युक्ती सुचवा/ युक्ती सांगा

Submitted by पूनम on 12 March, 2009 - 05:13

१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.

२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)

३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383

४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन्ही सेमच, थोडा फार इथे तिथे फरक व नावाने वेगळी ओळखली जातात.

स्वस्त मिळाली म्हणून टोमॅटो पेस्ट आणली. आता बायको येताजाता कुत्सीत्पणे बघते. काय करता येइल?

विकु
त्याचा टोमॅटो राईस प्रकार करता येईल. इथे कृती होती जुन्या मायबोलीत.
तसच पास्ता सॉससाठी वापरता येईल.

कुलकर्णी,
ती पेस्ट आईस ट्रे मधे ठेवुन क्युब्स करा. आणि ते झिपलॉक्मधे ठेवुन द्या फ्रिझर मधे. आणि मग पंजाबी पदार्थात. मारिनारा करायला वापरा. टोमॅटो नान वगैरे पण बनवता येईल.

~~~~~~~~~~~~~
मराठी रेसिपीज साठी आजच अवश्य भेट द्या: http://vadanikavalgheta.blogspot.com/
~~~~~~~~~~~~~

कुलकर्णी,

झटपट टॉम सूप, टॉम सारं, पिझ्झा बेस सॉस, पावभाजीत वापरा, केचप करा....

मागे एकदा राजगिर्‍याचे लाडु आणले होते, पण कोणीही खाल्ले नाहीत नी आता पडुन आहेत. मऊ पण झालेत. Sad
त्यामुळे खावेसे पण वाटत नाही. काही करता येइल ते संपवायला ?
-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
-----------------------------------------------------------

माधवी- दुधात टाकून- एक दिवस ब्रेकफास्टला खाऊ शकता.

खरंय.. खूप छान लागतात्... माझा उपवासाच्या दिवशिचा नाश्ता हाच असतो Happy

वि.कुलकर्णी! टोमॅटो पेस्ट वापरुन टोमॅटो पुर्‍या करता येतिल, छोल्यात घालता येइल.

नॉन स्टिक भांड्यांवरचे तेलाचे डाग (कडेने तेल सोडल्यामुळे येणारे) कसे जातिल? मी जनरलि असे तेल सोडत नाहि पण सासुबाइंना अश्याच पध्धतिने केलेले पदार्थ आवडतात Sad त्यामुळे घरातिल सगळ्या नॉन स्टिक भांड्या.वर असे डाग पडलेयत. पॅन तर पार दुरंगि झालय (कडेने तेलकट काळ आणि मध्ये नॉन स्टिक). प्लिज उपाय सांगा.

********************####**************************
माझि नरकात जाण्याचि तयारि आहे पण त्यामागच कारण मात्र स्वर्गिय असायला हव!

एक मोठी परात घे, त्याच्यात खायचा सोडा टाक, वरून गरम पाणी ओत नी एक चहाचा टी बॅग,चार पाच पुदीना पाने टाक्.(हसू नकोस, वर्क होते ही ट्रीक). मग त्या नॉन स्टीक तव्याचा बूड फक्त ह्या पाण्यात बुडव. हे पाणी तव्याच्या आत जावो देवू नकोस. नॉन स्टीक खराब होइल. रोज २-३ वेळा डुबवले की होइल स्वच्छ. आता बाहेरचा साफ झाला की गरम पाण्याने धू मग तव्याचा आतला भाग साफ करायला आत पाणी घे,फक्त एक चहाची बॅग व पुदीना पाने टाकून उकळ. मस्त चकचकीत. एवढी मेहनत सहसा करावी लागत नाही. काहीही तळले की मी आधी ट्यूशूने मस्त पुसून घेते लगेच. मग लगेच टी बॅग व पुदीना घालून उकळवले की तवा जरा रापत नाही. पुदीना ह्यासाठी की त्याने वास निघून जातो.

थँक्स अ मिलिअन ग मनुस्विनि, हसिन कशाला? नक्कि करुन बघते आणि सांगते काय झाल ते.

********************####**************************
माझि नरकात जाण्याचि तयारि आहे पण त्यामागच कारण मात्र स्वर्गिय असायला हव!

माझ्याकडे पण हा नॉनस्टीकवाला प्रॉब्लेम आहे. आता करुन बघते Happy
***************
युद्धकर्ता श्रीरामः मम | समर्थ दत्तगुरु मुलाधारः ||
साचार वानरसैनिकोSहम | रावण वधः निश्चितः ||
इति अनिरुद्ध महावाक्यम |

हाय,

माझ्याकडे ६ अंडी उरलियेत - शिळी झालियेत पण खराब नाही. खाणार नाहिये पण टाकायला ही जीवावर येतय.... काही दुसरा उपयोग करता येइल का?

डोक्याला मेंदि लावत असाल तर नुसत्या अंड्यानि मेंदि भिजवुन लावता येइल, ह्याने अंड्याचे फायदे तर मिळतिलच आणिक व्हिस्कॉसिटि जास्त असल्याने मेंदिचे थेंब टपकणार नाहित.
********************####**************************
माझि नरकात जाण्याचि तयारि आहे पण त्यामागच कारण मात्र स्वर्गिय असायला हव!

माझ्या कडे खुप आबट grapes आहे त्याचे काय करता येइल

तोंडाला पण लावू शकतेस लाजो अ‍ॅलर्जी नसेल तर.. Happy

तळणासाठी सर्वात चांगले तेल कोणते? मी कॅनोला ऑईलमधे तळते तेव्हा पदार्थाला थोडा वास वाटतो.

मला ऑईल स्प्रे गिफ्ट मिळालाय (सोयाचे तेल आहे) मी एकदा पराठ्यांवर वापरुन बघीतला पण कोणालाच वास आवडला नाही. त्याचा अजुन काही उपयोग करता येऊ शकतो का? आणि तो स्प्रे नेमका कसा आणि कशासाठी वापरतात?

कविता पापडवर स्प्रे करुन microwave मधे पापड कर मस्त होतात.... अगदि कमी तेलात.. मी बरेचदा केलं आहे... Happy

धन्स किट्टू आजच करुन बघते Happy

-------------------------------------------------------------------------
जो संपतो तो सहवास, आणि ज्या निरंतर रहातात त्या आठवणी

एक मोठी परात घे, त्याच्यात खायचा सोडा टाक, वरून गरम पाणी ओत नी एक चहाचा टी बॅग,चार पाच पुदीना पाने टाक्.(हसू नकोस, वर्क होते ही ट्रीक). >>>>>>> टी बॅग नसेल तर नुसतीच चहा पावडर टाकली तर चालेल का?

माझा जवळ जवळ पाउण gallon चा दुधाचा can नासला. फेकवत नाही इतक दुध !! या दुधाचे काही करता येईल का?

झी- पनिर, रसमलाई (पनीर खपवायला) किंवा कलाकंद.

नासलेल्या दुधाला जर वास यायला लागला असेल तर सरळ फेकुन द्यावे... वाईट वाटते कबुल आहे, पण खराब दुधामुळे पोटे बिघडण्यापेक्षा बरे....

१. गोड आवडत असेल तर तसच उखळव आणि पाणी कमि झाल कि गुळ / साखर आणि वेलचि पावडर टाकुन वड्या बनव. कोणा कळणारहि नाहि कशाचा पदार्थ आहे ते.
२. नासलेल दुध पाणि वेगळ होइ पर्यंत उकळ. थंड झाल्यावर पाणि काढुन टाक झाल पनिर तयार.

झी मोगरा नी १ नं ला सांगितल्या प्रमाणे मी करते. साखरे पेक्षा गुळ चांगला लागतो चविला. आणि डायरेक्ट नको उकळवु आधी त्यातले पाणि गाळ थोडेच पाणी ठेव त्यात त्यामुळे वेळ लागत नाही आणी गॅसही कमी लागतो.

मी पण केतकी ने सांगितल्याप्रमाणे १ आणि २ करते, पण ते दुध ताजे आणलेले असते आणि मग माझ्या चुकीमुळे फाटलेले असते Happy

पण कॅनमधले फाटलेले/नासलेले दुध वापरायचे मला तरी रिस्की वाटते. खाऊन काहीतरी अपाय होण्याऐवजी टाकलेले बरे.

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

केक किंवा इतर् काही पदार्थ करताना जेव्हा भांड्याला आतुन तेलाचा हात लाऊन घ्यायची वेळ येते तेव्हा ऑईल स्प्रेचा उपयोग करता येईल.. मी युटयुबवर पाहिले Happy

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

Pages