..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ३)

Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....

नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्स्या, बेळगावला माझं आजोळ होतं रे. तिथले खूप फोटो पाहिजेत ही स्पेशल इनंती. गेल्या कित्येक वर्षात गेले नाहिये तिथं. Sad आणि तू परत आल्यावर पूर्ण ट्रीपचे वर्णनासकट फोटोज पाहिजेत, काय समजलेत? Proud

>>स्वप्ना किस्से-संकलनाची आयड्या आवडली. तुझ्या शुभहस्ते होउंदे सुरू.

मामी, धन्स! ह्या बाबतीत अ‍ॅडमिनना लिहिते. कारण नुस्ते बीबी न काढता नायक, नायिका, संगीतकार, दिग्दर्शक असे विभाग काढून त्यात ही माहिती नीट संकलित व्हावी असं मला वाटतं. त्यासाठी त्यांची मदत लागेल ना? पाहू काय म्हणतात ते.

३/००२: कलीपूरला भूकंप होतो. राज्याचे मुख्यमंत्री नेहमीप्रमाणे पाहणी-पथक पाठवतात कलीपूरला. पथक दिवसभर पहाणी करते. सुदैवाने फारशी पडझड झालेली नसते. रात्री पथक प्रमुख श्रीकांत हेड-ऑफीसला फोन करून ही माहिती देतो पण एका गाण्यातूनच. कोणते ते गाणे ?

उत्तरः मंझिले (मजले) अपनी जगह है रास्ते अपनी जगह

क्रमांक ०३/००५:

बायकोला तिच्या वाढदिवसाची काय गिफ्ट द्यावी तेच संदीपला समजत नव्हतं. साड्या, दागिने ह्याबाबत्चं त्याच ज्ञान यथातथाच होतं. मागच्या वेळसारखंच हॉटेलात न्यावं असा विचार करत असतानाच त्याने एक परक्यूमवरचा लेख वाचला. मग काय? स्वारी लगेच जाऊन एक उत्तम परफ्यूम विकत घेऊन आली. वाढदिवसाच्या दिवशी ते पाहून चैत्राली खूश झाली. संध्याकाळी दोघांनी नाटकाला जायचं ठरवलं. पण कारमध्ये बसताच संदीपला परफ्यूमचा सुवास काही जाणवेना. एव्हढं महागातलं अत्तर आणि साधा वासही येत नाही? त्याने चैत्रालीला विचारलं की परफ्यूम लावलंस ना?खरं तर ती बिचारी घाईघाईत निघताना लावायचं विसरली होती पण चूक कशी कबूल करणार? मग तिने एक मस्त हिंदी गाणं म्हणून दाखवलं आणि संदीप रागवायचं विसरून गेला.

ओळखा ते गोल्डन इरातलं गाणं.

मेरी सांसो को जो महका रही है, यह पहले प्यार की खुशबू?

या गाण्यावर एक कोडं आधी स्वप्नानेच विचारले होते, म्हणजे हे नसेलच.

हमने देखी हैं इन आंखों की महकती खुशबू
हाथ से छू के इसे रिश्तोंका इल्जाम न दो
सिर्फ अहसास है ये रूह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो

क्रमांक ०३/००५:

मेरी सांसोमें बसा है तेरा हि एक नाम
तेरी याद हमसफर सुबह शाम

(पण हे गाणं गोल्डन इरा मधले नाहीए Sad )

बाहोमें तेरी मस्ती के घेरे, सांसो मे तेरी खुशबु के डेरे ..... ?

मुझे छू रही है तेरी गर्म सांसे के मेरे रातदिन महकने लगे है?

न जाने क्या हुआ, जो तूने छू लिया, खिला गुलाब की तरह मेरा बदन ...

बाप रे....प्यार, खुशबू, महकना वरच्या गाण्यांची इथे लिस्ट बनायच्या आत उत्तर टाकते Happy

क्रमांक ०३/००५:

बायकोला तिच्या वाढदिवसाची काय गिफ्ट द्यावी तेच संदीपला समजत नव्हतं. साड्या, दागिने ह्याबाबत्चं त्याच ज्ञान यथातथाच होतं. मागच्या वेळसारखंच हॉटेलात न्यावं असा विचार करत असतानाच त्याने एक परक्यूमवरचा लेख वाचला. मग काय? स्वारी लगेच जाऊन एक उत्तम परफ्यूम विकत घेऊन आली. वाढदिवसाच्या दिवशी ते पाहून चैत्राली खूश झाली. संध्याकाळी दोघांनी नाटकाला जायचं ठरवलं. पण कारमध्ये बसताच संदीपला परफ्यूमचा सुवास काही जाणवेना. एव्हढं महागातलं अत्तर आणि साधा वासही येत नाही? त्याने चैत्रालीला विचारलं की परफ्यूम लावलंस ना?खरं तर ती बिचारी घाईघाईत निघताना लावायचं विसरली होती पण चूक कशी कबूल करणार? मग तिने एक मस्त हिंदी गाणं म्हणून दाखवलं आणि संदीप रागवायचं विसरून गेला.

ओळखा ते गोल्डन इरातलं गाणं.
क्लू - 'कांची रे कांची रे'

उत्तरः

ले गयी खुशबू मांगकर बहार, महकी मै ऐसे लेकर तेरा प्यार
चित्रपटः फिर कब मिलोगी
पडद्यावर कांची (माला सिन्हा - मूळची नेपाळी) आणि शोलेतल्या ठाकूरसारखी शाल पांघरलेला, नुकताच आजारपणातून उठला आहे तसा दिसणारा विश्वजीत.

हा हा हा ... मस्त. मला हे गाणं माहितही नव्हतं.

पण त्या निमित्ताने मला बाहोमें तेरी मस्ती के घेरे, सांसो मे तेरी खुशबु के डेरे आणि मुझे छू रही है तेरी गर्म सांसे के मेरे रातदिन महकने लगे है ही अप्रतिम गाणी आठवली आणि ती आता ऐकतेय ..... Happy

मामी, स्वप्ना Proud

स्वप्ना, मी पहिल्यांदा ऐकतोय्/वाचतोय हे गाण (घोर अज्ञान दुसरं काय :() त्यामुळे हे गाणं नक्कीच ओळखता आलं नसतं. Happy

मामी, जिप्सी, हे गाणं एकदा ऐका (बघू नका, विश्वजीत आहे त्यात. आजूबाजूचा निसर्ग सुंदर आहे पण विश्वजीत जीव नकोसा करतो!). कदाचित तुम्हाला आवडेल.

जिप्सी, रात्री ९ नंतर टीव्हीवर म्युझिक चॅनेल्सपैकी कुठल्यातरी एकावर 'आवाज दे कहा है' म्हणून प्रोग्रॅम लागतो त्यात मी हे प्रथम पाहिलं होतं. आधी मलाही माहित नव्हतंच.

आपले गोल्डन इरावाले एनसायक्लोपिडिया, दिनेशदा, कुठे आहेत? त्यांना माहित असेल हे गाणं.

हे गाणं एकदा ऐका (बघू नका, विश्वजीत आहे त्यात. आजूबाजूचा निसर्ग सुंदर आहे पण विश्वजीत जीव नकोसा करतो!). कदाचित तुम्हाला आवडेल. >>> नक्की काय आवडेल हे स्पष्ट करावे. गाणं, निसर्ग की विश्वभीत? आणि आम्हाला विश्वभीत आवडेल असा आरोप तू आम्हा सर्वांवर करत असशील तर ते खपवून घेण्यात येणार नाही. Proud

.

.

.

हायला, ही एव्हढी टिंबं ह्या बीबीवर? काय झालं काय? Sad

>>नक्की काय आवडेल हे स्पष्ट करावे. गाणं, निसर्ग की विश्वभीत?

निसर्ग नक्कीच, गाणं कदाचित. विश्वभीत 'अजाबात न्हाई'. Happy

मला तर विश्वजीत, जॉय मुखर्जी, बबिता हे वेगळेवेगळे ओळखता हि येणार नाहीत.

तर चला पुढच्या कोड्याच्या तयारीला

कोडे क्रमांक ००३/००६

अमिता आणि मोहन, यांनी नवीन घरी आल्यावर कामवाली बाई शोधायला सुरवात केली. पण प्रॉब्लेम असा होता कि मोहनच्या ऑफिसच्या वेळा अशा होत्या कि त्याला लेट जावे लागे. सकाळी तोच थांबत असे आणि काम करवून घेत असे. आणि हा अमितासाठी मोठा प्रश्न होता. कामवाली बाई जरा जरी स्मार्ट असली तरी तिला खपत नसे. ती रविवारी तिच्या कामात काहीतरी खोड्या काढून तिला काढून टाकत असे.
पण त्या बायकांची मोहनबद्दल काहीच तक्रार नसे. तर असेच श्यामाबाईंना अमिताने काढून टाकले. त्यांना कामाची फार गरज होती. तर श्यामाबाई कुठले गाणे म्हणतील...

क्लू - या गाण्यांची दोन व्हर्जन्स आहेत. एका गाण्याशी संबधित निदान चार व्यक्ती मराठी आहेत तर दुसर्‍या गाण्याशी संबंधित निदान चार व्यक्ती अमराठी आहेत.

दिनेशदा गाणी हिंदी का मराठी? मराठी व्यक्ती म्हणजे मंगेशकर कुटुंबिय, सी रामचन्द्र वगैरे असणार. ह्यापलिकडे मला सुचत नाहिये. एकच पिक्चर मराठी आणि हिंदीत होता का...भाभीकी चुडिया टाईप्स? का एक गाणं आनंदी आणि एक दु:खी?

>>या ज्या चार व्यक्ती आहेत ना, त्यांचे गाण्यासंदर्भात स्थान तेच आहे.

ह्म्म्म्म, संगीतकार, गायिका, गीतकार आणि बहुधा दिग्दर्शक

>>मला तर विश्वजीत, जॉय मुखर्जी, बबिता हे वेगळेवेगळे ओळखता हि येणार नाहीत.
Proud

Pages