युक्ती सुचवा/ युक्ती सांगा

Submitted by पूनम on 12 March, 2009 - 05:13

१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.

२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)

३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383

४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिनोती आणि दिनेशदा धन्यवाद, आता एक एक प्रकार करुन बघते Happy

आर्च, अग डाळ मॉलमधुन आणली होती आणि बील नाहिय माझ्याकडे, नाहितर आधीच बदलून आणली असती. तरीपण धन्यवाद... Happy
====================================
कितीक हळवे, कितीक सुंदर, किती शहाणे....आपुले अंतर.....

मी खुप वेडेपणा केलाय. ज्व्यारिच्या पिठावर गव्हाचे पिठ टाकले डब्यात भरताना. २ kg ज्व्यारिchya पिठवर वर ५ kg गव्हाचे पिठ. मग हळु हळु वर्चे गव्हाचे पिठ रोज वापरुन सम्पवत आणले अहे. आता border line la ahe . आता mixed area ala ahe. हे पिठ आता कसे वापरु? काय करता येइल त्याचे.

सुमेधावी, ते मिक्सड् पीठ थालीपीठ करतांना वापरता येईल.

सुमेधा
त्या पीठात बेसन, तांद्ळाचे पीठ, बारीक चिरलेली मेथी घालून थालिपीठं करता येतील. मस्त लागतात!

मी पण कधी कधी कणिक , बेसन आणी ज्वारीचे पीठ वापरुन थालीपीठ करते. त्यात कांदा, मुळा, पालक, मेथी काहीही घालता येईल.

ओवा, तिखट ,हळद घालुन द्शम्या करता येतिल.

माझ्याकडे MTR shredded coconut अख्ख पाकिट आहे. त्या खोबर् याला थोडा वास येतोय त्याच काहि करु शकेन का? chatani wagre अक्ख पाकिट टाकुन द्यायला जिवावर येत.

shmt
ते खोबरं तव्यावर भाजून २ तास कडकडीत उन्हात ठेवा मग वापरा.
अगदी थोडा वास येत असेल तर जाईल, फार खराब झालं असेल तर टाकावं लागेल. Sad

shmt,
वर दक्षिणाने म्हटल्या प्रमाणे ते जरासे वास येत असलेले खोबरे खमंग ब्राऊन भाजले तर खूप प्रकारात थोडे थोडे वापरून संपवता येईल..... मग त्याची भरपूर लसूण व शेंगदाणे घालून झणझणीत तिखट चटणी,.... फुटाण्याची डाळ, खूपसा कढीपत्ता, हिंग घालून चटणी... खोबरे-खसखस व भरपूर कोथंबीर घालून पुडाची वडी... किंवा कांदा व खोबरे भाजून वाटून त्याचा मसाल्याच्या भाजीत किंवा मसालेभातात उपयोग करता येईल.....

इतक्यात इथे बराच पाऊस आहे त्यामुळे दही १ दिवस झाला तरी लागत नाही. ते लागलं नसेल तर मायक्रोवेव्हमधे १ मि गरम करुन ठेऊन द्यायचं मस्त घट्ट दही तयार होतं. माझ्या आईची आयडीया Happy

धन्यवाद दक्षिणा आणि सुर्पणा. खोबरे आता भाजून ठेवते.

सध्ध्या छान दळदार कैर्‍या मिळतात ना लोणच्यासाठी तर त्या आणून त्याचा पांढरा शुभ्र कीस छोट्या प्लॅसटिकच्या डब्यात ( चिझस्प्रेडच्या वै.) ठेवून डीपफ्रिझर मधे ठेवला तर गणपतीत प्रसादासाठी वाटली डाळ मस्त करता येते. कीस कच्चाच रहातो मीठ सुद्धा लागत नाही. माझा गेल्या वर्षीचा स्वानुभव.

तसेच आंब्याचा रस, फणसाचा रस काढून थोडीशी साखर टाकून एक चटका दिला व गार झाल्यावर असाच डब्यात घालून फ्रीझर मधे ठेवला तर नैवेद्याची सांदणं, उकडीचे मोदक वै. नैवेद्याचे पदार्थ मस्त साजरे करू शकतो. या श्रावण - गणपतीत असे करून पहा.

मा. माबोकरांनो, लफडं झालंय. कसं ते विचारु नका. नाहीतर हा हास्य विनोदाचा धागा होईल. असो.
साधारण १५० - २०० मिली. गोडेतेलात [ गरम असताना ] २५-३० मिली पाणी पडलंय. सोडवाल ना संकटातून?
-------------------------------------------------------
" वी आर नॉट ह्युमन बिईंग्ज ऑन स्पिरीच्युअल जर्नी, वी आर स्पिरीच्युअल बिईंग्ज ऑन ह्युमन जर्नी". --- स्टिफन कोव्हे.

संतोष ते सगळं तेल पाण्यासकट फ्रीजरमध्ये टाक. पाण्याचा बर्फ बनेल. तेल तसचं राहील. बर्फ काढुन तेल वापरा.
-------------------------
जाने क्युं लोग मोहोब्बत किया करते है..

ऊं हूं. फ्रीझर / फ्रीझ नाही. तरी पण धन्यवाद. दुसरं काही तरी.प्लीज.
-------------------------------------------------------
" वी आर नॉट ह्युमन बिईंग्ज ऑन स्पिरीच्युअल जर्नी, वी आर स्पिरीच्युअल बिईंग्ज ऑन ह्युमन जर्नी". --- स्टिफन कोव्हे.

साधारण १५० - २०० मिली. गोडेतेलात [ गरम असताना ] २५-३० मिली पाणी पडलंय

गोडेतेलात ते गरम असताना पाणी पडले आणि तडतडुन उडाले नाही??? कमाल झाली..

मग आता उरलेले तेल अजुन गरम करा, अर्थात झाकण ठेऊन, म्हणजे पाणी जाईल उडुन Happy

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

तडतड अंगावर उडाली, लगेच गॅस बंद केला. बरनॉल सुद्धा नाहिये.
आता परत तापवायचं? अरे बाप रे, बघतो प्रयोग करून.
त्यापेक्षा ते तसंच्या तसं कशात वापरता येइल का?
किंवा कोंड्याचा मांडा वगैरे काही?
-------------------------------------------------------
" वी आर नॉट ह्युमन बिईंग्ज ऑन स्पिरीच्युअल जर्नी, वी आर स्पिरीच्युअल बिईंग्ज ऑन ह्युमन जर्नी". --- स्टिफन कोव्हे.

त्यापेक्षा ते तसंच्या तसं कशात वापरता येइल का?>> देवाच्या बत्तीला येईल वापरता किंवा पोळ्यांनाही लावता येईल.
-------------------------
जाने क्युं लोग मोहोब्बत किया करते है..

राईट, म्हणजे अचूक, मावशींना पोळ्यालाच लावायला सांगतो. काय पण प्रेजेंन्स आहे , योगीताजी. देवाच्या दिव्यात चूर्चूर होईल बहुधा.
धन्यवाद योगीताजी. वाचले बाबा २०/३० रु. सुद्धा वाचले.
-------------------------------------------------------
" वी आर नॉट ह्युमन बिईंग्ज ऑन स्पिरीच्युअल जर्नी, वी आर स्पिरीच्युअल बिईंग्ज ऑन ह्युमन जर्नी". --- स्टिफन कोव्हे.

रोज थोडे थोडे कणिकेत व रोजच्या फोड्नणिसाठि पण वापरुन टाकता येइल. Dhirdi , थालिपिठे, ठेपले पण करता येइल. tyach telat 1/5 kg rava lal bhajun thevala v nantar thodich fodni ghalun upma karata yeil.

छान, उपमा आवडतो सुद्धा!
आधी अंगावर तडतड, मग मिळतो उपमा.[ आधी हाताला चटके च्या चालीवर]
एकदम व्यवहार्य तोडगा!
धन्यवाद, सुमेध / सुमेधा [?] जी.
-------------------------------------------------------
" वी आर नॉट ह्युमन बिईंग्ज ऑन स्पिरीच्युअल जर्नी, वी आर स्पिरीच्युअल बिईंग्ज ऑन ह्युमन जर्नी". --- स्टिफन कोव्हे.

मदत मदत मदत !! प्लीज , लवकर... युक्ती सुचवा... मी जुन्या मायबोलीवर दिनेश यांनी दीलेली कृती वाचुन सांडगी मीरच्या केल्या आहेत. (परवा). काल बरच उन होत म्हणुन उन्हात ठेवल्या पण आज खुप पाऊस आहे. कदाचीत उद्या पण राहील.. ओव्हन मधे ठेवुन वाळवु का?? किती डीग्री वर ? प्लीज लवकर सुचवा...

माझ्या वरच्या पोस्ट वर कोणालाच युक्क्ती माहीत नाही का?

ठेव ओवन मध्ये. पण फ्रीज मध्ये परत ठेवलीस तर चाबट होतील. जर हे करायचे नसेल तर उन्हाने बर्‍यापैकी सुकल्या असतील तरी बाहेर ठेवून दे पंख्याखाली. आणि पावुस नसेल दुसर्‍या दिवशी तर सुकव पुन्हा उन्हात. पण अगदीच ओल्या असतील तर बुरशी येण्याची शक्यता आहे. पण पहिले उन्ह कडक होते ना(तू वरती म्हणते आहेस ना)?

धन्यवाद मनुस्वीनी,
मी आज ओव्हन मधे ठेवते थोड्या वाळवते आणी जेव्हा उन असेल तेव्हा उन्हात ठेवते. एकाला देठापाशी बुरशी दिसते आहे. बाकीच्या ठेवते. २५० डिग्री वर.. खुप खुप धन्यवाद परत एकदा.

जुन्या मायबोलीवर एलायझा ने दिलेली कचोरी मी वाढदिवसाच्या पार्टीसाठी करणार आहे . मला ही कचोरी दही , चिंच खजूर चटणी घालून चाट सारखी द्यायची आहे , तेव्हा कचोरी मऊ पडलेली चालणार नाही . आदल्या दिवशी करून ठेवली तर दुसर्‍या दिवशी कुरकुरीत लागेल का ? कुरकुरीत राहावी ह्यासाठी काय करता येईल ?

मैद्या एवजी अमेरीकन स्टोर मधलं ऑल पर्पज फ्लोर वापरलं तर कुरकुरीत रहाते.

कचोरी कुरकुरीत हवी असेल तर २ चमचे रवा टाकायचा.

आणि मंद आचेवर तळायची.

ओके . मला कचोरी वरून अगदी स्मूथ , विकत मिळते तशी दिसायला हवीये . Happy रवा घालून टेक्श्चर मध्ये फरक पडणार नाही ना ?
ऑल पर्पज फ्लोअर इथे मिळत नाही . काय फरक असतो मैदा आणि ऑल पर्पज फ्लोअर मध्ये ?

Pages