भारत वि. इंग्लंड - २०११ -

Submitted by नंद्या on 3 July, 2011 - 22:15

England v India 2011

इथे या मालिकेसंदर्भात चर्चा करूयात.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

योग मूळात एखादा खेळाडू जर अमूक क्रमांकावर खेळायला मानसिकरित्या तयार नसेल तर त्याचा २००० च्या आधीचा लक्ष्मण होतो हे लक्षात घे. तेंव्हा सचिनला पुढे ढकलून settled line up हलवण्यामधे काहीच अर्थ नाहि. जर हा पहिलाच सामना नसून आपण ३-० वगैरे असतो तर असा drastic approach समजू शकतो. पण एकाच मॅचवर आधारीत असा निर्णय मला तरी reactive वाटतोय. युवराजल accommodate करताना गंभीरला बाहेर आणणे हा "रोग नको पण इलाज आवर" प्रकार होण्याचे जास्त chances आहेत. युवीकडे test temperament नाहि असे माझे मत आहे. त्याचे improved version सुद्धा टेस्ट्साठी fit नाहि IMHO. त्याला घ्यायचाच असेल तर हरभजनच्या ऐवजी घ्यावे Happy

वर भाऊंनी म्हटलय तसे मला तरी क्रमांक १ हे आपल्या हरण्याचे मुख्य कारण वाटते. नीट बघितले तर 200 च्या margin ने हरलो. peterson चे दोनशे बाजूला केले तर बाकीच्या poms नि आपले stats ह्यात मुख्य फरक आपण starts convert न केल्याचा आहे. झहीर अतिशय अयोग्य वेळी बाहेर गेला हा दुर्दैवाचा भाग. We looked rusty all over and that made big difference.

>>> या मॅचमधून मला वाटलेल्या +ve गोष्टी

द्रविडचे शतक, धोनीच्या ऐवजी त्याने केलेले यष्टीरक्षण आणि गरज असल्यावर सलामीला येऊन बर्‍यापैकी केलेल्या धावा ह्या सुध्दा +ve गोष्टी आहेत. कोणत्याही रोलसाठी तो तयार आहे हे अतिशय महत्वाचे आहे. गंभीर खेळणार नसेल सचिनच्या ऐवजी द्रविडच सलामीला योग्य. तो पूर्वीही पाकिस्तानविरूध्द सलामीला आला होता व विरूबरोबर पहिल्या विकेटसाठी तब्बल ४१० धावांची भागीदारी केली होती.

भाऊरावांच्या १, २ व ४ या मुद्द्यांशी सहमत. ३ रा मुद्दा पटला नाही. सचिन, लक्ष्मण व द्रविड यापैकी फक्त दोघेच खेळले तर खूपच तोटा होईल. सचिनच्या फिटनेसचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. फक्त या सामन्यात तिसर्‍या दिवशी त्याला ताप आल्याने पंचाईत झाली. पहिल्या डावात तो अतिशय सुंदर व सहज खेळत होता. फिटनेसचा खरा प्रॉब्लेम झहीरला आहे.

हरभजनला १-२ सामने बसवून त्याला झटका देण्याची गरज आहे.

<< ३ रा मुद्दा पटला नाही. सचिन, लक्ष्मण व द्रविड यापैकी फक्त दोघेच खेळले तर खूपच तोटा होईल. >> मास्तुरेजी, मला वाटतं माझ्या या मुद्द्याचं थोडं स्पष्टीकरण मी द्यायला हवं होतं; तीन अतिशय प्रथितयश व 'लीजंड' असलेले फलंदाज संघात असले कीं फलंदाजीतला समतोल ढळतो, कारण १] त्यांच्यावर नको तेवढं विसंबून रहाणं येतंच व २] आपले तथाकथित 'नवोदित' फलंदाज 'अंडर नाईंटीन'पासून आंतराष्ट्रीय स्तरावर विविध देशात, इंग्लंड धरून , बरीच वर्षं खेळलेले आहेत. नेमक्या अशावेळीच जबाबदारी घेण्यासाठीची खुमखूमी असते व ती त्यावेळींच त्यांच्यावर सोपवणं औचित्यपूर्ण व लाभदायक ठरतं [ आत्ताचं रैनाचंच उदाहरण बोलकं आहे]. याबाबतीत श्रीलंका व पाकिस्तान खूपच प्रयोगशील आहेत व त्याचा त्याना फायदाही झाला आहे. याशिवाय, असं करणं दूरदृष्टीचं तर आहेच ! आणि , मागेही मी मांडलेला मुद्दा म्हणजे असं केल्यानेच क्र.१ची मानसिकता आपल्या संघात रुजेल व फोफावेल.
मला सुचलेला हा एक विचार मांडावासा वाटला; हा कांही रामबाण उपाय नाही व सिद्धांत तर नाहीच नाही ! [ आणि, मुख्य म्हणजे असं होणारही नाही ! Wink ]

मास्तर, कोणत्याही रोलसाठी द्रवीड तयार असतो हे तो टीम मॅन असल्याचं द्योतक आहेच पण ती फक्त या सामन्यातून आलेली +ve गोष्ट नाही. ते त्यानं यापूर्वी बर्‍याच वेळेला दाखवलेलं आहे. त्या बाबतीत मी त्याला मानतो.

द्रविड ओपनिंग साठी सहमत. त्यामुळे नं ३ साठी दुसरा कोणीतरी तयार पण करता येइल. बर्‍याच वेळा द्रविडच त्याच्या बरोबर असेल Happy

धोनीने बरेच खुलासे आज केले आहेत. सचिन च्या तसे खेळण्याचे कारण तापच होता. दोनच बोलर्स असल्याने आपल्याला बोलिंग करावी लागली ई.ई.

मिल्या, गंभीर २००७च्या संघात होता, प्लेइंग इलेव्हन मध्ये नव्हता.

भारत ४ गोलंदाज घेऊन खेळतो हे नेहमीचंच आहे. पण इंग्लंडनेही चारच गोलंदाज
घ्यावेत? त्यांना स्वतःच्या गोलदाजीचा जास्त भरोसा आहे, की ७ फलंदाज घेण्यामागे भारतीय गोलंदाजीबद्दल भीती?

<< .. की ७ फलंदाज घेण्यामागे भारतीय गोलंदाजीबद्दल भीती? >> असलीच तर भारतीय फलंदाजीची भिती ! आपली गोलंदाजी तशी चांगली असली तरी भितीदायक नक्कीच नाही; पण, कामगिरीत चढ-उतार असले तरीही, फलंदाजी नक्कीच तशी आहे याबद्दल दुमत नसावं.

आगामी कसोटी साठी संघ असा हवा.........
१] गंभीर
२] मुकुंद
३] द्रविड(+ यष्टीरक्षक)
४] सचिन
५] लक्ष्मण
६] युवराज(+ डावखुरी गोलंदाज)
७] रैना(+कामचलाउ गोलंदाज)
८] श्रीशांत (गोलंदाज)
९] इशांत(गोलंदाज)
१०] प्रविण(गोलंदाज)
११] अमित मिश्रा(फिरकी गोलंदाज)
१२] धोनी ( नॉन प्लेअर कॅप्तान) (टेनिस प्रमाणे)

यात आपल्याला ७ फलंदाज तर मिळताच त्याच प्रमाणे ६ गोलंदाज देखील मिळतात.....ज्या मुळे एक गोलंदाज जरी जखमी झाला तरी ५ आहेतच........
धोनी चे फक्त नेतृत्व चांगले असल्याने त्याला न खेळवता बाहेरुन दिशा द्यावी........

Happy हा आपला सर्वात मजबुत संघ असेल................

>>> तीन अतिशय प्रथितयश व 'लीजंड' असलेले फलंदाज संघात असले कीं फलंदाजीतला समतोल ढळतो,

बरोबर आहे. पण हा प्रयोग ह्या मालिकेत तसेच बलाढ्य देशांविरूध्द करून फायदा नाही. विंडीज, बांगलादेश, झिंबाब्वे इ. देशांविरूध्द हा प्रयोग पूर्वी अनेकवेळा केलेला आहे. त्यातून फारसे चांगले नवीन खेळाडू मिळालेले नाहीत. जे नवीन खेळाडू (मुरली विजय, दिनेश कार्तिक, रविंद्र जडेजा, इ.) ह्या दुर्बल संघांविरूध्द अनेकवेळा संधी मिळूनसुध्दा चांगले खेळू शकत नाहीत, ते बलाढ्य देशांविरूध्द काय खेळणार?

असाम्या,
धोणी, भज्जी चे टेम्परामेंट तरी टेस्ट साठी कुठे योग्य आहे?
थोडक्यात, धोणी ला खेळवायलाच हवा त्यामूळे युवी ला संधी मिळणार नाही असे दिसते. सलामीच्या जोडीचा प्रश्ण खेरीज गोलंदाजी मधिल बोथट धार यामूळे दुसराही सामना आपल्याला बचावात्मक मानसिकतेत खेळावा लागेल असे मला वाटते--- अशा वेळी एकतर अनिर्णीत किंवा ईं चा विजय याच दोन शक्यता आहेत.

http://www.indianexpress.com/news/the-tweak-link/822944/0
इथे म्हटलंय की ट्रेंटब्रिजची खेळपट्टी जलदगत गोलंदाजांना धार्जिणी असल्याने हरभजनला बसवून पेसर्स खेळवावे.

रच्याकने लॉर्ड्सवरचा २००७ मधला सामना धोनीने वाचवला होता.

क्रिकइन्फो वरून घेतलेली भारताच्या परदेशातील मालिकांची २००१ पासूनची आकडेवारी (झिंबाब्वे व बांगला विरूध्दचे कसोटी सामने वगळून)

२००१ पासून आतापर्यंत भारत परदेशातल्या मालिकेतल्या पहिल्या कसोटीत ४ वेळा जिंकलेला आहे, ९ वेळा हरलेला आहे व ५ वेळा सामना अनिर्णित राहिलेला आहे.

पण मालिकेतल्या दुसर्‍या कसोटीत भारताने एकून ६ वेळा विजय मिळविलेला आहे, ४ वेळा पराभव झालेला आहे व ७ वेळा सामना अनिर्णित राहिलेला आहे.

मालिकेतल्या तिसर्‍या कसोटीत भारताने एकून ४ वेळा विजय मिळविलेला आहे, ६ वेळा पराभव झालेला आहे व ७ वेळा सामना अनिर्णित राहिलेला आहे.

म्हणजे परदेशातल्या मालिकेतला पहिला कसोटी सामना भारत बर्‍याचदा हरतो, दुसरा कसोटी सामना बर्‍याचदा जिंकतो किंवा सामना अनिर्णित राहतो, पण तिसरा कसोटी सामना भारत बर्‍याचदा हरतो किंवा सामना अनिर्णित राहतो.

परदेशातल्या मालिकेतील १ ल्या, २ र्‍या व ३ र्‍या कसोटीत प्रमुख भारतीय फलंदाजांची कामगिरी (२००१ पासून)

गंभीर -
परदेशातल्या मालिकेतील पहिल्या कसोटीतील सरासरी = ३४.२२ (एकूण ५ सामने)
परदेशातल्या मालिकेतील दुसर्‍या कसोटीतील सरासरी = ७०.७५ (एकूण २ सामने)
परदेशातल्या मालिकेतील तिसर्‍या कसोटीतील सरासरी = ७४.१६ (एकूण ३ सामने)

सेहवाग -
परदेशातल्या मालिकेतील पहिल्या कसोटीतील सरासरी = ५९.४२ (एकूण १२ सामने)
परदेशातल्या मालिकेतील दुसर्‍या कसोटीतील सरासरी = ५५.२६ (एकूण १२ सामने)
परदेशातल्या मालिकेतील तिसर्‍या कसोटीतील सरासरी = ३४.१५ (एकूण ११ सामने)

द्रविड -
परदेशातल्या मालिकेतील पहिल्या कसोटीतील सरासरी = ४७.५५ (एकूण १८ सामने)
परदेशातल्या मालिकेतील दुसर्‍या कसोटीतील सरासरी = ५१.२४ (एकूण १७ सामने)
परदेशातल्या मालिकेतील तिसर्‍या कसोटीतील सरासरी = ४९.०० (एकूण १५ सामने)

सचिन -
परदेशातल्या मालिकेतील पहिल्या कसोटीतील सरासरी = ५४.६३ (एकूण १५ सामने)
परदेशातल्या मालिकेतील दुसर्‍या कसोटीतील सरासरी = ४४.२० (एकूण १४ सामने)
परदेशातल्या मालिकेतील तिसर्‍या कसोटीतील सरासरी = ४२.१९ (एकूण १२ सामने)

लक्ष्मण -
परदेशातल्या मालिकेतील पहिल्या कसोटीतील सरासरी = ३५.१४ (एकूण १७ सामने)
परदेशातल्या मालिकेतील दुसर्‍या कसोटीतील सरासरी = ५९.६७ (एकूण १६ सामने)
परदेशातल्या मालिकेतील तिसर्‍या कसोटीतील सरासरी = ४७.३३ (एकूण १४ सामने)

हरभजन -
परदेशातल्या मालिकेतील पहिल्या कसोटीतील बळी = ३० (एकूण १४ सामने)
परदेशातल्या मालिकेतील दुसर्‍या कसोटीतील बळी = ५१ (एकूण १७ सामने)
परदेशातल्या मालिकेतील तिसर्‍या कसोटीतील बळी = ३९ (एकूण ८ सामने)

म्हणजे गंभीरची कामगिरी मालिकेत उत्तरोत्तर सुधारत जाते, सेहवागची ३ र्‍या सामन्यापासून व सचिनची २ र्‍या सामन्यापासून ढेपाळत जाते, द्रविडच्या कामगिरीत फरक पडत नाही व लक्ष्मणची कामगिरी कमीजास्त होत राहते. हरभजन मालिकेतल्या तिसर्‍या सामन्यापासून फॉर्मात येतो.

या आकडेवारीवरून असे वाटते की, भारत या मालिकेत दुसरा कसोटी सामना जिंकेल व तिसरा हरेल. चौथ्यात काय होईल ते सांगता येणार नाही, पण हरण्याचीच शक्यता जास्त.

इथे म्हटलंय की ट्रेंटब्रिजची खेळपट्टी जलदगत गोलंदाजांना धार्जिणी असल्याने हरभजनला बसवून पेसर्स खेळवावे.>> तसे नसेल तरि त्याला बसवावे असे मी म्हणतो Lol

अशा वेळी एकतर अनिर्णीत किंवा ईं चा विजय याच दोन शक्यता आहेत.>>असेच वाटतेय खरे. बाकी काहि नाहि eng सोकावणार Sad

>>अशा वेळी एकतर अनिर्णीत किंवा ईं चा विजय याच दोन शक्यता आहेत.>>असेच वाटतेय खरे. बाकी काहि नाहि eng सोकावणार
चुकून चमत्कार झाला, पहिली फलंदाजी आली, दमदार सलामी मिळाली तर मग साहेब, अण्णा, अप्पा त्रिकूट धावांचा डोंगर ऊभारू शकतात. मग अचानक आपली गोलंदाजी धारदार वाटायलाही लागेल. पुन्हा एकदा सामन्याचा पहिला दिवस ऊर्वरीत सामन्याची दिशा ठरवेल असे वाटते.

काय मास्तरा? आयला बराच वेळ घालवलेला दिसतोय आकडे काढण्यात!
उद्याचा सामना अनिर्णित ठेवला तरी मला आनंद होईल. Proud

आतां गंभीरच्या तंदुरूस्तीबद्दलही शंका आहे असं वाचलं. तसं झालंच तर लक्ष्मण व युवी दोघेही आंत व भज्जी ऐवजी मिश्रा !

>>> उद्याचा सामना अनिर्णित ठेवला तरी मला आनंद होईल.

क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या संघावर, आपण सामना हरलो नाही, यातच आनंद मानायची वेळ आलेली आहे.

आपण ही मालिका ०-१ (किंवा १-२) अशी हरू असा माझा मालिका सुरू होण्यापूर्वीचा अंदाज होता. हा अंदाज खरा ठरणार बहुतेक. कदाचित ही मालिका आपण ०-२ किंवा ०-३ अशी हरण्याची शक्यता सुध्दा नाकारता येईलच असे नाही.

नॉन-प्लेयिंग कॅप्टन (टेनिसप्रमाणे) वगैरे बोलण्यापुरतं छान-छान आहे पण क्रिकेटसारख्या खेळात तुमचा कॅप्टन मैदानाबाहेर असून चालत नाही.. काही निर्णय हे ऑन-फील्ड तातडीनं घ्यावे लागतात तसंच खेळाडूंना मोटिव्हेट तुम्ही बाहेर बसून करू शकत नाही. मैदानावर खेळाडूंसोबत कॅप्टन असणं अत्यंत गरजेचं आहे. टेनिस हा टीम स्पोर्ट नाहीच मुळात. त्यामुळे तिथं नॉन-प्लेयिंग कॅप्टन वगैरे ठीक आहे. उगा काहीच्या काही संबंध जोडून मोकळं होऊ नये.. धोनीचं टेम्परामेंट नाही टेस्टच्या लायकीचं पण त्याच्या तोडीस तोड कर्णधार सध्याच्या १४ मधून निवडणं कठीण आहे. पण जिथं सगळ्या जगाचाच टेस्ट क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतोय त्यात धोनीही फिट व्हावा.

मास्तुरेंचा आकड्यांचा खेळ इंटरेस्टिंग आहे! मागल्या वेळेला आपण ट्रेंटब्रिज कसोटी जिंकली होती मात्र त्यात झहीरनं ९ तर कुंबळेनं ७ विकेट्स घेतल्या होत्या! झहीर नावाचा वाघ उपलब्ध नसल्यानं उरलेल्या पिल्लांपैकी एकाने तरी निदान डरकाळी फोडावी तर काहीतरी होईल.. श्रीशांतच्या परफॉर्मन्सवर सगळं काही अवलंबून राहील असं वाटतं. आपली बॅटिंग नक्की सुधारणार पण.

>>> झहीर नावाचा वाघ उपलब्ध नसल्यानं उरलेल्या पिल्लांपैकी एकाने तरी निदान डरकाळी फोडावी तर काहीतरी होईल..

२ र्‍या कसोटीसाठी झहीर व गंभीर जखमी असल्याने बाहेर आहेत. रूद्र प्रताप सिंगला बोलावले असल्याचे ऐकले. युवराज नक्की आत येईल. झहीरच्या ऐवजी मुनाफ किंवा स्रिसंथ असे पर्याय आहेत. भज्जीला काढून मिश्राला घ्यावे. एक जुगार म्हणून एकही फिरकी गोलंदाज न खेळवता इशांत, प्रवीण कुमार, स्रिसंथ व मुनाफ या चौघांनाही खेळवावे. अगदीच फिरकी टाकायची वेळ आली तर युवराज व रैना आहेतच.

रच्याकने लॉर्ड्सवरचा २००७ मधला सामना धोनीने वाचवला होता. >>> भरत अर्धसत्य बोललात Happy ९/२८२ वर अपुरा प्रकाश आणि पावसामुळे खेळ थांबवावा लागला आणि ३५+ षटकांचा खेळ वाया गेला... नाहीतर धोनी पण काही करू शकला नसता.. हरलोच असतो..

तात्पर्य काय मागच्यावेळी पण पहिल्या कसोटीत आपण खराब खेळलो होतो पण दुसरी जिंकली होती.. पण ह्यावेळी झहीर आणि कुंबळे नाहीत Sad

तरी हरकत नाही इशांत च्या त्या स्पेलवर मदार ठेवून आपण निदान ही मॅच हरणार नाही असे वाटते Happy

माझे भाकित अनिर्णित किंवा आपला विजय Happy

भारताचा १९३२ मध्ये इंग्लंडच्या दौर्‍यावर गेलेला पहिला कसोटी संघ (कर्णधार - सी के नायडू - डावीकडून ६ वे; इंग्लंडचा कर्णधार डग्लस जार्डिन होता.). हा सामना लॉर्डसवर खेळला गेला होता. मागे बहुतेक लॉर्डसच्या प्रसिध्द गॅलर्‍या आहेत. ह्या सामन्यात भारताच्या अमरसिंग व महमंद निस्सार ह्यांनी जबरदस्त वेगवान गोलंदाजी करून खळबळ माजविली होती. पण हा सामना भारत १५८ धावांनी हरला.

cricket_1932_20110801.jpg

मास्तुरेजी, सी.के. माझ्या वडिलांचा हिरो होता; त्यामुळे मीं अगदीं लहान असताना होळकर वि. मुंबई सामना पहायला त्यांच्याबरोबर जायचा योग नशीबात होता. सी.कें. एक शांत पण जबरदस्त व्यक्तीमत्व होतं. त्यानी जमीनीला जवळ जवळ समांतर जाऊन साईटस्क्रीनवर मारलेला छक्का आजही मला आठवतो व मला भारावून सोडतो कारण आपले वडिलही लहान मुलासारखे नाचूं शकतात हे त्या क्षणीं मला प्रथमच उमगलं होतं; त्या काळात तें दुर्मिळ होतं ! म्हणूनच फोटोबद्दल खास धन्यवाद. [ विषयांतराबद्दल क्षमस्व.]

भाऊराव,

ही किती वर्षांपूर्वीची गोष्ट आहे? १९३२ ला आता जवळपास ७९ वर्षे होतील. सी के नायडू फारतर १९४० पर्यंत खेळले असावेत.

मी याआधीच्या प्रतिसादात भारताच्या परदेशातल्या मालिकेतील पहिल्या ३ कसोटी सामन्यांची आकडेवारी दिलेली आहे. परदेशातल्या बहुतेक मालिका जास्तीतजास्त ३ सामन्यांच्या असतात. क्वचित ४ किंवा ५ सामन्यांच्या होतात.

परदेशातल्या काही मालिकेतील भारताची ४ थ्या सामन्यातील कामगिरी -

(१) १९७६ वि वेस्ट इंडीज - भारताचा पराभव (शरीरवेधी गोलंदाजीने गाजलेला हाच तो सामना)
(२) १९७७ वि ऑस्ट्रेलिया - भारताचा विजय
(३) १९८२ वि पाकिस्तान - भारताचा पराभव
(४) १९८३ वि वेस्ट इंडिज - भारताचा पराभव
(५) १९८९ वि पाकिस्तान - सामना अनिर्णित
(६) १९९२ वि ऑस्ट्रेलिया - भारताचा पराभव
(७) १९९३ वि द आफ्रिका - सामना अनिर्णित
(८) २००२ वि इंग्लंड - सामना अनिर्णित
(९) २००३ वि ऑस्ट्रेलिया - सामना अनिर्णित
(१०) २००७ वि इंग्लंड - सामना अनिर्णित
(११) २००७ वि ऑस्ट्रेलिया - सामना अनिर्णित

म्हणजे १ अपवाद वगळता परदेशातल्या मालिकेतल्या ४ थ्या सामन्यात भारताचा पराभव होतो किंवा तो सामना अनिर्णित राहतो.

इतिहासाचा आधार घेतला तर (१) या मालिकेतला १ ला सामना भारताने हरून इतिहासाची पुनरावृत्ती केलेली आहे, (२) २ रा सामना भारत जिंकेल, (३) ३ रा सामना भारत हरेल आणि (४) ४ था सामना अनिर्णित राहील. Biggrin

आपली लोकं इतिहासातून काहीच धडा का घेत नसावेत बरे.... नुसताच इतिहास वाचतात, तो वाचून तसे होऊ नये म्हणून काहीव करत नाहीत... श्या.. अगदीच पालथ्या घडावर पाणी..

>> क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या संघावर, आपण सामना हरलो नाही, यातच आनंद मानायची वेळ आलेली आहे.

तसं नाहीये मास्तर! पहिल्या मॅचमधे सपाटून हरल्यावर दुसर्‍या मॅचमधे लगेच जिंकण्याइतका चांगला खेळ सहसा होत नाही. त्यामुळे पहिली पायरी ड्रॉची आणि त्यापुढे जिंकण्याचा विचार करता येईल. आता ही मॅच पण हरलो तर गोष्ट वेगळी आहे. मला अजूनही सीरीज ड्रॉ होईल किंवा आपण २-१ अशी जिंकू असं वाटतंय.

भारताने यापुढे इंग्लंड सिरीज मधे पहिली मॅच इतरत्र कोठेतरी होईल असे ठरवून घेतले पाहिजे. दुसरी किंवा पुढची टेस्ट लॉर्ड्सवर घ्यावी (यावेळच्या लंका सिरीज चे तसे होते). त्याशिवाय लॉर्डसवरची कामगिरी सुधारणार नाही. कारण यापुढे आयपीएल वगैरे मुळे भारत दोन तीन आठवडे आधी इंग्लंड मधे जाऊन दोन तीन फर्स्ट क्लास मॅचेस खेळला आहे असे कधी होणार नाही.

Pages