माझे आवडते शीर्षकगीत

Submitted by निंबुडा on 5 July, 2011 - 03:36

काही काही मालिका पडद्याआड जाऊनही त्यांचे शीर्षक गीत गुणगुणावेसे वाटते. जुन्या काळात जेव्हा आतासारखे सतराशे साठ उपग्रह वाहिन्यांचे पेव फुटलेले नव्हते तेव्हा मोजक्याच मालिका, कार्यक्रम लागायचे व लोकही न चुकता प्रत्येक भाग सुरुवातीचे शीर्षकगीत न चुकविता बघायचे. महाभारत, रामायण, लहान मुलांचे दानासूर (डायनॉसोर), मोगली, मराठीत असे पाहुणे येती, बोक्या सातबंडे इ. इ.

मी इथे माझी आवडती शीर्षकगीते लिहितेय. तुम्हीही लिहा. Happy

मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषांमधल्या जुन्या/नव्या मालिका, मनोरंजनपर कार्यक्रम, लहान मुलांचे कार्यक्रम इ. पैकी ज्या कशाचे शीर्षक गीत तुम्हाला आवडते ते इथे लिहा. पूर्ण लिहिल्यास दुधार साखर! त्या निमित्ताने विस्मृतीत गेलेल्या शीर्षक गीतांना उजाळा देऊ. Happy

युट्युब वर ही गीते available असतील तर इथे दुवा द्या (आणि दुवे घ्या) प्लीज. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मराठी मालिका "संस्कार" स्मित
मोहन जोशी होते बहुतेक >>

हो मोहन जोशीच होते. फारच छान होती मालिका.

कालिगंज कि बहु (हुन हुना हुन हुना........)>>>> नुतन होती आणि भोईलोक तिला मेण्यातून नेताना हुन हुना हुन हुना म्हणायचे एवढंच आठवतंय! Happy

तहकिकात म्हणून एक विजय आनंद ची सीरीयल असायची. त्याचे टायटल साँग फक्त ३ शब्दांचे होते. "तहकिकात... ये है तहकिकात..." . Happy

एका शीर्षकगीताची फक्त एक ओळच लक्षात आहे. मी इयत्ता ३री मधे असताना ही मालिका लागायची. त्यात रवि वासवानी होता एवढंच आठवतंय. शीर्षकगीत काहीसं असं होतं-

एक अलिबाबा बेचारे, बाकी चालीस चोर.....

३री मधे असताना शाळा सुरु झाल्यावरचे पहिले काही महिने होऊन गेल्यावर, अचानक एके दिवशी आमच्या वर्गशिक्षिका बाईंना जाणवले की पोरं-पोरं आणि पोरी-पोरी सतत गप्पा-दंगा करतायत. आणि त्यावर उपाय म्हणून बाईंनी प्रत्येक बाकावर एक मुलगा-एक मुलगी अशी व्यवस्था केली. तोपर्यंत वर्गातल्या बाकांच्या ३ ओळींमधे पोरं आणि उरलेल्या ३ ओळींमधे पोरी अश्या प्रकारे बसायची व्यवस्था होती. अशाप्रकारे अचानक अन्यायपूर्वक (?) Happy व्यवस्था बदलल्यामुळे आम्ही पोरं बाईंचं लक्ष नसताना एवढीच ओळ गुणगुणायचो आणि मग सामुहिक फिदीफिदी कार्यक्रम!

शाळेतल्या काहीही फालतु-फालतु गोष्टी अचानक कधीही आठवतात! Biggrin

>>आणी नुक्कड चे गीत. आठवते आहे
मी एका आधीच्या पोस्टीत मला आठवतं तसं दिलंय.

जुनून (टॉम ऑल्टर उर्फ केशव कलसी, अर्चना पुरणसिंग, शशी पुरी, मंगल धिल्लो वगैरे) चं टायटल सॉन्ग कोणाला आठवतंय? मला फक्त काहीच ओळी आठवताहेत.

किसीको मुहोबतका है जुनून
किसीको इबादतका है जुनून

पुढचं आठवत नाही आणि मग एकदम 'ना जाने ये कैसी है दिवानगी, ये कांधेपे लादे हुई जिंदगी" एव्हढंच आठवतं Sad

किसीको मुहोबतका है जुनून
किसीको इबादतका है जुनून>>>

'मुन्नाभाई'फेम विनोद राठोडच्या आवाजात हे शीर्षकगीत होतं. Happy

ओ मैंने प्रोड्यूस किया है, ये मेरा है प्रोडक्शन
अब मैं करवा देता हूं, इन सबका इंट्रोडक्शन

ये नंबर एक, ये नंबर दो, ये नंबर तीन,
ये नंबर चार, ये नंबर पांच,

हम पांच, प प प पांच
हम पांच, प प प पांच
हम पांच, प प प पांच
हम पांच

गायकः मराठमोळा विनय मांडके
Happy

'नीम का पेड' -परत जगजीत
मुंह की बात सुने हर कोई, दिल के दर्द को जाने कौन
आवाजों के बाजारों में खामोशी पहचाने कौन.
सदियों सदियों वही तमाशा, रस्ता रस्ता लंबी खोज
मेरेही भीतर रहता है मुझ जैसाही जाने कौन.

प्रिया तेंडुलकरची फेमस सिरिअल 'रजनी'

लडकी है एक नाम रजनी है,
रजनी, रजनी, रजनी....

रजनी की एक ये कहानी है..
रजनी, रजनी, रजनी....

***** (मधले आठवत नाही...)
रजनी, रजनी, रजनी....

उसे वो सबक देती है जिसकी भी जो गलती है....
रजनी, रजनी, रजनी....

(प्रिया तेंडुलकर आणि तिचा नवरा करण राजदान होते त्यात...)

देखी जहा बुराई है, जाके वहा टकरायी है
देखी जहा बुराई है, जाके वहा टकरायी है

सच्चाईकी डगरपे वो तो चलती है
सच्चाईसे कभी नही वो ---- है

खूप पूर्वी राऊ मालिका होती, तिचे शीर्षक गीत खूप छान होते. " तोच पिता साक्षात जाणावा" असा काही तरी होतं, कोणी सांगू शकेल का ते गाणं? अजुन एक दर्पण मालिका होति दुरदर्शन वरति. तिच गीत पण खुप छान होत, आठवत नहि पण...

तिचे शीर्षक गीत खूप छान होते. " तोच पिता साक्षात जाणावा" >>>येस्स, हे ही छान होतं. Happy

"माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले" हे "स्वामी" मालिकेतील ना? (हे शिर्षकगीत नाही)

तेनाली रामन होती , बले बले बले बले बले तेनाली रामा, बले बले बले बले बले तेनाली रामा , रुको रुको देखो देखो सुनो सुनो हासो हासो
मालगुडी डेज होती, किती सुंदर धुन होती त्याची पण.

मला कार्टुन बघायला आवडतं आणी "हंगामा"चॅनल वरचं माझं आवडतं कार्टुन"डोरेमॉन"त्याच शीर्षक गीत
जिंदगी सवार दु,एक नयी बहार दु
दुनिया हि बदल दु मै तो प्यारा सा चमत्कार हु,
मै किसीका सपना हु जो आज बन चुका हु सच,
अब ये मेरा सपना है कि सबके सपने सच मै करु
आसमां को छु लु, तितली बन उडु, या हॅलिकॉप्टर
हो हो हो
मै हु एक उडता रोबो "डोरेमॉन"
मानो या ना मानो
मै हु एक उडता रोबो "डोरेमॉन".:)

अरे वा उदय मला सुद्धा"डोरेमॉन"बघायला फार आवडतं.:)

मला ही डोरेमॉन फार आवडते...

कधी कधी रवीवारी मी आणी माझ्या जावेची मुलगी डोरेमॉन मधले डोरेमॉन आणी सुजुका चा आवाज काढुन एकमेकींशी बोलतो Happy

वाह! मस्त वाटलं वाचून...
डकटेल्स ला विसरून कसं चालेल?
-
हर दिन हर पल बनते है नये डक्टेल्स
खेले खतरों से हर पल, ये डक्टेल्स
उ उ उ उ !

स्वाभिमान चे गाणे आठव्वा रे लोक्स........ काही तरी भितीदायक आवाजात म्हणायची ती बाई. शोभा डे ची सिरीयल,
अंधा कुंवा, गहरा धुंवा इ.इ.

चिबी मारूको चॅन नावाची सिरियल लागायची निकलोडियन चॅनल वर त्याचं टायटल साँग पण छान आहे

हम सब नाचे गाए
मस्ती मे झूम झूम जाए
आओ मिलकर करे जादू
मस्ती मे हो बेकाबू
मम्मी भी नाचे गाए
रंगबिरंगी हवाए
सपनो भरा ये जहा हो ssssssss
त त रा रा री रा... मारूको मारूको
त त रा रा रा मारूको मारूको
वो है सबसे प्यारी

सारे तो सपने इसकी आंखो मे सपने कितने सारे
उडती रहती है आसमा मे पागल चांद और सितारे
है इसके दोस्त

"कलर्स"वरची"उतरन"
नन्हे नन्हे से हातोमे गुडीया पुरानी
किस्मत अपनी तो जैसे कोई रुठी नानी
नन्हे नन्हे से हातोमे गुडीया पुरानी
किस्मत अपनी तो जैसे कोई रुठी नानी
किसीका जीवन सपना है
किसीका सपना है उतरन
किसी के उतरे सपनो से
सजे किसी का बचपन
वो नही समजे अभी क्या हो ती उतरन
वो नही समजे अभी क्या हो ती उतरन. Happy

अरे कार्टुन्सचा विषय निघाला आहे तर - नॉडी, शिनचॅन आणि किपर डॉग यांची पण गाणी छान आहेत.

बाय द वे, उगाच जास्तीची माहिती. मला 'पिंगु' हे कार्टुन सगळ्यात आवडते. आणि शिनचॅन चा खुप राग येतो.

मनिमाऊ, अगदी अगदी, त्या शिनचॅन ला कुणी जन्माला घातला त्याला हाणायला पाहिजे धरून, अत्यंत वाया गेलेलं, आगाऊ कॅरॅक्टर आहे ते Angry

Pages