भारत वि. इंग्लंड - २०११ -

Submitted by नंद्या on 3 July, 2011 - 22:15

England v India 2011

इथे या मालिकेसंदर्भात चर्चा करूयात.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सालाबादाप्रमाणे आपण पहिली टेस्ट हारलेली आहे... आता चेकाळून जाऊन पुढच्या तीन टेस्ट मध्ये राडा करायला पाहिजे..

NAHI NAHI...ENGLAND NE CHANGA KHEL NAHI...AAPAN KHARAB KHELALO MHANUN TE JINKALE....65-5 ASATANA...ANI 110-6 ASATANA...AAPANCH TYANNA 289 KARU DILE....TITHECH MATCH HARALO..
GHANTYACHI SPORTSMAN SHIP DAKHAVTAYT...?...

होपफुली सचिन त्या शेल मधून लगेच दुसर्‍या टेस्टला बाहेर येइल. साधारण २००४ पासून २००६-०७ च्या आसपास तो काही डाव असे खेळला होता, पण २००७ च्या इंग्लंड दौर्‍यात फॉर्मात आल्यापासून मी तरी कधी त्याला असा खेळताना पाहिलेला नव्हता. तो जेव्हा असा खेळायला जातो तेव्हा नेहमीच अत्यंत कमी रन्सवर आउट होतो. त्यात काल पिच व बोलिंग अशी होती की कधीतरी न खेळता येण्याजोगा बॉल येणार हे नक्की होते.

पण त्याहीपेक्षा त्याचा नेहमीचा गेम खेळून त्याने बोलर्स वर हुकूमत गाजवायला हवी होती. आपल्यासारख्यांना निदान सचिन चांगला खेळला असे वाटले असते. जसे लक्ष्मण च्या बाबतीत वाटले.

गांगुलीला काल हर्ष भोगलेने विचारले की तो अधूनमधून असा पूर्ण बचावात्मक 'शेल' मधे का जातो? गांगुली स्पष्टपणे म्हणाला की मलाही माहीत नाही. फक्त एवढेच आणखी म्हणाला की पुढच्या टेस्ट मधे पुन्हा वेगळाच सचिन दिसेल.

काल त्याने ६०-७० रन्स जरी केले असते तरी भारताने सामना वाचवला असता. आणि एवढे सगळे (लक्ष्मण आणि रैना सोडून) पुचाट खेळूनही २५० मधेच झोपले. तर त्यापेक्षा सेहवाग सारखी हाणामारी तरी करायची. यापेक्षा नक्कीच रन्स जास्त झाले असते. आणि सकाळी २ वाजल्यापासून लॉर्डस वर लाईन लावणार्‍यांना निदान काहीतरी इंटरेस्टिंग बघायला मिळाले असते.

गांगुलीला काल हर्ष भोगलेने विचारले की तो अधूनमधून असा पूर्ण बचावात्मक 'शेल' मधे का जातो? गांगुली स्पष्टपणे म्हणाला की मलाही माहीत नाही. फक्त एवढेच आणखी म्हणाला की पुढच्या टेस्ट मधे पुन्हा वेगळाच सचिन दिसेल.

गांगुलीचे म्हणणे लॉर्डसवर तो असा (काल खेळला तसा खेळतो) हर्षाचे म्हणणे की चौथ्या इनिंगमध्ये सामना वाचवायचा असला की त्याचे असे होते.

जाउदे लोकहो... काल तो त्याचा नेहमीचा खेळ खेळला असता आणि असाच धावा काढायच्या नादात आउट झाला असता तर आपणच म्हणले असते ... धावांना काय महत्व होते का? अधिक अधिक बॉल खेळून काढायला पाहिजे होते त्याने Proud काल तो तसे करायला गेला आणि फसला बिचारा... तरी ६८ चेंडू म्हणजे जवळजवळ ११ षटके खेळून काढलीच की त्याने (तापाने थकला असताना पण) Happy

पण तसाही तो ४थ्या इनिंगचा खेळाडू नाहीच हे सत्य आपण स्विकारले पाहिजे अता...

लक्ष्मण, गंभिर आणि द्रविड हेच चौथ्या इनिंगचे खेळाडू आहेत... बाकीचे कुणीच टिकू शकत नाहीत हे सत्य आहे

नाही मिल्या, तो जेव्हा नेहमीसारखा खेळून लौकर आउट होतो तेव्हा कधीच मला प्रॉब्लेम नसतो. कारण तो तसा आउट झाला तरी बरेच रन्स तोपर्यंत काढलेले असतात. तो असला काही तरी विचित्र खेळतो तेव्हाच राग येतो.

एक शक्यता आहे, ताप असल्याने एनर्जी वाचवत जेवढा वेळ मैदानावर काढता येइल तेवढा प्रयत्न करत असेल. माहीत नाही.

>>> पण २००७ च्या इंग्लंड दौर्‍यात फॉर्मात आल्यापासून मी तरी कधी त्याला असा खेळताना पाहिलेला नव्हता.

यावर्षी आफ्रिकेविरूध्द ३ र्‍या कसोटी सामन्यात ५ व्या दिवशी सामना जिंकायला ३००+ धावा हव्या असताना, सचिन व लक्ष्मण नांगर टाकून खेळले व सामना अनिर्णित ठेवला. त्यात सचिनचा वाटा १०० चेंडूत नाबाद १४ धावा इतका होता.

>>> तो असला काही तरी विचित्र खेळतो तेव्हाच राग येतो.

म्हणूनच काल त्याचा राग आला. काल तो विचित्र खेळला हे मात्र नक्की. कदाचित ११ वर बाद असताना बाद न दिल्यामुळे तो कोषात गेला असावा.

>>> लक्ष्मण, गंभिर आणि द्रविड हेच चौथ्या इनिंगचे खेळाडू आहेत... बाकीचे कुणीच टिकू शकत नाहीत हे सत्य आहे

हे खरे नाही. सचिनने अनेक वेळा ४ थ्या डावात मोठ्या खेळी केलेल्या आहेत. २ उदाहरणे चटकन आठवतात. १९९९ मध्ये पाकड्यांविरूध्द १३६ व २००८ मध्ये इंग्लंडविरूध्द नाबाद १०३.

Truth is England deserved to win this match by many counts, from Day One!

या सामन्यात तरी आपल्यात संघभावना, जिद्द आणि विजयी संघाप्रमाणे खेळायचे गूण या सर्वाचा खूपच अभाव दिसला. हे फार चिंताजनक वाटते. या ऊलट ईं. ची देहबोली पहिल्या दिवसापासून सकारात्मक, आक्रमक व आपण भारताला हरवू शकतो अशी वाटली.
सचिनची ७० चेंडूतील १२ धावांची खेळी मला वाटतं या सामन्यातील आपल्या एकंदर मानसिकतेचे प्रतिक ठरली.
पुढील सामन्यातून पेपर अधिकच अवघड आहे. झहीर बाहेर, विरू नाही (तो येईपर्यंत मालिका गमावली असेल का? असल्यास त्याला पाठवूच नये), गंभीर बाहेर/बेभरवशाचा, धोणी गोलंदाजी करणार (फलंदाजी नाही), भज्जी च्या जागी मिश्रा (५०-५० गँबल आहे), आणि एकूणात नकारात्मक मानसिकता. ईं. ला पुढील कुठल्याही सामन्यात हरवायचे तर आपल्याला आत्तापेक्षा २००% अधिक चांगला खेळ करावा लागेल.
सचिन ला सलामी ला पाठवायचा धाड्सी निर्णय मला वाटतं पुढील सामन्यात अधिक फायद्याचा ठरेल खेरीज सलामीला डावा व ऊजवा फलंदाज हे काँबो आपल्या फायद्याचे ठरेल.

बाकी धोणी चा लॉर्ड्स वर प्रथम गोलंदाजीचा निर्णय अगम्य होता आणि ईं ने प्रथम फलंदाजी केल्यास ते जिंकतील (शक्यता जास्त) असे मी आधी लिहीले होते. शंका खरी ठरली.

या मॅचमधून मला वाटलेल्या +ve गोष्टी

रैना टेस्टमधे खेळू शकतो. त्याचा शॉर्ट बॉलचा प्रॉब्लेम कमी झाला असावा किंवा त्याला फारसे तसे बॉल्स टाकले नसावेत. तरिही तो तिथे टिकला हे फार महत्वाचं!

द्रविडची सेंचुरी!

इशांतचा तो सेन्सेशनल स्पेल. असाच एखादा स्पेल परत टाकला आणि त्याला दुसर्‍या बाजूने चांगला सपोर्ट मिळाला तर पुढची एखादी मॅच आपण खिशात घालू शकतो.

मुकुंद बरा बॅटिंग करतो. अजून लहान आहे पण त्याची बॅटिंग नक्कीच सुधारेल पुढे.

योग्या, विचार कर. जर का आपण इंग्लंडला १०० च्या आत गुंडाळलं असतं (झहीर असता किंवा हरभजन/प्रवीणकुमारने २/३ विकेटा काढल्या असत्या तर सहज शक्य होतं) तर लीड ३०० पेक्षा जास्त झालं नसतं आणि आपले बॅटसमन जास्त खुन्नसने खेळले असते. शिवाय २०० च्या आसपास स्कोअर आल्यावर इंग्लंड प्रेशर खाली गेलं असतं. प्रेशर मुळे एकदम फरक पडतो.

चिमण.. आपल्याला एक बॉलर कमी पडला.... आधीच चार बॉलर घेऊन खेळणार, त्यात एक जायबंदी. दुसरा नावाचा नंबर एक स्पीनर... तिसरा आणि चवथा ठिकठाक चालले.. पण पाचवा बॉलर नाही आणि जास्तीचा बॅट्समन पण फारसा उपयोगी पडला नाही..

कर्रेक्ट हिम्या! इंग्लंड ही मॅच जिंकल्याचं त्यामुळेच मला फारसं आश्चर्य वाटत नाही. त्रास फक्त इथे ऑफिसमधे लोक माझ्याकडे विजयी मुद्रेने बघताहेत त्याचा होतोय. Proud मेरे भी दिन आयेंगे!

पुढच्या मॅचला मी मुनाफला घेईन श्रीशांत ऐवजी. श्रीशांत बेभरवशाचा आहे. मुनाफ निदान अ‍ॅक्युरेट बॉलिंग तरी टाकेल.

चिमण,

जर तर ला फार अर्थ नाही... वस्तूस्थिती तुझ्या आशावादाच्या फार विरोधी आहे. सचिन, गंभीर चा अपवाद सोडला तर विंडीज वि. हीच टिम घेवून आपण एक सामना जिंकलो ऊर्वरीत सामने तरलो. ई. विरुध्द तीच टीम अर्थातच कमकुवत होती हे आपल्याला आधीच माहित होते.
असो. या सामन्यातून आपला संघ "जागा" होईल आणि मानाची जागा घेईल असे म्हणुयात.
to me this match was failure of strategy! whether that means dhoni bowling, sachin defending, gambhir's selection on such crucial tour after his layoff period, etc.
For next match I think we should take risk by getting Sachin to open the innings (this risk if pays off, will bring huge and multiple benefits), drop Gambhir and get Yuvi in the middle order, mishra to replace bhajji, and fo course shrishant to replace zaheer (no guessing there).

योग्या तू फारच भन्नाट आहेस. सचिनला ओपनिंगला? तेही टेस्टमधे? त्याला त्याच्या नंबरवरून फक्त अपवादात्मक परिस्थितीच हलवू शकते. मागे कधीतरी वनडे मधे त्याला त्याच्या ओपनिंग जागेवरून हलवला होता तेव्हा काय धुमाकूळ झाला होता. त्यानंही मुलाखतीत सांगितलं होतं की त्या नंबरवरच मी इतक्या धावा केल्या आहेत वगैरे वगैरे! म्हणजे त्याला पर्याय ठेवला नाही तर तो ओपन करेल पण रिझल्ट त्याच्या १२ धावांपेक्षा फार वेगळा येईल असं मला वाटत नाही. फ्रँकली कोणीही त्याचा नंबर बदलायचा विचार पण करणार नाही.

युवी इज नो बेटर दॅन गंभीर! अ‍ॅटलिस्ट गंभीरकडे सॉलिड टेस्ट रेकॉर्ड तरी आहे.

मी पण मिश्राला घेईन!

भज्जी पुढच्या सगळ्या मॅच मधे खेळणार चिंता नसावी...

आणि सलामीच्या फलंदाजाची चिंता वृद्धीमान सहाचा बकरा करुन दुरु होऊ शकते.... म्हणजे तो जर टीम मधे असेल तर तो विकेट किपर आणि धोनी चांगल्या २० एक ओव्हर टाकायला मोकळा... गेला बाजार लक्ष्मण किंवा द्रवीड सलामीला येतील पण सचिन सलामीला जरा अवघड आहे.

चिमण शी सहमत... गंभिर ला बसवायची गरज नाही... तो मस्त खेळतोय गेले १-२ वर्षे...
भज्जीला कायमचे बसवायची वेळ आली आहे...

मला अजूनही आपण कमबॅक करू अशी आशा आहे.. आठवा द. आफ्रिका मधली सेरिज तेव्हाही आपण पहिली मॅच दारूणरित्या हरलो होतो..

माझ्यामते जितकी विकेट बॉलर्सना साथ देणारी तितका भारताचा फायदा... मग आपले साधारण बॉलर्स पण त्यावर चालतात आणि आपण २० बळी घेऊ शकतो अन्यथा आपल्याला कायमच ते अवघड जाते..

आपली बॅटींग बहुतेक वेळा मजबूत असते फक्त application कधी कधी (पूर्वी कायमच) कमी पडते... पण अलिकडच्या काळात सचिन, द्रविड, लक्ष्मण, गंभिर आणि आता रैना ने ती शक्यता खूप वाढविली आहे...

>>पुढच्या मॅचला मी मुनाफला घेईन श्रीशांत ऐवजी. श्रीशांत बेभरवशाचा आहे. मुनाफ निदान अ‍ॅक्युरेट बॉलिंग तरी टाकेल

त्याला हरभजनच्या ऐवजी घेतला तरी चालेल Proud
बरा आहेस न चिमण? मुनाफ म्हणजे आ बॅट्समन मुझे मार कॅटेगरीतला प्राणी आहे. तो बॉलिंग टाकायला धावतोय की पुण्यात पीएमटीची बस पकडायला ते समजत नाही Lol

कमबॅक बद्दल दूमत नाही पण सलामीची जोडी कसोटी सामन्याला निर्णायक कलाटणी देवू शकते, किंबहुना सलामीची जोडी सामन्याची दिशा निश्चीत ठरवू शकते. त्या अनुशंगाने मला तरी सचिन सलामी ला आलेला पहायला आवडेल. सचिन सारखा फलंदाज क्र. ४ वरून क्र. १ वर अ‍ॅड्जेस्ट करू शकणार नाही हे जरा पचायला अवघड जातय.. अर्थात त्याला वैयक्तीक ते अजीबातच पसंत नसेल तर बोलणे संपले. मग अशा वेळी हा एक मोठा बेनेफीट/संधी आपण गमावून बसतो. एरवी विंडीज विरुध्द ते चालून गेले पण ईं विरुध्द सलामी/सुरुवात मला तरी अधिक महत्वाची वाटते. it sets the tone of the match whether batting first or bowling first!
एखाद डावात सचिन ला सलामी ला पाठवायचा प्रयोग करून पहायला काही हरकत नाही, निदान पहिली फलंदाजी घेतली असेल तर. असेही तूर्तास सलामिची जोडी निव्वळ जागा भरून काढणारी वाटते. असो.
ज्या परिस्थितीत आणि ज्या प्रकारचा संघ आपल्याला ऊपलब्ध आहे मला वाटतं थोडं out of the box thinking करायला हवं. खरं तर धोणीलाच बसवून अजून एक गोलंदाज घेतला तरी चालेल. द्रविड यष्टीपूढे आणि मागे असाही व्यवस्थित ऊभा रहातोच Happy
बाकी ईतके सामने खेळून अनुभव गाठीशी असलेल्या भज्जी ने काल दुसर्‍या डावात जो फटका मारला त्यावरून एकंदर "बेजबाबदारपणा" बद्दल कल्पना यावी. भज्जी ला "डच्चू इंजेक्शन" देण्याची नामी संधी चालून आली आहे, त्याचा चांगला परिणाम मिश्रा च्या चमकदार कामगिरी मध्ये दिसायची शक्यता अधिक आहे!
बाकी दुसरी कसोटी तीनच दिवसात चालू होणार.... अशक्य दमणूक आहे लोकांची. प्रत्येक जण शरीराने अक्षरशः दमलेला/थकलेला/भागलेला दिसतोच आहे. त्यात पुन्हा मानसिक तणाव.

>>तो बॉलिंग टाकायला धावतोय की पुण्यात पीएमटीची बस पकडायला ते समजत नाही

अगदी!
प्रविण कुमार ला बॉलिंग टाकताना पाहून याला कुणीतरी "बळी" द्या रे (दोन्ही अर्थाने!) असे मनात येते. Happy पण त्याची जिगरबाज वृत्ती मला आवडते.

असो केवळ विनोद म्हणून काही जणांची सद्य नावे:

१. गंभीर बोलबाला
२. मुनाफ दूधवाला
३. प्रविण पानवाला
४. धोणी मटकावाला
५. ईशांत बटावाला
६. झहीर लंगडावाला
७. लक्षमण रेषावाला
८. द्रविड तंबूवाला
९. सचिन तापवाला (त्यालाही व ईतरांनाही)
१०. भज्जी बिंडोकवाला

योग्या तुला फक्त भज्जीचा बेजबाबदारपणा दिसला काय रे? त्या आधी द्रविड आणि लक्ष्मण यांनी काय केलं? सचिन कसा आउट झाला मला माहीत नाही. म्हणजे मला भज्जीचं समर्थन करायचं नाही पण खरं तर त्याला बॅटिंग येत नाही... तो नुसता पट्टेवाला आहे.

मंद्या अरे तो अ‍ॅक्युरेट नक्की आहे. आठव जरा वर्ल्ड कप मधली त्याची आणि श्रीशांतची बॉलिंग.

मुनाफचा फिटनेस, बोलिंग आणि अ‍ॅटिट्युड गेल्या एका वर्षात खुपच सुधारलाय. तो श्रीसंतपेक्षा कधीही प्रिफरेबल.

गेल्या दौर्‍यात (२००७- द्रविड कप्तान) भारतीय गोलंदाज झहीर आणि आरपीच्या स्विंगमुळे इंग्लिश फलंदाजांना भारी पडले होते. ते ध्यनात घेऊन प्रथम गोलंदाजीचा धोनीचा निर्णय बरोबर होता.इंग्लंडच्या फलंदाजीत वॉन आणि कॉलिंगवुड जाउन ट्रॉट आणि मॉर्गन आलेत. भारत सेहवागविना खेळला आणि मालिका जिंकला होता. जाफर, कार्तिक , गांगुलीच्या जागी रैना, मुकुंद आणि सहा आलेत.

भरत त्यावेळी लॉर्डस ला आपल्याला पावसाने वाचवले होते पण .. नाहीतर ती मालिकाही बरोबरीत सुटली असती

जाफर, कार्तिक , गांगुलीच्या जागी रैना, मुकुंद आणि सहा आलेत.>>> गंभिर???

योग, गंभीरला बसवून युवराज ? सचिनला open करायला पाठवायचे ? गंभीर rusty वाटत होता हे बरोबर आहे पण गेल्या काहि वर्षांमधे तो जसा खेळतोय ते बघून त्याला हात लावायची गरज नाहि. सचिनने त्याला त्याचा नंबर बदलायचा नाहिये हे स्पष्ट शब्दांमधे बरेचदा सांगितलेले आहे. तेंव्हा त्याचा विचारही करू नये. बाकी हरभजनबद्दल अनुमोदन पण धोनी त्याच्या पेसबद्दल हे बोललाय ते बघून तो चारी टेस्ट sleepwalk करेल असे मलाही वाटते Sad

आपली बॅटींग बहुतेक वेळा मजबूत असते फक्त application कधी कधी (पूर्वी कायमच) कमी पडते... पण अलिकडच्या काळात सचिन, द्रविड, लक्ष्मण, गंभिर आणि आता रैना ने ती शक्यता खूप वाढविली आहे...>>मिल्याला अनुमोदन. रैना was impressive yesterday.

१] सराव सामने न खेळतां इंग्लंडमधे कसोटी खेळणं, विशेषतः सध्या छान जमून आलेल्या त्यांच्या समतोल संघाबरोबर, हा शुद्ध आगाऊपणा होता व त्याचं फळ आपण भोगलं;
२] आपली फलंदाजी कितीही मजबूत असली तरी कसोटी जिंकण्यासाठी विरोधी संघाच्या २० विकेट घ्याव्याच लागतात. जर आपल्याकडे तसे गोलंदाज नसतील तर बदली गोलंदाजांचा कल्पकतेने व धाडस दाखवून अधून मधून वापर करण्याशिवाय गत्यंतर नाही. [ इंग्लंडमधे वाडेकर, कपिलने अशी कल्पकता दाखवली होती ];
३] सचिन, लक्ष्मण व द्रविड यापैकी दोघानाच 'फॉर्म व फिटनेस' बघून खेळवावं; हें आगाऊपणाचंच वाटेल पण मला प्रामाणिकपणे वाटतं कीं त्यामुळे नवोदित खेळाडूंच्या व संघाच्या मानसिकतेत खूप चांगला फरक पडेल;
४] फलंदाजी हें आपलं खरं शक्तीस्थळ आहे हे स्पष्ट असताना नाणेफेक जिंकून इंग्लंडला पहिली फलंदाजी देण्यासारखे जुगार आपल्याला परवडण्यासारखे नाहीत, हें समजून घेणं अत्यावश्यक आहे.

असाम्या,
कसोटीत एखादे गॅम्बल्/चूक सुधारायला दोन संधी तरी मिळतात (दोन डाव). तेव्हा सचिन ला एका डावात तरी सलामीला पाठवावे असे मी अजूनही म्हणेन. अर्थात हे विरू नाही म्हणूनच. तो चालला तर पुढील सर्व सामन्यांचा सलामीचा प्रश्ण निकालात निघेल, मग विरू येवो वा न येवो. नाही चालला तो वर तर आहेच क्र. ४ वर.
रैना इंप्रेसिव्ह होताच यात वाद नाही. पण त्याच्या जोडीला बरेच वेळा धोणी आणि शेपूट शिल्लक असते ज्यामूळे त्याच्या कामगिरीचे चीज होत नाही/त्याला दुसर्‍या टोकाकडून साथ मिळत नाही.
युवी गोलंदाजी करू शकतो. क्षेत्ररक्षण चांगलेच आहे आणि ईं. विरुध्द तो नेहेमीच महत्वाच्या खेळी खेळतो (जसे लक्षमण ऑसी विरुध्द) हा एक मानसिक डावपेचाचा भागही आहे. गोलंदाजांना होत असलेल्या दुखापती पहाता युवी हा अजून एक पर्यायी गोलंदाज ऊपलब्ध होतो. गंभीर चे स्थान निव्वळ सलामीचा फलंदाज म्हणून आहे-- तो खेळला नाही तर संघाचे फार मोठे नुकसान होते.
तात्पर्य, सलामीच्या जोडीचा प्रश्ण सोडवणे खेरीज गंभीर च्या बदल्यात अष्टपैलू खेळाडू घेणे हे मला तरी गरजेचे वाटते.

Pages