युक्ती सुचवा/ युक्ती सांगा

Submitted by पूनम on 12 March, 2009 - 05:13

१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.

२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)

३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383

४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुन्हा दही! Proud

कुल्फीची आणि गुलाबजांबचीही रेसिपी योजाटा सीमा.

स्वाती , सुपर्मॉम कुल्फीची रेसीपी लिहिली आहे.
गुलाबजाम ची पण लिहिते नंतर . भयंकर काम आहे आज. आणि मी इथे टाईमपास करती आहे.:)
सुपर्मॉम खुप मिल्क पावडर असेल तर गुलाबजाम करुनच खपेल ती.

सुमॉ, जुन्या मायबोलीवर मिल्क पावडरपासून खवा बनवण्याची एक कृती आहे, ही बघ. खवा करुन फ्रिजमध्ये ठेवता येईल. नंतर हवा तेव्हा पंजाबी भाज्या, गाजर हलवा, दुधी हलवा, खिरींमध्ये वापरता येईल.

मी रोज दूध पावडरचेच दहि लावतो. नेहमीसारखे दूध करुन, तापवून वगैरे वगैरे. छान लागते दही, शिवाय किती घट्ट लावायचे ते आपल्या हातात असते ना.
याचे पनीर, चक्का पण छान होते.

नाहीतर रोज बोकणा भरून थोडी थोडी संपवायचा विचार होता
>> सुमॉ, माझा हाच सल्ला होता तुला Happy
--------------
नंदिनी
--------------

हा प्रश्न कुठे टाकायचा कळला नाही, म्हणून इथेच...
काल मला एका ठिकाणी 'अव्हॅकॅडो' मिळाले.. पण ते कसे बघून घ्यायचे ते न कळल्याने आणले नाहीत.
ब्रोकोली, लेट्यूस, इ इ इ हे प्रकार आता सर्रास मिळतात.. ते ताजे आहेत, चांगले आहेत हे कस ओळखायच? आणी ते शिजवायचे काही नियम असतील तर प्लीज सांगा.

सुरभी आव्हाकाडो जर हिरव्या रंगावर असतील तर अजुन पिकायचे आहेत पण जर काळपट हिरवे असतील तर ते तयार आहेत असे समजवे. देठाकडचा भाग एकदम काळा असेल तर लगेच खाण्याजोगे आहेत. आणि हो आव्हाकादो कधि शिजवु नयेत. त्यात शरिराला आवश्यक अशी ओमेगा ३,६,९ तेले असतात आव्हाकाडो शिजवल्याने त्याचा नाश होतो.

अव्हाकाडोची ग्वाकमोले मी इथे लिहिली आहे मायबोली वर - http://www.maayboli.com/node/4550
ग्वकमोलेचा फोटो - http://vadanikavalgheta.blogspot.com/2009/04/guacamole-and-salsa.html

हा प्रकार ब्रेडवर चटणी सारखा लवुन चांगला लागतो.

आणि हो, ते जलपॅनो पेपर नाही हालापिनो किंवा हालापिनिओ पेपर्स Happy

हो का??? मला ते तस वाटल... Happy

अव्हाकाडो झाडावर पिकत नाहीत, ते बाहेर, शक्यतो पेपरमधे गुंडाळून ठेवले तर चांगले पिकतात. ( म्हणून आणताना हिरवे आणि चमकदार बघुन आणावेत )
त्याला बटर फ्रुट असा पर्यायी शब्द आहे, कारण त्याची चव लोण्यासारखी लागते. त्यात दूध आणि साखर घालून केलेले थिक शेक, माझ्या खास आवडीचे. मला ते नुसते खायलाही आवडते.
लेट्यूस पण शिजवायचे नसते. ते करकरीत लागले पाहिजे. ब्रोकोलीच्या अनेक कृति आहेत इथे.

डाळीचे वडे करताना भिजलेली डाळ पाणी न वापरता कशी वाटावी?
मी मागच्या आठवड्यात केला प्रयत्न पण जमले नाही........उडदाची डाळ वाटताना मिक्सर फिरतच नव्हता... मग चमचा चमचा पाणी टाकले .... पण त्यामुळे पीठ सैलसर झाले.. वडे थापणे जमले नाहिच मग छोटे छोटे गोळे टाकले तर मधुन कच्चेच राहिले.
USमध्ये Osterizer वापरतेय. देशी मिकसर नाही आहे.

पीठ सैलसर झाले तर कुठले पीठ टाकुन घट्ट करता येईल का?

मी फूड प्रोसेसरमधे एस आकाराचे ब्लेड लावुन वाटते.

उडचाचे पीठ सैल झाले तर थोडेसे सरसरीत तांदूळाचे पीठ घाल पूनम. Happy

शिंडी इज म्हणिंग द राईट. या प्रकारासाठी फूड प्रोसेसर सगळ्यात मस्त. ढोकळ्याचे पीठ, इडली/डोसे/अडाई ही पीठे, खजुराचे लाडू, कणिक, पराठ्याची पिठे, मोठ्या प्रमाणात करायच्या कोशिंबरी ची गाजरे वगैरे अशा बर्‍याच गोष्टी फूड प्रोसेसर मधे करता येतात.

धन्स !

सिन्ड्रेला,कराडकर...... फूड प्रोसेसर नाही आहे माझ्याकडे. पण एस आकाराच्या ब्लेड्चे लक्शात ठेवेन.
फूड प्रो. इंडियामध्ये मिळतात त्यात हे एस आकाराचे ब्लेड वापरलेय ...कणिक मळायला,गाजरे किसायला... तेच ना!
वाटाणे सोलायला प्लास्टीकचे एस आकारचे पण दुसरे ब्लेड असते.

मनुस्विनी .... अच्छा.. पुढल्या वेळेस टाकेन तांदळाचे पीठ.
दुसर्या खेपेत पाण्याशिवाय वाटताना मिक्सर बंदच पडला दुसरा मिक्सी होता मग त्याचे डोसेच केले.
यावेळी मुगडाळीचे वडे करायचे आहेत. (एकही मिक्सर बचा है मेरे पास) यावेळेस पाण्याशिवाय वाटणे जमणार नाही म्हणुन इथे विचारले..
मुगडाळीमध्ये पण तांदळाचे पीठ वापरले तर चालेल का की बेसन वापरु?
क्रिस्पी होईल ना तांदळाच्या पीठाने!

मी एकदा-दोनदा ब्लेंडरमधे काढली होती उडदाची डाळ. पाणी घालावे लागले त्यामुळे वडे थापण्याजोगे नाही झाले. पण माझ्याकडे अंजली की सुनिता काय तरी कंपनीचे मेदुवडे करायचे छोटे भांडे आहे. त्यातुन वडे केले. जरा फॅन्सी दही वडे झाले Happy

पूनम, अग ओस्टेराइझर मधे वाटली जाते गं डाळ चांगली. मी नेहमीच हाच मिक्सी वापरलाय. डाळ एकदम कोरडी करून टाकू नकोस. सुरुवातीला आधी थोडे पाणी टाकून दोन दोन मिनीटावर वाटली की बंद करून ढवळून पुन्हा किंचीत पाणी टाकून वाटायचे. बघ प्रयत्न करून. दुसरे म्हनजे जराशीच तांदूळ पिठी घाल तू मूगडाळीत.

सिंडे तुझं पिठ कसं होतं? म्हणजे कितपत सैल होतं? मला त्या मेदूवड्याच्या भांड्यातून अजून वडे करताच आले नाहीत.

ते भांडं मेदुवड्याचच आहे ना. Wink
- अनिलभाई
It's always fun when you connect.

धन्स मनुस्वीनी...
काय सांगतेस ... मला वाटले यासाठी वेगळे ब्लेंडर वापरत असाल ... छान टीप आहे तुझी. या आठवडयात करुन बघते.

कुठल्याही प्रकारची भिजलेली डाळ कमी पाण्यात बारिक वाटायला मॅजिक बुलेट झिंदाबाद!

पूनम, रेवेलचा मिक्सी चांगलाय असे एकलेय पण माझ्याकडे नाही आहे तो अजून घ्यायचाय. Happy

ते भांड मेदुवड्याच आहे ना. >> भाई काय ही भाषा! तुमच्याकडुन ही अपेक्षा नव्हती हा! Happy

रेवेल इज एकदम मस्त म्हणुन एकदम मस्ट! माझ्याकडे गेले ४ वर्षे आहे.

मुगाच्या डाळ वाटायची असेल तर कोरडीच वाटायची आणि मग तो भरडा पाण्यात भिजवुन वापरायचा. भरडा भिजवायला, पाण्याच्या ऐवजी जास्त पाणी घालुन वाटलेली मुगाची वा उडदाची डाळ वापरता येते.

रेवेल... इंडियन मिक्सी... बघायला हवा.

अरे हो कोरडीच वाटुन भिजवली तर नक्कीच फरक पडेल. दिनेशदा छान आहे तुमची टीप.
वाटलेली डाळ घालुन भिजवायचे... कसे काय सुचते एवढे.

इथे फक्त स्वयंपाकघरातीलच युक्त्या अपेक्षित आहेत का? तसं असेल तर मला कोणीतरी युक्ती सांगा आणि मगच माझं पोस्ट डिलीट होऊ द्या.... Wink

नवर्‍याचा पांढराशुभ्र शर्ट इतर रंगीत कपड्यांबरोबर चुकून भिजवला गेला आणि त्याच्या स्लीव्हज् आणि खांद्यावर छानपैकी हिरवा रंग लागला आहे. Sad तो हमखास काढता येईल का??? मी रात्रभर व्हॅनिशमध्ये भिजवून धुवून पाहिला. पण हिरवा रंग थोडासा फिकुटला एवढंच.... तो पूर्णपणे जाण्याची काहीतरी युक्ती सांगा, नाहीतर माझं काही खरं नाहीये.

तो हमखास काढता येईल का??? >>>
नाही! एकदा पडलेले डाग पूर्णपणे कधीच जात नाहीत. ब्लीच केलंस तरीही फक्त फिके होतात डाग, पूर्ण पांढरा शर्ट तर विसरच. नवीन आण (मी हेच केलंय ;))

हा बाफ सुरू करताना स्वयंपाकघराशी संबंधित युक्त्या हेच डोक्यात होतं- यात अगदी साफसफाईपासून स्वयंपाक लवकर होण्यासाठी सर्व काही आलं Happy अश्या प्रकारच्या अनेक युक्त्या कोणी लिहिणार असेल, तर नवीन बाफ सुरू करूया की, हाकानाका! Happy
---------------------
*ससुराल गेंदा फूल*

नवीन आण>>>>> Happy
अगदी अगदी.
................................
किसीनेभी तो न देखा निगाह भरके मुझे
गया फिर आजका दिन भी उदास करके मुझे....

मंजु, दुकानात वेगवेगळ्या रंगाचे फॅब्रिक डाईज मिळतात. त्यातला नवर्‍याच्या आवडत्या डार्क रंगाचा डाय घेऊन ये आणि रंगवून टाक शर्ट... वर त्याला सांग 'बघ मी तुझ्यासाठी नव्वीन शर्ट आणला'... :). आणि मग गुपचुप एक पांढरा शर्ट पण घेऊन ये....

अगं, माझ्या एका पांढ-या ड्रेसवर लाल रंगाचे डिजाईन होते आणि धुतल्यावर लाल रंग पांढ-यावर सैरावैरा पळाला. मी वाळवुन तसाच लाँड्रीवाल्याकडे घेऊन गेले. त्याने रंग जाण्यासाठी काय केले की काय वगैरे चौकशी केली. म्हणाला की आला वगैरे वापरुन मग लाँड्रीत दिलात तर काहीच करता येणार नाही. मी अर्थात काहीच केले नव्हते.. त्याने मग ड्रेस स्वच्छ होता तसा पांढरा करुन दिला. बाकिच्या डिजाईनचा रंग पण जवळपास तसाच राहिला. बदलला नाही. एकदा देऊन बघ लाँड्रीत.. नाहीतर मग लाजो सांगते तसे कर Happy

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

Pages