माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<<अरे बाप रे इतके मोठे प्रयोग फसले की वाईट वाटत असेल ना? >>>> - खूप माला तर रडुच आलं काल....

अनु - तुझं नी माझं एकाच दिवशी कसं बीघडल...

माला सांगा ना काय चुकलं????

नवर्‍याने चेरी टोमॅटो सॅलड साठी फेटा चीज ऐवजी रिकोटा आणल ह्यात माझं काय चुकलं? Biggrin
क्रिमी रिकोटा चीज वापरुन काय काय करता येईल?

नवर्‍याने चेरी टोमॅटो सॅलड साठी फेटा चीज ऐवजी रिकोटा आणल ह्यात माझं काय चुकलं?>>>>> स्वतः न जाता नवर्‍यावर विसंबलीस हे चुकलं Proud

वत्सला... पास्ता बनवू शकतेस व त्यात उदार मनाने रिकोटा चीज ढकलू शकतेस!! रिकोटा चीज वापरून गुलाबजाम इत्यादीची रेसिपी आहे बहुतेक माबोवर. बेकडिश मध्येही वापरू शकतेस. Happy

तुम्ही कसल्या कसल्या चीजांची नावं घेता गं ! फेटा काय अन् रिकोटा काय ! Happy मला फक्त ते बाजारात क्युब्ज्स मिळतात तेवढेच माहित आहेत :अडाणी बाहुली:

मला चीज आणि चीजा दोन्ही आवडतात, त्यामुळे त्याबद्दलची माहिती करून घेत असते अम्मळ...आणि चीजचे प्रकार खाण्यात आले तर त्यांना नाही म्हणत नाही...!!! :स्वतःच्याच कोटीवर खुश होऊन खिदळणारी बाहुली: Light 1

प्राची, Biggrin अगदी हेच मनात आलं माझ्या. (पण बोलणार कोणाजवळ?). अकु, आता ते भयंकर क्रिमी चिज बेकुनच संपवावे लागेल. अश्विनी, चीजचे १७६० तरी प्रकार असतील. आंबलेल्या उग्र वासाचे चीज लोकं चवीने खातात.

हो मी पण खुप प्रकार पहिलेत ... ईथे पण काहि समजण्यापलीकड ले वाटतात मला.. कोणि माहिती सांगेल तर बर होईल. Happy

अनु आणि स्वार्थ सो सॉरी तुमच्या फिलिंग मध्ये मी भर घातली का गं? - नाही ग..... मी उगाच सेंटी झाली होते.

पण मग वाफ देउन उघडुन पाहाते तर सर्व मोदक गळुन (वीतळून) गोळा झाले होते

नक्की बघितल्याशिवाय काय कारण झालं असावं ते कळणं कठीण आहे. पण असु शकतात ती पुढील प्रमाणे-

१) उकड खुप सैल झाली असावी.
२) उकडीमधे मोहन(तेल, लोणी) जास्त पडलं असावं.
३) साधारण १३-१५ मिनिटांत छान उकडले जावेत. त्यापेक्षा जास्त वेळ ठेवले गेले असावेत.
४) प्रेशर कुकर मधे केले असतील तर शिट्टी काढुन ठेवावी लागते. (हे साधारण सगळ्यांना माहीत असतं. तरी एक कारण म्हणून लिहितोय)

ही अक्कल माझी नव्हे गैरसमज नसावा. आईला विचारुन लिहिले आहे Proud मोदक बिघडले म्हटल्यावर राहवलं नाही अगदीच. Sad

परेश आईला विचारुन कारण लिहिलीत ते खूप बर झाल. अजुन पर्यंत चैन पडत नाहीये स्वार्थ ला.
खरच मोदकासारखी गोष्ट बिघडली की फारफार कसतरी वाटत.

परेश - धन्स्... माला वाट्तं:
१. मोहन खूप पडलं -
२. साधारण १३-१५ मिनिटांत छान उकडले जावेत. त्यापेक्षा जास्त वेळ ठेवले गेले असावेत - मी २० मिनिटे ठेवलं Sad

आता पुढ्च्या वेळी मी मोहन थोड कमी टाकेन आणि १०-१३ मिनिटे ठेउन पाहीन....

अनु - Happy

आमच्या इथे बरीच पोलीश, जर्मन, इटालियन मोठाली ग्रोसरी स्टोअर्स आहेत. मी तिथुन फ्रोझन चीझ रॅव्हिओली आणी पटेटो पिरोगी आणली. सॉस घरी करायचा ठरवलं होतं पण आयत्या वेळेस कंटाळा आल्यामुळे, Ragu चा बॉटल्ड सॉस गरम केला. त्यात थोडं मीठ, मिरपूड, रेड चिली फ्लेक्स, गार्लिक पॉवडर, ओरेगनो, व थोडीशी साखर घातली. पण काही केल्या चांगली चव येइना. फारच आंबट चव होती. (tart). आंबट पणा घालवायला सगळं थोडं थोडं अजून टाकलं अश्याने गोड पणा वाढत होता, तिखट पणा वाढत होता, खारट पणा पण वाढत होता पण आंबट पणा काही केल्या जात न्हवता.

त्या सॉस मधे थोडे कॅन्ड बीन्स, थोडं पाणी, कोथिम्बीर पण टाकून पाहीली, पण मना सारखी चव येत नाहीये आणी मुख्य म्हण्जे तो डोक्यात जाणारा आंबट पणा पण जात नाहीये.
एव्ढा सगळा सॉस टाकून द्यायचं पण जिवावर आलयं आणी त्यात navin ingredients ची भर पडून तो मारुतिरायाच्या शेपटी प्रमाणे वाढतच बसलाय.

माझ्या कडे कॅरट जिंजर सूप चा एक कार्टन आहे, ते थोडं घालून बघु का? पण एवी तेवी जर तो फेकुन द्यायला लागला तर जास्ती त्यात अ‍ॅडिशन करायला नको वाटतिये.

A pinch of this, a dash of that, असं काही सोप्पं आहे का घालायला? एकदा वाटल क्रीम घालून पहाव, पण रंग बदलेल आणी चवीत फार नाही फरक पड्णार.

काय करू?:(

अरे वा.. बेकिंग सोड्याची टिप न्हवती माहीती. मस्तचं आहे.

आता ते वाचल्या वर आठवलं कि एक इटालियन मैत्रिण त्यात आयत्या वेळेस, पार्मेजानो घालायची. पण तिला सगळ्यात चीझ घालायला आवडतं अगदी भारतीय पदार्थांवर सुद्धा, त्यामुळे चीझ हे टार्टनेस जायला
पण वापरता येइल हे लक्षात न्हवतं आलं.

थँक्स मृण्मयी. Happy

काल शेवग्याच्या शेंगा घालून पिठलं केल होते, पण नवर्याला अजिबात आवडल नाही ( नेहमीच वाक्य होतच --माझी आई छान करते---) माझ काय चुकल असेल, मला तरी बरं लागत होतं. मी तिखट घालून केले होते.

साक्षी, शेवग्याच्या शेंगा आणि पिठले यांचा एकत्र पोत (टेक्स्चर ) कुणाकुणाला आवडत नाही.
हिंग आणि जिर्‍याची फोडणी करुन उभा कापलेला कांदा परतून त्यावर शेंगा परतून त्या उकळायच्या.
मग त्यात लाल तिखट, आणि कोकमे घालून उकळायचे. थोडासा गूळ घालायचा, मीठ घालायचे आणि त्याला थोडे तांदळाचे पिठ लावायचे. असे शेंगोळे नक्कीच आवडेल त्यांना.

मला पारंपारिक मसाला भाताची(काळा भात) रेसिपी हवी आहे. मी ३ पुस्तकात बघुन प्रयत्न केला आहे पण ती खास चव येत नाही. आजचा पण प्रयत्न फसला. Sad

परवा खूप दिवसांनी आलू पराठे केले अन फसले. बटाटा उकडून किसून घेतलेला. पण तो पारीत भरल्यावर लाट्ताना सर्व सारण बाहेर आले. लाटणे व खाली चिकटले. बटाट्यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने असे झाले का? ते हाताला पण जास्त ओलसर लागत होते.

जागू च्या घरी महिना भर फडका मारावा झालं Happy

Pages