..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ३)

Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....

नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा, हो की काय? मला माहित नाही ती कथा. सत्यनारायणात सांगतात एवढंच माहित आहे.

किरण, कोळीगीत नाही. हिंदी आहे.

उत्तर मी इतक्यात सांगत नाही. ती स्वप्ना येऊदे. ती आपल्याला भरपूर पिडते नाही का? तिच्या डोक्याला पण जरा त्रास देऊ यात. Proud

वानी ब्रँड वरून दिवानी हा शब्द असावा त्यात. दर्या, सागर यापैकी एक आणि सारी हा शब्द.. अशा शब्दांचं मिळून गाणं आठवायला लागेल आता Happy

कोडं क्र. ००३ / ०२५

आता हे हिंदी गाणं ओळखा Happy

तटी:
१. थोडी मेहनत घेतलीय हे बनवण्यासाठी, त्यामुळे पटकन नाही ओळखल तरी चालेल. Happy
२. प्रत्येक चित्रच एक क्लु आहे. Wink
३. काहि शब्दच्छल आहे Happy

हे जर आवडलं तर अजुन अशी चित्र(गीत)कोडी बनवेल. Happy

००३/०२५ मुझे प्यार की जिंदगी देनेवाले
कभी गम न देना खुशी देनेवाले

थोडीच मेहनत का घेतलीत? जास्त घ्या.घ्या की! Lol

००३/०२५ मुझे प्यार की जिंदगी देनेवाले
कभी गम न देना खुशी देनेवाले>>>>>>>भरत Happy Happy

चित्र बनवायला अर्धा तास लागला मात्र भरतने अर्ध्या मिनिटातच ओळखलं. Happy Happy

जिप्सी, मस्त डोकेबाज कोडं. एक नविन प्रकार सुरू होईल आता. वॉव, मज्जा येणार!

भरत मयेकर .... _______/\_______ घ्या. झक्कास सुरूवात.

मि. शहा ... Lol

कुठे गेले सगळे परत?? Uhoh
बर्‍याच दिवसांनी हा धागा परत धावता झालेला पाहुन छान वाटलं.
नेहमीचे मेंबर्स मामी, स्वप्ना_राज, दिनेशदा, राम, माधव, भरत, श्रद्धा, स्निग्धा, मि. शहा, मी_आर्या लवकर या आता. Happy

जिप्सीच्या कोड्यातले शब्द बहुतेक हे आहेत.
एक, चांद, एक, सुरज, रानी
दिल मिलके (दो दिल), गाये, कहानी

पण गाणं कोणतं ब्वा?????

माझंही हे कोडं ओळखा लोक्स!

कोडं क्र. ००३ / ०२३:

''वानी'' ब्रँडच्या उत्तमोत्तम साड्यांचा मोठा व्यापारी एकदा भरपूर माल भरून समुद्रातून दुसर्‍या देशात तो माल विकायला जात असतो. वाटेत मोठे वादळ होते. व्यापारी कसाबसा लाईफबोटमध्ये बसतो पण त्याच्या डो़ळ्यादेखत त्याच्या सगळ्या साड्या वाहून जातात. घळाघळा वाहणारे अश्रू कसेबसे आवरत तो समुद्रदेवाला मनापासून प्रार्थना करतो की "देवा समुद्रा माझ्या साड्या मला परत मिळू देत. मी तुझे उपकार जन्मात विसरणार नाही." त्याची मनोभावे केलेली प्रार्थना समुद्रदेवापर्यंत पोहोचते आणि तो सगळ्या साड्या त्या व्यापार्‍याला सहीसलामत परत देतो.

व्यापारी अर्थातच अत्यंत आनंदित होतो आणि समुद्राचे आभार मानतो. आणि साड्यांचं ब्रँडनेम वानीऐवजी यापुढे समुद्राचे नाव देण्याची परवानगी त्याच्याकडे मागतो. याकरता तो कोणतं गाणं म्हणेल?

मला दुसर्‍या ओळीतली चित्रे बघून 'दोनो मिले इस तरह और जो तनमन में हो रहा है वो तो होना ही था' या ओळी आठवल्या Lol

कोडं क्र. ००३/०२३
क्ल्यु १) कोळीगीत नाही. हिंदी आहे.
क्ल्यु २) ९०च्या दशकाच्या सुरवाती सुरवातीच्या सिनेमातलं गाणं.

मामी Proud

पहिल्या चित्रकोड्यात सगळ्या शब्दांची चित्रे दिली होती मात्र दुसर्‍या गाण्यात, गाण्यातील ठळक शब्दांचीच चित्रे आहेत. Happy

कोडं क्र. ००३/०२३
क्ल्यु १) कोळीगीत नाही. हिंदी आहे.
क्ल्यु २) ९०च्या दशकाच्या सुरवाती सुरवातीच्या सिनेमातलं गाणं.
क्ल्यु ३) माधुरी दिक्षित.

माधुरी दिक्षितची ९० च्या सुरुवातीचे दिल, बेटा, साजण, खलनायक हे चित्रपट होते. पण गाणं कुठलं ते आठवत नाहिए Sad

Pages