भारत वि. इंग्लंड - २०११ -

Submitted by नंद्या on 3 July, 2011 - 22:15

England v India 2011

इथे या मालिकेसंदर्भात चर्चा करूयात.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हॉटस्पॉट अधिक चन्गला प्रकार आहे असे वाटते. त्यात तापमानातील फरक दिसतो. आणि ही टेक्नॉलॉजी उपग्रहातही वापरली जाते असे मला अंधुकसे आठवते. इन्फ्रारेड थर्मोग्राफी असे म्हणत्तात या टेक्नॉलॉजी ला!

poor show from sachin........... he clearly smees to be struggling to handle expectation/hype of this series. I noticed in both games, he is NOT enjoying the cricket... his body language suggests an individual under emotional pressure... that tendulkar-smile has disappeared?
And as if to prove the point, Dravid has another 50 in this series. Happy
May be Yuvi will make golden 100? Happy Hopes..

आणि सचिन च्या विकेट नंतर एव्हाना मरगळलेली ईं. ची गोलंदाजी अचानक तिखट झाली आहे.. संजीवनी प्यायल्यागत आता गोलंदाजी करतायत.
युवी साठी आजचा पेपर सचिन आणि रैना ने अधिकच कठीण करून ठेवलाय...
-----------------------------------------------------------------------------
मला कुठल्याही वादाला तोंड फोडायचे नाही: पण सचिन व द्रविड एकत्र खेळताना दोघांमधील केमिस्ट्री मिसींग होती. षटक संपल्यावर मित्रत्वाचे शब्द दिसत नव्हते. ऊपाहाराच्यावेळी तंबूत परतताना द्रविड अण्णा एकटेच पुढे गेले होते.. लहानच गोष्ट पण खूप खटकले Sad or may be i am reading too mich into the small things..

भरत

इरफान इतका का वाईट्ट खेळाडू आहे ?

एकेकाळी झहीरला मागे टाकून तो स्ट्राईक बॉलर होता भारताचा. त्याच्यासारखा स्विंग याआधी मनोज प्रभाकरकडे पहायला मिळाला होता. इंग्लंडच्या हवामानात इरफानचा स्विंग चालला असता असं मला वाटलं.

झहीरदेखील एका बॅडपॅच मधून बाहेर येऊन आज मुख्य गोलंदाज बनला आहे. दोघंही क्विक लर्नर आहेत. इरफानला संघात घेतल्यास त्याचा आत्मविश्वास लवकर परत येऊ शकतो. इंग्लंडच्या हवामानात कमी वेगाने चेंडू टाकल्यास तो जास्त स्विंग होतोय. प्रवीणकुमारची बॉलिंग पाहील्यास हे लक्षात येईल.

<< प्रवीणकुमारची बॉलिंग पाहील्यास हे लक्षात येईल. >>प्रविणकुमारचं टप्पा व स्विंग वरचं नियंत्रण हे त्याला इंग्लंडमधे यश मिळावून देतंय ; तो 'गूड लेंग्थ' सहसा सोडत नाही व त्यामुळे फलंदाजाना प्रत्येक चेंडू जपूनच खेळावा लागतो. इर्फान नेमका इथंच कमी पडत असावा असं आपलं मला वाटतं.
भारत २२३ -४. तरूण पण अनुभवी फलंदाज जबाबदारीने मोठी इनींग खेळण्याच्या संधिची वाट पहात असतात व ती योग्य वेळीं मिळाली तर त्या संधीचं ते सोनं करतात, हेच युवी दाखवत आहे !

स्वरुप | 30 July, 2011 - 12:56
आजचा दिवस परत एकदा द्रवीडचा असणार आहे

>> बोला था ना!
हॅट्स ऑफ जॅमी Happy

इर्फान नेमका इथंच कमी पडत असावा असं आपलं मला वाटतं.

भाऊ

इरफान जेव्हा निव्वळ गोलंदाजी करत होता तेव्हा मस्त चाललं होतं सगळं. पण अष्टपैलू खेळाडूंबाबत चर्चा सुरू झाली आणि इरफानमधे ते गुण असल्याचं सगळ्यांना दिसायला लागलं. त्याची बॅटींग चांगली झाली. काही काळ त्याने इनिंग ओपनही केली. त्या वेळी तो बॅटींगवर बरीच मेहनत घेत होता.

त्याआधी जेव्हा जेव्हा तो परदेश दौ-यावर गेला तेव्हा तेव्हा त्याने तिथल्या आजी माजी खेळाडूंकडून टीप्स घेतल्या. त्या अंमलातही आणल्या. त्याचे जसे फायदे झाले तसेच तोटेही झाले. वेस्ट इंडीजमधे तो अँडी रॉबर्ट्सना भेटला. ही मंडळी फक्त वेग आणि वेगाची भुकेली. इरफानचं प्रमुख अस्त्र म्हणजे त्याचा स्विंग. यांनी त्याला बाऊंसर आणि वेगवान चेंडूंची दीक्षा दिली. एकवेळ तो मायकेल होल्डिंग किंवा कोर्टनी वॉल्शकडे गेला असता तर परवडलं असतं.

त्याचा खेळच बदलला. वेगामुळे स्विंग हरवला. अक्रम त्याला जीव तोडून सांगत होता. अक्रम हा असा गोलंदाज होता ज्याचा वेग कमी झाला तसतसा तो जास्त धोकादायक होत गेला. पुढे इरफानवर आलेली फलंदाजीची जबाबदारी आणि त्यातून गोलंदाजीकडे दुय्यम जबाबदारी म्हणून पाहील्याने त्याच्या कारकिर्दीवर परिणाम झाला.

स्विंग गेला आणि वेगही कमी झाला. तो प्रेडिक्टेबल होत गेला.

आता एका मोठ्या ब्रेकनंतर इंग्लंड दौरा ही पुनरागमनाची सर्वात चांगली संधी होती. भारताला त्याचा निश्चितच फायदा झाला असता. द्रवीड आणि लक्ष्मण गेल्यावर ज्या पद्धतीने भारतीय डाव संपतोय ते पाहता शेपटाकडून प्रतिकार होण्यासाठी इरफानसारखे खेळाडू हवेतच. भज्जीच्या जागेवर तरी किमान घ्यायला हवं होतं.

हॉटस्पॉट अधिक चन्गला प्रकार आहे असे वाटते.
पण इंग्लंडच्या मते नाही. कारण त्यांच्या मते लक्ष्मण बाद होता, पण हॉटस्पॉटने नाही सांगितले. आता डी आर एस, हॉटस्पॉट, आणि मैदानावर असलेल्या काही पंचांवर सुद्धा कुणाचा विश्वास नाही!!

मला वाटते, दोन्ही बाजूंच्या कप्तानांनी वाटाघाटी करून ठरवावे. मग राजकारणी जसे सौदे करतात तसे होतील. तुम्ही आम्हाला लक्ष्मण द्या, आम्ही तुम्हाला अँडरसन व ब्रेस्नन देऊ.

ट्रॉट जखमी. सिरीज मिस करणार?

अनिल झहीरने काउंटी खेळून स्वतःला सिद्ध केलं होतं. इरफानला भारतीय डोमेस्टिक क्रिकेटमध्येही विकेट्स मिळत नाहीत, अशात कोणत्या आधारावर त्याला भारतीय कसोटी संघात घ्यायची चैन परवडणार?

सचिन काल मी थोडा पाहिला तेव्हा त्याने आक्रमक सुरूवात केली होती. असा खेळून लौकर आउट झाला तर काहीच प्रॉब्लेम नाही. काल नाहीतर दुसर्‍या डावात खेळेल तो. पण जरा टेन्शन मधे दिसतो हे खरे. २००७ मधे बर्‍याच वेळा तो शतकाआधी आउट झाला तेव्हा ८०-९० च्या पुढे गेल्यावर त्याचे जसे व्हायचे तसे होत असावे आत्ता.

द्रविडला पुन्हा सलाम! जमैका, लॉर्ड्स आणि आता. तीन जबरी शतके. वर्गणी कोण काढणार असेल तर मी द्यायला तयार आहे Happy

इरफान बहुतेक चॅपेलच्या त्याला ऑलराउंडर करण्याच्या प्रयत्नात संघाबाहेर गेला. पण नुकत्याच एका मुलाखतीत त्याने आता मी पुन्हा बोलिंग वर फोकस करत असून पुन्हा संघात यायला रेडी आहे असे सांगितले. विचार करायला पाहिजे त्याचा नंतरच्या वन डे सिरीज मधे.

<< आपलं शेपूट गुंडाळायला जलदगती व त्यांचं शेपूट गुंडाळायला चांगली फिरकी गोलंदाजी , असा कदाचित हमखास फॉर्मुला असावा !! >> माझा हा अंदाजी फॉर्म्युला आतां सिद्धांत होऊं पहातो आहे !आपल्या शेवटच्या ५ खेळाडूना ब्रॉडने १५ धांवांत गुंडाळलं !
सोनवणेजी, आपलं इर्फानबद्दलचं विश्लेषण एकदम मान्य पण तेंच त्याला संघात न घेण्याचंही समर्थन होऊं शकतं, असं नाही वाटत ? उमदा खेळाडू असूनही आपलं शक्तीस्थळ काय आहे हे न समजून घेतां प्रयोग करत बसणं त्याला भोवलं आहे. त्या उलट, प्रविणकुमारनं आपल्या मर्यादा व खुबी ओळखून आपली गोलंदाजी विकसित केली याची फळं त्याला मिळताहेत. शिवाय, इर्फानवर कायमचा काट थोडाच मारला आहे !

Pages