भारत वि. इंग्लंड - २०११ -

Submitted by नंद्या on 3 July, 2011 - 22:15

England v India 2011

इथे या मालिकेसंदर्भात चर्चा करूयात.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वुर्केरी रमन ही होता, पण दुसरा तेव्हा डावा कोणी आठवत नाही. वन डे मधे गांगुली-रमेश, गांगुली-पार्थिव पटेल असे कदाचित झाले असावे, चेक करायला पाहिजे.

काल इंग्लंडच्या बोलर्सना ही काही सपोर्ट मिळत नव्हता. स्विंग फारसा दिसला नाही, ट्रेमलेट ला थोडा बाउन्स मिळत होता एवढेच. मुकुंद अ‍ॅक्रॉस फार खेळायला बघत होता. एक दोन एलबी दिले नाहीत त्याचे, त्यातला एक वाटत होता.

एकूण सकाळचा थोडा वेळ नीट खेळले तर आपल्यालाही बरेच रन्स करता येतील. पिच मधे काहीच नाही हे कळेपर्यंत पूर्वी चार पाच चुकीचे शॉट्स मारून परतलेले असायचे तसा प्रकार होऊ नये. काल द्रविड पॅव्हिलियन मधे बसलेला दाखवत होते. चेहर्‍यावर "निदान उद्यापर्यंत मला यायला लावू नका रे" असे भाव Happy

काल धोनीने पॅड्स उतरवून स्वतः गोलंदाजी करणे हा वेडेपणा होता. फक्त एक गोलंदाज जायबंदी असला म्हणून चक्क यष्टीरक्षकावर गोलंदाजी करण्याची वेळ यावी? कसोटीत आतापर्यंत ४५ बळी घेणार्‍या सचिनला गोलंदाजी द्यायला काय हरकत होती? रैनाची इतक्या उशीरा का आठवण झाली?

आता पर्यन्त इंग्लंड ने अप्रतीम खेळ खेळला आहे.....पहील्या दिवशी पाउस पडुन गेलेला तेव्हा दोन्ही ओपनर्स ने मोठे फटके न मारता आरामात खेळलेत.....झहीर ला विकेट मिळुन सुध्दा बाकीच्या फलंदाजी मधे काहीच फरक पडला नाही......त्यांचे टारगेट होते हळुहळु खेळुन पहीला दिवस विकेट न पाडता पुर्ण कराय्चे......दुसर्या दिवशी खेळ चालु झाला तेव्हा त्यांचे टारगेट होते की झहीर नाही आहे त्यामुळे फक्त दोनच गोलंदाज आहे...म्हणुन सकाळ्च्या सत्रात त्यांनी सावध सुरुवात करुन नंतर च्या सत्रात वेगाने धावा जमवल्या......आणी शेवट्च्या सत्रात तर ५.५ च्या धावगती ने धावा जमवल्या.....यावरुन त्यांचे जे प्लानिंग होते...त्यात ते यशस्वी झाले............

या उलट भारताचे झाले...... पहिल्या दिवशी जो झहीरच्या झटक्याने जी टीम डळमळीत झाली ती दुसर्या दिवशी पर्यंत रुळावर आलीच नाही..........त्यामुळे धोनी ला एक सप्राइझ म्हणुन गोलंदाजी टाकावी लागली.......जेणे करुन काही विकेट मिळु शकेल.....पण विकेट थोडीफार पाटा असल्या मुळे काहीच झाले नाही.......ज्या पिटरसन ला डावखुरी गोलंदाजी निट खेळता येत नाही ( हे पुर्ण जगाला ठाउक आहे) त्याच्यासमोर रैना ला त्याने तो आराम सेटल झाल्यावर म्हणजे १५० रन्स झाल्यावर आणले......तो पर्यंत तर तो रैना संघात आहे हे विसरुनच गेलेला.....
तेंडुलकर सुध्दा गोलंदाजी करतो काही ओवर्स त्याला दिले असते म्हणजे रैना, तेंडुलकर आणि भज्जी यांनी काही ३० -३५ ओवर्स केल्या असत्या तर ओवर रेट सुध्दा वाढला असता...जो फक्त १३ ओवर्स एका तासात होत्या..... तोपर्यन्त इशांत आणि प्रवीन ला आराम सुध्दा मिळाला असता ...........आणि काही ओवर्स नी ताजेतवाने होउन जोमाने गोलंदाजी साठी तयार झाले असते........
प्रवीन ने ४० ओवर्स ........इशांत ने ३२ ओवर्स .......भज्जी ने ३५ ओवर्स टाकल्या.........म्हणजे काहीच विविधता नव्हती गोलंदाजी मधे............त्यामुळे इंग्लंड फलंदाजांना सोपे झाले ..........त्यातल्या त्यात प्रविन स्विंग मिळत होता........म्हणुन त्याला विकेट तरी मिळाल्यात........आता जर भारताच्या वि़केट्स जर स्वान ने मिळवल्या तर भज्जी उघडा पडणार...........कारण त्याने नाही वि़केट मिळवल्या नाही टिच्चुन गोलंदाजी केली
३५ ओवर्स मधे ३च निर्धाव आणी १५२ रन्स म्हणजे ४.३२ च्या सरासरी ने...........त्याच्या पेक्षा सरासरी धोनीची आहे फक्त २.८७............

आता बघु ३र्या दिवशी फलंदाज लाज वाचवतात की.................आपले वस्त्रहरण होते..................

सचीन च्या शतकावर प्रचंड बेटिंग चालु आहे....... आणि कल आहे की शतक करणारच म्हणुन...........
चला एक तरी आनंदाची बातमी आहे....नाही तर बाकी आनंदच आहे......... Happy

मॅच सुरु झाली............पहिले २ तास खेळुन काढले तर बरे होईल.............

आता रांग नको लागायला...........................................................
लंच पर्यन्त दोघांनी खेळुन काढायला हवे...................

अरेरे, अरेरे! सचिन ३४ वर बाद!! सबंध स्टेडियम ला वाईट वाटले. शेवटी कर्तव्य म्हणून हळू हळू टाळ्या वाजवल्या. २००१ मधील ऑस्ट्रेलिया विरुद्ध एका सामन्यात द्रवीड व लक्ष्मण जमले होते, दोघांची शतके. तसे पुनः व्हावे ही प्रार्थना!!

ज्या पिटरसन ला डावखुरी गोलंदाजी निट खेळता येत नाही ( हे पुर्ण जगाला ठाउक आहे) त्याच्यासमोर रैना ला त्याने तो आराम सेटल झाल्यावर म्हणजे १५० रन्स झाल्यावर आणले......तो पर्यंत तर तो रैना संघात आहे हे विसरुनच गेलेला.... >> रैना right arm off break टाकतो. फक्त बॅटिंग डावखुरी आहे.

Please cut some slack to Dhoni. He has his own methods and instincts and so far they have not failed him. World Cup च्या आधीचे दिवस आठवा Lol

हॅत्तेरी - लक्ष्मण, रैना दोघेहि गेले.
निदान फॉलो ऑन तरी टाळा!! नाहीतर नामुष्कीची वेळ येईल.

२१५-५; द्रविड व धोनी डाव सावरताहेत असं वाटतं. फॉलोऑन वाचवणं आतां आवाक्यात आहे. चौथ्या पांचव्या दिवशी खेळपट्टी खराब झालीच तर अजूनही सामना रंगतदार होऊं शकतो !

उद्या चहापानापर्यंत इंग्लंडने अजून २०० धावा केल्या, तर, त्यांचे एकूण आधिक्य जवळपास ४०० धावांचे होईल. त्याचे धावसंख्येवर डाव घोषित केला, तर, भारताला ८ तासात ४०० धावा कराव्या लागतील. स्ट्रॉस चहापानानंतर अर्ध्या पाऊण तासाने अंदाजे ४२५ चे लक्ष्य ठेवून डाव घोषित करेल. लॉर्डसवर ४ थ्या डावात इतक्या धावा करणे फार अवघड आहे. त्यामुळे सामना वाचविणे अवघड आहे.

<< वॉल द्रविडला सलाम! जबरदस्त शतक! >> १००% अनुमोदन.
<< उद्या चहापानापर्यंत इंग्लंडने अजून २०० धावा केल्या, तर.. >> हे अपेक्षित आहेच .. पण चौथ्या-पांचव्या दिवशीं अनपेक्षितही कांही होऊं शकतं, हीच तर कसोटी क्रिकेटची गंमत आहे !

काल लंचनंतर सचिन आणि द्रविड दोघेही मस्त खेळत होते. पण सचिन ३२ रन्स वर बराच वेळ अडकला आणि नंतर आउट झाला. सचिनचे फोर्स मात्र सुंदर होते. द्रविड ही आधी बराच वेळ १०-१२ वर अडकला होता - पण कदाचित द्रविड अडकतो म्हणजे वेगळे काय होते हे कधी कधी कळत नाही Happy त्याचा पेशन्स जबरी असतो त्यामुळे नंतर पुन्हा रन्स होणे चालू होते.

पण द्रविडची एकाग्रता जबरदस्त होती. स्विंग, स्पिन सर्व खेळताना लाईन बरोबर ओळखून व्यवस्थित मागे येउन खेळणे वगैरे नेहमीप्रमाणेच. आणि त्याने मारलेले फटकेही अतिशय सुंदर होते. अ‍ॅण्डरसन च्या एका ओव्हरमधे चक्क तीन फोर मारले त्याने, तीनही जबरी होते.

मुकुंदही चांगला खेळत होता, केवळ ५० च्या घाईत आउट झाला. डावखुरा असूनही तो एवढा ग्रेसफुल वाटत नाही. लेगला मारताना बराच ऑकवर्ड वाटला.

आज एक आश्चर्य म्हणजे बर्‍याच पेपर्स मधे द्रविडच्या शतकाबद्दल फारसे नाही. कदाचित उद्या येइल.

<< कदाचित द्रविड अडकतो म्हणजे वेगळे काय होते हे कधी कधी कळत नाही >> कदाचित, बचावात्मक व आक्रमक पवित्रा या दोन्हीतही तो सरस असूनही एकाचवेळीं या दोन्ही पवित्र्यात सहजपणे वावरणं त्याच्या मानसिकतेत बसत नसावं ! बरेच चांगले खेळाडू या सांपळ्यात अडकतात. उदा. वेंगसरकर सारखा अत्यंत आक्रमक फलंदाज कांही वर्षं बचावात्मक पवित्र्यातच अडकून पडला होता; संजय मांजरेकर तर अशाच मानसिकतेत अडकून स्वतःचं करीअरच संपवून बसला [ हे एकदा समालोचन करताना त्यानेच प्रांजळपणे कबूल केलं होतं]. द्रविड त्यामानाने एकाच डावात , वेळ लागला तरीही, पवित्रा बदलूं शकतो हे त्याच्या शिस्तबद्ध, तंत्रशुद्ध, व शैलीदार मोठ्या खेळीं मागचं रहस्य असावं.
[ फार क्लिष्ट झालंय का हे विश्लेषण; ठराविक वय झाल्यावर येतोच वाटतं असला क्लीष्टपणा ! Wink ]

पिचमध्ये फारसे काही नसतानाही भारतीय फलंदाज ढेपाळले... अर्थात टेस्ट मोडमध्ये जायला आपल्याला थोडासा वेळ लागतोच हे आजपर्यंतचा इतिहास सांगतो ... असो... परत एकदा द्रवीडने सावरले... लॉर्डसवरच्या शतकाबद्दल त्याचे अभिनंदन Happy
सचिनच्या होउ घातलेल्या शतकाबद्दल इतका हाइप चाललेला असताना द्रवीडच्या शतकाची दखल मिडीयाने फारशी घेतलेली दिसत नाही Sad

द्रविडचं कौतुक करताना पीटरसनलाही सलाम ठोकायला हवाच. " भारताची स्विंग गोलंदाजी चांगलीच होती " हे ठीक आहे पण " धोनीचा सामना करणं सगळ्यात कठीण होतं" हे पीटरसनचं म्हणणं मात्र जरा पेंचात टाकणारं वाटतं.

>>> सचिनचे फोर्स मात्र सुंदर होते.

काल आल्यापासून सचिन अतिशय सुंदर खेळत होता. त्याचे सर्व ६ चौकार अतिशय सहज मारलेले होते. खेळपट्टी इतकी छान होती की सचिन व द्रविड हे दोघेही द्विशतक करतील असे वाटले होते. पण ब्रॉडने गंभीर व मुकुंदप्रमाणेच सचिनला सुध्दा फुललेंथ चेंडू टाकून चकवले.

धोनीचा सामना करणं सगळ्यात कठीण होतं" हे पीटरसनचं म्हणणं मात्र जरा पेंचात टाकणारं वाटतं>>>>>>>>>>>>>>>>>> धोनी ने खरच चांगली गोलंदाजी केली आणि त्याने आता पर्यंत कधीच गोलंदाजी टाकली नसल्याने कुणालाच त्याच्या चेंडुंचा अंदाज नव्हता...तो किती स्विंग करतो चेंडु याचा अंदाजच नव्हता कुणाला...... म्हणुन ते वाक्य बरोबर आहे.......त्यामुळेच धोनी गोलंदाजी करायला उतरला असेल........पण नशीब त्याच्याबाजुने नव्हते....... Happy

udayone | 21 July, 2011 - 15:07

जो पहीली फलंदाजी करेल तो ३०० पर्यन्त तरी नक्कीच जाउ शकेल....विकेट दुसर्या दिवशी सुध्दा स्विंग करत राही ली तर दुसरा डाव २५० च्या आतच आटपेल...आणि शेवट्च्या दिवशी २५०-३०० चे लक्ष्य असेल..........

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

चला थोडे फार तरी अंदाज बरोबर आला म्हणायच...........................स्विंग कमी झाला म्हणुन आपण २८४ तरी पोहचलो....... Happy

फार क्लिष्ट झालंय का हे विश्लेषण; ठराविक वय झाल्यावर येतोच वाटतं असला क्लीष्टपणा

वय झाल्याने क्लिष्टपणा येत नाही - तीव्र बुद्धिमत्ता, अफाट नि सखोल ज्ञान यामुळे तुम्हाला जे सहज नि सोपे वाटते ते बर्‍याच जणांना क्लिष्ट वाटेल असे वाटते एव्हढेच.

भारताचा विजय व्हावा या इच्छेने अतीव भावनामय होऊन एक दिवास्वप्न बघतो -
समजा आज चहापानापूर्वीच इंग्लंडचा सगळा संघ बाद केला नि मग उद्या अगदी शेवटची पाच मिनिटे राहिली असता एक गडी राखून भारताने इंग्लंडचा पराभव केला!!

प्रवीण कुमारचे पुनः पाच बळी, हरभजनचे तीन! एक धावबाद, एक शर्माला!

गंभीर व तेंडूलकर यांची शतके, धोणी, रैना यांची जबरदस्त फटकेबाजी!!

आनंदी आनंद गडे.
Happy

टीपः भावनेच्या भरात, मेंदूला पूर्ण विश्रांति देऊन, माहित असलेले सगळे विसरून, हे लिहीले आहे. हे कसे होईल, का होणार नाही याचे विश्लेषण करण्यात आपली अमूल्य बुद्धिमत्ता खर्च करू नका.
लगान सिनेमा पाहिलात ना???!!!! त्यात नाही का जिंकले भारताचे लोक??

आत्ताची बातमी............एका तासात फक्त १४ ओवर्स..........धोनी वर एका कसोटी सामन्याची बंदी ची टांगती तलवार......हळुहळु खाली यायला लागली आहे......
अजुन काही केले नाही तर दुसर्या कसोटी मधे सेहवाग , झहीर, धोनी हे तिघे ही बाहेर.........

इंग्लंड ६५/५ ????

धोनीच्या गोलंदाजी करण्याने कपिलदेवसकट लोक का उखडले?त्याने पिटरसनला बाद केल्यातच जमा होते. आणि सचिनच्या ५० टेस्ट विकेट्स आहेत, तशा धोनीच्या होणार नाहीत कशावरून?

Pages