भारत वि. इंग्लंड - २०११ -

Submitted by नंद्या on 3 July, 2011 - 22:15

England v India 2011

इथे या मालिकेसंदर्भात चर्चा करूयात.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> अरे हा कसोटी क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासातला २००० वा सामना आहे
ओके ओके. चुकलं. थॅन्क्स मास्तर!

सेहवाग इंग्लंडला गेलाय? >> जाणार आहे ना दोन tests नंतर ?

चिमण प्रश्न Lords च्या माह्त्म्याचा आहे रे. एक जुने मैदान ह्यापलीकडे त्यात इतर काही नाहि तेंव्हा तिथे शतक केले किंवा नाहि केले ह्याला फारशी किंमत नसावी असे माझे मत.

>> लॉर्डसवर दरवर्षी सरासरी २ या हिशेबाने गेल्या १२५ वर्षात फारतर २५० सामने झाले असतील.

लॉर्ड्सवर आजवर सर्वाधिक कसोटी सामने झालेत - १२२. भारत-इंग्लंड दरम्यानची कसोटी ही लॉर्ड्सवरची १२३वी कसोटी आहे. आणि याबाबतीत ईडनच काय इतर कोणत्याही मैदानाची लॉर्ड्ससोबत तुलना होऊ शकत नाही. लॉर्ड्सनंतर नंबर लागतो एमसीजी (१०३), एससीजी (९९), ओव्हल (९३) आणि ओल्ड ट्रॅफर्ड (७४) यांचा! भारतात सर्वाधिक सामने ईडन गार्डन्सवर झालेत. किती? ३६!

मुद्दा लॉर्ड्सच्या माहात्म्याचा आहे हे जाणतो पण आकडेवारी देणं राहावलं नाही! Lol

पण लॉर्डस या ग्राउंड बद्दल बोलणं चाललेलं आहे त्याच्या ध्रुवगिरी किंवा आवाजाबद्दल नाही.>> आणि म्हणूनच गावश्याचे शतक मध्ये यायला नाही पाहिजे. तिथून सुरूवात झाली. Happy

परत एकदा एखाद्या ग्राउंड वर किती सामने झाले म्हणजे ते ग्राउंड महान वगैरे ठरते का? त्याला एके ठिकाणी उतार, पिच, इ इ सर्व त्यात गावस्करने घेऊन तुलना केली आहे. लॉर्डस वर जास्त कसोट्या होणारच. गेमच त्यांनी इन्वेंट केला आहे.

त्याचे महात्म्य वगैरे ठिक. केवळ ग्राउंड आणि सुविधा ह्यांची तुलना गावस्करने केली. पण कदाचित तो तज्ज्ञ नसावा Wink आपण ग्राउंडमनना विचारायला पाहिजे. असो.

मलाही लॉर्ड्सचे खूप महत्त्व वाटते. पूर्वी एमसीसी म्हणजे क्रिकेट मधले सर्वात महत्त्वाचे प्रेक्षक समजले जात तेव्हा तेथे मारलेले शतकही तेवढे महत्त्वाचे वाटणे साहजिक आहे. त्यात बरीच वर्षे असलेला ब्रिटिशांचा एकूण दराराही त्यात आला.

पण लॉर्ड्स वर किंवा कोणत्याही जास्त मॅचेस होणे यात काहीच विशेष नाही. आज जगात सर्वात जास्त क्रिकेट ग्राउण्ड्स भारतात आहेत. इंग्लंड मधे आत्तापर्यंत फक्त ६ कसोटी ग्राउण्ड्स होती (लॉर्ड्स, ओल्ड ट्रॅफर्ड, ट्रेन्ट ब्रिज, एजबस्टन, हेडिन्ग्ले आणि ओव्हल), ऑस्ट्रेलिया, विंडीज, न्यू.झी. पाक येथेही. त्यामानाने भारतात किमान १५-२० कसोटी व ३०-४० वन डे साठी वापरली जाणारी ग्राउण्ड्स आहेत. त्यामुळे प्रत्येकाला मॅच मिळणे यात बरीच रस्सीखेच चालू असते.

भारतात इडन, चेपॉक, वानखेडे, मोहाली या मैदानांना दरवर्षी एक दोन सामने खरे म्हणजे मिळालेच पाहिजेत, तेथील (कलकत्ता, चेन्नै, मुंबई) प्रेक्षकही कसोटीला आवर्जून येणारे आहेत. पण तसे मिळत नाही. उगाच कोठेतरी मोकळ्या मैदानात खेळवत बसतात.

>>> मास्तुरेजी, लिहीण्याच्या ओघात चूक झाली. क्षमस्व.

भाऊसाहेब, लाजवू नका. Biggrin

सेहवाग नसल्याची आपल्याला कसोटी सामन्यात खूप उणीव जाणवेल. धावांचा कितीही मोठा डोंगर पार करायचा असला तरी, सेहवाग आपल्या अत्यंत वेगवान व स्फोटक फलंदाजीने त्याचे दडपण नाहीसे करतो. त्याची फलंदाजी बघायला खूप मजा येते. ४ थ्या डावात धावांचा पाठलाग करायचा असेल तर, सचिन, लक्ष्मण, द्रविड इ. नांगर टाकून खेळतात. अशा वेळी सेहवाग पाहिजेच.

थोड्या वेळापूर्वीच स्टार वर सिग्नेचर सौरव म्हणून एक सिरीज चालू आहे त्यात गांगुली च्या पदार्पणातील लॉर्ड्सच्या शतकाबद्दल त्याची मुलाखत आणि त्या सिरीजमधले काही हायलाईट्स दाखवले. सुंदर मुलाखत होती. एप्रिलमधे सुरू होणार्‍या इंग्लिश दौर्‍यात चार स्पिनर घेउन जाणे वगैरे निवडसमितीचे अचाट पणे, (गांगुलीच्याच शब्दात) भारतात पाटा पिचेस वर भेदक बोलिंग करणारा पारस म्हांब्रे इंग्लंड मधल्या स्प्रिंग मधल्या अत्यंत सुटेबल वातावरणात फेल गेला त्याचे आश्चर्य, सचिन, द्रविड आणि स्वतःची त्या दौर्‍यातील बॅटिंग, पहिले शतक झाल्यावर नक्की कसे रिअ‍ॅक्ट करायचे न कळणे, आदल्या दिवशी थोडे रन्स झाल्यावर दिवसाचा खेळ संपल्यावर सेंट जॉन्स वूड, बेकर स्ट्रीट वर फिरून मॅकडी मधे बर्गर खाणे वगैरे बद्दल खूप चांगली माहिती दिली त्याने.

>> चिमण प्रश्न Lords च्या माह्त्म्याचा आहे रे. एक जुने मैदान ह्यापलीकडे त्यात इतर काही नाहि तेंव्हा तिथे शतक केले किंवा नाहि केले ह्याला फारशी किंमत नसावी असे माझे मत.

मी महात्म्याबद्दल पण नाही बोलत आहे. मी क्रिकेट प्रेमी असूनही मला स्वतःला कुठल्याही क्रिकेट ग्राउंडचं फारसं कौतुक नाही. पुण्यातलं नेहरू स्टेडियम सोडता मी इतर कुठलंही पाहिलेलं नाही. लॉर्डसच्या फॅसिलिटिज नक्कीच भिकार असतील. पण लॉर्डसच्या ग्राउंडची प्रचंड हवा बर्‍याच लोकांनी वर्षानुवर्ष केलेली आहे आणि अजूनही करतात. इथले क्रिकेट वीर लॉर्डसच्या खेळपट्टीबद्दल आणि मैदानाच्या उताराबद्दल शिव्या घालतात पण त्याच्या क्रिकेटमधल्या स्थानाबद्दल सगळ्यांचं एकमत आहे. ज्या माणसाने गावभर शतकं मारली त्या गावश्याला त्याची सेंचुरी तिथे झाली नाही याचा विषाद नक्किच असणार, तो ते सहज मान्य करत नाहीये असं मला वाटतं. हे टेनिसच्या सगळ्या ग्रँडस्लॅम जिंकल्या पण विंबल्डन मधे नाही जमलं म्हणून विंबल्डन पेक्षा बेंगलोर मधलं जास्त चांगलं आहे असं म्हणण्यातला प्रकार झाला.

>> सेहवाग नसल्याची आपल्याला कसोटी सामन्यात खूप उणीव जाणवेल.
टेस्ट मॅच मधे नाही पण वनडे मधे भासेल. माझा सेहवागवर तितकासा विश्वास नाही. तो जास्त भरोश्याच्या म्हशीला कॅटेगरीतला आहे. त्याचं इंग्लंडमधलं रेकॉर्ड पण फारसं चांगलं नाही. तो जास्त करून पाटा विकेट किंग आहे. (आता लगेच खूप स्टॅट्स येतीलच Proud मला फक्त एकच मॅच आठवतेय न्यूझिलंड मधली जिथे त्यानं सेंचुरी मारली होती आणि ते पिच स्विंग बोलिंगचं नंदनवन होतं. पण एक्सेपशन प्रुव्हस द रुल. ) पण हे माझं मत आहे. आता खुद्द चॅपेलनं पण सेहवाग नसणे याची उणीव भासेल असं म्हंटलं आहे. आणि चॅपेल माझ्यापेक्षा जास्त क्रिकेट खेळला आहे पण म्हणून काय झालं? आयाम एन्टायटल्ट टू माय ओन मत, डोन्ट्यु थिंक?

<< आयाम एन्टायटल्ट टू माय ओन मत, डोन्ट्यु थिंक? >> चिमणजी, सेहवागच्या शैलीची फलंदाजी इंग्लंडच्या हवामानातील स्विंग गोलंदाजीसमोर बहरणं खूपच कठीण असावं, असं मलाही वाटतं.
[तो असेल चॅपेल, म्हणून आम्ही काय लेचेपेचे कीं काय ? माबोच्या खतरनाक खेळपट्टीवर काय आम्ही उगीचच करतोय इतकी फलंदाजी !! Wink ]

जो पहीली फलंदाजी करेल तो ३०० पर्यन्त तरी नक्कीच जाउ शकेल....विकेट दुसर्या दिवशी सुध्दा स्विंग करत राही ली तर दुसरा डाव २५० च्या आतच आटपेल...आणि शेवट्च्या दिवशी २५०-३०० चे लक्ष्य असेल..........

बघु..............................

बाकीच्यांचे काय अंदाज आहे ????????????????????????

टॉस जिंकून त्यांना बॅटिंग दिली! मला दुसर्‍यांची बॅटिंग बघायला अजिबात आवडत नाही (विकेटा पडत नसतील तर). धोन्याची पहिली सर्प्राईज मूव्ह ती हीच की काय?

हा हे ठीक आहे वाटते............... Happy एक तर अधिच उशीर झाला आहे त्यात तुम्ही लंच पर्यत लक्ष्य देतात.. जास्तच होत होते......... Happy

अरे श्रिलंकेने पण इंग्लंडचे फटाफट ३ आउट केले होते रिसेंटली पण पुढे त्यांना जमलं नाही.

आणि फिल्डींग घेतली ते चांगल केलं असं मला पण वाटतंय. आत्ता इथे चांगलंच ढगाळ आहे.

अरे श्रीशांत ला नाही घेतले...............४ जलदगती घेतले असते तरी चालले असते ....................

तू लाव पैसे मला त्यांच्यातल्या कुणिच ५० च्या वर करायला नहोयत. Proud

Pages