माझे आवडते शीर्षकगीत

Submitted by निंबुडा on 5 July, 2011 - 03:36

काही काही मालिका पडद्याआड जाऊनही त्यांचे शीर्षक गीत गुणगुणावेसे वाटते. जुन्या काळात जेव्हा आतासारखे सतराशे साठ उपग्रह वाहिन्यांचे पेव फुटलेले नव्हते तेव्हा मोजक्याच मालिका, कार्यक्रम लागायचे व लोकही न चुकता प्रत्येक भाग सुरुवातीचे शीर्षकगीत न चुकविता बघायचे. महाभारत, रामायण, लहान मुलांचे दानासूर (डायनॉसोर), मोगली, मराठीत असे पाहुणे येती, बोक्या सातबंडे इ. इ.

मी इथे माझी आवडती शीर्षकगीते लिहितेय. तुम्हीही लिहा. Happy

मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषांमधल्या जुन्या/नव्या मालिका, मनोरंजनपर कार्यक्रम, लहान मुलांचे कार्यक्रम इ. पैकी ज्या कशाचे शीर्षक गीत तुम्हाला आवडते ते इथे लिहा. पूर्ण लिहिल्यास दुधार साखर! त्या निमित्ताने विस्मृतीत गेलेल्या शीर्षक गीतांना उजाळा देऊ. Happy

युट्युब वर ही गीते available असतील तर इथे दुवा द्या (आणि दुवे घ्या) प्लीज. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अध्यात ना मध्यात म्हणजे सतीश पुळेकरची का?
बुद्धीबळाच्या खेळामधली आम्ही पांढरे प्यादी
ना राजा ना घोडा आपली सेना असली साधी....असं काहिसं होते त्याचं टासाँ

रथचक्र.....
सह्याद्रिकी गोदी कोकण, कोकण के कन की गाथा है, दीपक को आंचल से ढ्ककर चलती माता की गाथा हे. राहे मुश्कील मीलो मंजील, राहे मुश्कील मीलो मंजील.......कानोंमे गहरा दरद बसा, ईक रोज अचानक धरती के जीवन के रथ का चक्र धसा....रथ चक्र धसा ...रथ चक्र धसा .....रथ चक्र धसा...फिरभी .....फिरभी...फिरभि न झुकाया माथा है ये उस माता की गाथा है.......लालन सारंग चा अफाट अभिनय्.....आताच्या सिरिअल वाल्या नट नट्यांनी रोज लालन बाइंन्चे पाय चेपुन द्यावेत आणि अभिनयाचे शिक्शान घ्यावे.

"रानजाई" नावाची एक मराठी मालिका यायची. त्यात कवियत्री "शांता शेळके" आणि "सरोजीनी बाबर" होत्या. त्याचे शिर्षक गीतही खुप छान होते.

रानजाई......रानजाई
दर्‍याखोर्‍यात फुलते तु ग रानजाई,
भोळा शंकर भुलोबा त्याची भुलाबाई

हि कविता कुणाकडे संपूर्ण आहे का? असेल तर प्लीज, प्लीज, प्लीज संपर्कातुन पाठवा. Happy

वो आशा है वो अभिलाशा
वो अपनेपन की परिभाशा
वो साथ चले बनके साया
उससे जिवन बनता आया
वो दुख सहती सुख देती है
वो आसु भी पी लेती है
जीवन को मधुर बनाने कि
कोशिश एक आशा

सॉरी मधल्या ओळी येत नाहित....

रानजाईचं शीर्षकगीत मलाही हवंय. मलाही पाठवा. विपूत चालेल.
(जिप्सी, असं सगळ्यांच्या भल्यासाठी विपूत मागायचं असतं! फक्त एकट्याच्या इमेलीत नै कै! Proud Light 1 )

अध्यात ना मध्यात म्हणजे सतीश पुळेकरची का?>>>> बरोब्बर... अर्थात फारसं आठवत नाही...सतीश पुळेकर आणि थोडसं शीर्षकगीत सोडून! Happy

जिप्सी, असं सगळ्यांच्या भल्यासाठी विपूत मागायचं असतं! फक्त एकट्याच्या इमेलीत नै कै!>>>>:फिदी: ओक्के प्रज्ञा Happy

हि कविता/शिर्षकगीत कुणाकडे संपूर्ण आहे का? असेल तर प्लीज, प्लीज, प्लीज याच धाग्यावर पोस्ट करा. Happy

>>>>>>>>>>बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत
कसे रूजावे बियाणे माळरानी ..................

कसे रूजावे बियाणे माळरानी खडकात
मिलिंद इंगळेने म्हटलेले गोट्याचे टायटल साँग <<<<<<<<<<<<<
अरुण इंगळेने म्हट्ले आहे हे. अतिशय तरल आणि हळुवार.

'आम्ही सारे खवय्ये' केवळ प्रशांत दामले साठी पाहिली जाते सिरियल, बाकी पाकृ मधे फारसा इंटरेस्ट नसला तरी त्याचं शीर्षकगीत फार इंटरेस्टिंग आहे...

आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे
ज्यांना पोट आहे तोंड आहे, जीभ आहे, सोस आहे
चमचमीत खाण्याचा रे
आम्ही साsssssरे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये

सुचवितो, सुचवितो नवे काही बनवावे
किती किती चोचले ते, जीभेचे हे पुरवावे
छान छान, टेस्टी की टेस्टी, पदार्थ जाणून घ्यावे
चुकता चुकता, करता करता खावे अन् खिलवावे
आम्ही साsssssरे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये Happy

<छान छान, टेस्टी की टेस्टी, पदार्थ जाणून घ्याव<> छान, छान, देशी विदेशी आसे ऐकत होते मी इतके दिवस

बालचित्रवाणी.... बालचित्रवाणी.... (पुढे नाही येत.)

>>>
टिल्लु, हे घ्या :

मुलामुलांची मजेमजेची बालचित्रवाणी
आम्ही पाखरे आनंदाने
आनंदाने...
आम्ही पाखरे आनंदाने
गातो गंमतगाणी
बालचित्रवाणी.... बालचित्रवाणी....

फू बाई फू चं टायटल साँग किती बंडल आहे.

मला त्यातले शब्द कधीच नीट ऐकू येत नाहीत. Wink

फू बाई फू, चकट फू
फू बाई फू, चकट फू

हसून हसून पोट कसलं वैतागलं
...... भैताडलं Uhoh

टेन्शनची रेमेडी, ..... ची कॉमेडी
.......
हसा चकटफू...
फू बाई फू बाई फू बाई फू

स्वप्ना_राज, हे घे गं Happy

किसीको मुहोब्बत का है जुनून
किसीको इबादत का है जुनून
कोइ मुफुलसी (???) का मारा हुआ
किसी को दौलत का है जुनून
जुनून...जुनून ....जुनून .... जुनून

ना जाने ये कैसी है दिवानगी
के कांधे पे लादे हुए जिंदगी
भटकता हु मैं बेसबब बेनिशान
मेरे साथ है मेरी आवारगी

मेरे ..... को जुनू(न) चाहिये
किसी ..... को जुनू(न) चाहिये
.....
......का है जुनून
जुनून...जुनून ....जुनून .... जुनून

अधलं मधलं आठवत नाहीये Sad

मला तर कुठलही शिर्षकगीत ऐकलं कि धस्सच होतं... आता पुढची २२ मिनिटं (किमान) चॅनेल बदलता येणार नाही याचा तो इशाराच असतो..... ! Proud

मालगुडी डेजचं तानाना तानानाना ना हे संगीत आजही लक्षात आहे. मालगुडी डेज सुरू होण्याआधी तेरा भागांची स्वामी ही मालिका दाखवण्यात आली होती. त्यातली स्वामी ही हाकही लक्षात आहे...

मंजिरी ते आम्ही सारे खवैय्येच गाण अस आहे
तुम्ही लिहिलेल
सुचवितो, सुचवितो नवे काही बनवावे
किती किती चोचले ते, जीभेचे हे पुरवावे
छान छान, टेस्टी की टेस्टी, पदार्थ जाणून घ्यावे
चुकता चुकता, करता करता खावे अन् खिलवावे
आम्ही साsssssरे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये

एकमेका शिकविता नवे काही बनवावे
किती किती चोचले ते, जीभेचे हे पुरवावे
छान छान, देशी विदेशी, पदार्थ जाणून घ्यावे
चुकता चुकता, करता करता खावे अन् खिलवावे
आम्ही साsssssरे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये

एक निशीगंधा वाडची 'गिनीपीग' नावाची मालिका प्रसारीत व्हायची त्याचे शीर्षकगीत मस्त होते. सुरुवात बहुदा अशी होती (नीट आठवत नाहिए)..

'पुनवेचा उत्सव सरला थकलेले पैंजण तुटले, अवसेच्या अंधाराला निष्पाप चांदणे फसले...'

'हैलो जिंदगी' चे शीर्षकगीत सुद्धा मस्त होते जगजीत सिंगची गझल होती.. 'हैलो जिंदगी, जिंदगी नूर है जमाने मै चलने का दस्तूर है..' (असेच होते ना?)

अजून एक दिप्ति नवल ची 'थोडासा आसमान' यायची दुपारी त्याचे शीर्षकगीत सुद्धा भारी होते.

@जिप्सी रानजाई चे शीर्षकगीत मलाही हवे आहे. काय सुंदर मालिका होती..

आधी कोणी दिल आहे की नाही माहीत नाही, पण डिडि१ वर एक मालिका लागायची स्वाभिमान म्हणुन त्याच गाण माहीत आहे का कोणाला??

कुणीतरी वर साया मध्ये माधवन चा मित्र दाखवला होता त्याचे नाव सुधांशु पांडे म्हटले आहे. पण सुधांशु पांडे म्हणजे तर बँद ऑफ बॉईज वाला ना? किंवा सिंग इस किंग मध्ये अक्षय कुमारच्या टोळीतला एक असतो तो ना? अश्विनी पांडेचा एक्स नवरा कोण? मी त्या बद्दल म्हणतीये. Uhoh

निंबुडे धन्स Happy

राणी गुणाजी आणि ऋजुता देशमुख ह्यांचा 'मानसी' म्हणून एक प्रोग्रॅम लागायचा. त्याचंही शीर्षकगीत छान होतं. सगळ्या ओळी नीट आठवत नाहीत. फक्त 'सार्‍या सख्यासजणींचे मन मानसी मानसी" एव्हढंच आठवतं.

अमृता सुभाषचं रडगाणं असलेल्या 'अवघाची हा संसार'चं शीर्षकगीत सुरेख होतं.
मन माझे मोरपिशी स्वप्न जणू, मन माझे शिशिरातील इन्द्रधनू
----------
नवा छंद, नवा ध्यास, शोधी नवे आभाळ
उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार

असं काहीतरी होतं. सिरियल टुकार होती ते सांगायला नकोच.

निंबुडा तो(साया) नितीश पांडे

हे पुन्हा पोस्ट करतोय :साया मधे सुधांशु पांडे?
त्यात मानसी जोशी(रॉय) (शर्मण जोशी हिचा भाऊ), अचिंत कौर, माधवन (हो तोच) आणि करण ओबेरॉय (बँड ऑफ बॉइज वाला, हा पुढे जस्सी जैसी कोई नही मधे दिसला) होते.

सुधांशु पांडे मला तरी नाही आठवत त्या मालिकेत.

Pages