भारत वि. इंग्लंड - २०११ -

Submitted by नंद्या on 3 July, 2011 - 22:15

England v India 2011

इथे या मालिकेसंदर्भात चर्चा करूयात.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

द्रवीड, तेंडूलकर, सेहेवाग, गंभीर आता तंबूत परत.
मला वाटते एवीतेवी बीसीसी आय भारत देशाचे प्रतिनिधित्व करत नाही असे वाचले होते. मग चांगले चांगले खेळाडू जगातून कायमचे बीसीसीआय साठी विकत घेऊन त्यांचाच संघ करा! म्हणजे कसे अग्गदी अमेरिकेतल्या यांकी, जायंट्स, रेड सॉक्स सारखे.

मग त्या संघाला शरद पवार संघ नाव द्या. मग भारतीयांना उगाच कष्ट करायला नकोत. ते तेंडूलकर, द्रवीड जुनाट मताचे लोक, त्यांचे काय ऐकता?

>>> मास्तरा, मागच्या टेस्टस मधे पहिली बॅटिंग घेतल्यावर काय झालं असतं याची कल्पना आलीच असेल तुला!

पहिली बॅटिंग घ्या नाहीतर बॉलिंग, ह्यांची नेहमीचीच रड आहे. इतक्या चांगल्या खेळपट्टीवर पुन्हा एकदा भारतीयांनी माती खाल्ली.

भारताविरूध्द खेळताना विरूध्द संघाला फक्त एकदाच बॅटिंग मिळेल, असा आता आयसीसीने नवीन नियम करायला पाहिजे.

>> भारताविरूध्द खेळताना विरूध्द संघाला फक्त एकदाच बॅटिंग मिळेल
ती पण खूप होईल. या वेळेला डावाने मार खाणार!

सेहवाग आणि सचिन- दळभद्री! एकच शब्द आहे Happy या लेव्हल ला हे फलंदाज असे बाद होतात ?
द्रविड बाद झाला तो चेंडू या अख्ख्या सिरीज मधला सर्वात भन्नात चेंडू म्हणावा लागेल.. काय गोलंदाजी करत आहेत ईं चे लोक.. महान!
गंभीर बॅड लक.
(रच्याकने: सचिन ला बसवायचा विचार व्हायला हरकत नाही... खरच.. त्याची जागा निव्वळ वेस्ट आहे. आणि त्याच्या विकेट चा फायदा वि. संघाला सर्वार्थाने अधिक होतोय.. खेरीज साहेब गोलंदाजी देखिल करत नाहीत. सन्नीभाय ने सचिन ला कोपर्‍यात घेवून थोडे चार मित्रत्वाचे शब्द सांगावेत अशी विनंती!)
आता रैना येवून बाऊंसर वर थोडा वेळ नाचेल, मग धोणी अवलक्षण दाखवून परतेल..
जास्ती जास्त भारताचे १५०. त्यातही शेपटाचे ५० असतील असे वाटते:)

खरं तर खेळपट्टी खेळायला ओके वाटते आहे.. मान्य, थोडा अनईव्हन बाऊंस आहे, झिप पण आहे (टप्पा पडल्यावर चेंडू थोडा जास्त वेगात जातोय), पण आपण पुन्हा एकदा मानसिकतेमध्येच पराभूत झालेलो आहोत. आणि त्यातून बाहेर येणे अवघड दिसते आहे.
----------------------------------------------------------------------------------
"एक विजय" हे या संघासाठी संजीवनी ठरेल पण तो मिळवायला आवश्यक खडतर प्रयत्न देखिल आपण करताना दिसत नाही.

१६८/७....

आज विषम संख्यांचा दिवस दिसतोय... स्कोर कार्ड वरती.. सगळे विषम आकड्यावरचे खेळाडू दोन आकडी धावा करून आणि सम आकड्यावरचे खेळाडू ०,१,४,४ अश्या एक आकडी धावा करून बाद झालेत...

असाम्या,
अगदी... मी हेच म्हणत होतो एक द्रविड व गंभीर चा अपवाद सोडता फाटू मानसिकतेमूळे बाद झाले आपले गडी. सर्वांचे चेहेरे टनभर ओझ्याखाली दिसतात आणि देहबोली तर विचारूच नये..
त्याच खेळपट्टीवर स्वतःचा नैसर्गिक आणि आक्रमक खेळ केला तर ईं. चे गोलंदाज अगदी शाळकरी भासतात हे धोणीने दाखवून दिले. (नशीब आपण असेच खेळायला हवे हे धोणी ला पुन; ऊमगले असावे. एकदीवसीय असो वा कसोटी, हीच त्याची खेळायची स्टाईल आहे आणि त्याने तसेच खेळावे) पिटरसन दोन्ही सामन्यात असेच पुढे येवून खेळतो ईतकेही आपल्या महान फलंदाजांनी पाहिले नाही याचे आश्चर्य वाटते.
याच खेळपट्टीवर ऊद्या ईं. ने ४०० धावांचा पाऊस पाडला तर मला अजीबात आशचर्य वाटणार नाही..
थोडक्यात सचिन सकट सर्वांनी पुन्हा एकदा सामना हातून घालवला आहे. आईशप्पथ सचिन ला बघवत नाही रे खेळताना... जे फटके एरवी झोपेत तो सीमापार करेल त्यावर तो बाद होतोय.. Sad

बाकी आज आपल्या विकेट्सः
सचिन, सेहवागः दळभद्री
द्रविडः चमत्कार
गंभीरः दुर्दैव
रैना: शब्दशः मामा केला
लक्षमणः मामा करून घेतला
धोणी: देर से आये पर दुरूस्त आये
प्रविणः चलता है
बाकी शेपटाबद्दल काय बोलायचे?

पुन: एकदा संघ म्हणून कामगिरी होत नाहीये ईथेच सामना हातून जातोय..

'हाराssरे' हे गाणे ऐकत असावीत आपली मंडळी !! मला तर आता पांढरावॉश दिसतोय ! होप, गोलंदाज काही चमत्कार करुन दाखवतील Proud

हा माझा मालिका सुरू होण्यापूर्वीचा अंदाज -

मास्तुरे | 19 July, 2011 - 23:30

>>> पण एकंदरीत मालिका अत्यंत चुरशीची होईल असेच वाटते. मालिका सुरू व्हायच्या आधी आकडे लावताय का कुणी?

माझा अंदाज - एकदिवसीय सामन्यांची मालिका भारत जिंकणार (४-१ किंवा ३-२). कसोटी सामन्यांची मालिका भारत हरणार (०-१ किंवा १-२. ०-१ ची शक्यता जास्त आहे.). एकमेव T20 सामना भारत जिंकणार.

माझा अंदाज इतक्या वाईट रितीने चुकेल असे वाटले नव्हते. ०-१ किंवा १-२ च्या ऐवजी आपण ०-४ अशा पराभवाच्या दिशेने घोडदौड करत आहोत. आजचा सामना सुरू होण्यापूर्वीच आपण मानसिकदृष्ट्या हा सामना व मालिका हरलेलो आहोत हे लक्षात येत होते. त्याचे लगेचच प्रत्यंतर आले. इंग्लंडचा संघ खूप भरात आहे ह्याची कल्पना होती. पण आपली इतकी दारूण अवस्था होईल हे स्वप्नातदेखील वाटले नव्हते. आतापर्यंत झालेल्या पाचही डावात आपल्याला एकदा सुध्दा ३०० च्या भोज्याला शिवता आले नाही.

पहिला सामना १९६ धावांनी व दुसरा ३१९ धावांनी आपण हरलो. तिसरा सामना डावाने हरण्याची शक्यता दिसत आहे. चौथ्यात फॉलोऑन मिळून डावाने हरू.

विंडीजने १९७५ साली विश्वचषक जिंकल्यावर लगेचच ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. तिथे ६ कसोटी सामन्यांची मालिका ते १-५ अशा फरकाने हरले. जवळपास तशीच परिस्थिती आपली झालेली आहे.

आयपीएलचे दुष्परिणाम स्पष्ट दिसत आहेत. आयपीएलमुळे बहुसंख्य खेळाडूंना विश्रांती मिळालेली नाही. त्यामुळे सराव नाही. जिथे जाउन खेळायचं त्याबद्दल कसलंही प्लॅनिंग नाही. पाट्या टाकाव्यात तसे आज वर्ल्डकपमध्ये, उद्या आयपीएलमध्ये, परवा विंडीजमध्ये, तेरवा इंग्लंडमध्ये असे आपले खेळाडू नुसते पाट्या टाकत आहेत. भारतातल्या ठणठणीत पाटा खेळपट्टीवर व जवळपास एकही क्षेत्ररक्षक नसताना कशीही आडवीतिडवी बॅट फिरवून वाटेल त्या मार्गाने धावा जमविणार्‍या फलंदाजांना स्विंग गोलंदाजी अजिबात खेळता येत नाही हे कटू सत्य आता उशीरा का होईना लक्षात आले असेल. आयुष्यात कधीही क्रिकेट न खेळलेल्या व बीसीसीआयच्या गल्ल्यावर आडवा हात मारण्यासाठी घुसलेल्या राजकारण्यांमुळेच ही वाईट परिस्थिती ओढवली आहे.

तिकडे कांगारूंचा संघ सावरायला लागलाय. पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्यांनी लंकेला चक्क त्यांच्या देशात जाऊन हरवलं (लंका सर्वबाद १९१, ऑसीज १९२/३). लंकेला मुरलीधरनची चांगलीच उणीव भासतेय.

जर खरेच हा संघ भारताचे प्रतिनिधीत्व करत नसेल तर उगाच भारताचे नाव बदनाम करण्यापेक्षा याला चक्क बीसीसीआय चा संघ म्हणा. पवारांचा किंवा मनोहराचा किंवा आणि कुणाचा म्हणा, भारताचा नको. देशाची बदनामी नुसत्या खेळावरून नको. अतिरेकी करताहेत ती पुष्कळ आहे.
"बहुसंख्य खेळाडूंना विश्रांती मिळालेली नाही.........फलंदाजांना स्विंग गोलंदाजी अजिबात खेळता येत नाही हे कटू सत्य आता उशीरा का होईना लक्षात आले असेल."
अनुमोदन.

हा कदाचित गॅरी कर्स्टन गेल्याचा प्रभाव असावा. तो प्रशिक्षक म्हणुन गेल्यावर आपला संघ आधाराचे खांब काढल्यावर इमारत कोसळावी तसा कोसळला.

काय खेळले राव काल आपले लोक...........जबरदस्त....... एकटा काय तो त्यांचा प्रायर काय तो ७७ केले....त्याला साथ ब्रेसन ची मिळाली दोघांनी ८० रन्स ची भागीदारी केली म्हणुन काय ते २२४ पर्यंत गेले..नाही तर काय लायकी होती त्यांची इशांत, श्रीशांत, प्रविन च्या समोर टिकन्याची... कुक च्या कुकरने तर पहिल्याच बॉल वर शिटी वाजवली..भोपळा पण नाही फोडु दिला श्रिशांत ने..ट्रॉस नेहमी प्रमाणे खेळला पण प्रविन ने छान बाद केला.. बेल ची तर बेलच वाजली प्रविन च्या अप्रतिम बॉल ने...आश्चर्याची घंटा वाजली डोक्यात त्याच्या.. त्यानंतर पीटरसन ला तर मामा केला श्रीशांत ने...जुनी खोड त्याची पकडुन बरोबर ऑफ स्टंप च्या बाहेर चेंडु टाकला....आणि गेला झेल स्लीप मधे..... Happy इयन मोर्गन ने चांगली सुरुवात केली पण बरोबर पकडला गेला जाळ्यात इशांत च्या..मागच्या ४-५ डावात तो असाच आउट झाला..कळते पण वळत नाही अशी अवस्था झाली त्याची.. बोपारा आला कधी गेला कधी हेच कळले नाही.....प्रायर ला साथ स्वान ने द्यायला हवी होती पण नाही दिली...ब्रेसन ने छान साथ दिली..म्हणुन ८० रन्स तरी झाले...नंतर ब्रोड आनी अंडरसन १ रन्स ची सुध्दा जोडता आले नाही.......
आता भारताला छान सुरुवात मिळाली आहे...गंभीर ने तर जबरदस्त फलंदाजी करुन ५० सुध्दा केले सेहवाग खेळतोय सावधानी ने...पहिलीच मॅच आहे ना..... उद्याच्या दिवसात मस्त फलंदाजी करुन किमान ४०० तरी करावेच...........बाकी आपली गोलंदाजी आहेच त्याना कापुन काढण्यासाठी............ Happy
------------------------------------------------------------------------------------------------------------------
अतिशय राग आल्याने वेड लागले आहे.......

एक भारतीय क्रिकेटप्रेमी.............

bel out

कत्तल! अशी धुलाई ८३चा वर्ल्डकप जिंकल्यावर वे. इंडिजने घरी येऊन आपली केली होती ते आठवलं!

अशी धुलाई ८३चा वर्ल्डकप जिंकल्यावर वे. इंडिजने घरी येऊन आपली केली होती ते आठवलं! >> नाहि रे, ती ६ मॅचेस मधे ३-० होती. त्यापेक्षा वाईट ९१-९२ ची down under series. ५ मॅचमधे ४-०.

चिमण.. तू लॉर्ड्सवर मॅच बघायला गेला नाहीस म्हणून आपली टीम भंजाळली आहे.. आणि त्याचा परिणाम म्हणून असे खेळत आहेत... Lol

>>> अशी धुलाई ८३चा वर्ल्डकप जिंकल्यावर वे. इंडिजने घरी येऊन आपली केली होती ते आठवलं! >> नाहि रे, ती ६ मॅचेस मधे ३-० होती. त्यापेक्षा वाईट ९१-९२ ची down under series. ५ मॅचमधे ४-०.

अशी आपली कत्तल अनेकवेळा झालेली आहे.

१९९९-२००० मध्ये ऑस्ट्रलियात कसोटी मालिका आपण ०-३ व तिरंगी एकदिवसीय मालिका (पाकडे, आपण आणि ऑसीज) १-७ अशी हारलो होतो. त्यावेळी संघात सचिन, द्रविड, गांगुली व कुंबळे सोडला तर उरलेले सगळे नग होते (हृषिकेश कानिटकर, विजय भारद्वाज इ.). त्यावेळी लक्ष्मण सुध्दा फ्लॉप होता.

२००३ मध्ये न्यूझीलँडमध्ये २ सामन्यांची कसोटी मालिका ०-२ व एकदिवसीय मालिका २-५ अशी हरलो होतो. त्यानंतर जवळपास साडेआठ वर्षांनी आपली तशीच कत्तल होत आहे.

इतिहास बघितला तर १९७४ ची इंग्लंडविरूध्द्ची ३ सामन्यांची मालिका आपण ०-३ अशी हरलो. त्यानंतर १९८३ मध्ये विंडीजविरूध्द ६ सामन्यांची कसोटी मालिका ०-३ व एकदिवसीय मालिका ०-५ अशी हरलो. त्यानंतर १९९२ मध्ये ऑसीजविरूध्द ५ सामन्यांची कसोटी मालिका ०-४ अशी हरलो. नंतरची कत्तल १९९९-२००० मध्ये ऑसीजविरूध्द्च (०-३ आणि १-७) आणि त्यानंतर २००३ मध्ये किवींविरूध्द झाली (०-२ आणि २-५). म्हणजे दर ८-९ वर्षांनी आपली अशी जबरदस्त कत्तल होते. त्यामुळे आपली यापुढची कत्तल थेट २०१९-२० मध्ये होईल आणि नंतरची २०२८ मध्ये.

इंग्लंडला आजच २३२ धावांची आघाडी मिळालेली आहे. भारताला डावाने हरवायला एवढी आघाडी पुरेशी आहे. तरीसुध्दा उद्या इंग्लंड साधारण ४५०-४७५ ची आघाडी घेऊन डाव घोषित करेल व त्यानंतर भारत ४ थ्या दिवशीच २५०+ धावांनी हरेल. भारताने हा सामना वाचवला तर मला मालिका जिंकल्याचा व इंग्लंडची तपकिरी धुलाई केल्याचा आनंद होईल.

सगळीकडची वर्णने वाचून भारताने ही मॅच व सिरीज सोडून दिल्यात जमा आहे. कोणाचीतरी वैयक्तिक मानहानी झाल्याशिवाय लोक आता पेटून उठणे अवघड आहे. २००८ च्या लंका सिरीज नंतर एवढी भिकार कामगिरी बघितली नव्हती. त्या सिरीज मधे निदान तीन पैकी एक मॅच जिंकली होती.

असामी,
ईंग्लंड ला येतोयस काय? आपल्या गोलंदाजांविरुध्द आपण दोघेही शतके मारूयात.. जाम हात शिवशिवत आहेत. राव अशा बॉलिंग वर गल्ली मधले पण वाईट्ट धुतील.. Happy खेरीज द्रविड ला स्लिप मध्ये ऊभा करू आणि विरू ला सीमारेषेवर म्हणजे झेलबाद आणि धावचित ची शक्यता शून्य.
ऊद्या ईं ची आघाडी ४५०+ आणि मग परवा भारत २०० मध्ये तंबूत परत.. या खेपेस स्वान ची फिरकी माज करेल असे दिसतेय.. ब्रॉड, ब्रेसनन ला फार घाम गाळावा लागणार नाही. खेळप्पटी मैलभर वळते आहे. (रैना पण हातभर वळवतो तिथे अजून काय बोलायचे?)
रच्याकने: आर पी. सिंग ला विसा मिळालाच नाहीये तर बदल्यात जंबो ला विमानाने पाठवायला काय हरकत आहे फक्त ऊद्याच्या दिवसासाठी? Happy

भारत किती फरकाने हारेल याचे आकडे लावावेत.. Happy

अरे हो आजचा रिपोर्ट राहिलाचः पानिपत-२
(मास्तुरे आपले आकडे मॅच होतायत... jynx?)

>>> सगळीकडची वर्णने वाचून भारताने ही मॅच व सिरीज सोडून दिल्यात जमा आहे.

खरं आहे. भारतीय संघाचा खेळताना अत्यंत कॅज्युअल अ‍ॅप्रोच दिसून येतो. मस्टरवर सही करून घरी निघून जाणार्‍या कर्मचार्‍याप्रमाणे भारतीय संघाने आतापर्यंत केवळ पाट्या टाकण्याचे काम केलेले आहे. लागोपाठ तिसरा कसोटी सामना फार मोठ्या फरकाने हरण्याची सर्व चिन्हे दिसत आहेत.

काही वेळापूर्वीच स्रिसांथने पॉईंटवर मॉर्गनचा अत्यंत सोपा झेल सोडला. त्याच्यासारख्याला पॉईंटवर क्षेत्ररक्षणाला ठेवणार्‍या धोनीची पण धन्य आहे. एकंदरीत जिंकणे, हरणे यापेक्षा काही तरी करून मालिका पार पाडणे हेच भारतीय संघाचे एकमेव उद्दिष्ट दिसत आहे.

डंकन फ्लेचर कोच नको (संघाच्या मनाविरुध्द नेमला) म्हणून हे सर्व चाललय का..? ऊगाच एक शंका Happy

का फ्लेचर ने ईं तर्फे आपली सुपारी घेवून गेम केलाय आणि किसी को कानोकान खबर तक नही है? Happy

धोनी संपूर्ण मालिकेत एक कल्पनाशून्य कप्तान या भूमिकेत होता/आहे. निदान या सामन्यात तरी बदल म्हणून इशांत व स्रिसांथऐवजी मुनाफ व आरपीला खेळवायचा प्रयोग करायला पाहिजे होता. इंग्लंडच्या डावर्‍या फलंदाजांसमोर कदाचित आरपीचा उपयोग झाला असता.

योग Lol

हरल्याचे दु:ख नाहि पण अजिबात fighting spirit नसल्यासारखे जे खेळाताहेत ते बघवत नाहि. बॉलर्सना काय दोष द्यायचा ? सलग सहावी मॅच आहे जिथे दिवसेंदिवस बॉलिंग करताहेत.

Pages