..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ३)

Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....

नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वप्ना, हे गाणे ऐकल्यावर नक्कीच आधी ऐकलेय असे वाटेल...
आणि त्या गाण्याशी संबंधित एकच व्यक्ती आता हयात आहे.
आणखी एक क्लू--- मी ज्या तीन देशांची नावे दिलीत, त्यांचा गाण्याशी संबंध आहे.

आणि त्या बलून वरुन गाणे नाही पण एक म्हण नक्की आठवली,

घोडं गेलं ओझ्याने आणि शिंगरु गेलं हेलपाट्याने !!

आता एक कन्फेशन... खरे तर हे गाणे या बीबीवर येण्यासाठी क्वालिफाय होत नाही, तरीही..

१) ए मेरे सनम ए मेरे सनम, दो जिस्म मगर एक जान है हम (संगम)
२) चाहे कोई मुझे जंगली कहे (जंगली)
३) खबर मोरी राम लिजे, बहुत दिन बीते ( संत ज्ञानेश्वर)
४) जाने कहा, गये वो दिन ( मेरा नाम जोकर )

या वरच्या चार गाण्यातील प्रत्येकी दोन बाबी माझ्या कोड्यातील गाण्यांशी सामायिक आहेत.

पण हा शेवटचा क्लू !

मला स्वप्ना. मामी, भरत, माधव... सगळे मिळून चोप देणार आता.

क्रमांक ०३/००३

भारताच्या सीमेवर काही संशयास्पद व्यक्ती पकडल्या जातात. त्यांच्याकडचे कागदपत्र बघितल्यावर त्या स्वाझिलँड, स्वित्झरलँड, पोलंड आदी देशातून आलेल्या दिसतात. कसून चौकशी केल्यावर देखील त्यांच्याकडे काहीच संशयास्पद आढळत नाही. पण ते मात्र सांगतात कि आम्ही शांततेचा प्रसार करत आहोत. सगळी धरा एकच आहे, आपण देशांच्या सीमा विसरुन जाऊ... तर ते कुठले गाणे म्हणतील..

हे कोडे खुपच कठीण आहे, याची मला कल्पना आहे.
हे गाणे खुपच कमी जणांनी ऐकलेले असेल, पण ते ऐकल्यावर मात्र खुपच ओळखीचे वाटेल (मी ऐकवणार आहेच.)
हा थोर गायक आज हयात नाही, पण तो आपल्या सर्वांचा आवडता होता, नव्हे आहेच.

उत्तर :

Although we hail from different lands,
we shone earth and sky and sun,
remember friends, the world is one..

We want all enmity to seize,
for we want peace, we all want peace,
we want no hate, we want no strife,
since we were born for love and life,
come let us chant while joining hands,
we shall not rest till wars are done,
remember friends, the world is one..

Although we hail from different lands,
we shone earth and sky and sun,
remember friends, the world is one..

we have matured to dream and build,
we want our dreams to be fulfilled,
we have come here to dream and plan,
a world of joy and hope for man,
a world is dignity demesne,
a world that we shall see begun,
remember friends, the world is one..

Although we hail from different lands,
we shone earth and sky and sun,
remember friends, the world is one..

http://www.youtube.com/watch?v=kLaol19qaig

हे ते सुंदर गाणे, वरच्या लिंकवर जरूर ऐका.
रफिने गायलेय, संगीत शंकर जयकिशन यांचे आहे, आणि हे चक्क शिवरंजनी रागावर आधारीत आहे.
अगदी ऐकाच, आणि मग सांगा किती ओळखीचे वाटले ते.

>>मला स्वप्ना. मामी, भरत, माधव... सगळे मिळून चोप देणार आता.

मी नाही चोप देणार. मी बदला घेणार नवी गाणी टाकून ** विकट हास्य **
पण दिनेशदा, ते क्लू ह्या गाण्याशी कसे निगडित आहेत ते सांगा ना.

माझं कोडं कोणी ट्राय पण नाही केलं Sad

स्वप्ना...कालपासुन तुझ्याच गाण्यावर विचार करतेय!

"तुम भी चलो, हम भी चलें, चलती रहे ज़िन्दगी
ना ज़मीं मंज़िल, ना आसमां, ज़िन्दगी है ज़िन्दगी
तुम भी चलो, हम भी चलें, चलती रहे ज़िन्दगी "

हे आहे का?

माधवकृत ३/००२ या कोड्याचं उत्तर >>>

काली राम का खुल गया पोल
बिच बजरिया फट गया ढोल
हो गया उसका डब्बा गोल
बोल हरी बोल हरी बोल हरी बोल

स्वप्ना --- हे आहे का गाणे>>>

ज़रा होले होले चल्लो मोरे साजना
हम भी पीछे है तुम्हारे

त्या तीन देशांच्या नावात-स्वाझिलँड, स्वित्झरलँड, पोलंड - लँड हा शब्द कॉमन आहे. आणि गाण्याचा भावार्थ तोच आहे. रफी आज इतक्या वर्षांनीही लोकप्रिय आहे.
आता मी दिलेली गाणी
१) ए मेरे सनम ए मेरे सनम, दो जिस्म मगर एक जान है हम (संगम) - रफी लता/शंकर जयकिशन
/रागः शिवरंजनी
२) चाहे कोई मुझे जंगली कहे (जंगली) रफी /शंकर जयकिशन

३) खबर मोरी राम लिजे, बहुत दिन बीते ( संत ज्ञानेश्वर)-लता/शंकर जयकिशन
/रागः शिवरंजनी

४) जाने कहा, गये वो दिन ( मेरा नाम जोकर )-मुकेश/शंकर जयकिशन
/रागः शिवरंजनी

(म्हणजे प्रत्येक गाण्यात दोन गोष्टी कॉमन होत्या कि नाही ?)

पण हे गाणे तूम्ही सर्वांनी ऐकावे असा माझा प्रामाणिक हेतू होता बरं.

आप अब शौकसे चाहे जो सजा देते हो .....

स्वप्ना...

'हवा के साथ साथ, घटा के संग संग
ओ साथी चल...."

हे आहे का? (स्वगतः इतकं सोप्प नसावं)

स्वप्ना

दीवाना मुझसा नहीं इस अम्बर के नीचे
आगे है कातिल मेरा और मै पीछे पीछे

( अब तो मानजा स्वप्ना रानी !!!)

स्वप्नाने आवर्जून ते नाव दिलेय, त्याचा काहितरी सबंध असावा.

आणि हो भरत, बहारो फुल बरसाओ.. चीच आठवण येते.
या गाण्याशी संबंधित असे रफी / शंकर जयकिशन / राजेंद्र्कुमार यापैकी कुणीच हयात नाही. वैजयंतीमाला मात्र अमृतमहोत्सवी वर्षातही नृत्य करतेय.

मोहन कि मीरा, नाही हो. आर्या Happy सोप्पंच होतं कोडं.

क्रमांक ०३/००४:

Weather Balloon बद्दल तुम्ही लोकांनी ऐकलं असेलच. त्याच्या खालच्या भागात मोजमाप करण्यासाठी जे उपकरण बसवलेलं असतं त्याला Radiosonde म्हणतात. तर असाच एक Weather Balloon आकाशात सोडला गेला तेव्हा त्याचं Radiosonde त्याला उद्देशून काय म्हणालं असेल?

क्लू: गाणं गोल्डन इरातलं आहे.

उत्तरः
हवाके साथ साथ घटाके संग संग, ओ साथी चल
मुझे लेके साथ चल तू, यूही दिनरात चल तू, संभल मेरे साथ चल तू, ले हातोंमे हात चल तू

अरे, राजेन्द्रकुमारवरून आठवलं. मध्यंतरी लोकसत्तात सिरियलवरच्या एका लेखात राजेन्द्रकुमार आणि सायराबानू ह्यांचं एकमेकांवर प्रेम होतं पण त्यांना लग्न न करता आल्याने तिने दिकुशी निकाह केला असं वाचलं. राजेन्द्रकुमारबद्दल असंतसं काहीही कधी छापून आलं नाही असं सांगणार्‍या आईसाहेबांना हे वाचून सॉलिड धक्का बसला. मला मात्र सायराबानूची कीव आली. आसमान से गिरे खजूरमे अटके! ** दिवा घ्या **

रच्याकने, दिनेशदा, मी बर्‍याच दिवसांपासून विचार करत होते की माबोवरच्या बर्‍याच जणांना हिंदी चित्रपटसृष्टीतल्या नायक, नायिका, दिग्दर्शक, निर्माते, संगीतकार, गीतकार, चरित्र अभिनेते अश्या अनेक लोकांबद्दलचे किस्से ठाऊक आहेत. ह्या सगळ्या किश्श्यांचं माबोवर कुठे संकलन आहे का? नसल्यास ते करायची आयडिया कशी वाटते?

२ काजूकतल्या + २ बदामी हलवा + एक माहिमी हलवा - आर्यासाठी. Happy
** मीठा खाना स्वास्थ्य के लिये हानिकारक है Proud

>>आधीच वजन वाढलय...
माझंही. म्हणून तर तटी दिली आहे. तुझी काळजी आहे मला >>>>>>दोघींच्या वाटणीच्या मिठाया इकडे द्या पाठवून माझं वजन अजुन आटोक्यात आहे Proud

म्हणजे सायराबाईने ओरिजीनल कार्बन कॉपीच्या ऐवजी ओरिजीनल ओरिजीनल कॉपी निवडली तर !!
जिप्स्या, अजून तू इथेच ?!!

जिप्सी कुठे चाललाय म्हणे?????

स्वप्ना किस्से-संकलनाची आयड्या आवडली. तुझ्या शुभहस्ते होउंदे सुरू.

अग, मी कोडी वाचते, डोकं चालवायचा प्रयत्न करते पण ...... Proud

जिप्सी कुठे चाललाय म्हणे????? >>>>मामी, मी उत्तर कन्नडा (बेळगाव, गोकर्ण, गोकाक, मुरूडेश्वर) भटकायला चाल्लोय Happy

Pages