माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हळद, मीठ, तिखट, थोडी मोहरीची डाळ वगैरे वापरून केलेल्या लोणच्याला अगदी टिकावू करायचे असेल तर तेल घालायलाच हवे असे नाही. पण घालायचेच असेल तर फोडाणी करुन अगदी थंड करून घालायची.

लिंबाचे बिनतेलाचे लोणचे पण करता येते. तेलाचे लोणचे जरा कडवट लागते. बिनतेलाचे तसे लागत नाही, हा माझा अनुभव.

बिनतेलाचं लोणचं करायचं असेल तर ते गोड करावं लागत असेल ना? Uhoh
मी करते ते संपुर्ण गोड करते. बिनतेलाचं तिखट लोणचं कसं करायचं? Uhoh

तयार पॅक चा केक केला पण तो मधुन खूप फुगला आणि बाजूनं नाही असं का झालं असेल? त्यावरच्या सूचने नुसार सगळ केल होतं . ओव्हन मधे टेम्परेचर सगळ्या बाजून मिळालं नसेल का? सगळ्यात वरच्या रॅक वर ठेवला होता केक.

तोषवी, मला वाटतंय मधल्या रॅकवर ठेवलं नसल्यामुळेच झालं असेल किंवा सगळीकडून नीट फेटलं होतं का मिश्रण?

काल फिंगर चिप्स बनवल्या. बटाटे चिरून तळल्यावर छान सोनेरी रंगही आला, पण एकदम मऊ पडल्या. अगदी लोळागोळा झाल्या होत्या. नेहमी मी बटाटे चिरल्यावर मीठाच्या उकळत्या पाण्यात दोन मिनिटे घालून ठेवते आणि मग तळते. चांगल्या कुरकुरीत होतात. यावेळी ती स्टेप गाळली होती. त्यामुळे, मऊ पडल्या असतील का?

हो बरोबर. जर ती स्टेप विसरली असेल , तर दोनदा फ्राय करायचे. म्हणजे पहिल्यांदा तळताना दोन तीन मिंट तळायचे व बाहेर काढायचे जरी ते शिजले गेले नसले तरी ही. मग दुसर्यांदा तळायचे, तेंव्हा ते शिजतात पण, त्यांना सोनेरी रंग पण येतो आणी क्रिस्पी पण होतात.

दुसर्यांदा तळताना त्यावर थोडं corn flour टाकायचे.

आज नविन आणलेले तान्दुळ वापरुन इडलि केलि. पिठ खूप छान फुगले होते. पण इडलि अजिबात शिजलि नाहि. २० मिनिट वाफवलि तर सगळे पिठ पात्रात खालि बसुन गेले होते आणि बर्‍याच वेळ थन्ड केल्यावर जरा इडलि बनलि पण खुप चिकट लागते आहे. डोसे बनवले तर मस्त बनत आहेत. मी १ कप उडिद डाळ, २ कप बासमती तान्दुळ,१ चमचा मेथि दाणे घेतले होते. काय चुकले असेल?

दिनेशदा, पिठ चान्गले ढवळुन घेतले होते. वाफ सुद्धा चान्गलि होति असे वाटते. कारण पहिल्यान्दा इड्ली कुकर मधे ट्राय केल्या थोडि वाफ बाहेर जात होति पण कुकरच्या शिटि चा आवाज येत होता आणि त्यात नाहि जमल्या तर नेहेमिच्या प्रेशर कुकर मधे शिटि न लावता ट्राय केल्या तरिहि नाहि जमल्या.
प्राची मी आधि बासमती तान्दुळ वापरुन नाहि केल्या इडल्या. बासमती तान्दुळ चालत नाहि हे महिती नव्हते इडल्याना. Sad

मी रवीवारी बीटच्या पाण्यात ( म्हणजे नुसत पाणी, बीटची प्युरी नाही ) काळा गुळ विरघळून घेतला , आणि त्या पाण्यात गव्हाचे पिठ पुरीला भिजवतात त्याप्रमाणे भिजवले. काही वेळाने पातळ पोळी लाटून शंकरपाळ्या केल्या. शिवाय त्या कुरकुरीत व्हाव्या म्हणून त्यावर चमच्याने टोचा देखील मारल्या. गरम तेलात तळल्या. टोपल्यात काढून थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवल्या. त्या दिवशी चांगल्या कुरकुरीत राहिल्या पण दुसर्‍या दिवशी चिवट झाल्या. काय चुकल असेल ?

जुयी
डबा हवाबंद नव्हता का ?
अगदी कुरकुरीत हव्या असतील तर तळण्यापुर्वी थोडा वेळ तशाच पसरुन ठेवायच्या.
जरा सुकल्या कि तळायच्या.

आज बरेच दीवसांनी आणि हौसेने उकडी चे मोदक केले (करायला घेतले) - फाफ देई पर्यंत सगळं ठीक (छानच) चालंल होतं. पण मग वाफ देउन उघडुन पाहाते तर सर्व मोदक गळुन (वीतळून) गोळा झाले होते - माझं काय चुकल???????? Sad

काल मलईकोफ्ते करणार होते. नेहमी प्रमाणे भाज्या,पनीर, बटाटे घालून कोफ्ते केले आणी कॉर्नस्टार्च मध्ये घोळवुन तळले तर तेलात सोडल्यावर झार्‍याने हलवताना सगळे तुटले (अगदी कुचकरल्यावर होतील असा चुरा झाला )
माझ काय चुकल असेल??

हो दिनेशदा असही असेल कदाचित.. किंवा जास्त वेळ बाहेर राहिले असेल. तेल एकदम जास्त गरम झाल्यावरच तळायचे का ?
पुर्ण गार झाल्यावरच डब्यात भरून ठेवायचे ना...
बर झाल मी कमी प्रमाणात केलेले. पुढच्या वेळी नक्की लक्षात ठेवीन. Happy

ओह............. मी कॉर्नस्टार्च कमी लावल मला वाटल ते तेलात पसरेल Sad

Pages