माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल चॉकलेट फज ट्राय केले.

१/२ कप कुकींग चॉकलेट
२०० ग्रॅम कंडेंस मिल्क ( मिल्कमेड )

मायक्रोमधे पातळ करुन घेतले. त्यात १/२ कप रोस्टेट बदामाचे तुकडे टाकले. आणी ट्रेमधे ठेउन फ्रीज मधे ठेवले.. १ तासात सेट नाही झाले Sad
मग बाहेर काढुन त्यात अजुन १/२ कप कुकीग चॉकलेट टाकुन परत मायक्रोमधे वितळले. रात्रभर फ्रीजरमधे राहिले. सकाळी थोडा वेळ बाहेर काढुन वड्या केल्या. पण जास्त गोड आणी चिकट लागतय Sad

मिल्कमेड जास्त झाले का Uhoh की अजुन काही घालायला हवे होते Uhoh

मला मदत करा.. मी बर्‍याच वेळा प्रयत्न करुनही छोले छान शिजतच नाहीत.. अगदी कुकरमध्ये ७-८ शिट्ट्या दिल्या तरी..वेगळ्या प्रकारचे ही आणुन करुन पाहीले तरी नाहीच.छान, थोडीशी टरफलाला चीर गेल्यासारखे होतच नाही Sad
मी आदल्या रात्री भिजायला घालते आणि दुसर्‍या दिवशी बनवते.. जास्त वेळ भिजायला हवेत का? Uhoh

छोले शिजवताना कुकरच्या २ शिट्ट्या करायच्या आणि मग ग्यास (gas मराठीत टाईप करता येत नाहीये) बारीक करून २० मिनिटे ठेवावे. छोले, राजमा एकदम मस्त शिजतात.

चिंगी, छोले शिजल्यावरही तसेच अखंड रहातात.(म्हणजे तुटतात्/तुकडे होतात अशी काही कल्पना तर नाहीये ना?) हवा तर थोडा बेकिंग सोडा घालून पहा, अगदी चिमूटभरच.

सानिकाला अनुमोदन. दोन किंवा तीन शिट्ट्या करुन मग पंधरा-वीस मिनिटं अगदी मंद आचेवर शिट्टी न आणता शिजव. गॅस बंद केल्यावर पूर्ण वाफ गेल्यावरच कुकर उघड. हमखास शिजतील.
माहीत नसण्याची शक्यता कमी आहे पण छोले शिजवताना ते बुडतील इतपत पाणी घालून शिजवतेस ना ?

आधी छोले रात्रभर भिजवून घ्यायचे. मग वरील प्रमाणे शिजवायचे. मग गार झाल्यावर त्यातील मूठ भर मिक्सर मधून पेस्ट करून घ्यायचे. म्हणजे भाजीला दाट्पणा चांगला येतो.

किंवा एखाद्या रुमालात एक चमचा चहा पावडर ची पुरचुंडी करुन छोल्यात ठेवायची आणि छोले शिजल्यावर [म्हणजे कुकर उघडल्यावर त्यातुन ती पुरचुंडी काढुन टाकायची. रंगही छान येतो.

हे कुठे विचारयचं कळत नव्हतं म्हणून इथे विचारते..

आज पनीर केलं घरीच (चांगलं झालं Happy ) आणि आता नासक्या दुधाचं पाणी उरलंय. त्या पाण्याचा पुन्हा पनीर करायचं सोडून दुसरा काही उपयोग आहे का? ते टाकून द्यायच्या आधी एकदा इकडे विचारावं असं वाटलं. काही सोपा सुटसुटीत पदार्थ असेल तर सुचवा. अवघड नको, नाहीतर एक संपवता दुसरं उरायचं नि शेवटी तेही वाया... Sad

रच्याकने, "हरिच्या नैवेद्याला केला..." अशी काहीतरी कविता होती...एका नवशिक्या ग्रुहिणीने नैवेद्याला केलेले पदार्थ उरले...मग त्यातून तिने अजून काय काय बनवलं..ते कसं उरत गेलं अशी काहीतरी आहे ती कविता..कोणाला माहिती असल्यास मला विपुत पाठवाल का?

पनीर करुन उरलेल्या पाण्यात रोजच्या पोळ्यांची कणिक भिजवायची. पाणी जास्त असेल तर फ्रीजमधे ठेवून वापरायचे. फेकू नये.

पनीर चे पाणि म्हण्जे whey protein जे आजकाल gym madhe dieticians घ्यायला सान्गतात. ते फार भयाण महाग असते. दोन हजार ला एक डबा. त्यामुळे हे पाणि मि आत फेकत नाहि. दहि घालुन पनीर केले तर ते पाणि जास्त आम्बट पण नाहि होत. मग ते कढि आम्टि पोळ्यानचि कणिक उकड वगैरे करायला वापरायचे. ते पाणि वापरुन नेक्स्ट रस्गुल्लेहि जस्त जा़ळिदार होतात.

पनीरच्या पाण्यात थोडे ताक/ दही मिसळून मस्त मलईदार स्निग्ध कढी करता येते. मीही हाच प्रश्न विचारला होता तेव्हा ही टिप मिळाली होती. खरंच मस्त कढी होते. करून पहा Happy

पनीरच्या पाण्याचे उपयोग सांगितल्यबद्दल सगळ्यांना धन्स!
पनीर चे पाणि म्हण्जे whey protein जे आजकाल gym madhe dieticians घ्यायला सान्गतात. ते फार भयाण महाग असते. दोन हजार ला एक डबा.
बापरे!! हे मला महितच नव्हतं! बरं झालं मी आधी इथे हा प्रश्न विचारला!

@अश्विनी, थँक्यु वेरी मच! Happy
मला हवी होती ती कविता. (आता उरलंसुरलं काही असलं की "अहों"वर प्रयोग करता येतील! Wink )

काल ब्राउन राईस खिचडी केली पण अजीबात मोकळी झाली नाही..गोळा झालेली. मी खिचडी करायच्या आधी २-३ तास तांदुळ भीजत घातले नीट शिजावे म्हणुन. जास्त वेळ भीजल्यामुळे असे झाले असेल का?

अश्विनीमामींना अनुमोदन. हातसडीच्या तांदळाचा फडफडीत भात होत नाही. हातसडीचा बासमती तांदुळ असला तर थोडा तरी होतो.
थोडा जास्त वेळ भिजवावा लागतो हा तांदूळ

मी घरी pineapple sponge cake केला -- पण सगळे pineapple pieces तळाशी गेले... केक खातांनी मधे १का पण bite मध्ये pineapple नाही आला.......... पुर्ण केक मध्ये spread व्हावा यासाठी काय करायचं ? Uhoh

सा कि, मूळ रेसिपी मधे पाईनापल पीसेस होते का ? नसावेत. स्पाँज चे मिश्रण खूप हलके असते. त्यात काहीही घातले तर ते तळालाच जाणार. पाईनापल अपसाईड डाऊन केक मधे पण त्या चकत्या तळालाच असतात.

दिनेशदा... मी रेसिपी बघून नाही केला........ monginis च्या pineapple cake मध्ये pieces असता म्हणून मी पण टाकून बाघीतले Lol

मी या भारतवारीत फ्युचुराचा हार्ड अॅनोडाईज्ड तवा आणला.पण पोळ्या नीट होत नाहीत्.जास्त गरम केला तर पोळ्या चिपकतात. आणि कमी गरम केला तर पोळ्या निघतात, पण कच्च्या वाटतात्.माझ्याकडे कॉईलचा गॅस आहे. थोड्या टिप्स द्या ना प्लीज....

रश्मी,Pineappleचे माहीत नाही.पण केक करतांना जेव्हा नट्स घालतो तेव्हा ते कसे गरम करून dry indredients मध्ये घोळवतो (toss with flour,shake off excess flour before mixing into the batter) तसे एकदा करून बघायला हरकत नाही.

स्नेहा१
माझ्याकडे पण फ्युच्युराचा तवा आहे. कॉइलवर वापरतांना माझ्यासाठी उपयोगी पडलेली गोष्ट मी लिहीते कदाचित तुला उपयोगी पडेल. तवा हाय हिटवर गरम करायला ठेवायचा. चांगला तापत आला की हीट कमी करायची (मध्यम आचेवर), मग अर्धा एक मिनीट वेळ जावू द्यायचा आणि मग पोळी भाजायला घ्यायची.

हल्ली माझी गवारची भाजी बीघडते, मी शिजताना २ चमचे दुधपण घालते पण मस्त चव नाही येत. काय चुकत असेल?

गवार जून असेल, म्हणून असे होत असेल. काही शेंगा कोवळ्या आणि काही जून होत्या का ?
गवारीच्या भाजीत, चण्याच्या पिठाचे गोळे घालून चांगली चव येते. भाजीत गूळ, काळा मसाला घातला, तरी चांगली चव येते.

दिनेशदा, गूळ, गोडा मसाला सगळं घालते मी, पण तरीही चव काही येत नाही, चण्याच्या पिठाचे गोळे घालून बघेन, शिजतानाच घालू का? आणखी काय घालू त्यात?

चण्याच्या पिठात तिखट, मिठ, कोथिंबीर व तेल वगैरे घालून घट्ट गोळे करायचे. मग मोडलेल्या गवारी आणि हे गोळे पाणी न घालता कूकरच्या डब्यात वाफवून घ्यायचे. मग तेलात कांदा परतून त्यात काळा, मसाला, तिखट, हळद व कोकम घालून पाणी घालायचे. पाण्याला चांगली उकळी आली कि त्यात गवार आणि गोळे आणि मीठ घालायचे. यात हवे तर मक्याचे दाणे किंवा शेंगदाणे पण घालता येतील. हा रस थोडा दाट होतो. गवारीच्या भाजीत, लाल भोपळा पण घालतात. त्यानेही चांगली चव येते.

Pages