युक्ती सुचवा/ युक्ती सांगा

Submitted by पूनम on 12 March, 2009 - 05:13

१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.

२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)

३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383

४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही चालणार का? मग राहीलेच. Happy

रूनी, तुला आता नवीनच(रवेल नाहीतर मॅगीक बूलेट) घ्यावा लागेल बघ. (फु. स.) Happy
मी आपली मासे तळल्यावर तव्यावर हेच(बटाटा+ लिंबू रस) नी वरून मग फक्त साबणाचे गरम पाणी करून लखलखीत, वास न येणारे तवे करते. Happy

रुनी, नाही, माझा Cuisinart नव्हता. माझ्या घरमालकिणीचा साधा ग्राईंडर होता तो. अर्थात तो सुद्धा ऑफिशियली पाण्याने धूत नाहीत, पण मी दाणे / खोबरं असं काहीतरी तेलकट त्यात घातलं होत एकदा चुकून, आणि मग पाणी आत जाऊ नये म्हणून उलटा धरून साबणाच्या पाण्याने धुतला होता, आणि तसाच वाळवला पण होता. (तो अजून चालू आहे. Happy ) पण हा टोकाचा उपाय तुझ्या मॉडेलला मानवेल असं वाटत नाही.

- गौरी
http://mokale-aakash.blogspot.com/

मेदु वडे कुरकुरित होण्यासाठी काय करावे?
माझे वडे थोडे घट्ट होतात.

उडदाची डाळ रात्रभर तरी भिजत घालावी. वाटून झाल्यावर साधारण तासभर तशीच ठेवावी आणि मगच वडे तळावेत. पीठ वाटल्या वाटल्या वडे तळले तर ते कुरकुरीत होत नाहीत.

ऊडदाची डाळ वाटुन झाल्यावर एकाच दिशेने( हाताने/ चमच्याने) चांगली फेसावि..
मग वडे तळावे.

ऊडदाची डाळ वाटुन झाल्यावर एकाच दिशेने( हाताने/ चमच्याने) चांगली फेसावि..
मग वडे तळावे. >> हे काम फूड प्रोसेसर चांगले करतो. मी इडलीची डाळ फूड प्रोसेसर मधे 'S' ब्लेड ने वाटते आणि मग dough करायचे ब्लेड लावुन २ मिनिटे फिरवुन १ मिनिट थांबुन असे १०-१२ मिनीट तरी करते. मग त्यात वाटलेले तांदूळ घालुन परत ५-६ मिनीटे करते. पीठ खुप हलके होते त्यामुळे.

बासमतीचा भात हमखास मोकळा किंवा हमखास मऊ होण्यासाठी काय करावे? मी लेमन राइस करतो तेव्हा हमखास मऊ होतो आणी वरण भात खावा तर हमखास मोकळा होतो.

हमखास मोकळा करण्यासाठी
बासमती तांदूळ धुऊन , पाणी पूर्ण निथळून अर्धा तास ठेवावेत. मग तांदूळ बुडून शिवाय वर ३/४ इंच पाणी येईल इतकं पाणी पातेल्यात आधी गरम करुन घ्यावं अन मग त्यात तांदूळ घालून दणदणीत उकळी काढावी. उकळी आल्यावर दोन मिनिटांनी पाणी ओतून द्यावे व भात पाचेक मिनिटे झाकून ठेवावा. वाफ उतरली की लगेच मोठ्या ताटात, किंवा ट्रेमधे पसरुन गार होऊ द्यावा.

राइस कूकर मधे करत असाल तर एक कपाला १.२५ ते १.५ कप पाणी घातलं तरी छान मोकळा होतो भात. पण भात झाल्यावर जास्त वेळ त्याच भांड्यात ठेवला तर खालचा थर नेहमी मऊ / मुश्ड होतो Sad

कुणी आत्ता ऑनलाईन असेल तर लवकर उत्तर द्या :

मुलाच्या शाळेत उद्या टीचर बरोबर हेल्दी फुड मीटींग आहे. प्रत्येक पॅरेंटला टीचरने सांगितलेला पदार्थ आणायचा आहे . मला इडल्या पाठवायच्या म्हणुन मी आज सकाळी उडदाची दोन अडीच वाट्या दाळ भिजत घातली. पण "खयालों मे" पांढर्‍या डाळी ऐवजी काळी सालीची दाळ भिजत घातलीय Sad आता काय करु त्या दाळीचे? लवकर उत्तर द्या प्लीज.

...तु सब्र तो कर मेरे यार....
-प्रिन्सेस...

भात मोकळा होण्यासाठी मी त्यात ३-४ थेंब तेल किंवा १/२ चमचा साजुक तुप घालाते.

प्रिन्सेस,

- मिस़ळीचे वरण (अजून दोन ४ कडधान्य टाकून - २-३ चमचे प्रत्येकी. )
- पौष्टीक खिचडी- लवकर, एका झटक्यात संपेल. पण ती फार ग्रेट लागत नाही, बट इटस ओके एखादयावेळेस.
- धिरडी पडतील का ?

धिरडी मस्त पडतील. वाटुन घे, त्यात हिरव्या मिरच्या, आले, हवा तर लसुण वाटुन लाव. १ डावभर तांदळाचे पीठ लाव आणि टाक धिरडी.

प्रिन्सेस......राजमा असेल तर दाल मखनी कर.

अहा...
इतक्या त्वरित उत्तराबद्दल रैना अन मिनोती दोघींचे आभार. मला उत्तर द्यायला उशीर झाला कारण मी पळाले होते संगोपनहिताय Happy नंतर पोटपाणी.... पोटपुजा Happy ई.ई.

खिचडी मध्ये आज रात्री थोडी ढकलेन अन वाटुन ठेवते उरलेली.
उद्या धिरडी करेन .

...तु सब्र तो कर मेरे यार....
-प्रिन्सेस...

अरे..हो की दाल माखनी करता येईल. मज्जाच आहे कित्ती काय काय प्रयोग करता येतील मला Wink

पर्र आता दाल माखनी कशी करतात ते ही सांगुन टाक Happy

...तु सब्र तो कर मेरे यार....
-प्रिन्सेस...

दाल माखनीला आख्खे साबूत उडद लागतात ना ?
अल्पनाSSSSSSSS- कुठे आहेस ?

रैना.. Happy
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/81455.html?1146162012 ही घे दिनेशनी दिलिये की दालमाखनीची कृती... यात तरी शाबुत उडीद आहेत
मला नाही आवडत दाल माखनी..म्हणुन मी कधीच करत नाही घरी.. त्यापेक्षा मिक्स दाल ( पण यात थोडीच दाल वापरली जाईल्) करता येईल..किंवा मा-चनेकी दाल...हि मस्त लागते.. नव्या मायबोलीवर पंजाबी पदार्थात लिहिल्यात दोन्ही कृती... करायची असेल अन नाहीच सापडल्या तर देते लिंक..

माझ्या कडे पाव खुप उरले आहेत पाव भाजि झाली ,पावाचा चिवडा झाला तरी पण खुप पाव राहिले त्याचे काय करता येइल.

मिसळ पाव,दाबेलि, पाववडा(पावाचि भजि), वडापाव, चुरा करुन कटलेट मधे घालता येईल.

वटपोर्णिमे पर्यंत ठेवायचे. मग वडापाव करायचा.
वडा (मला) पाव !!!

तुमच्या सगळ्याचे आभार.

वेल१२३, पाव उन्हात वाळवून/ओवन मधे कडक करुन चुरा करुन ठेव. आयत्या वेळी कटलेटस मधे वगैरे घालता येतिल.....

दिनेशदा, वडा (मला) पाव - सहीच Happy

कोणताही वास घालवायचा असेल तर त्या भांड्याला/हाताला आधी खोबरेल तेल लावा मग साबणाले धुवा, अगदी मशाचा वासही जातो.
मेदूवडे करताना भिजवलेल्या डाळीबरोबर मूठभर कोरडे पोहे वाटावेत, मेदूवडे मस्त कुरकुरीत आणि हलके होतात.

नवर्‍याने चुकुन सालाच्या मुगाच्या डाळी एवजी (ए वर मात्रा कसा द्यायचा?) सालाची उडीद डाळ आणली आहे. काय काय करता येईल? १ किलो आहे, कशी संपवायची कळत नाहिए. दिनेशदा मदत करा.... Happy
====================================
कितीक हळवे, कितीक सुंदर, किती शहाणे....आपुले अंतर.....

सखी इथे वरती वाचुन पहा. सगळे उपयोग अगदी परवाच लिहिले आहेत.
~~~~~~~~~~~~~
मराठी रेसिपीज साठी आजच अवश्य भेट द्या: http://vadanikavalgheta.blogspot.com/
~~~~~~~~~~~~~

सखी याचे डांगर करता येईल. मिनोति ने कृति दिली होती. याचे घुटं करता येते ( कृति असणार इथे ).
भिजवून चोळली तर बरीच साले निघतील. मग त्यात भिजवलेली मुगडाळ घालून, वाटून दहिवडा, भजी करता येतील. भाकरीची आवड असेल तर ज्वारीच्या पिठात याचे पिठ मिसळता येईल.
भिजत घालून वाटून त्यात कोरडे ज्वारीचे वा तांदळाचे पिठ मिसळून भाकर्‍या करता येतील. या भाकर्‍या थापायला सोप्या जातात. यातच कांदा मिरची घालून मसाला भाकरी करता येईल.

सखी डाळ बदलून आणायला सांग.

Pages