..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ३)

Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....

नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता बहुतेक स्वप्नाची घरी जायची वेळ झालीय ना ? मग मी झोप उडवणारा क्लू देतो..... गाणे हिंदी नाही !!!!!!

गाणे हिंदी नाही >> दिनेश म्हणजे गाणे मराठी आहे का? का मगच्या वेळेसारखे इंग्रजी किंवा अजून दुसर्‍या भाषेत?

दिनेशदा, तुम्ही हा काय भुलभुलैय्या घातलाय????? Uhoh

मला तर विश्वजीत, जॉय मुखर्जी, बबिता हे वेगळेवेगळे ओळखता हि येणार नाहीत.

>>>> Rofl

>>आता बहुतेक स्वप्नाची घरी जायची वेळ झालीय ना ?

काश ये सच होता Sad

मामी Happy "एकमेका साह्य करू अवघे सोडवू कोडं" असं करायला हवं आता.

चार व्यक्ति आणि त्यांच्या मराठी पॉसिबिलिटिज वरून सुरुवात करायला हवी. हिंदी चित्रपटात मराठी लोकांच्या पॉसिबिलिटिज हिंदी लोकांपेक्शा कमी असतील.

चार व्यक्ति पुढील धरू

१. गायक्/गायिका - लता, आशा, सुमन कल्याणपूर, बाबूजी - गाणं जुनं म्हणजे सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल वगैरे आऊट.
२. गीतकार - मला फक्त गदिमाच आठवताहेत. त्यांनी हिंदीसाठी लिहिलं की नाही माहित नाही.
३. संगीतकार - इथेसुध्दा माझी पाटी कोरी आहे. सी रामचन्द्र ही एक शक्यता आहे. दत्ता डावजेकरांनी हिंदीत संगीत दिलेलं का?
४. दिग्दर्शक?

बाकी मोहना, श्यामा म्हणजे कृष्णाशी संबंधित गाणं असू शकतं.

श्यामा, अमिता ह्या नट्या त्यात असू शकतात.

संगितकार दोन नसावेत. एकाच चित्रपटात दोन संगितकार असलेली उदाहरणे कमीच आहेत.

मीराबाईचे भजन असेल का? दोन वेगळ्या संगितकारांनी सगीत दिलेले दोन गायिकांनी गायलेले - लता / वाणी जयराम?

दिनेश एखादी उपयोगी पडेल अशी हिंट द्या बरं Happy वरच्या हींटा अगदीच लांबच्या आहेत.

खरं तर माधवचा ट्रॅक अगदी योग्य होता.
मला माधव आणि मामी यांना थोडं डिवचायचे होते...
वेल, रचना संत मीराबाई यांचीच आहे. (पण ती अर्थातच हिंदी नाही ना)

पहिले व्हर्जन, तूफान और दिया मधले. (लता मंगेशकर/वसंत देसाई/नंदा/व्ही शांताराम) शब्द आहेत, म्हाणे चाकर राखो जी

http://www.youtube.com/watch?v=hcD0RyeZSUI

दुसरे व्हर्जन होते मीरा चित्रपटातले (वाणी जयराम/पं रविशंकर्/हेमामालिनी/गुलजार) शब्द आहेत
श्याम मने चाकर राखो जी.

http://www.youtube.com/watch?v=wt4mYxLWJdI

चालीच्या गोडव्यात जमीन आस्मानाचा फरक आहे.
तूफान और दिया मधेच, मुरलीया बाजेगी जमुना के तीर, आणि पिया ते कहा गयो अशी आणखी दोन मीराभजने आहेत, आणि ती लतानेच गायली आहेत.
गुलजारच्या मीराच्या वेळी देखील लता हिच पहिली पसंती होती. पण हृदयनाथनंतर (चाला वाही देस/ मीराबाई) मी इतर कुणाच्याही संगीतात मीरेच्या रचना गाणार नाही, असे सांगत लताने नकार दिला. मग सगळ्या रचना वाणी जयरामनेच गायल्या. पण कुछ जम्या नही. चालीतच काही दम नव्हता.
तूफान और दिया मधे राकु होता तर मीरा मधे, विनोद खन्ना, विद्या सिन्हा वगैरे होते.

स्वप्ना, टिंबांबद्दल घाबरू नकोस. या बीबीवर अजून तरी वाद झाले नाहीयेत. साक्षीने मला एक इमेल केली होती ती बघावी असं तिने मला सांगितलं होतं आणि मी ही तिला इथे उत्तर दिलं होतं. मग आम्ही ते आवांतर बोलणं एडिट केलं ..... Happy

मीरा मध्ये मीराबाई हेमामालिनीही होती ना?

दिनेश ट्रॅक योग्य असल्याबद्दल मला १/२ वाटी कायरस Happy

मला अगदी ते गाणे सुचले पण होते पण गुलझारचा मीरा मी बघितला नसल्यामुळे ते त्यामधे पण आहे हे माहितच नव्हते. त्यातली गाणी ऐकायचा प्रयत्न खूप पूर्वी केला होता पण 'चाला वाही देस / मीरा भजन' मधल्या लता/हृदयनाथ या द्वयीच्या मानाने ती प्रचंड तोकडी वाटली मग लक्षात राहिलीच नाहीत कधी. एकच गाणे आठवतय - एरी मै तो प्रेम दिवानी. नौबहारमधले लता/रोशन चे गाणे ऐकल्यावर मीरामधले तेच गाणे ऐकणे कठीणच गेले मला.

हो मामी, हेमाच होती, राणाच्या भुमिकेत विनोद खन्ना आणि मीरेची बहीण उत्तरा झाली होती.. विद्या सिन्हा.

माधव. पंडितजींनी संगीत मनापासून दिले नव्हते, असेच मला वाटले.
पण त्यातले एक गाणे मला आवडते..

करना फकिरी फिर क्या दिलगीरी, सदा मगन मई रहना री,
कोई दिन गाडी, न कोई दिन बंगला, कोई दिन पैदल चलना री
कोई दिन लड्डू, न कोई दिन खाजा, कोई दिन फाकमफाका री...

नौबहारमधले ते भजन तर अप्रतिम आहे. पंडीत अमरनाथ यांच्या संगीतात पण लताने एक मीराभजन गायले होते. जोगियासे प्रीत किये दुख होय.. सुंदर आहे.

नर्गिस दिकु च्या जोगन मधे गीता दत्तने मीराभजने गायली होती.
झनक झनक पायल बाजे मधे.. जो तुम तोडो पिया (लता/ वसंत देसाई)

अमिता आणि मनोजकुमारचा एक सिनेमा होता (बहुतेक पिया मिलनकी आस) , पण त्यातल्या एका गाण्यात, मीरेच्या या दोन ओळी वापरल्या होत्या.

कागा कागा सब तन खाईयो, के चुन चुन खाईयो मास
दो नैना मत खाईयो, इन्हे पिया मिलनकी आस.

बैजू बावरा मधल्या, लताच्या.. मोहे भूल गये सावरिया मधे पण सुरवातीला मीरेचा या ओळी आहेत

जो मै जानती, प्रीत किये दुख होय
नगर ढंढोरा पिटती, के प्रीत ना करयो कोय.

हिंदीत आशाने कुठले मीराभजन गायल्याचे आठवत नाही, पण एक गदिमांचे रुपांतर ( बहुतेक सुहासिनी )
तिने गायल्याचे आठवतेय. सखी मी प्रेम दिवानी..

मराठीत किर्ती शिलेदारने पण, सखी मीरा, असा एकपात्री प्रयोग केला होता. त्यातले जोशीडा जुवोने जुवोने.. असे भजन यू ट्यूबवर आहे.

पंडितजींनी संगीत मनापासून दिले नव्हते, असेच मला वाटले

दिलेल्या चाली गाणारा गळा मिळाला तरच मनासारखे संगीत देतील ना? अनुराधामधले सांवरे सांवरे आणि जाने कैसे सपनों में खो गयी अंखियां कधीही विसरू शकत नाही.

जोगियासे प्रीत किये दुख होय >> दिनेश सुंदरच आहे ते गाणे. गर्म कोट अशा नावाच्या सिनेमात होते ते. माझ्याकडे कॅसेटवर होते आता कुठेच मिळत नाहीये Sad

>>राणाच्या भुमिकेत विनोद खन्ना

हायला, मग मी नसतं कृष्णाकडे पाहिलं Proud ** दिवा घेणे **

"करना फकिरी फिर क्या दिलगीरी" हे गाणं मी ऐकलेलं आहे YIPPEE!

स्वप्ना तू ते ऋषी कपूर / मिनाक्षीच्या पिक्चरमधले ऐकले असशील Happy त्याचे नाव नाही आठवत आता.

माधव, त्या टॉम आणि जेरीच्या कार्टून्समध्ये कसं फजिती झाल्यावर टॉमला रेकणारं गाढव आठवतं तसं झालं माझं ही पोस्ट वाचून. Proud यू आर म्हणींग द राईट. काय कॉन्फिडन्स आहे इथे लोकांना माझ्याबद्दल. एक दिवस मात्र मी बंड करणार आणि सगळी जुनी गाणी ऐकून काढणार - अगदी सैगलला सुध्दा सोडणार नाही. Proud

भरत, पं. रविशंकर यांनी गोदान ला पण संगीत दिले होते. एकसे एक गाणी आहेत त्यात,(सुदैवाने सगळी यू ट्यूबवर आहेत.)

ओ मृगनयनी क्यू तडपाये (महेद्र कपूर, गीता दत्त) बिरजमे होली खेलत नंदलाल, पिपरा के पटवापे (दोन्ही रफि), हिया जरत रहत दिन रैन (मुकेश) जाने काहे जिया मोरा डोले ( लता )

आणि अनुराधामधलेच.. कैसे दिन बीते (लता) त्यामधेच महेद्रकपूरचे पण एक गाणे होते, पण ते खास नव्हते.

स्वप्ना, मी सगळ्या जून्या गाण्यांचा राग आणि तालासकट डेटाबेस तयार करतोय, (७०० जमलीत) सगळ्यांना पाठवेन तो.

मामी Happy

दिनेशदा, माझ्याबाबतीत मात्र हे 'गाढवापुढे वाचली गीता' अशातला प्रकार होणार Sad राग वगैरे काही कळत नाही मला. गाणं तालात म्हणता येतं एव्हढीच जमेची बाजू. पण डेटाबेस मिळाला तर आवडेल.

आणि हो, असाच डेटाबेस रेसिपीजचा तयार करावा ही हात जोडून विनंती. मला अनुमोदन द्या रे सगळे Proud

माझा डेटाबेसचा एक तुकडा (बर्‍याच गाळलेल्या जागा भरायच्या आहेत

चारुकेशी दादरा अकेले है चले आओ मोहम्मद रफ़ि Raaz कल्याणजी आनंदजी
दरबारी कानडा दादरा अगर मुझसे मुहोब्बत है लता मंगेशकर Aap ki parachhaaeeyaan मदनमोहन
पिलु दादरा अपनी कहो, कुछ मेरी सूनो लता मंगेशकर तलत मेहमूद Parachhaaee सी. रामचंद्र
अहिर भैरव दादरा अपने जीवनकी ऊलझनको किशोर कुमार Ulazan कल्याणजी आनंदजी
भैरवी दादरा अब तेरे सिवा कौन सहारा अमीरबाई कर्नाटकी Kismat अनिल बिस्वास
कल्याण दादरा अभी ना जाओ छोडकर मोहम्मद रफ़ि आशा भोसले Hum Dono जयदेव
पहाडी दादरा अरे जा रे हट नटखट आशा भोसले महेंद्र कपुर Navarang सी. रामचंद्र
खमाज दादरा आ दिलसे दिल मिला ले आशा भोसले Navrang सी. रामचंद्र
भीमपलासी दादरा आ नीले गगन के तले लता मंगेशकर हेमंत कुमार Badshah शंकर जयकिशन
पहाडी दादरा आज कि रात पिया दिल ना तोडो गीता दत्त Bazi सचिनदेव बर्मन
पिलु दादरा आज की रात बडी शोख बडी नटखट है मोहम्मद रफ़ि Nai Umar ki Nai Fasal रोशन
भीमपलासी दादरा आज मेरे मनमे कोई बांसुरी बजाये लता मंगेशकर कोरस Aan नौशाद
मालकंस दादरा आधा है चंद्रमा महेंद्र कपुर आशा भोसले Navarang सी. रामचंद्र
भैरवी दादरा आयी दिवाली आयी दिवाली जोहराबाई अंबालावाली Rattan नौशाद
कल्याण दादरा आये हो मेरी जिंदगीमे तुम बहार बनके Raja Hindustani नदीम श्रवण

माधव Happy Happy

कोडे क्रमांक ००३/००७:

कोणाच्याही विरोधाला न जुमानता निर्मलाताईंनी त्यांच्या तिबेट ट्रीपची सांगता एव्हरेस्ट बेस कॅम्पला भेट देऊन करायचं ठरवलं होतं. आत्तापर्यंतची सगळी ट्रिप विशेष त्रास न होता झाल्याने हेही दिव्य पार करू अशी त्यांना खात्री होती. त्यामुळे ऑक्सिजनचं नळकांडं बरोबर आणूनसुध्दा त्यांनी त्याचा वापर सुरु केला नव्हता. पण काही वेळातच त्यांच्या छातीत धडधडायला लागलं, श्वास घेणं मुश्किल होऊ लागलं. त्यांची अवस्था पाहून बरोबरच्या गाईडने गडबडीने ते आणून दिलं. मोकळा श्वास घेताना निर्मलाताई ऑक्सिजनच्या नळकांड्याला काय म्हणतील?

हे गाणं गोल्डन इरातलं नाही.

सान्सो को सान्सो मे ढलने दो जरा
धीमी सी धडकन को बढने दो जरा
लम्हो की गुजारिश है ये पास आ जाये
हम हम तुम
तुम हम तुम

Pages