Submitted by निंबुडा on 5 July, 2011 - 03:36
काही काही मालिका पडद्याआड जाऊनही त्यांचे शीर्षक गीत गुणगुणावेसे वाटते. जुन्या काळात जेव्हा आतासारखे सतराशे साठ उपग्रह वाहिन्यांचे पेव फुटलेले नव्हते तेव्हा मोजक्याच मालिका, कार्यक्रम लागायचे व लोकही न चुकता प्रत्येक भाग सुरुवातीचे शीर्षकगीत न चुकविता बघायचे. महाभारत, रामायण, लहान मुलांचे दानासूर (डायनॉसोर), मोगली, मराठीत असे पाहुणे येती, बोक्या सातबंडे इ. इ.
मी इथे माझी आवडती शीर्षकगीते लिहितेय. तुम्हीही लिहा.
मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषांमधल्या जुन्या/नव्या मालिका, मनोरंजनपर कार्यक्रम, लहान मुलांचे कार्यक्रम इ. पैकी ज्या कशाचे शीर्षक गीत तुम्हाला आवडते ते इथे लिहा. पूर्ण लिहिल्यास दुधार साखर! त्या निमित्ताने विस्मृतीत गेलेल्या शीर्षक गीतांना उजाळा देऊ.
युट्युब वर ही गीते available असतील तर इथे दुवा द्या (आणि दुवे घ्या) प्लीज.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अभिलाषा आरती अंकलिकरच्या
अभिलाषा
आरती अंकलिकरच्या आवाजात..मस्त वाटायच
आयुष्याचे हे चक्र चालते
साद घालते आशा
स्वप्ना मागुन सत्य चालते
हि दैवाची रेषा
जन्मापासुन कोण खेळवी
तुलाच नाही ठावे
हवे हवे ची हाव सुटेना
किती हिंडशी गावे
ऐक सुखाचा माग माणसा
सोड सोड अभिलाषा..अभिलाषा...
आणि एक खोज म्हणुन सिरियल
आणि एक खोज म्हणुन सिरियल होती, त्याला हेमंत कुमारांचं सिनेमा मधलं गाणं होतं.
त्या सिरीयलच नाव तलाश/फिर वही तलाश....
तुम पुकार लो तुम्हारा इंतजार है या गाण्याची चाल होती.
कडव्याबद्दल संपर्क स्वप्ना_राज
बिंबातून प्रतिबिंब जन्मते,
प्रतिबिंबित हे बिंब जाहले
सिरीयलच नाव द्विधाता
काही वर्षांपूर्वी विकास
काही वर्षांपूर्वी विकास भल्लाने काम केलेली 'तुम बिन जाऊ कहा' म्हणून एक सिरियल लागायची. त्यात त्याची बायको मरते, मग पुनर्जन्म घेते वगैरे टुकार कथा होती. पण मला त्याचं टायटल सॉन्ग भारी आवडायचं.
तुम्हारे लिये मेरा दिल बेकरार है
मुझे सिर्फ तुमसे, हा तुमसे प्यार है
तुमही मेरा प्यार हो, मेरे दिलका करार हो
जानेमन जानेजा
तुम बिन जाऊ कहा
महाभारत सिरियलचं ते 'यदा यदाही धर्मस्य' ने सुरु होणारं शेवटचं संगीतही मला आवडायचं.
सिरीयलच नाव द्विधाता>>>>> मला
सिरीयलच नाव द्विधाता>>>>> मला वाटलं मालिकेचे नाव पण 'प्रतिबिंब' ! धन्यवाद!
धन्स पियापेटी.......... बाकी
धन्स पियापेटी..........
बाकी २ स्वप्ना इथे आहेत म्हटल्यावर, आमचे काय काम?
धन्स खुप खुप २ न्ही स्वप्ना.....
<तुम पुकार लो तुम्हारा इंतजार
<तुम पुकार लो तुम्हारा इंतजार ह<>
जीवन एक प्यास है, तुम्हारा इंतजार है,
तुम पुकार लो, तुम्हारा इंतजार है,....
मस्त मस्त
राष्ट्रीय साक्षरता मिशन चे
राष्ट्रीय साक्षरता मिशन चे रेडीओ ला लागायचे गाणे पण छान होते
सवेरे सवेरे
यार से मिलके...
बन ठन के निकले हम
रोके से ना रुके हम मर्जी से चले हम
बादल सा बरसे हम
सावन सा गरजे[?] हम
सुरज सा चमके हम
स्कुल चले हम
स्कुल चले हम
[जसे आठवले तसे टाकले
याचे मराठीत पण एक गाणे होते]
मोहम्मद अजीज (मर्द टांगेवाला
मोहम्मद अजीज (मर्द टांगेवाला फेम) का कोणीतरी शिंगर गायचा. आणि मग 'आया रे बाबा' असं रेकायचा... >>>
अगदी अगदी....
मित
युं निकल पडा हुं सफर पे मै
युं निकल पडा हुं सफर पे मै मुझे मंझिलों की तलाश है
अस काहीतरी शिर्षकगीत आहे फिर वही तलाश
मुग्धानंद
या शिर्षकगीताला 'तुम पुकार लो' ची चाल आहे
ये जो है जिंदगीचं टायटल
ये जो है जिंदगीचं टायटल सॉन्गच कसलं सही होतं. एक्दम उत्साही आणि आनंदी. आत्ताच्या सिरियल्ससारखं लोकांचं ब्लडप्रेशर वाढवणारं नाही.
इधर उधर म्हणून रविवारी एक सिरियल लागायची त्याच्या थोड्याच ओळी आठवतात.
इधर उधर ढूंढे अगर, दो हसीन पल, मिल गये किधर, इधर उधर असं काहीतरी.
नंतर 'देखो मगर प्यारसे'.
देखो देखो देखो मगर प्यारसे, देखो देखो देखो मगर प्यारसे
कभी दाई ओर तो कभी बाई ओर
कभी आरसे तो कभी पारसे
दुनियाका ट्रॅफिक गुजरता रहेगा
तुम देखो मगर प्यारसे
इतकी वर्षं झाली, आता ओळीही नीट नाही आठवत
अरे आणि सगळ्यात फेमस आणि लहान
अरे आणि सगळ्यात फेमस आणि लहान मुलांचं आवडतं 'मोगली - जंगल बुक्'चं गाणं विसरलात का?
>>
नाही गं, मनिमाऊ. मी हेडपोस्ट मध्ये उल्लेख केलाय की.
जंगल जंगल बात चली है
पता चला है
चड्डी पहन के (हे "पहन के" असंच म्हणायचं बरं का!) फूल खिला है फूल खिला है
एक परिंदा है शरमिंदा, ****** (इथे मला नेहेमी "जाओ गंदा" असे ऐकू यायचे. काय आहे नक्की ते?
)
)
इस से तो अंडे के अंदर (ही ओळही नक्की काय आहे? मला जशी ऐकू यायची तशी टाकली आहे.
सोच रहा है बाहर आखिर क्यु निकला है
(तु रु रु रु तु रु रु)
अरे, चड्डी पहन के फूल खिला है फूल खिला है
जंगल जंगल पता चला है
चड्डी पहन के फूल खिला है फूल खिला है
जंगल जंगल पता चला है
चड्डी पहन के फूल खिला है फूल खिला है
(मला चुकीची ऐकू आलेली गाणी मध्ये मला हे गाणे टाकले पाहिजे.
)
आणि ते आजुन एक राष्ट्रिय
आणि ते आजुन एक राष्ट्रिय साक्षरता मिशनचे गीत-
पुरबसे सूर्य उगा..फैला उजियारा
जागी..... दिशा दिशा, जागा जग सारा....
राग भटियार
पूर्वेला सूर्य उगवला, प्रकाश हा पसरे, इ.इ.
इतकी वर्षं झाली, आता ओळीही
इतकी वर्षं झाली, आता ओळीही नीट नाही आठवत
हे पुष्कळ आठवतय
मला वाटत
इधर उधर ढूंढे किधर, दो हसीं नजर, मिल गये किधर, इधर उधर
अस आहे अस वाटतय
बडे शहरकी एक गलीमे बसा हुआ है
बडे शहरकी एक गलीमे बसा हुआ है नुक्कड
नुक्कडके सारे बाशींदे तस्विरोंसे भुक्कड
अलग अलग तकदीर है सबकी अलग अलग है बोली
अपने अपने धंदे सबके अपनी अपनी टोली
अजब तमाशा है ये नगरी इसमे हसते गाते है
अपनी बरबादिका यारो ये तो जश्न मनाते है
लडते है झगडते है, मिलते है बिछ्डते है
लडते झगडते है, मिलते बिछ्डते है गिरके संभलते है यारो
चाहे किसीभी नामसे तुम इनको पुकारो
ये सारे है -----
शब्द इकडेतिकडे झाले असतील पण गुरु, घनशू भिकारी, पानवाला, राधा, राजा, हरी, खोपडी सगळे डोळ्यासमोर आले.
चड्डी पहन के (हे "पहन के"
चड्डी पहन के (हे "पहन के" असंच म्हणायचं बरं का!>>>>
सगळ्या जागी नाही.. फक्त एका स्पेसिफिक ठिकाणीच 'पहन के'... बाकीच्या जागी 'पेहेन के'......
जागी हर दिशा दिशा असावं
जागी हर दिशा दिशा असावं बहुतेक.
निंबुडा, खरंच की. मी वाचलाच
निंबुडा, खरंच की. मी वाचलाच नव्हता तो उल्लेख.
मला 'मालगुडी डेज'चं म्युझिक आणि जंगलबुकचं शिर्षकगीत इतकं आवडायचं तेव्हा. खाली खेळताना ऐकु आलं तर मी जीव खावुन घरी धावायचे.
<एक परिंदा है शरमिंदा, ******
<एक परिंदा है शरमिंदा, ****** (इथे मला नेहेमी "जाओ गंदा" असे ऐकू यायचे. काय आहे नक्की ते? )
इस से तो अंडे के अंदर<>
एक परिंदा हो शरमिंद, था वो नंगा,
उससे तो अंडे के अंदर था मै चंगा.....
सोच रहा है बाहर आखिर क्यों निकला है
निंबुडे, माझं काम बोंबललंय ग,
निंबुडे, माझं काम बोंबललंय ग, कसला बीबी काढलायस, मघापासून पडिक आहे इथेच
भारत एक खोज नावाच्या सिरियल
भारत एक खोज नावाच्या सिरियल चं पण शीर्षकगीत भारी वाटायचं ऐकायला -
सृष्टी का कौन है कर्ता?
कर्ता है वा अकर्ता?
उंचे आकाश मे रहता
सदा अध्यक्ष बना रहता ......... असं काहितरी होतं ते!
जागी हर दिशा दिशा असावं
जागी हर दिशा दिशा असावं बहुतेक.
हंम्म बरोबर.... म्हटले नाही का वर .... २ स्वप्ना...
>>सदा अध्यक्ष बना रहता हे
>>सदा अध्यक्ष बना रहता
हे बाकी आजच्या पॉलिटिशयन्सला लागू पडावं
>>हंम्म बरोबर.... म्हटले नाही
>>हंम्म बरोबर.... म्हटले नाही का वर .... २ स्वप्ना...
हा उल्लेख मी आजवर इतक्या ठिकाणी ऐकलाय की माबोवर पण तीच गत आहे हे पाहून आता हसायला येतं.
२ स्वप्ना
<निंबुडे, माझं काम बोंबललंय
<निंबुडे, माझं काम बोंबललंय ग, कसला बीबी काढलायस, मघापासून पडिक आहे इथेच<> अगदी अगदी. म्हणुन मी ह्याचे शिर्षक वाचुनही इथे आले नाही सकाळी... काम आवरले... आणि मगच आले , गृहिणी मोड ऑन.
स्वप्ना
स्वप्ना
दुसरीकडे कुठे ऐकला?
दुसरीकडे कुठे ऐकला?
>>दुसरीकडे कुठे ऐकला? शाळेत,
>>दुसरीकडे कुठे ऐकला?
शाळेत, कॉलेजात, बीस्कूलमध्ये - जिथे जाईन तिथे किमान आणखी एक स्वप्ना असायचीच
करमचंदचं टायटल सॉन्ग? करमचंद करमचंद करमचंद हूऊऊऊउ
बले बले बले बले बले बले
बले बले बले बले बले बले बले... तेनालीरामा..... आठवतंय का कोणाला?
तसंच आपले ओठ न उघडता बोलणार्या संजय खानच्या टिपू सुलतानचं थीम साँग (बँण्डवाल्यासारखं) !
अथ श्री महाभारत कथा अथ श्री
अथ श्री महाभारत कथा
अथ श्री महाभारत कथा
महाभारत कथा, महाभारत कथा
कथा है पुरुषार्थ की ये स्वार्थ की परमार्थ की
सारथी जिसके भये श्रीकृष्ण भारत पार्थ की
भारत की ये कहानी
है नित नयी कहानी
भारत की ये कहानी
सदियोंसे भी पुरानी
है विश्व की ये गंगा
है ये अमरकहानी
महा SS भा S र S त S
महा SS भा S र S त S
ओ ओ ओ महा SS भा S र S त S
शब्द दिघ्घोषित हुआ जब सत्य सार्थक सर्वथा
शब्द दिघ्घोषित हुआ...
यदा यदा हि धर्मस्य
ग्लानिर्भवति भारत
अद्भुत्थानम् अधर्मस्य
तदन्मान्यम सृजान्यहम
परित्राणाय साधूनाम
विनाशाय च दुष्कृताम
धर्मसंस्थापनाथाय
संभवामि युगे युगे
टुं SSSSSS (शंखाचा आवाज इमॅजिन करा.
)
ओळींचा सीक्वेन्स थोडा गडबड वाटतोय. कुणीतरी दुरुस्त करा प्लीज.
आता जरा हे विषयाला धरुन नाही,
आता जरा हे विषयाला धरुन नाही, पण निंबुडाची परवानगी घेउन मी हा प्रश्न विचारते. आणि मराठी सिरियल मधलं गीत आहे, म्हणुन तिने परवानगी द्यावी, प्लीज.
एक चावुन चोथा झालेली मराठी सिरियल होती - कुलवधु. यातल्या फक्त - सुबोध भावे, मिलिंद गुणाजी आणि निशिगंधा वाडला मी ओळखते. तर या मधे कोणी एक 'नील' नावाचा देवदास टाइप भाउ होता हिरोचा. तो एक गजल म्हणतो किंवा त्याला दाखवताना background ला ही गजल होती. सुरेश वाडकरांचा आवाज होता ( बहुतेक). नक्की आठवत नाही. मला अत्तिशय आवडली होती.
कोणाला माहित आहे का? किंवा कोणी लिंक देवु शकेल का, प्लिज? मला रेकॉर्ड करुन ठेवायला आवडेल. खुपच छान वाटली होती. शब्द पण छान होते, पण एकदाच सिरियलमधे ऐकल्यामुळे फार आठवत नाही. पण मनात राहिली आहे.
Pages