युक्ती सुचवा/ युक्ती सांगा

Submitted by पूनम on 12 March, 2009 - 05:13

१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.

२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)

३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383

४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हळद पण? हे सगळं वेगवेगळ्या काँबिनेशनमधे करुन पाहिलं पाहिजे.
************
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग

कांदा घालून खिचडी मस्त लागते. माझी मामी करते कायम. Happy

--------------
नंदिनी
--------------

रात्री पावभाजी केली आणि त्यातली भाजी बरीच उरली, तर सकाळी अजून थोडे बटाटे उकडून, मॅश करून त्या भाजीत मिसळायचे, भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरते मीठ आणि रवा घालून ब्रेडक्रम्ब्ज मध्ये घोळवून कटलेट करता येतात. (न भाजलेला) ब्रेड उरला असेल, तर त्याचा मऊ भाग पाण्यात भिजवून घालता येईल. भाजीत लसूण घातलं नसेल, तर तेही चवीला घालायचं. भाजी संपते, आणि नवीन पदार्थही.
-----------------------------------
Its all in your mind!

पूनम, मी पण असे करते. कधी कधी भाजी कणकेत मिसळून छान पराठेही होतात.
************
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग

पूनम, ही ट्रिक चांगली आहे पण आमच्याकडे सतत आठ दिवस सुद्धा सकाळ, दुपार, रात्र पावभाजी खायला घातली तरी खपेल अशी परीस्थिती आहे. त्यामुळे कटलेटसाठी वेगळा घाट घालावाच लागतो.

पालकपनीर उरले असेल तर पनीर हातानेच मॅश करून त्यात ब्रेड घालून त्याच्या पारीत किसलेले चीज भरून पालकबाँब्स करता येतात.
................................
माझे जगणे होते गाणे...

पालकाचे काय करायचे आणि ? की ते बाँब पालकात टाकून खायचे ? की पूर्ण पालकपनीर मध्ये ब्रेड घालायचा ?

आमच्याकडे पण पावभाजी कितीही दिवस खाता येते, त्यामुळे कटलेट करणे या वेगळा बेत करावा लागतो.

मिलींदा Happy पालकपनीरमध्येच ब्रेड घालायचा हो. आणि हाताने नीट मिसळून मग त्या मिश्रणाच्या पार्‍या करून त्यात चीज भरायचे.
................................
माझे जगणे होते गाणे...

साबुदाण्याची खिचडी उरली तर फ्रिजमध्ये न ठेवता फ्रिजरमध्ये ठेवावी. वापरायच्या आधी डिफ्रॉस्ट करताना फ्रोजन व्हेजिटबलच सेटिंग वापराव. अगदी छान ताज्या खिचडीसारखी होते.

आर्च, हे मात्र मला करुन बघावेच लागेल. एकदा दोन तीन दिवस खिचडि फ्रीजमधे राहिली माझी. मग तिचे जे झाले ते झालेच.

तुम्ही मला मॅड म्हणाल पण मी चक्क माझ्या लेकीच्या बॉट्ल स्टरलाझर मधे साबूदाण्याच्या खिचडीचा क.न्टेनर ठेवला आणि २ मिनीट मायक्रोव्हेव मधे गरम केल. पर्फेक्ट गरम झाली. एकदम ताज्यासारखी लुसलुशीत. बघा काय काय उपयोग होतात वस्तू.न्चे... Wink

तुम्ही मला मॅड म्हणाल>>> नाही, मॉड म्हणू Happy

मदत करा.. मदत करा. चुकुन 'मथिया फ्लोर' mathiya floor आणले आहे. त्याचे काय करता येइल? मोठी पिशवी आहे. कशी खपवायची आता? Sad

चिन्नु, flour म्हणायच आहे का तुला? Happy

हो गं. चुकुन टायपले.

त्याचे खाकरे करता येतात. पापड करता येतात.

धन्यवाद दिनेशदा. सविस्तर कृती सांगणार का खाकर्‍याची? प्रमाण वगेरे.

आणखी थोड्या वेळाने म्हणजे ४/५ तासानी, घरी गेल्यावर.

मठिया फ्लोर = मटकी पीठ जर असेल तर मग पिठल्यासाठी वगरे वापरायला हरकत नाही ना? मुगाच्या भजिसारख्या मटकिच्या भजी पण करतात. मी खाल्ल्यात. मग कांदाभजीसाठी बेसन वापरायच्या ऐवजी हे मटकीचे पीठ पण चालू शकेल ना?

चांगली आयडिया मिनोती. बघते करून.

वडाभातासाठी वडे करण्यासाठी वापरता येईल ते पिठ.
नायजेरियात आपल्या खेकडा भजीसारखी भजी करतात ( त्याला ते करकरा म्हणतात ) त्यासाठी ते चवळीचे पिठ वापरतात. मग हे पिठ पण चालू शकेल.

माझ्याकडे बरीच दुधाची पावडर उरलीय. काय करता येईल?
१.प्लीज बर्फी नका सांगू...त्यासाठीच आणली होती.

२.आणखी बरेच पदार्थ टाकावे लागतील (विकत आणून) अशीही डिश नको. घरात नेहमी असणार्‍या चिजांपैकी काय ढकलता येईल त्यात ते सांगा. मला सध्या ग्रोसरीला जायला वेळ नाहीय अज्जिबात....(नि शिवाय ते 'चार आने की कोंबडी नि आठ आने का मसाला' होईल. तेही नको.
सांगेल का कोणी उपाय एखादा?

---------------------------------------------------------------
फूलोंसे कांटे अच्छे होते है,
जो दामन थाम लेते है.
दोस्त से दुश्मन अच्छे होते है
जो जलकर नाम लेते है.

गुलाबजाम कर दुध पावडरचे.

खेकडा भजीसारखी भजी

हे काय नविन??? काय प्रकार आहे? शाकाहारी की मांसाहारी? आणि खेकड्याची भजी करायचीच तर बेसनही वापरता येईल, चवळीतच काय स्पेशल आहे??

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

अ‍ॅशबेबी, कांदाभजीला खेकडा भजी म्हणतात- त्याला तसा आकार येतो म्हणून. हा शाकाहारी खेकडा आहे Happy
खर्‍या खेकड्याच्या भजीला काय म्हणतात कोणास ठाऊक? Happy

सुमॉ, गाजरहलवा, दुधीहलवा, पंजाबी माईल्ड भाज्या या सर्वात मिल्कपावडर वापरू शकतेस.

खर्‍या खेकड्याच्या भजीला काय म्हणतात कोणास ठाऊक >> खेकडाखेकडा भजी. Proud

सुमॉ, दम आलू, काश्मिरी खोया मटार, पालक पनीर सारख्या भाजीत दूध पावडर वापरत येते. नेहमीच्या चपातीच्या पिठात थोडे थोडे मिसळले तर चपात्या चवदार होतात.

बेसनापेक्षा, चवळीचे पिठ वापरुन केलेली भजी जास्त कुरकुरीत होता. ( आपल्या लाल चवळीसारख्याच पण आकाराने जरा मोठ्या असतात या चवळ्या, भिजवून हाताने चोळल्या कि साले निघतात. पटकन शिजतात )

सुपरमॉम गुलाब जाम कर त्या मिल्क पावडरचे. अतिशय सुंदर होतात. म्हणजे गिट्स पेक्षा चांगले Happy
कुल्फी पण करता येईल.

सगळ्यांच्या आयडिया मस्तच. बरं झालं इथे आले ते. नाहीतर रोज बोकणा भरून थोडी थोडी संपवायचा विचार होता Happy
सीमा, कुल्फीची रेसिपी टाक ना प्लीज.

----------------------------------------------------------
फूलोंसे कांटे अच्छे होते है,
जो दामन थाम लेते है.
दोस्त से दुश्मन अच्छे होते है
जो जलकर नाम लेते है.

सुमॉ, मिल्क पावडरच दही छान लागत. रोजच दही लावताना त्यात मुठभर मिल्क पावडर टाक. अगदी घट्ट दही लागेल. अगदी वड्या पडतात अशा दह्याच्या.

Pages