..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ३)

Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....

नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोल्डन ईरा तील एक गाणे चालेल

तेरे बिना जीन्दगीसे कोइ शिकवा तो नही
तेरे बिना जीन्दगी भी लेकीन जीन्दगी तो नही

( गम्मत )

गाणं नाही माहित, पण लेखिका मीना प्रभूंवर पण अशीच वेळ आली होती. (असे वर्षूने सांगितले.)
>>>>>

हो वाचले आहे. त्यान्च्या "दक्षिणरन्ग" मध्ये. एक्वेडोर मध्ये त्यान्ना हा अनुभव आला. तिथे हवा विरळ असल्याने अल्टिटुड सिकनेस ज्यान्ना असतो त्यान्न्ना हा त्रास होतो. मला ही हा त्रास आहे. माला कधी कधी विमानातही असा त्रास होतो.

वर्षू म्हणजे त्यान्चि मुलगी का?

दिनेशदा,मोहन कि मीरा - मी त्यांचं 'वाट तिबेटची' आत्ताच वाचून संपवलं. त्यांना बेस कॅम्प्साठी ऑक्सिजनची गरज पडली नाही. पण त्यावरूनच हे कोडं सुचलं. ह्या पुस्तकात आपल्या वर्षू-नीलचा उल्लेख आहे Happy

स्वप्ना अत्ता समजले. मला वाटले की वर्षू म्हणजे त्यान्ची मुलगी की काय. कारण त्यान्च्या मुलीचे नाव ही वर्षा काळे आहे. "ही" वर्षू-नील म्हणजे वाट टिबेटची मधली त्यान्ची वाचक चाहती, जी त्यान्ना ग्रहण बघायला भेटते. छान छान. मायबोली वर नवीन असल्याने हे सन्दर्भ माहित नाहित.

हे पण खडा टाकून बघणेच..

कहा ऊड चले है, मन प्राण तेरे
किसे ढूंढते है, मधुर प्राण तेरे..

असले पिवर शब्द असणारे गाणे, बहुतेक भाभी कि चूडियाँ मधले आहे.

३/००८
नारायणरावांचे अनिकेतवर - आपल्या नातवावर - अतिशय प्रेम असते. ते त्याचा एकही शब्द खाली पडू नसत. पण अशाच लाडाने तो बिघडत चाललेला असतो. एक दिवशी मात्र अनिकेत यामहाची बाईक मागतो. बाईक अपघातात मुलगा गमावलेले नारायणराव त्याची मागणी साफ धुडकावून लावतात. तेंव्हा अनिकेत कुठले गाणे म्हणेल?

३/००९

डॉ. प्रेयसी: अरे सन्ध्याकाळी भेटायच ठरलेल आणि आताच आलास इतकी माझी आठवन्ण...
प्रियकरः थांब!!!!!!! तूला वाटतय तस काही नाही मी टॉयलेटला गेलो आणि... थांब तुला गाऊनच सांगतो...

कुठल गाण म्हणेल.

.

कोडे क्रमांक ००३/००७:

कोणाच्याही विरोधाला न जुमानता निर्मलाताईंनी त्यांच्या तिबेट ट्रीपची सांगता एव्हरेस्ट बेस कॅम्पला भेट देऊन करायचं ठरवलं होतं. आत्तापर्यंतची सगळी ट्रिप विशेष त्रास न होता झाल्याने हेही दिव्य पार करू अशी त्यांना खात्री होती. त्यामुळे ऑक्सिजनचं नळकांडं बरोबर आणूनसुध्दा त्यांनी त्याचा वापर सुरु केला नव्हता. पण काही वेळातच त्यांच्या छातीत धडधडायला लागलं, श्वास घेणं मुश्किल होऊ लागलं. त्यांची अवस्था पाहून बरोबरच्या गाईडने गडबडीने ते आणून दिलं. मोकळा श्वास घेताना निर्मलाताई ऑक्सिजनच्या नळकांड्याला काय म्हणतील?

हे गाणं गोल्डन इरातलं नाही.

क्लू १. bureaucracy
क्लू २. आई (पण मराठीतली नाही), चाचा (पण मराठीतला) आणि मदनबाण

आजकाल इथे कोणी फिरकत नाही वाटतं. असो. मी उत्तर देऊन टाकते:

उत्तरः ऐ हवा मेरे संग संग चल, मेरे दिलमे हुई हलचल

क्लू १. bureaucracy - ह्या पिक्चरचं नाव 'बाबू' आहे.
क्लू २. आई (पण मराठीतली नाही), चाचा (पण मराठीतला) आणि मदनबाण - पिक्चरमध्ये हेमामालिनी, राजेश खन्ना आणि रती अग्निहोत्री आहेत.

कोडे क्रमांक ००३/०१० :

प्रभुरामचंद्रांचा परमभक्त असलेल्या हणमंतरावांचं (एकदाचं) अनुसुयाबाईंशी लगीन झालं. पण हाय रे दैवा! काही दिवसांतच अनुसुयाबाईंचा तापट स्वभाव हणमंतरावांच्या लक्षात आला. हापिसातून सायंकाळी दमूनभागून घरी यावे तर अनुसुयाबाई रोज कशावरून तरी संतापलेल्या असायच्याच. मग हणमंतरावांची रोज हजेरी घेतली जायची. या प्रकारामुळे कंटाळून हणमंतरावांनी आपले रोजचे श्लोकही बदलले. आता ते त्यांचं गार्‍हाणं प्रभु रामचंद्रापुढे कसं मांडत असतील?

क्ल्यु : मराठी पण गाणं नव्हे. सोप्पं आहे.

माधव, गुगु - तुमच्या कोड्यांची उत्तरं द्या ना. मामी, गुगुचं कोडं ००९ आहे. तुमच्या कोड्याचा नंबर चेन्ज करा ना प्लीज.

२-३ कोडी मलाही सुचली आहेत पण आजकाल इथे कोणी येत नाही. घालू का?

३/००८
नारायणरावांचे अनिकेतवर - आपल्या नातवावर - अतिशय प्रेम असते. ते त्याचा एकही शब्द खाली पडू नसत. पण अशाच लाडाने तो बिघडत चाललेला असतो. एक दिवशी मात्र अनिकेत यामहाची बाईक मागतो. बाईक अपघातात मुलगा गमावलेले नारायणराव त्याची मागणी साफ धुडकावून लावतात. तेंव्हा अनिकेत कुठले गाणे म्हणेल?

आजा आजा मैं हू प्यार तेरा अल्ला अल्ला इन्कार तेरा

आधीचे दोन बीबी कसे ओसंडून वहायचे. पण इथे मात्र कधीपासून शुकशुकाट आहे Sad असो. इथे कधीतरी कोणीतरी येईल ह्या आशेवर २-३ कोडी घालत आहे. कोणी कधी इथे आलातच तर नक्की सोडवा.

कोडे क्रमांक ००३/०११:

सकाळी उठून नेहमीप्रमाणे मॉरिस गावातल्या बेकरीकडे निघाली. तिथे जाऊन बघते तर ही गर्दी. 'काय झालंय'? तिने विचारलं. 'जॉन गायब आहे. बेकरीत कोणीच नाहिये' गर्दीतल्या कोणीतरी तिला उत्तर दिलं. "मग, फोन लावा ना त्याला' ती म्हणाली. 'लावला, पण तो उचलत नाहिये'. तोच माणूस परत म्हणाला. मॉरिसने बेकरीच्या मागे असलेल्या दाट वनराईकडे नजर टाकली. गावातली गिर्हाइकं यायच्या आत भल्या पहाटे डोंगर उतरून पलीकडल्या गावात मालाची विक्री करायला जॉन कधीमधी जात असे हे तिला माहित होतं. गर्दीतल्या कोणाला काही न सागता ती त्या दिशेने निघाली.

बरंच अंतर कापलं तरी तिला जॉनची काही चाहूल लागेना. तिने हाकाही मारून पाहिल्या पण काही उपयोग नाही. एव्हाना पाऊलवाट संपली होती. आणि पुढे असलेल्या घनदाट जंगलात शिरावं की नाही ह्याचा विचार करत असतानाच तिला गवतात काहीतरी दिसलं. ते पहाताच तिचे डोळे चमकले. थोडं अंतर पुढे गेल्यावर पुन्हा काहीतरी दिसलं. तिने जॉनला फोन लावला.

"हॅलो, मॉरिस"
"जॉन, अरे सगळे शोधताहेत तुला. कुठे आहेस तू?'
'अग, मी बेकरीमाग्च्या जंगलात आहे, माझा पाय लचकलाय.हलता पण येत नाहिये"जॉन कण्हत म्हणाला.
"पाऊलवाट जिथे संपते तिथेच आहे मी, येते तुझ्यापर्यत'
"कशी येशील जंगलातून. नीट रस्ताही नाहीये"

मॉरिसने उत्तरादाखल कुठलं गाणं म्हटलं असेल?

क्लू: गाणं गोल्डन इरातलं नाही. थोडं कैच्या कै आहे. Happy

कोडे क्रमांक ००३/०१२:

'अहो, ऐकलं का? आपल्या निलगिरीशास्त्रांच्या मुलीचं लग्न ठरलं बरं का? त्यांचा फोन आला होता. म्हणाले होते की पत्रिका बघा कशी वेगळीच छापली आहे म्हणून. आज पत्रिका पण आली. मस्तच आहे. बघा तर खरं'
'कुठली मुलगी? गायत्री, धारा का मीनाक्षी?
'इश्श्य, अहो गायत्रीचं लग्न मागल्या वर्षी नाही का झालं? आणि मीना शिकतेय अजून. धाराचं लग्न ठरलंय'
'कोण आहे नवरामुलगा?'
'कोणी पंजाबी आहे, साहिल कपूर म्हणून. ती शिकायला होती ना तिथे दिल्लीला तिथे भेटला म्हणे."
"बाप रे, हे चेन्नईवाले, तो दिल्लीवाला. हम्म, निलगिरीशास्त्री बरे तयार झाले, कर्मठ तामिळ ब्राह्मणाचं घराणं त्यांचं. आणि आता जावई पंजाबी. मिले सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा"
'मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी. पत्रिका बघा. एका जुन्या हिंदी गाण्याच्या ओळी काय कल्पकतेने वापरल्या आहेत. हे नक्की मीनाचं डोकं असणार'

काय ओळी असतील पत्रिकेवर? सांगू शकाल?
क्लू: गाणं गोल्डन इरातलं आहे. कैच्या कै नाही Happy

कोडे क्रमांक ००३/०१३:

'हांजी बोलिये, क्या काम है?'
'जी वो खेतके आसपासवाले इलाकेमे खुदाई करनी थी. परमिसन चाहिये थी'
'आपका शुभनाम?'
'दीपककुमार सहाय'
'कौन गावसे है?'
'जी, धोलापुरसे'
'धोलापुरसे हम भी आये है. हमे भी खुदाईके लिये परमिसन चाहिये'
'आपका शुभनाम?'
'ह्र्दयनाथ मिसरा'

'भाई, ये थोडी गडबड हो गयी. अभी खुदाईके कानुनोपे बडा कडा अमल हो रहा है. एक गावमे दो लोगोंको परमिशन नही मिल सकती. किसी एकको ही मिलेगी. आप लोग सारे डीटेल्स फॉर्ममे भर दे. हफ्तेभरमे फैसला हो जायेगा"

सहाय आणि मिश्रा दोघांनी फॉर्म्स भरले खरे पण दोघे एकमेकांकडे 'खाऊ की गिळू' नजरेने पहात होते ही बाब त्या चाणाक्ष अधिकार्याच्या नजरेतून सुटली नाही. तो गोल्डन इरातल्या गाण्यांचा चाहता होता. त्यांचे फॉर्म्स गोळा करून ठेवताना त्याला ह्या परिस्थितीवर अचूक भाष्य करणारं एक सुमधुर गाणं आठवलं आणि तो दिवसभर तेच गुणगुणत राहिला. सांगा ते गाणं.

स्वप्ना...

कोडे क्रमांक ००३/०११:

हमे रासतोंकी जरुरत नही हैं...
हमे तेरे पाओं के नीशान मिल गये है.

हे तर नाहियेना?

कोडे क्रमांक ००३/०१३:

सहाय आणि मिश्रा दोघांनी फॉर्म्स भरले खरे पण दोघे एकमेकांकडे 'खाऊ की गिळू' नजरेने पहात होते ही बाब त्या चाणाक्ष अधिकार्याच्या नजरेतून सुटली नाही. तो गोल्डन इरातल्या गाण्यांचा चाहता होता. त्यांचे फॉर्म्स गोळा करून ठेवताना त्याला ह्या परिस्थितीवर अचूक भाष्य करणारं एक सुमधुर गाणं आठवलं आणि तो दिवसभर तेच गुणगुणत राहिला. सांगा ते गाणं.>>>

ऑप्शन
१. आ देखे जरा किसमे कितना है दम
२. आज हम अपनी दुवाओंका असर देखेंगे , तिरे नजर देखेंगे जख्मे जिगर देखेंगे

कोडे क्रमांक ००३/०१२:

'अहो, ऐकलं का? आपल्या निलगिरीशास्त्रांच्या मुलीचं लग्न ठरलं बरं का? त्यांचा फोन आला होता. म्हणाले होते की पत्रिका बघा कशी वेगळीच छापली आहे म्हणून. आज पत्रिका पण आली. मस्तच आहे. बघा तर खरं'
'कुठली मुलगी? गायत्री, धारा का मीनाक्षी?
'इश्श्य, अहो गायत्रीचं लग्न मागल्या वर्षी नाही का झालं? आणि मीना शिकतेय अजून. धाराचं लग्न ठरलंय'
'कोण आहे नवरामुलगा?'
'कोणी पंजाबी आहे, साहिल कपूर म्हणून. ती शिकायला होती ना तिथे दिल्लीला तिथे भेटला म्हणे."
"बाप रे, हे चेन्नईवाले, तो दिल्लीवाला. हम्म, निलगिरीशास्त्री बरे तयार झाले, कर्मठ तामिळ ब्राह्मणाचं घराणं त्यांचं. आणि आता जावई पंजाबी. मिले सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा"
'मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी. पत्रिका बघा. एका जुन्या हिंदी गाण्याच्या ओळी काय कल्पकतेने वापरल्या आहेत. हे नक्की मीनाचं डोकं असणार'

काय ओळी असतील पत्रिकेवर? सांगू शकाल?
क्लू: गाणं गोल्डन इरातलं आहे. कैच्या कै नाही

>>>>>> साहिल आणि धारा = समुद्र आणि नदी यांच्या मीलनावरचं गाणं असणार.

मोहन कि मीरा, बरोबर Happy

कोडे क्रमांक ००३/०११:

सकाळी उठून नेहमीप्रमाणे मॉरिस गावातल्या बेकरीकडे निघाली. तिथे जाऊन बघते तर ही गर्दी. 'काय झालंय'? तिने विचारलं. 'जॉन गायब आहे. बेकरीत कोणीच नाहिये' गर्दीतल्या कोणीतरी तिला उत्तर दिलं. "मग, फोन लावा ना त्याला' ती म्हणाली. 'लावला, पण तो उचलत नाहिये'. तोच माणूस परत म्हणाला. मॉरिसने बेकरीच्या मागे असलेल्या दाट वनराईकडे नजर टाकली. गावातली गिर्हाइकं यायच्या आत भल्या पहाटे डोंगर उतरून पलीकडल्या गावात मालाची विक्री करायला जॉन कधीमधी जात असे हे तिला माहित होतं. गर्दीतल्या कोणाला काही न सागता ती त्या दिशेने निघाली.

बरंच अंतर कापलं तरी तिला जॉनची काही चाहूल लागेना. तिने हाकाही मारून पाहिल्या पण काही उपयोग नाही. एव्हाना पाऊलवाट संपली होती. आणि पुढे असलेल्या घनदाट जंगलात शिरावं की नाही ह्याचा विचार करत असतानाच तिला गवतात काहीतरी दिसलं. ते पहाताच तिचे डोळे चमकले. थोडं अंतर पुढे गेल्यावर पुन्हा काहीतरी दिसलं. तिने जॉनला फोन लावला.

"हॅलो, मॉरिस"
"जॉन, अरे सगळे शोधताहेत तुला. कुठे आहेस तू?'
'अग, मी बेकरीमाग्च्या जंगलात आहे, माझा पाय लचकलाय.हलता पण येत नाहिये"जॉन कण्हत म्हणाला.
"पाऊलवाट जिथे संपते तिथेच आहे मी, येते तुझ्यापर्यत'
"कशी येशील जंगलातून. नीट रस्ताही नाहीये"

मॉरिसने उत्तरादाखल कुठलं गाणं म्हटलं असेल?

क्लू: गाणं गोल्डन इरातलं नाही. थोडं कैच्या कै आहे.

उत्तरः हमे रास्तोकी जरुरत नही हैं...
हमे तेरे पावो के निशान मिल गये है.

कोडे क्रमांक ००३/०१३ - मोहन कि मीरा, भरत नाही

कोडे क्रमांक ००३/०१२ - भरत, रस्ता बरोबर आहे पण घर चुकलं Happy , मामी, तुम्ही मुख्य रस्ता सोडून थोडी बाजूची गल्ली घेतली आहे. Happy

Pages