेस इतर प्राण्यांसारखे शार्प नसल्याने इजा व्हायचा संभव खूप असतो - काळजी घ्या......... चष्मा अथवा गॉगल वापरा.....
आणि दुसरे महत्वाचे - त्याचे घरटे काढून टाकायचा विचारही करु नका - कोणाला काढूनही देऊ नका - कावळा अशी माणसे (त्याच्या घरट्याला काढणारी) नंतर खूप काळ व्यवस्थित ओळखतो व प्रचंड त्रास देऊ शकतो........

नाही, असं अंडी वगैरे कोण काढणार. ऑफिस प्रिमायस मधलं झाड आहे. शिवाय फारच उंच आहे. बिल्डिंगपासुन इतक्या अंतरावर आहे कि त्याला हात लावु शकत नाही त्यामुळे कावळ्यांना त्रास देणं दूरच. शिवाय घरटं काढायचाही प्रश्न येत नाही. अमेरिकन कंपनी आहे,त्यामुळे HSE dept भलतंच strong आहे. आता माणसांवरच हल्ला करताहेत म्हणुन, कदाचित परवानगी देतील. नाहीतर घरटं हलवुही शकत नाही.

शांकली, अगं FC roadला जे आम्रपाली आहे ना, तिथे पावडर पफचं झाड आहे. तिथे मी पाहिले होते असे किडे. आपण हात लावला कि भरभर हातभर पसरतात. त्याची फुलं बहुतेक गुलाबी आहेत.

हं बरोबर, त्या कावळ्याला कुणीतरी त्रास दिला असणार, त्याशिवाय तो असा वागणार नाही. कारणाशिवाय दुसर्‍याला त्रास द्यायला तो काय माणूस आहे?>>>> जवळपास घरटे असल्यास कावळा कारणाशिवायही हल्ला करतो - एक डिफेन्स मेकॅनिझम..... स्वसंरक्षण तंत्र ..... कावळ्याच्या वाट्याला बिलकूल जाऊ नये, त्याच्या घरट्याच्या आसपास तो कोणालाही फिरकू देत नाही, घरट्याला हात लावल्यास किंवा प्रयत्न करणार्‍यासही तो अजिबात सोडत नाही - कित्येक काळ तो अशी व्यक्ति लक्षात ठेऊन हल्ला करतो........ कावळा अशाबाबतीत प्रचंड डेंजरस असतो..... अजिबात चान्स घेऊ नये......

शांकली, आम्रपालीच्या जवळचं झाडंच बघुन ये फक्त. गेल्यासरशी जेवण करुन येवु नकोस तिथे. Wink आम्रपालीची मजा गेली. आता फारच कंजेस्टेड वाटतं ते. आणि छोट्या जागेमुळे फार आवाजही वाटतो. Happy

मी आज घरी आहे. कॉम्युटर पॅसेजमध्ये खिडकीजवळच लागून आहे. सध्या खिडकी बाहेर झुडूपावर भरद्वाज आणि पाणकोंबडीचे दर्शन चालू आहे. Happy

शांकली, मी रेफ बघून सांगतो. न्यू झीलंड कुठल्याही भूभागापासून लांब असल्याने तिने अनेक खास बाबी आहेत. तिथे सरपटणारे प्राणीच नाहीत (तरी वरची पाल आहे.) त्यामुळे पक्ष्यांना जमिनीवरही धोका नसतो.
त्यांचा किवी उडू शकत नाही, तशी गरजच नाही त्याला. पण त्याचे अंडे मात्र भलेमोठे असते. तिथले काही पोपट पण उडत नाहीत.

शांकली , तु म्हणतेस तसे गुलाबी झाड पुलगेट्जवळच्या एका बंगल्याच्या कंपाऊंड्वर आहे. खुप सुंदर दिसते ते पण. मला रोज तिथे थांबुन त्याचा फोटो काढायची इच्छा होते. पण नाही जमत .

तिथले काही पोपट पण उडत नाहीत.>>>> हो डिस्कव्हरी चॅनेलवर पाहिले होते ते - जरासे गलेलठ्ठच होते.

दिनेशदा, नक्की माहिती द्या. आता उत्सुकता वाढलीये.
मला वाटतं मॉरिशस मधे पण असेच आहे. तिथे भक्षक नव्हते, त्यामुळे पिंक पीजन ही प्रजाती मॉरिशसमधे नंतर आलेल्या माणसांमुळे धोक्यात आली. माणसाने तिथे मांजरासारखे, मुंगसा सारखे प्राणी आणले. जे अनेक प्राण्यांना धोकादायक ठरले. अर्थात माणूस कुठेही गेला तरी 'तबाही कर सकता है|'

हो हो बरोबर, मी पण पुलगेट जवळच्या बंगल्यातच बघितले होते. आणखी एक सहकार नगर जवळच्या संतनगर मधे एका बंगल्यातपण आहे.

आता पुढच्या महिन्यात जातोय तिथे.. मग आणखी काही बघायला मिळते का ते बघतो.
या एकाच कारणासाठी ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड, देशात काय आणू द्यायचे याबाबत खुप काटेकोर नियम करतात आणि अंमलात आणतात. अगदी मन लावून सामान तपासतात.

मी पण पुलगेट जवळच्या बंगल्यातच बघितले होते<< मी पण तिथेच पाहिलेय हे झाड पहिल्यांदा पण मला ते शिरिष वाटले

आमच्या इथे पण टेरेस वर कावळा असाच टोची मारायचा का तर जवळच्या झाडावर त्याचे घरटे होते.

कावळे अतिशय हुशार व सावधही असतात - आपण खाद्यपदार्थ त्याच्या पुढ्यात टाकल्यास खाणार नाही, पण आपण खात असल्यास तो पदार्थ जरुर खाईल -खात्री पटल्याशिवाय तो कोणताही खाद्य पदार्थ खात नाही - काही काही घरात - शांकलीच्या मावशीकडे - त्या मावशींच्या हातची पोळी खाण्यास दररोज एक कावळा येतो - मावशी आजारी असतील अथवा घरात नसतील तर दुसर्‍याच्या हातून बिलकुल खात नाही.......
......पण ......त्याची "सगळी हुशारी" ती अतिहुशार कोकिळा त्याच्या घरट्यात स्वतःची अंडी घालते तेव्हा कुठे जाते कोण जाणे?????

स_सा, शिरिष च्या फुलांचा रंग वेगळा असतो ना? म्हणजे पिवळसर.
बंगल्यावरुन आठवले, सध्या पौड रोड्वर एका बंगल्याच्या दारात एक झाड पूर्ण गुलाबी फुलांनी भरुन गेलय. एकही हिरवे पान नाही. खुप छान दिसतेय ते पण झाड. त्याचाही फोटो काढायलाच हवा.
पण प्रॉब्लेम असा आहे की, मी फोटो काढला तरी तो तितका छान येयिल असे नाही आणि आला तरी ईथे अपलोड करता येईल असेही नाही. पण कोणाला जमले तर नक्की काढा.

Pages