युक्ती सुचवा/ युक्ती सांगा

Submitted by पूनम on 12 March, 2009 - 05:13

१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.

२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)

३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383

४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूनम एक अघोरी उपाय....
घरी ड्रिलींग मशिन असेल तर मध्यम ड्रिल बीट लावून सरळ तो बो व्ही दगड ड्रिल कर, पटकन तुकडे पडतील.......आणि मग हे तुकडे मिक्सीत फिरवून परत पावडर तयार...

हं, तर तो प्लॅस्टिकचा डबा आडवा करून ओट्यावर गोलगोल फिरवत जोराजोरात आपटला. त्याने आतल्या दगडाची बरीचशी माती झाली Proud उरलेला दगड डब्यातून बाहेर येऊ शकला. तो मिक्सरमधे फिरवून त्याचीही माती करून सर्व माती फ्रीजमध्ये ठेवली आहे. पण हे फार टिकेल असं वाटत नाही. पुन्हा दगड होणारच त्याचा Sad
कराडकरची क्यूब्जची आयडीया बेस्ट. उन्हाळा आहेच, संध्याकाळी गारेगार काही खायला मजा येईल. आजच करेन Happy
धन्यवाद सगळ्यांनाच.

तर, टिप अशी, की बोर्नव्हिटाचे, कॉफीचे मोठमोठाले डबे आणू नका. छोटे पॅक मिळतात, ते आणा. ही टीप आशू_डी ची.

-----------------------------------
Its all in your mind!

पुनम, सुटलीस एकदाची Happy
************
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग

माझ्याकडे पार्ले जी + मारी बिस्किट चे बरेच तुकडे/चुरा आहे (मुलीचा उपद्व्याप). आणि आता ती तुटलेल बिस्किट खात नाही. प्रत्येक वेळी पुर्ण बिस्किट पाहीजे असत.
काय करता येइल त्या तुकड्यांच?

http://www.maayboli.com/node/5596 - हे करा आणि आम्हालाही पाठवा थोडा रोल Happy

साधना

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

बोर्नव्हिटाचे, कॉफीचे मोठमोठाले डबे आणा! पण ते शीत कपाटात ठेवा.

तो मिक्सरमधे फिरवून त्याचीही माती करून सर्व माती फ्रीजमध्ये ठेवली आहे. >>आणि त्या डब्याच काय केलस? Wink

सगळेच शक्तिमान>> Biggrin

*********************
All desirable things in life are either:
1.Illegal
2.Banned
3.Fattening or
4.Married to Others.
Wink Biggrin

धन्यवाद साधना. Happy

पार्लेजी मारी चा केक मस्त लागतो चॉकलेट फ्लेवर घालून... बाकी प्रमाण वगैरे दिग्गजांना विचारा.. माझा नेहेमीच बिघडातो केक.. Sad पण केक चवीला छान होतो नेहेमी! Happy

मी पार्ले जी चे लाडु करते.

दुधात बिस्किट बुडवुन घ्यावे आणि ते एका खोलगट भांड्यात ठेवावे. असे प्रत्येक बिस्कीट ओलसर झाले की त्यात खोवलेला नारळा मिक्स करावा. मिश्रणाच्या निम्मी साखर घालावी. मिश्रण गअ‍ॅस वर ठेवावे. साखर वितळली की त्याचा मस्त गोळा तयार होतो. लगेच खाली उतरवुन लाडू वळावे. हाताला तुप लावयची पण आवश्यकता नाही.

तर, टिप अशी, की बोर्नव्हिटाचे, कॉफीचे मोठमोठाले डबे आणू नका. >> ऑफलाईन जरी युक्त्या सुचवल्या असल्या तरी सांगणार्‍याचे नाव विसरायचं नसतं!! Wink Proud
-----------------------------------------------
स्वतःचा असतो तो स्वाभिमान ,दुसर्‍याचा तो माज! Proud

आरती, कसल्या सही पाककृती आहेत तुझ्या... आधी बटाट्याच्या किसाचे लाडू आणि आता बिस्किटांच्या खोबरं घालून लाडू... व्वा!!

एक सांग, बिस्किट भिजवून घेणे अगदीच आवश्यक आहे का? चुरा करून खोबर्‍यात मिसळलेलं चालेल का?

माझ्याकडे बरेच चॉकलेट फ्लेवरचे कॉर्नफ्लेक्स आहेत, त्याचं काय होऊ शकेल??

माझ्याकडे पण बरेच व्हीटफ्लेक्स, ओटमिल आणि अजुन काही सिरल्स आहेत. दिराने आणले होते स्वतःसाठी. तो अन नवरा दोघं ढुंकुनपण बघत नाहीत. मला आवडत नाही पण तरीही मी खाते अधुन मधुन. काहीतरी सुचवा मलापण.

अल्पना
कडक व कुरकुरीत फ्लेक्ससाठी(कॉर्न्/व्हीट) =
पनीर थोडे १ तास मॅरिनेट करून ठेव. दही+गरम मसाला+लाल तिखट+मीठ+आले लसूण पेस्ट हे वापर मॅरिनेशनसाठी. कॉर्न फ्लोअर मधे पाणी व थोडे मीठ(एक अंड ही चालेल खूप बीट करून) घालून पातळसर बॅटर कर. मॅरिनेट झालेले पनीरचे तुकडे(लांब लांब) आधी या कॉर्न फ्लोअर च्या मिश्रणात बुडव व नंतर तुझ्याकडच्या व्हीट/कॉर्न फ्लेक्स मधे घोळवून तळून काढ. छान स्नॅक्स होतील.

व्हीटफ्लेक्स, ओटमील वगैरे कोरडेच भा़जून घ्यायचे. मग त्याचा मिक्सरवर चुरा करायचा. या चुर्‍याचा उपमा करता येतो. तसेच इडली डोश्यात तो घालता येतो.

आरतीवर एका मोठ्या ट्रेक ग्रुपच्या जेवणाखाण्याची जबाबदारी आहे, त्यातूनच ती हे सगळे शिकली, असा माझा कयास आहे.

माधुरी धन्यवाद. छान आयडिया आहे. एक शंका, त्यात रेझिन्स वैगरे आहे, मग गोडसर नाही का लागणार?
दिनेश उपमा केला होता एकदा, आता डोश्यात घालुन बघते. धन्यवाद.

अल्पना
आपण चिवड्यात वगैरे नाही का घालत रेझिन्स वगैरे(तिखटाबरोबर गोड चव.)....तर मला वाटतं इथेही चालेल.

साबुदाणा खिचडी बरीच उरल्यावर नाईलाजाने फ्रिजमधे ठेवावी लागली तर कडक होते व परत खाण्याच्या लायकीची रहात नाही. ती परत मऊ कशी करता येईल. रब्बर व्हायला नको.
************
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग

पाण्याचा एक हबका मारुन गरम केलीस का कधी?

अश्विनी, पाण्याचा/ताकाचा एक हबका मारुन खिचडी १-२ मिन मायकक्रोवेव कर. मग थोड्याश्या तेलात फोडनी करुन त्यात कान्दा परतव. त्यात साबुदाणा खिचडी, चविप्रमणे तिखट, मिठ, साखर (खिचडी त असेलच ते धरुन) टाकुन एक वाफ काढ. लिम्बु, कोथिंबिर टाकुन खायचे. छान लागते.

साबुदाणा खिचडीत कांदा? Uhoh

मला पण पहिल्यांदा ऐकलं तेव्हा झेपलं नव्हतं... पण आता बघ, ते कसं अशक्य लागतं असं सांगत येईल कोणीतरी Happy

वाइट नक्किच लागत नाहि. हा खिचडी उरल्यावर करायाचा उपाय आहे आणी उपवासच्या दुसर्या दिवशी खिचडी खायचा कंटाळा येतो. अशक्य नक्किच लागत नाही. मलातरि आवडते. बाकि करायचे कि नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न्न आहे.
(हे एव्हड्या साठी लिहिले कारण न खाताच एकदम अशक्य लागेल वैगेरे वाचुन आश्चर्य वाटले Happy

अशक्य लागते म्हणजे अती चविष्ठ लागते किंवा भयंकर आवडते. बरेच जण हा शब्द प्रयोग करतात. उदा: इमरान अशक्य क्युट आहे Wink

दुधाचा हबका मारुन शिट्टी न लावता प्रेशर कूकरमधे ५ मिन ठेवले तरी खिचडी छान मऊ होते.

बरोबर, हाही एक उपाय आहे जर मायक्रोवेव्ह नको असेल तर..

नारळाचे पातळ दूध घालुन ती जरा गरम करायची. थोडा वेळ तशीच ठेवायची. परत कोकम, घालून गरम करायची. थोडा वेळ तशीच ठेवल्याने, साबूदाणा छान फूलतो. त्यात उकडलेले दाणे घालायचे. वरुन बटाट्याचा चिवडा पेरायचा. कि फराळी मिसळ तयार झाली. सोबत घट्ट दहि घ्यायचे.

सायो, माझ्या जेवढ्या उत्तर भारतीय मैत्रीणी आहेत, त्या खिचडीत कांदा घालतात. आपण कांदेपोहे करतो ना तसे त्या साबूदाणा खिचडी करतात. त्यामुळे, आपल्यासारखी खिचडी केली की त्यावर अक्षरशः तुटून पडतात.:)
................................
माझे जगणे होते गाणे...

ह्म्म्म, कशी लागते/लागेल माहीत नाही. आपण मोस्टली उपासाकरता करतो म्हणून 'खिचडीत कांदा' प्रकरण आपल्याला झेपत नाही.

साबुदाण्याबरोबर कांदा/लसूण सहीच लागतं. एकदा चुकून मी भिजवलेल्या साबुदाण्यात नारळाचा चव टाकण्याऐवजी बारीक कापलेला कांदा घातला होता. मग त्यातच थोडा लसूण, हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि जिरेपूड टाकली. उकडलेला बटाटा कुस्करून घातला आणि सरळ वडे तळून खाल्ले. अप्रतिम चव लागते, फक्त उपासाला करू नका म्हणजे झालं.

अरे वा! साय, साज, मिलिंदा, सिंडरेला, दिनेश, प्राची, भाग्या अनेक धन्यवाद. दुधाचा/पाण्याचा हबका मारुन गरम करुन पाहिली होती पण विशेष छान नाही लागली (घास फिरतच राहिला) पण कुकरमधे शिटी बाजुला काढून नव्हती पाहिली. आता करुन पाहीन. फराळी मिसळ किंवा ताक, कांदा, फोडणी छानच आणि वेगळंच लागेल.

************
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग

खिचडीत नुसताच कांदा नव्हे तर हळद आणि शेंगदाण्याच्या कुटाऐवजी अख्खे भाजलेले शेंगदाणे घातले जातात. मी खाल्ली आहे अशी खिचडी, मस्त लागते.. Happy

Pages