माझे आवडते शीर्षकगीत

Submitted by निंबुडा on 5 July, 2011 - 03:36

काही काही मालिका पडद्याआड जाऊनही त्यांचे शीर्षक गीत गुणगुणावेसे वाटते. जुन्या काळात जेव्हा आतासारखे सतराशे साठ उपग्रह वाहिन्यांचे पेव फुटलेले नव्हते तेव्हा मोजक्याच मालिका, कार्यक्रम लागायचे व लोकही न चुकता प्रत्येक भाग सुरुवातीचे शीर्षकगीत न चुकविता बघायचे. महाभारत, रामायण, लहान मुलांचे दानासूर (डायनॉसोर), मोगली, मराठीत असे पाहुणे येती, बोक्या सातबंडे इ. इ.

मी इथे माझी आवडती शीर्षकगीते लिहितेय. तुम्हीही लिहा. Happy

मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषांमधल्या जुन्या/नव्या मालिका, मनोरंजनपर कार्यक्रम, लहान मुलांचे कार्यक्रम इ. पैकी ज्या कशाचे शीर्षक गीत तुम्हाला आवडते ते इथे लिहा. पूर्ण लिहिल्यास दुधार साखर! त्या निमित्ताने विस्मृतीत गेलेल्या शीर्षक गीतांना उजाळा देऊ. Happy

युट्युब वर ही गीते available असतील तर इथे दुवा द्या (आणि दुवे घ्या) प्लीज. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्या जागी नाही.. फक्त एका स्पेसिफिक ठिकाणीच 'पहन के'... बाकीच्या जागी 'पेहेन के'......
>>
हो रे हो. मित, धन्स. ते मेन्शन करायचं राहून गेलं माझं. कॉपी पेस्ट केलं. त्यामुळे खालच्या ओळींमध्येही तसंच लिहिलं गेलं. Happy

एक परिंदा हो शरमिंद, था वो नंगा,
उससे तो अंडे के अंदर था मै चंगा.....
>>>
मुग्धानंद, ठांकु. मला कधीच नीट ऐकू यायची नाही ती ओळ. Happy

अथ श्री महाभारत कथा
अथ श्री महाभारत कथा
महाभारत कथा, महाभारत कथा

कथा है पुरुषार्थ की ये स्वार्थ की परमार्थ की
सारथी जिसके भये श्रीकृष्ण भारत पार्थ की

शब्द दिघ्घोषित हुआ जब सत्य सार्थक सर्वथा
शब्द दिघ्घोषित हुआ...

यदा यदा हि धर्मस्य
ग्लानिर्भवति भारत
अभ्युदानम अधर्मस्य
तदात्मानं सृजाम्यहम
परित्राणाय साधूनाम
विनाशाय च दुष्कृताम
धर्मसंस्थापनार्थाय
संभवामि युगे युगे

हे सुरुवातीचं आणि पुढल्या ओळी एपिसोड संपल्यावर

भारत की ये कहानी
सदियोंसे भी पुरानी
है ज्ञान की ये गंगा
ऋषीओंकी अमरवाणी

ये विश्वभारती है
वीरोंकी आरती है
है नीत नई पुरानी
भारतकी ये कहानी
महा SS भा S र S त S
महा SS भा S र S त S
ओ ओ ओ महा SS भा S र S त S

ते शेवटचं 'टुं SSSSSS' मात्र झक्कास Happy मला शंखध्वनी फार आवडतो त्यामुळे तो वाजेपर्यंत मी ऐकत उभी रहायची.

आशा भोसले ने गायलेले एक खुपच सुंदर शीर्षकगीत होते. त्याचा एक हि शब्द आता आठवत नाहीये Sad फक्त संगीत आठवतय आणि चित्रीकरण असं चांदण्या रात्री...झाडाखाली एक स्त्री असं काहीसं आहे. खुपच तरल गाणं आहे. काही दिवसांपुर्वी त्याचे ध्रुपद आठवत होते आता तेही नाही. इथे कोणाला काही अंदाज येऊ शकेल का? एक गुढ वलय होतं त्या गाण्याला...

निंबुडाची परवानगी घेउन मी हा प्रश्न विचारते. >>
मनिमाऊ, परवानगी वगैरे काये? मालिकांच्या जुन्या स्मृतींना उजाळा देताना इकडचं तिकडचं आठवलं आणि ते शेअर करावसं वाटलं किंवा विचारावंसं वाटलं तरी इथेच कर. बिनधास्त. Happy

@ निंबुडा................... गाणी ऐकुन ऐकुन लिहित आहात का.........?????????????? कि युटुब चालु आहे............... Happy

गाणी ऐकुन ऐकुन लिहित आहात का.........?????????????? कि युटुब चालु आहे............... >>>
नाही. जे पाठ आहे, लक्षात आहे ते लिहितेय पेपर मध्ये. आम्ही परिक्षेत कॉपी नाय करत. Proud

ऑफिस मध्ये युट्युब अ‍ॅक्सेस नाहीये. Sad

कंही तो है सपना और कहीं याद
कहीं तो है सेरे कहीं फरयाद
पलछिन पलछिन तेरे मेरे जीवन की यही बुनीयाद

स्वप्ना तुझ बरोबर होत... और कही याद , शिवाय कही तो है सेरे मिळाल

श्रद्धादिनेश बहुदा 'भुमिका' सिरीयल बद्दल बोलतेय

सोनी वर थोडा है थोडे की जरुरत है म्हणून एक मालिका लागायची. त्यातला एकच अ‍ॅक्टर आठवतोय पण त्याचे नाव आठवत नाहीये. Sad

या मालिकेला अभिजीत च्या आवाजातले टायटल साँग होते. आठवतेय का कुणाला? मला फक्त "थोडा है थोडे की जरुरत ह" ची चाल आठवतेय.

ऑफिस मध्ये युट्युब अ‍ॅक्सेस नाहीये>>>>>>>>>>. बेस्ट झाले.......बॉस बिचारा विचार करत असेल कि निंबुडा काम करत आहे......... Happy एक गाणे त्याला पण विचार............................

'अपना अपना आसमाँ' - यात गिरीष कर्नाड होते. टायटल साँग जगजीतचेच

जिंदगी में हर किसीका अपना अपना आसमाँ
हर कोई अपने दिनोंकी कह रहा है दास्तां.
जिंदगी की तल्खीयां और हर तरफ नाकामियां
दिल को घायल कर गयी और बढ गयी बेचैनियां
जख्मे दिल तो भर गये है ना मिट सके उनके निशां,
अपना अपना आसमाँ.

यात बहुतेक अजून एक कडवे आहे, आता आठवत नाहीए.

झी मराठीवर "असंभव" ही मालिका लागायची त्या मालिकेचा एकहि भाग मी बघितला नसेल पण त्याच शीर्षक गीत मला फार आवडायचं.:)

दिवसा मागुन रात्र धावते सकाळ संध्याकाळ
सूत्रधार जो या सार्‍याचा नाव तयाचे काळ
काय तयाच्या मनात दडले न कळे कधी कुणा
क्षणात होते संभव सारे क्षणापुर्वीचे "असंभव"

दुरदर्शनवर रविवारी सकाळी "स्पिरीट ऑफ युनिटी कॉन्सर्टस् फॉर नॅशनल इंटिग्रेशन' नावाचा कार्यक्रम होता, त्याला ए.आर.रेहमानचे शीर्षक(सं)गीत होते (संतुर, मृदुंग यांचा मस्त वापर केला होता). फक्त ते ऐकण्यासाठी हा कार्यक्रम कधी संपतो, अशी वाट बघायचो! Happy

चुक केलीस गं बायो मला परवानगी देवुन. आज तुझ्यामुळे इतक्या जुन्या सिरियल्स आठवताहेत ना. आता तु म्हणालीसच आहेस तर ढीगभर प्रश्न विचारुन घेते.

आणि थँक्स. मस्त धागा चालु केला आहेस.

धन्स निंबे! जुन्या मालिका आठवल्या तुझ्यामुळे आज!

ये जो है जिंदगी, कच्ची धुप गुनगुनी धुप, आ बैल मुझे मार अशा अनेक शिर्षक गितांची आठवण झाली.

कसं जगायचं?
कसं वागायचं?
कुणी सांगेल का मला?
माझ्या आयुष्याचा हिरो व्हायचंय मला.

हे कोणत्या मालिकेचं शीर्षकगीत आहे? नीना कुलकर्णी आणि दिलीप कुलकर्णी हे दोघे होते आणि त्यांचा एक लहान मुलगा असतो. इतकेच आठवतेय. पण मला ही मालिका अजिबात आवडत नसे.

माझ्याकडे टीव्ही नव्हता त्या काळातला हा किस्सा !
दर रविवारी रात्री साडेनऊला 'द झी हॉरर शो' असायचा. आणि मला तो कधीच चुकवायचा नसायचा. मग घरच्यांचा विरोध पत्करून मी शेजारच्यांकडे इतक्या रात्रीचा जात असे.

झी हॉरर शो च्या आधी 'झी'वर 'कुरूक्षेत्र' नावाची मालिका लागायची. मी ती मालिका एकदाही पाहिली नाही. मात्र मी त्यांच्या घरी जायचो तेव्हा ती मालिका संपलेली असायची आणि श्रेयनामावली चालू असतांना तिचे शीर्षकगीत वाजत असे. 'झी हॉरर शो' मधे मी काय काय पाहिले त्यातले काहीच आता आठवत नाही, पण आज १४-१५ वर्षांनीही ते 'कुरूक्षेत्र' चे टायटल साँग मला जसेच्या तसे आठवते ! Happy

कुरूक्षेत्र.. कुरूक्षेत्र

हे उदास आसमान सब जहां विरान है
युद्ध चल रहा है क्यों.. पराया इनमे कौन है?

किसको क्या पाना है? जाना है कहां किधर?
किसीको नही है ये खबर...
सत्य झूठ पाप पुण्य के बीचमे है निरंतर..

कुरूक्षेत्र.. कुरूक्षेत्र
कुरूक्षेत्र कुरूक्षेत्र.... कुरूक्षेत्र !

-------------------------

घरी टीव्ही आला तोवर टीव्हीचे वेड संपलेले होते. Happy
आजही मी फार क्वचित टीव्ही पाहतो. (मॅच/बातम्या अपवाद.) पण त्यातही कधीतरी ऐकलेली आणि आवडलेली गाणी-

'हम जैसे लाखो है पर-
जस्सी जैसी कोई नही !'

'सारे कळत नकळतच घडते' (फक्त आवाजासाठी. हे गाणे मी अद्याप टीव्हीवर ऐकलेले नाही. मोबाईल रिंगटोन आहे.)

अलिकडच्या काळातली मला खूप जास्त आवडलेली आणि मी शेवटपर्यंत पाहिलेली एकमेव सिरीअल म्हणजे 'सब टीव्ही' वरची अनुराग कश्यपची 'लव्ह स्टोरी.' अत्यंत युथफूल, नो-नॉन्सेन्स अशा या सिरीअलचे काहीसे माझ्या कॉलेज जीवनाशी साम्य असल्याने ती मला फार जवळची वाटत असे. या सिरीअलचे टायटल साँग पुढे देतो आहे. (सिरीअलमधे प्रसंगानुसार येणारी अन्य गाणीही अप्रतिम होती. काही फराजच्या गझलाही त्यात होत्या !)

दिल..
करता है नादानियां
सहता है लाखो सितम !

राही.. चलना है अब तेरे संग.. यूंही ...

तुझे मै ढुंढता फिरू..
मेरी हर चाहत है तू !

थोडा है थोडे की जरूरत है - सचिन खेडेकर , प्राजक्ती देशमुख.
दिग्दर्शक रवी राय.
रवी रायचीच आधीची मालिका : सैलाब - सचिन खेडेकर, रेणुका शहाणे, प्राजक्ती देशमुख.
याचं टायटल साँग जगजीत सिंगच्या आवाजातली सुंदर गझल.
अपनी मर्जी से कहां अपने सफर के हम हैं?
रुख हवाओं का जिधर का है उधर के हम हैं

मराठी मालिका "संस्कार" Happy
मोहन जोशी होते बहुतेक.

तेजस्पर्शाने दूर होई अंधार
जैसा मुळांचा वृक्षास असे आधार
शिल्पास आकारी जैसा शिल्पकार
मना घडवी संस्कार
मना उद्धरी संस्कार
मना भूषवी संस्कार
मना तेजवी संस्कार

आशा भोसलेंच्या आवाजात होतं ते "आनंदी गोपाळ" चं शीर्षक गीत का? भार्गवी चिरमुलेची पहिली मालिका. त्यात तिने आनंदीचं काम केलं होतं. नीट आठवत नाही, पण

...घुटघुट कर जीती थी नारी..
ऐसे में पडी चिंगारी...आनंदी गोपाल....आनंदी गोपाल.

आनंदी : भार्गवी
गोपाळराव : अजित भुरे
आनंदीची आई : लालन सारंग (की उत्तरा बावकर? लक्षात नाही)

अश्या ओळी होत्या.

हिंदी:
हम चार (एक, दो, तीन, चार. चारो मिलके साथ चले तो कर दे चमत्कार :-)), आशिष, स्टोन बॉय, स्पायडरमॅन (स्पायडरमॅन.....स्पायडरमॅन.......स्पायडरमॅन), स्टार ट्रेक, जाईंट रोबोट, कालिगंज कि बहु (हुन हुना हुन हुना........)

मराठी:
संघर्ष (?)
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
गाण्यातला सूर जैसा ओठांतुनी ओघळावा
झिजूनी स्वतः चंदनाने दुसर्‍यास मधुगंध द्यावा
हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा

बंदिनी
बंदिनी, स्त्री हि..... हृदयी पान्हा, नयनी पाणी, जन्मोजन्मीची कहाणी

कोइ हो सफर मे जो साथ दे .................... मुझे रास्तो की तलाश है. हे तलाश मालिकेचे ना ?

आणी पंकज कपुरची नीम का पेड म्हणुन एक सिरियल होती. त्याचे टायटल song आठवते आहे का कोणाला ?

Pages