भारत वि. इंग्लंड - २०११ -

Submitted by नंद्या on 3 July, 2011 - 22:15

England v India 2011

इथे या मालिकेसंदर्भात चर्चा करूयात.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मास्तुरे

ती मालिका रवी शास्त्रीचीच होती. तुम्ही म्हणता ती सुनील गावसकरची मालिका ग्रेट इनिंग्जबद्दल होती. प्रोफेशनल मॅनेजमेंट ग्रुप या नावाने तो टीव्हीवर ती मालिका सादर करीत असे. रवी शात्रीने दॅटस क्रिकेट (नावाबाबत साशंक आहे) सुरू केलेलं. त्यात स्विंग कसा करायचा, स्विंग कसा खेलायचा हे दाखवलं जाई. बॉल अडवायचा कसा हे हि दाखवला गेलं होतं. अक्रम बद्दल आक्षेप येणार हे जाणून होतोच पण त्याने पदार्पणातच सर्वांच लक्ष वेधून घेतलं होतं. पायाच्या मागून स्विंग बॉलवर घेतलेल्या विकेटस आजही आठवतात. बहुतेक के श्रीकांत त्याचा बकरा झाला होता.

त्या कार्यक्रमात रिचर्ड हॅडलीने हजेरी लावली होती तसच कपिलनेही स्विंग करून दाखवले होते आणि कपिल त्या वेळी खेळत होता.

असामी माझ्या पोस्ट इग्नोर करीत असल्याबद्दल असामी यांना धन्यवाद !! पण पोस्ट एडीत करताना त्यांनी सोनवणे हे कुणाचं रूप असल्यासारखं का लिहीताहेत हा उल्लेख मनोरंजक वाटला. बहुधा त्याच वेळी शाईनचा मुद्दाही एडीट केला असावा. असो. बॉल स्विंग कसा होतो याचा व्हिडिओ दिलाच आहे. दुर्दैवाने दॅटस क्रिकेटचा व्हिडिओ मिळाला नाही.

जाता जाता : सुनील गावस्करची ती मालिका पाचेक वर्षांपूर्वी ईएसपीएन वर पुन्हा दाखवली गेली होती. त्या मालिकेत त्याने खेळतले बारकावे समजावून सांगितले होते. कसोटी क्रिकेट काय असतं हे त्याच मालिकेतून नीट समजलं. कॉलेज, रणजी वगैरे लेव्हलला पाच दिवसाचे सामने कुणी खेळत नाहि. त्या सर्वांना ही मालिका खूप आवडायची. सेशन्स बाय सेशन्स खेळ काय असतो, चहापान किंवा भोजनाच्या आधी विकेट मिळणं कसं महत्वाचं असतं, हेवी रोलर कधी घ्यायचा, चेंडू बदलणे किंवा न बदलणे हे कर्णधाराने कसं ठरवायचं यावर त्याने प्रकाश टाकला. सुनीलच्याच प्रयत्नातून दूरदर्शनवर द बॉडीलाईन ही मालिकाही दाखवली गेली होती.

शेवटची पोस्ट. हा अनाहूत सल्ला समजा.

क्रिकेटसारख्या खेळावर सहज गप्पा मारल्यासारख्या पोस्ट टाका हो. आकडेवारी चुकली काय किंवा गोंधळ झाला काय... चलता है ! नासाच्या संशोधकांना त्यात ओढणं म्हणजे अती(च) होतंय..

The wall is taller now, in our eyes !! >> Indeed !!! खरे तर तो हि सिरीजही खेळला नसता तरी ते क्षम्य होते.

बहुधा त्याच वेळी शाईनचा मुद्दाही एडीट केला असावा.>> मी ढोबळ पोस्ट करत नसल्यामूळे अशी गरज लागत नाहि.

ओके. गणूचं दुसरं रूप म्हणून कोण गणू हा सर्च दिला. नेमका काय विनोद आहे हे समजावं या हेतूने. त्या धाग्यावरची एकंदर चर्चा ( आपल्या पोस्टसहीत) पाहील्यानंतर ज्या हेतूने आपण हे वाक्य (आधीपासूनच) टाकलय त्याबद्दल आपलं कौतुक वाटलं. फार म्हणजे फारच छान लिहीता आपण. त्याचबरोबर दुस-याबद्दल वैयक्तिक पातळीवर असं लिहून त्रास मात्र स्वतःच करून घेता. इग्नोर करीन असं म्हणताही आणि वाचताही. धन्य आहे. मला तरी असं वैयक्तिक पातळीवर येण्याचं कारण अद्याप कळालेलं नाही. अगदी मास्तुरेंनी गोंधळ वगैरे ज्या पोस्टला म्हटलय त्या पोस्टही झक्कींच्या पोस्टनंतर तशाच गंमतीत टाकल्यात. कुणाकुणाला नाही समजत गंमत, लगेच येतात आकडेवारीनिशी म्हणून आकडेवारीबद्दल पुन्हा कमेंटस केल्या. चेंडू शाईन मुळे स्विंग होतो हे वाक्य आता त्या पोस्टमधे दिसत नाही म्हणून एडिट केली असं म्हटलं. तसच रिव्हर्स स्विंग करताना शाईनवाली बाजू वगैरे पोस्टमधून पुन्हा तेच स्पष्ट होतय. त्याचं उत्तर आधीच्याच पोस्टमधे आहे.

यात गणूचं दुसरं रूप याचा संबंध काय हे मात्र खरच कळालेलं नाही.

चेंडू शाईन मुळे स्विंग होतो हे वाक्य आता त्या पोस्टमधे दिसत नाही म्हणून एडिट केली असं म्हटलं>>जे कधी नव्हते ते दिसणारच कसे दिसणार ? तुम्हाला जशा doctored pitches, एखाद्या कालखंडामधे न झालेल्या मॅचेस वाटल्या त्यातलाच प्रकार असेल. मी जे कधी म्हटलेच नाहि त्यावर म्हणून "साप साप" म्हणून भुई धोपटत का बसताय ?

"सोनवणे हे गणूचे दुसरे रुप असल्यासारखे का लिहिताहेत ?" (तुम्ही गणू आहात असे नाही म्हटले) असे का म्हणालो ह्याचे उत्तर कारण तेहि तुमच्यासारखे सगळेच ढोबळपणे बोलत असत, आकडेवारी किंवा पुरावा शून्य पण भारताच्या मॅच फिक्स होतात हे अनेकदा ठामपणे सांगून मोकळे. इतर कोणी त्याविरुद्ध argument दाखवले तरी हे ठामच. (म्हणजे माझी अशी भाबडी समजूत कि अमकी मॅच फिक्स आहे सारखा गंभीर आरोप करतात तेंव्हा काहितरी पुरावा असावा पण तो काहि कधीच आलाच नाहि.). तुम्हीही असेच 'doctored pitches, SL चे पैसे घेऊन हरणे' सुरु केलेत. त्यांचाही "I'm entitled to my own facts" वरच भारी विश्वास. साम्य लक्षात आले असेल.

माझ्या शेवटच्या पोस्टचा उल्लेख तुमच्या क्रिकेटबद्दलच्या मतांबद्दलच्या पोस्टबद्दल होता. लिहिताना स्पष्ट पोस्ट केले नव्हते हे लक्षात आले नि बदलायचेही होते. पण बदलले तर तुम्ही म्हणाल पोस्ट बदलली म्हणून बदलली नाहि. Lol

तुमची हरकत नसेल तर क्रिकेटव्यतिरिक्त इतर सर्व (जर तुम्हाला चालूच ठेवायचे असेल तर) विपू किंवा मेलवर नेउया ? तुमच्याबद्दल कल्पना नाही पण ह्या बाफचा मूळ विषय माझ्यामूळे अजून बाजूला पडू नये असे मला प्रामाणीकपणे वाटते. 'तुमच्यासाठी हा सरसकट गमतीचा विषय असू शकेल' ह्याची कल्पना आलीये आत्तापर्यंत पण, इथल्या बर्‍याच जणांना (माझ्यासकट) हा जिव्हाळ्याचा विषय आहे म्हणून विनंती. ह्याउप्पर तुमची मर्जी.

सोनवणे माझ्या पोस्ट खूप personal वाटल्या असतील तर क्षमस्व. त्या सोनवणे ह्या व्यक्तीला उद्देशून नसून तुमच्या I'm entitled to my own facts (about cricket)" ह्या प्रव्रुत्तीला उद्देशून लिहायच्या होत्या. आपल्याच टिमवर विनाकारण दोषारोप करणार्‍या तुमच्या पोस्ट्साठी उद्देशून होत्या. ती मर्यादा ओलांडली गेली असेल तर क्षमस्व.

आधीच्या पोस्ट बदलाव्या असे वाटत होते पण परत पोस्ट बदलली असे वाटायला नको म्हणून वेगळे पोस्ट करतोय.

अरे वा. भलतीच स्विंग बॉलिंग खेळायची प्रॅक्टिस झाली आहे असे दिसतेय. Happy

आता स्पिनची चालू करा नाहीतर स्वान मॅच घेउन जायचा. Happy

आयला रे.. कसली स्विंग बॉलिंग टाकताय एकमेकांना... नुसत्या दांडक्या उडवताय.. लगे रहो.. फक्त इंग्लंड विरुद्ध पण अशीच स्विंग भारतीय गोलंदाजांनी करायला पाहिजे...

वॉलनी नेहमीप्रमाणेच योग्य वेळी कडक शॉट मारलेला आहे...

http://www.espncricinfo.com/ci/content/video_audio/526253.html हे ऐका, केदार्, योग, अमोल, भाऊ काहि अतिशय चांगले पाँईट्स आहेत. विशेषतः failures of BCCI as an organization, lack of test level players, influence of money. नवीन नाहित पण compilation छान आहे.

असामी,
मी हीच लिंक तुला काल पाठवणार होतो.. कालच पाहिलं ते.. बाळ आणि हर्षा चे मुद्दे अगदी अचूक आहेत.
संजय भाऊ नेहेमीप्रमाणेच बरळतात.. Happy
I echo their sentiments that BCCI is not serious about Team India keeping up at no 1 spot. Their planning and decisions are driven by revenue and profits!
I also like the idea of someone asking point blank to Sehevag: why he could not have opted for surgery perior to IPL..? I guess the answer is obvious: Money Happy
(same question can be asked to Jhahir, Gambhir, Yuvi, Bhajji and Co..)

I guess the answer is obvious: Money >> yeap, can one really blame them though ? There is easy money available for picking ? I guess fair compromise from BCCI is to space out tours to give breather to players. BCCI really needs to step up to discard the attitude of rebuffing scheduling. Enough with those responses "We are not forcing anyone to play."
*** from cell***

England and India are monitoring the security situation in Birmingham in the wake of the rioting and looting in the city on Monday night
बरेच काही काही विचार मनात आले हे ऐकून. रिकामे मन हे सैतानाचे कार्यक्षेत्र असते अशा अर्थाची एक म्हण आहे इंग्रजीत, ती माझ्याबाबतीत खरी आहे. म्हणून लिहीले. आता उद्यापासून सामना सुरु झाला की लगेच असले बाष्कळ लिखाण बंद.
आता भारत लक्ष ठेवणार असे वाचून पोटात गोळा आला. भारतीय नेहेमीच लक्ष ठेवत असूनहि मुंबईत स्फोट होतात, कसाब सारखे नि अफझलसारखे लोक सरळ बंदुका घेऊन हिंडतात नि निरपराध लोकांना मारतात. तसे काही होणार की काय? नशीब आपण जोरदार हरलो, नाहीतर हे गोरे लोक मारायचे आपल्या लोकांना!!

पाकीस्तान चे दौरे रद्द, आता घाई घाईने चालू दौरा पण रद्द करा. उगाच आणखी मानहानी नको.
शिवाय ऑलिंपिकला पण जायला नको, उगाच तिथे जाऊन एक मेडल घेऊन यायचे, त्यापेक्षा श्री. साईबाबांकडे बघा, कुठे गेले नाहीत तरी सोन्याचे सिंहासन!!

इंग्लंडचा संघ ढेपाळल्यावर मग पुनः करू दौरा, जखमी खेळाडूंना घेऊन. मग ते जिंकतील नि त्यांचे मनोधैर्य वाढवल्याबद्दल भारताला धन्यवाद देतील.

हटकेश्वर, हटकेश्वर. तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे.
(किंवा मायबोलीवर लिहावे! )
Happy Light 1

extra sambhar, trans-fat-free chunky peanut butter, avial (without Adai >>>

Invalid question. India have played in every single World Cup final at the Wankhede. This scenario is meaningless. >>

Rofl

तुमची हरकत नसेल तर क्रिकेटव्यतिरिक्त इतर सर्व (जर तुम्हाला चालूच ठेवायचे असेल तर) विपू किंवा मेलवर नेउया ?

असामी,
हे आधीच सुचलं असतं तर ? तुम्हाला विषयांतर होतंय अशी टोचणी लागली असेल तर हीच पोस्ट माझ्या विपु मधे का नाही टाकली ? इथे टाकण्याची काहीच गरज नव्हती. खरं तर अद्याप तुम्ही माझ्या विपुत काह्जीही लिहीलेलं नाही. गणूचं दुसरं रूप असल्यासारखे आणि गनूसारखे लिहीणे यात काय मेख आहे हे तुम्हाला मी सांगायची गरज नाही. मी माझ्या पूर्ण नावानिशी इथं पोस्ट टाकतोय. असामी वगैरे संदिग्ध नावाने नाही हे आधी लक्षात घ्या. सुरूवात केल्यानंतर अशा साळसूद पोस्ट्सचा काय उपयोग ? खरं तर मला शनिवार रविवारशिवाय वेळ मिळत नाही पण आत्ता वेळ काढून उत्तर देतोय.

राहीली गोष्ट पुराव्यांची. हे काही न्यायालय नाहि. या विषयांवर इतक्या ठिकाणी छापून आलेलं असतं कि साधारणपणे ते सर्वांच्या वाचनात आलेलं असण्याची शक्यता असते. या घटना आहेत. माझे काही ठाम दावे नाहीत आणि न्यायालय मिलॉर्ड मिलॉर्ड म्हणून केलेली भाषणं नाहीत. आपण नाही का गप्पा मारताना पाच मिनिटात अजित वाडेकरपासून ते महेंद्रसिंह ढोणी पर्यंतच्या क्रिकेटचा आढावा घेत ? का तिथं सनावळ्ञा आणि पुरावे घेऊन बसतो ? दुसरी गोष्ट इथं मी मॅचफिकिसिंगचे कुठलेही आरोप केलेले नाहीत. त्यामुळं न केलेल्या आरोपांबद्दल बोलणंही विकृतीच. प्रत्येक गोष्ट गूगलची लिंक दिल्याने सिद्ध होते अशा भ्रमात काही मंडली असतात ही ही एक विकृती. आता मास्तुरेंनी दॅटस क्रिकेटमधे सुनील गावस्करला घुसवलं म्हणून तुमचा अभूतपूर्व गोंशळ होतोय अशी खिजवणारी पोस्ट इथे मलाही टाकता आली असती. पण मला तसं करावसं नाही वाटलं. त्यांना काय म्हणायचंय हे मला समजलं आणि मी फक्त फॅक्टस मांडल्या. आता गूगलवर दॅटस क्रिकेतची लिंकच नसेल तर तुम्ही पुन्हा मला मी कुणाचं तरी रूप असल्यासारखा आरोप करून काहीतरी लिहीणार आणि वर माझ्याच प्रवृत्तीवर मल्लिनाथी करणार असाल तर करा.

इथं फारएण्ड सारखेही लोक आहेत जे फक्त फॅक्टस मांडून चूक दाखवून देतात. जे सुसंकृतपणाचं लक्षण आहे. केदारसारखेही सुसंक्रूत लोक आहेत . तुम्ही क्षमायाचना करताना पुन्हा तुमची तयारी अस्ले तर वगैरे साळसूदपना करून त्या क्षमायाचनेलाही काहीच अर्थ ठेवलेला नाही. तुमची प्रवूत्ती काय त्रास आहे वगैरे पोस्तमधून स्पष्ट झालेलीच आहे. नाहीतर मला तुमच्या प्रत्येक पोस्तला उत्तर देण्याचं काहीही कारण नव्हतं. तो काही माझा धंदा नाही आणि तितका वेळही नाही. कसला त्रास आहे तुम्हाला ? अनिल सोनवणे या नावाचा ? इतकं काय आभाळ कोसळलं होतं तुमच्यावर ? ती पोस्ट जर महामूर्खपणाची वाटली असेल तर इग्नोर करणं हे शहाणपणचं लक्षण नाही का ? कि तुम्हाला वाटलं म्ह्णून कुणी कुणाचं दुसरं रूप असल्याचं लिहीण्याचा ठेका तुम्हाला मिळालाय ? तुमच्या प्रत्येक पोस्टमधून फक्त इतरांबद्दलची तुच्छता दिसून येतेय दुसरं काही नाही.

अशा विषयांवर पुरावे मागणे हे हास्यास्पद आहे. असं मला वाटतं. आणि त्यावरून एका पोस्टवरून कुणाच्झी प्रवृत्ती काढून कोण कुणाचं रूप आहे हे लिहीणं आणखी विकृत मनोवृत्तीचं लक्षण आहे.
तुम्ही अशा प्रकारच्या पोस्टसची सुरूवात केली होती. इथून पुढे तुम्हाला लिहायचे तर लिहा मी काही त्याला उत्तर देत बसणार नाही.

धन्यवाद.

नंद्या, बहुतेक दुसरे कोणीतरी. मी या बीबीवरचे स्विंग होणारे बॉल सोडून दिले, कारण मी स्लो विकेटवर अडकलो होतो Happy पण लेख वाचल्यासारखा वाटतो. चेक करतो परत.

मॅच ला सुरुवात झाली.............. इंग्लंड ने टॉस जिंकला आपल्याला फलंदाजी दिली.............

हरभजन च्या जागी अमित मिश्रा आला............हा एकच बदल केला आहे

सेहवाग आउट................................. Sad

<<हरभजन च्या जागी अमित मिश्रा आला............हा एकच बदल केला आहे>>

मग सेहवाग कुठून आला? त्याचा अनुल्लेख केला ना केवळ म्हणूनच तो बाद झाला Wink

तो येनारच होता ..........म्हणुन............. मिश्राचा भरवसा नव्हता.......४ जलद गोलंदाज घेनार होता..... Happy

हो ना. एक दोघे जण चांगले खेळले म्हणजे पुरे. बाकीच्यांना आराम नको का? नुकतेच आजारातून उठले आहेत. बाळंतिणीला नाही का प्रसूतीआधी नि नंतर मिळून पाच सहा महिने विश्रांती घ्या असे सांगतात डॉक्टर!

>>> बॉउसर ने परत घात केला.

सेहवाग बाद झाला तो चेंडू बाउन्सर् नव्हता. तो थोडासा पोटाच्या वर उडाला होता. सेहवागला चेंडूच्या रेषेतून बाहेर येता आले नाही व चेंडू ग्लोव्हजला चाटून यष्टीरक्षकाकडे गेला.

>>> आपली भिस्त नेहमीप्रमाणेच परत एकदा वॉलवर...

भिंत पण पडली. भारत ४ बाद ७५.

सचिनला ऑफच्या बाहेरचे चेंडू खेळताना बराच प्रॉब्लेम येताना दिसतोय. आजही तो त्याच चेंडूवर बाद झाला.

>>> बाळंतिणीला नाही का प्रसूतीआधी नि नंतर मिळून पाच सहा महिने विश्रांती घ्या असे सांगतात डॉक्टर!

Rofl

chala....aawarayla ghyaa.....mi shatter band karato...tumhi taala lava.......

pryateka chya baayaka aana...mhanje ghari jaanya cha virah kami hoilach...ani kiman baayako la tond dakhavaayche mhanun khelatil tari...

Pages