माझे आवडते शीर्षकगीत

Submitted by निंबुडा on 5 July, 2011 - 03:36

काही काही मालिका पडद्याआड जाऊनही त्यांचे शीर्षक गीत गुणगुणावेसे वाटते. जुन्या काळात जेव्हा आतासारखे सतराशे साठ उपग्रह वाहिन्यांचे पेव फुटलेले नव्हते तेव्हा मोजक्याच मालिका, कार्यक्रम लागायचे व लोकही न चुकता प्रत्येक भाग सुरुवातीचे शीर्षकगीत न चुकविता बघायचे. महाभारत, रामायण, लहान मुलांचे दानासूर (डायनॉसोर), मोगली, मराठीत असे पाहुणे येती, बोक्या सातबंडे इ. इ.

मी इथे माझी आवडती शीर्षकगीते लिहितेय. तुम्हीही लिहा. Happy

मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषांमधल्या जुन्या/नव्या मालिका, मनोरंजनपर कार्यक्रम, लहान मुलांचे कार्यक्रम इ. पैकी ज्या कशाचे शीर्षक गीत तुम्हाला आवडते ते इथे लिहा. पूर्ण लिहिल्यास दुधार साखर! त्या निमित्ताने विस्मृतीत गेलेल्या शीर्षक गीतांना उजाळा देऊ. Happy

युट्युब वर ही गीते available असतील तर इथे दुवा द्या (आणि दुवे घ्या) प्लीज. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

देख भाई देखः

इस रंग बदलती दुनिया मे
क्या तेरा है क्या मेरा है
देख भाई देख, देख भाई देख
हर शाम के बाद सवेरा है
देख भाई देख हो देख भाई देख

कदम कदम पर गाना है
हसना है रोना है
जीना है मर जाना है
जानी कुछ कर जाना है
हर लम्हा बेहतरीन
देख भाई देख, अरे देख भाई देख
जमाना है रंगीन
देख भाई देख हो देख भाई देख

चुपचाप चले या शोर मचे
रोज नया एक खेल रचे
जान जाये या जान बचे
ये किस्सा है संगीन
पैरो तले रहे जमीन
देख भाई देख हो देख भाई देख
हर शाम के बाद सवेरा है
देख भाई देख हो देख भाई देख

अजुन एक कडवे आहे वाटते. पण नीट आठवत नाहीये. गूगलून पाहते आणि मग लिहिते. Happy

अस्तित्व म्हणून एक सीरीयल लागायची झी सिनेमावर. निकी अनेजा, वरुण बडोला आणि हर्ष छाया. कुणी बघायचं का ही सीरीयल. माझ्या आवडत्या सीरीयल्स पैकी एक Happy निकी अनेजा मला जाम आवडते. तिच्यात कधी कधी माधुरी दिक्षित चा भास होतो. या मालिकेचे शीर्षक गीत मला खूप आवडते. पन युट्युब वर खूप शोधूनही सापडले नाही. कुणी शोधून इथे लिंक देईल का प्लीज??

गीताच्या ओळी अशा आहेतः

चुन ली है मंजिले
अब जिंदगी
मेरे फैसले, मेरे हौसले
चाहे जैसे आजमाये
जितना भी उलझाये अब ये
रिश्तोंमे नातोंमे, रस्मोंके इस आंगन मे

मुझको तो अपने ही
अस्तित्व का दामन थामे चलते जाना है
चलते जाना है
अस्तित्व का दामन थामे
अस्तित्व का दामन थामे

चंद्रकान्ता, की कहानी, बडी लगती, है सुहानी,
ये पुरानी, हो कर भी, बडी लगती, है सुहानी,

(वर प्रत्येक स्वल्पविरामाच्या जागी टुऊंग असं मुजीक तोंडाने म्हणणे) Happy

नौगड विजयगड में थी टकरार, नौगड का था जो राजकुमार
चंद्रकान्ता से करता था प्यार, (पुन्हा) चंद्रकान्ता से करता था प्यार

सोनी वर साया म्हणून एक मालिका होती. मानसी जोशी (रोहित रॉय ची पत्नी), आर माधवन आणि अचिंत कौर. एक पांडे आडनावाचा अ‍ॅक्टर होता (अश्विनी पांडे चा आधीचा नवरा). फार छान सीरीयल होती. नंतर नंतर थोडीशी भरकटली होती. पण वेळेत नीट शेवट करून संपवली. आणि मेन म्हणजे "२ मैत्रिणींचे नाते" वाढत्या वया नुसार आणि परिस्थितीनुसार कसे घडत / बदलत जाते या थीम ने ही मालिका चालू केलेली होती. तो ट्रॅक कधीही भरकटला नव्हता. याचेही शीर्षक गीत माझे फेवरीट. Happy

ही मालिका मी आर माधवन साठी जीव ओवाळत पाहिली. He is still my favourite! Happy

धूप के साथ साथ साया भी
अपनी हर दिशा बदलता है
एक से एक है जुडे फिर भी
फिर भी कुछ फासला सा लगता है

धूप के साथ साथ साया भी
अपनी हर दिशा बदलता है

दुरदर्शनवर पूर्वी सुदेश बेरी आणि मालविका तिवारी यांची एक सिरियल लागायची. तो खडूस बॉस आणि ती त्याची सेक्रेटरी (बहुतेक). तीच्या पात्राचे नाव मोहना असते. एवढेच ठळक संदर्भ आठवतायत!

या सिरियला शीर्षकगीत नव्हते, पण सॅक्सोफोनवरचा एक मस्त म्युजीकपीस होता. जाम गुगलला, पण कुठेच मिळत नाहीये! Uhoh

F.R.I.E.N.D.S चे I'll be there for you... कोण विसरू शकेल? Happy

So no one told you life was gonna be this way?
Your job's a joke, you're broke, your love life's D.O.A.
It's like you're always stuck in second gear
When it hasn't been your day, your week, your month, or even your year, but

I'll be there for youuuu
(When the rain starts to pour)
I'll be there for youuuu
(Like I've been there before)
I'll be there for youuuu
('Cause you're there for me too)

काही काही वेळा शीर्षक गीताच्या मोहापायीच मालिका पाहिली जाते असं होतं नाही का?

स्टार प्रवाह वरची राजा शिवछत्रपती ही मालिका मी केवळ त्याचे टायटल साँग ऐकायला टीव्ही लावत असे म्हणून अधले मधले एपिसोड्स पाहत असे. याचे सर्व शब्द लिहिल का कुणी?

त्यात कवी शिवराज भूषण ने शिवरायांच्या स्तुतीपर रचलेल्या कवनातील ओळी आहेत. कुणातरी माबोकराच्या विपू मध्ये मागे हे वाचल्याचे आठवतेय. (बहुतेक विशल्याच्या!)

दुरदर्शनवरच एक 'घुटन' नावाची सिरियल लागायची. त्याचे शीर्षकगीत तलत अझीज च्या आवाजात होतं. पूर्ण आठवत नाही, जेवढं आठवतंय तेवढं-

कहीं सफर हैं, कहीं रास्ता हैं मंजील का,
ये रात दिन की घुटन क्यूं, अजाब हैं दिल का,

(अजाब- जाणकारांनी हा शब्द चुकला असल्यास बरोबर शब्द सांगणे)

ती 'कशीश' सुदेश बेरी आणि मालविका तिवारी वाली.>>>> येस्स्स... मस्त होती ती. तो म्युजिकपीस मोबाइलवर रिंगटोन म्हणून ठेवायची खूप इच्छा आहे, पण कुठेच मिळत नाहीये. Uhoh

अजून एक "छत्रपती शिवराय" नावाची सिरियल (प्रवाहवरच्या सिरियलच्या खूप आधी) बहुतेक सह्याद्रीवर लागायची. अचानक मधेच कुठेतरी बंद केली.

शरद जांभेकरांच्या आवाजात त्याचं शीर्षकगीत होतं:-

राजाधीराज (जांभेकर),
महाराज(कोरस),
राजाधीराज(जांभेकर),
महाराज(कोरस)

शिवराय राजा, शिव छत्रपती,(जांभेकर)
कर्तव्यदक्ष, सिंहासनाधीश,(जांभेकर)

छत्रपती शिवराय (कोरस)

अप्रतिम शीर्षकगीत होते ! जांभेकरांच्या आवाजामुळे मस्त भारदस्त वाटायचं!

बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत
कसे रूजावे बियाणे माळरानी खडकात

बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर
लख्ख प्रकाश निर्मळ, त्यात कष्टाचा पाझर
हवी अंधारल्या राती, चंद्रकिरणांची साथ

कसे रूजावे बियाणे माळरानी खडकात

मिलिंद इंगळेने म्हटलेले गोट्याचे टायटल साँग

पुढेही कडव आहे.
काही वर्षांपुर्वी कुठल्याश्या इयत्तेच्या बालभारतीत पाहीलेल.

निंबुडा...इथे तुला दूरदर्शनवरच्या जुन्या सिरियल्सचे टायटल साँग्ज मिळतील! >>>
धन्स, मी_आर्या. Happy

मला ती 'वादळवाट' आणि 'गोट्या' अशी दोन्ही शिर्षकगीते आवडायची.

बीज अंकुरे अंकुरे काळ्या मातीच्या कुशीत,
कसे रुजावे बियाणे माळरानी, खडकात..... गोट्या

इटिवी वरील झोका........ही मालिका पण छान होती आणि त्याचे शिर्षक गीत माझ्या मते आता पर्यंत चे सर्वात लहान आहे........सरगम होती फक्त.............

बे धुंद मना ची लहर...............या मालिके चे सुध्दा शिर्षक गीत छान उडत्या चाली चे होते.......

जबान संभालके, जबान संभालके
जबान संभालके, जबान संभालके
जो चाहे कहो पर जरा देख भाल के
जबान संभालके, जबान संभालके

मै XXXXX का अफसर हा, हिंदी भाषा सीखता हां (इथे फुल्यांच्या जागी शिव्या नाहीत. Wink मला तो शब्द माहीत नाहीये. Wink )
हिंदी मेरी कच्ची, पर अ‍ॅक्टींग मेरी अच्ची
मै हांगकांग से आया बडी इतना डालर लाया
ए धीरे से कहो, टॅक्स वालोंसे बचो

कोई हिंदी कोई पारसी
कोइ रुसी तो कोई अरबी
कोइ ब्रिटिश राज का रायटर
तो कोइ मद्रासी अभिनेत्री

कोई XXXXX कोई कॅन्ट्रॅक्टर
मिलके बोले का खा गा
सब्की है यही अभिलाषा
मिलके सील्हे हिंदी भाषा

भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गाते
तू शिकविले जे ते....
भय ईथले संपत नाही... हे आणि
वादळवाटचे शिर्षक गीत तर भारीच आवडतात.

देख भाई देख पण आवडीचे

वैशाली सामंत ने गायलेले एका मालिकेचे शिर्षक गीत कुठले ते.. आता नवीनच असलेले सांगाल का..
तेही खुप मस्त वाटत ऐकायला Happy

Pages