..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ३)

Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....

नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा श्रध्दा, जबरीच. आणि स्वप्ना ह्या कोड्याबद्दल तुला कॅरॅमल पुडींग (ते श्रध्दाबरोबर शेअर कर मात्र). मस्त.

श्रध्दा, बरोबर Happy मामी, धन्यवाद!

कोडे क्रमांक ००३/०१३:

'हांजी बोलिये, क्या काम है?'
'जी वो खेतके आसपासवाले इलाकेमे खुदाई करनी थी. परमिसन चाहिये थी'
'आपका शुभनाम?'
'दीपककुमार सहाय'
'कौन गावसे है?'
'जी, धोलापुरसे'
'धोलापुरसे हम भी आये है. हमे भी खुदाईके लिये परमिसन चाहिये'
'आपका शुभनाम?'
'ह्र्दयनाथ मिसरा'

'भाई, ये थोडी गडबड हो गयी. अभी खुदाईके कानुनोपे बडा कडा अमल हो रहा है. एक गावमे दो लोगोंको परमिशन नही मिल सकती. किसी एकको ही मिलेगी. आप लोग सारे डीटेल्स फॉर्ममे भर दे. हफ्तेभरमे फैसला हो जायेगा"

सहाय आणि मिश्रा दोघांनी फॉर्म्स भरले खरे पण दोघे एकमेकांकडे 'खाऊ की गिळू' नजरेने पहात होते ही बाब त्या चाणाक्ष अधिकार्याच्या नजरेतून सुटली नाही. तो गोल्डन इरातल्या गाण्यांचा चाहता होता. त्यांचे फॉर्म्स गोळा करून ठेवताना त्याला ह्या परिस्थितीवर अचूक भाष्य करणारं एक सुमधुर गाणं आठवलं आणि तो दिवसभर तेच गुणगुणत राहिला. सांगा ते गाणं.

क्लू: कोड्यातली नावं.

उत्तरः
कही दीप जले कही दिल
जरा देख ले आकर परवाने
तेरी कौन सी है मंजिल

मंडळी, माझी अशी विनंती आहे की कधीही, कुठेही कोडं सुचलं तर इथे येऊन पोस्ट करा. कोडी असली की इथे लोक येतातच Proud

सगळ्यांना माझ्यातर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! नव्या वर्षात हा धागा कोड्यांनी, चूक आणि अचूक उत्तरांनी गजबजता राहो ही सदिच्छा Happy

अरे एक दोन दिवस नाहि डोकावलो, तर बरंच पाणी वाहून गेलं कि.

वक्त मधली साडी तशी फेमस होती. साडी चेगळी नव्हती, ती नेसायची पद्धत वेगळी होती, पुढे मुमताजने पण ब्रम्हचारी मधे तशी साडी नेसली होती.

हे काय हो दिनेशदा, मी तुमच्यासाठी एक स्पेशल कोडं घातलं होतं आणि तुम्ही आत्ता येताय? Sad

स्वप्ना ~ ओके. सायरा तर सायरा. पण आदमी और इन्सानमधील ते गाणे "गोल्डन इरा" पिशवीतील नक्कीच नाही. संगीतासाठी गोल्डन इरा फक्त ५० ते ६० या दशकाला संबोधिले जाते आणि सायराचे हे गाणे तर चक्क १९८० मधील. तरीपण असो. "मीना" नावामुळे काहीशी फसगत झाली म्हणेन.

श्रध्दा मस्तच.

००३/०१५: नाह पहान हा कोयलाबादचा सुलतान असतो आणि खुमखाज ही त्याची लाडकी बेगम असते. ताजमहाल बघितल्यावर ती नाह पहानला म्हणते, 'तू पण माझ्या प्रेमाखातर असा महाल बांध. पण तो शहा जहानच्या ताजपेक्षा अधिक सुंदर झाला पाहिजे. म्हणून तू त्याचे बांधकाम फक्त चंद्रप्रकाशातच कर' हे ती गाण्याच्या दोन ओळींतून सांगते. कोणत्या त्या ओळी?

>>स्वप्ना ~ ओके. सायरा तर सायरा. पण आदमी और इन्सानमधील ते गाणे "गोल्डन इरा" पिशवीतील नक्कीच नाही. संगीतासाठी गोल्डन इरा फक्त ५० ते ६० या दशकाला संबोधिले जाते आणि सायराचे हे गाणे तर चक्क १९८० मधील.

ओह, मला वाटत होतं की ७० चं दशकही गोल्डन इरात येतं. अर्थात 'आदमी और इन्सान' ८० मधला आहे हे मला माहित नव्हतं.

गाण्यात शब्दच्छल वगैरे आहे का? >> गाणे नितांत सुंदर आहे. कसला छल वगैरे नाहिये. कृष्णधवल असले तरी तुला पण माहिती असेल याची खात्री आहे.

कोड्यात मात्र.... कसला तरी छल केल्याशिवाय या बाफवरची कोडी बनू शकतील का?

००३/०१५: नाह पहान हा कोयलाबादचा सुलतान असतो आणि खुमखाज ही त्याची लाडकी बेगम असते. ताजमहाल बघितल्यावर ती नाह पहानला म्हणते, 'तू पण माझ्या प्रेमाखातर असा महाल बांध. पण तो शहा जहानच्या ताजपेक्षा अधिक सुंदर झाला पाहिजे. म्हणून तू त्याचे बांधकाम फक्त चंद्रप्रकाशातच कर' हे ती गाण्याच्या दोन ओळींतून सांगते. कोणत्या त्या ओळी?

उत्तरः ये वाडा (WADA) करो चाँद के सामने | भूला तो ना दोगे मेरे प्यार को |

या गाण्यात 'बसाया है जब अपने दिल में तुम्हे - निभानाही होगा इस इकरार को'
अस म्हणतानाचा पदरी पडले पवित्र झाले , हा अत्यंत पराकोटीचा नाईलाज मधुबालाच्या चेहर्‍यावर स्पष्ट लिहिलाय.
जमाने के गम से हमें काम क्या च्या वेळी अख्ख खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो हे गाणं दोन सेकंदात दिसतंय.

माधव सह्ही!

>>अस म्हणतानाचा पदरी पडले पवित्र झाले , हा अत्यंत पराकोटीचा नाईलाज मधुबालाच्या चेहर्‍यावर स्पष्ट लिहिलाय.

ह्यात प्रदीप कुमार होता ना? मधुबालावरच्या पुस्तकात असं वाचलं होतं की दिलीपकुमारबरोबरचं नातं संपुष्टात आल्याबरोबर ती प्रदीपकुमार किंवा भारत भूषण ह्यांच्यापैकी एकाचा जीवनसाथी म्हणून विचार करत होती. पैकी प्रकुचं लग्न झालं होतं तर भाभुची पहिली बायको वारली होती.

कोडं ००३/०१६:

सरिता आणि क्षितिजचं प्रेम जमलं ते कॉलेजमध्ये. कॉलेज संपलं आणि नोकरी लागताक्षणी क्षितीज सरिताच्या घरी तिच्या आईवडिलांकडे तिला मागणी घालायला आला. तिच्या वडिलांनी त्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि मग बॉम्ब टाकला 'सरिताला दोन श्रीमंताघरची स्थळं चालून आली आहेत. एक आहे देसाई ग्रूपच्या मालकांच्या मुलाचं, अर्णवचं. आणि दुसरं रमानी इंडस्ट्रीजच्या मालकांच्या एकुलत्या एक मुलाचं - हिमालयचं." बिचारा क्षितिज हिरमुसला. ह्या दोघांपुढे आपली डाळ काय शिजणार असंच त्याला वाटलं. तेव्ह्ढ्यात भरीस भर म्हणून त्याला कंपनीतर्फे दुसर्‍या शहरात एका प्रोजेक्ट्साठी सहा महिने जावं लागणार होतं. सरिताने त्याची समजूत काढली. 'तू परत येईपर्यंत आपल्या लग्नासाठी आईबाबांना तयार करेन' असं तिने त्याला ठासून सांगितलं. तो काहीशा नाराजीनेच गेला.

सरिताने वेळ न दवडता दोघाही स्थळांची भेट घेऊन आपलं क्षितिजवर प्रेम असल्याचं सांगितलं. तिच्या सुदैवाने दोन्ही मुलं मनाने उमदी निघाली. त्यांनी आपापल्या घरी आपल्याला सरिताच्या स्थळात इन्टरेस्ट नसल्याचं कळवलं. क्षितिजच्या कामावर खूश होऊन कंपनीने त्याला परदेशातल्या प्रोजेक्टवर पाठवायचं ठरवलं आणि सरिताच्या आईवडिलांनी त्यांच्या लग्नाला संमती दिली.

सरिताने क्षितीजला फोन केला आणि सगळं सांगून शहरात लवकरात लवकर परत यायला सांगितलं - एक हिंदी गाणं म्हणून. गाणं गोल्डन इरातलं. ओळखा.

भाभुची पहिली बायको वारली होती.
>>> वारेल नाहीतर काय करेल बिचारी!

सुरू झाला का हा धागा पुन्हा? चला विचार करूयात ......

कोडं ००३/०१७:

'हे अभय, काय यार असा बसला आहेस देवदास होऊन?'
'देवदासच होणार आहे आपला बॉस.'
'ओह, फिर वोही सोनियावाला किस्सा? एकदा सांगून का टाकत नाहीस तिला?'
'काय सांगू? तिचा बाप केव्हढा मोठा बिल्डर आहे माहित आहे ना? सॉल्लिड श्रीमंत आहेत ते लोक'
'पण मला एक कळत नाही - तू तिच्यावर प्रेम करतोस का तिच्या बापावर?'
'निल्या, लेका, उडव टर माझी. तुला काय? ज्याचं जळतं त्याला कळतं'
'ए, ए, यार, असं नाही हं. कान कर इकडे. तिचा बाप बिल्डर आहे ना? मी तुला एक मस्त गाणं सांगतो. ते फक्त तिच्यासमोर जाऊन म्हण. तुझ्यावर फिदा नाही झाली तर माझं नाव बदल'

निल्याने अभयला कोणतं गाणं सांगितलं असेल.

वि.सू. - गाणं गोल्डन इरातलं नाही. क्लू - बिल्डर.

००३/०१६ : हे गाणं नसेल अशी आशा आहे. प्राहमिक शाळेतल्या विद्यार्थ्यासारखा अभिनय आहे.
मेरा प्रेम हिमालय से उंचा सागर से गहरा प्यार मेरा

००३/०१६ मिळालं.
मेरे तुम्हारे बीच में अब तो ना पर्वत ना सागर
निसदिन रहें खयालों में तुम अब हो जाओ उजागर
अब आन मिलो सजना

चित्रपट : झुक गया आसमां

भरत बरोबर Happy

कोडं ००३/०१६:

सरिता आणि क्षितिजचं प्रेम जमलं ते कॉलेजमध्ये. कॉलेज संपलं आणि नोकरी लागताक्षणी क्षितीज सरिताच्या घरी तिच्या आईवडिलांकडे तिला मागणी घालायला आला. तिच्या वडिलांनी त्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि मग बॉम्ब टाकला 'सरिताला दोन श्रीमंताघरची स्थळं चालून आली आहेत. एक आहे देसाई ग्रूपच्या मालकांच्या मुलाचं, अर्णवचं. आणि दुसरं रमानी इंडस्ट्रीजच्या मालकांच्या एकुलत्या एक मुलाचं - हिमालयचं." बिचारा क्षितिज हिरमुसला. ह्या दोघांपुढे आपली डाळ काय शिजणार असंच त्याला वाटलं. तेव्ह्ढ्यात भरीस भर म्हणून त्याला कंपनीतर्फे दुसर्‍या शहरात एका प्रोजेक्ट्साठी सहा महिने जावं लागणार होतं. सरिताने त्याची समजूत काढली. 'तू परत येईपर्यंत आपल्या लग्नासाठी आईबाबांना तयार करेन' असं तिने त्याला ठासून सांगितलं. तो काहीशा नाराजीनेच गेला.

सरिताने वेळ न दवडता दोघाही स्थळांची भेट घेऊन आपलं क्षितिजवर प्रेम असल्याचं सांगितलं. तिच्या सुदैवाने दोन्ही मुलं मनाने उमदी निघाली. त्यांनी आपापल्या घरी आपल्याला सरिताच्या स्थळात इन्टरेस्ट नसल्याचं कळवलं. क्षितिजच्या कामावर खूश होऊन कंपनीने त्याला परदेशातल्या प्रोजेक्टवर पाठवायचं ठरवलं आणि सरिताच्या आईवडिलांनी त्यांच्या लग्नाला संमती दिली.

सरिताने क्षितीजला फोन केला आणि सगळं सांगून शहरात लवकरात लवकर परत यायला सांगितलं - एक हिंदी गाणं म्हणून. गाणं गोल्डन इरातलं. ओळखा.

मेरे तुम्हारे बीच में अब तो ना पर्बत ना सागर
निसदिन रहें खयालों में तुम अब हो जाओ उजागर
अब आन मिलो सजना

चित्रपट : झुक गया आसमां

हे गाणं मिसेस युसुफ खान पावसात भिजत भिजत राजेन्द्रकुमारला उद्देशून म्हणतात. गाण्यात राकु आहे पण तो लपत असतो. आता तो खरा राकु असतो का त्याचा आत्मा असतो देव जाणे!

कोडं ००३/०१७:

'हे अभय, काय यार असा बसला आहेस देवदास होऊन?'
'देवदासच होणार आहे आपला बॉस.'
'ओह, फिर वोही सोनियावाला किस्सा? एकदा सांगून का टाकत नाहीस तिला?'
'काय सांगू? तिचा बाप केव्हढा मोठा बिल्डर आहे माहित आहे ना? सॉल्लिड श्रीमंत आहेत ते लोक'
'पण मला एक कळत नाही - तू तिच्यावर प्रेम करतोस का तिच्या बापावर?'
'निल्या, लेका, उडव टर माझी. तुला काय? ज्याचं जळतं त्याला कळतं'
'ए, ए, यार, असं नाही हं. कान कर इकडे. तिचा बाप बिल्डर आहे ना? मी तुला एक मस्त गाणं सांगतो. ते फक्त तिच्यासमोर जाऊन म्हण. तुझ्यावर फिदा नाही झाली तर माझं नाव बदल'

निल्याने अभयला कोणतं गाणं सांगितलं असेल.

वि.सू. - गाणं गोल्डन इरातलं नाही. क्लू - बिल्डर.

उत्तरः मेरे दिल विच रहियो सोणी मेन्यू छड ना जइयो सोणी
तेरे लिये बनायी है सीनेमे एक जगह रे.
रहे जा रहे जा रे, रहे जा रहे जा रे, रहे जा रहे जा रे,
मेरे दिल विच आ रहे जा रे.

बिल्डर = रहेजा

कोडं क्र. ००३ / ०१८ :

खलनायक जीवनच्या मुलीवर एका मुलाचे प्रेम जडते. ती म्हणते मी वडिलांना विचारल्याशिवाय काहीच करत नाही. तू त्यांना विचार. जीवन म्हणतो मी तिचे लग्न सागर नावाच्या मुलाशी ठरवले आहे. त्याचा आमरसाचा धंदा आहे. तू तर काहीच कामधंदा करताना दिसत नाहीस. तरी मी तुला एक संधी देतो.
जर तू माझ्या घरामधे गच्चीवर जाण्यासाठी जीना बांधून दिलास तर मी विचार करीन..

त्यानंतर तो मुलगा मुलीकडे येतो, तर ती वडिलांच्या अटीची आठवण करून देतो. आता त्याला तिच्या डोळ्यांतही तिचा बापच दिसायला लागतो आणि त्याची अट आठवायला लागते. त्याला काही सुचेनासे होते.. मग तो कुठले गाणे म्हणेल ?

Pages