Submitted by निंबुडा on 5 July, 2011 - 03:36
काही काही मालिका पडद्याआड जाऊनही त्यांचे शीर्षक गीत गुणगुणावेसे वाटते. जुन्या काळात जेव्हा आतासारखे सतराशे साठ उपग्रह वाहिन्यांचे पेव फुटलेले नव्हते तेव्हा मोजक्याच मालिका, कार्यक्रम लागायचे व लोकही न चुकता प्रत्येक भाग सुरुवातीचे शीर्षकगीत न चुकविता बघायचे. महाभारत, रामायण, लहान मुलांचे दानासूर (डायनॉसोर), मोगली, मराठीत असे पाहुणे येती, बोक्या सातबंडे इ. इ.
मी इथे माझी आवडती शीर्षकगीते लिहितेय. तुम्हीही लिहा.
मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषांमधल्या जुन्या/नव्या मालिका, मनोरंजनपर कार्यक्रम, लहान मुलांचे कार्यक्रम इ. पैकी ज्या कशाचे शीर्षक गीत तुम्हाला आवडते ते इथे लिहा. पूर्ण लिहिल्यास दुधार साखर! त्या निमित्ताने विस्मृतीत गेलेल्या शीर्षक गीतांना उजाळा देऊ.
युट्युब वर ही गीते available असतील तर इथे दुवा द्या (आणि दुवे घ्या) प्लीज.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
निंबुडा तो(साया) नितीश पांडे
निंबुडा तो(साया) नितीश पांडे >> धन्स, भरत. सैलाब का कुठल्यातरी सीरीयल मध्ये रेणुका शहाणेची धाकटी बहिण असते (बहुतेक फिरदौस दादी असे काहीतरी नाव आहे त्या अॅक्ट्रेस चे) तिच्या डॉक्टर नवर्याची भुमिका याने केलीये ना??? मला हा नितीश पांडे अॅज अॅन अॅक्टर खूप आवडतो. संयत आणि छान अभिनय.
स्टार प्रवाह वरचे बंध रेशमाचे कुणी पाहतं का? स्वप्नील बांदोडकर च्या आवाजातले गाणे फार सुरेख आहे.
पण मला कडव्यापासून पुढे आठवतेय. सुरुवातीच्या ओळी कुणाला येतायत का?
ध्यानी मनी नसताना
रस्ता मिळे नवा
जादू अशी झाली अलगद
हाती ये चांदवा
मन हलके बघ पाऊल ओले
सुख हे तळहाती आले
सारे सांगून गेले, हे बंध रेशमाचे
हे बंध रेशमाचे
मानसीचे टायटल
मानसीचे टायटल साँग
http://bollywood-mp3.com/music/manasi-zee-marathi_a7a864.html
कशी वेल्हाळ वेल्हाळ त्याला हवीशी हवीशी
सार्या सख्या सजणींचे मन मानसी मानसी
कुणी थोडी स्वप्नवेडी कुणी कर्तव्यकठोर
कुणा आकाशाची ओढ कुणा जमिनीचा घोर
कुणा जगण्याची धुंदी तरी धुंदीतही भान
कुणी स्वतःमध्ये मग्न तरी ढळते न ध्यान
अशा सख्या सजणींचे मन मानसी मानसी
आभाळमाया ??? येतंय का
आभाळमाया ??? येतंय का कुणाला??
दादा दादीकी कहानिया, सदियो
दादा दादीकी कहानिया, सदियो याद रहे
भूला नही कोई, बचपनमे सुनी
दादादादीकी कहानिया
अशोककुमार दादा आणि लीला मिश्रा दादी.
>>सैलाब का कुठल्यातरी सीरीयल
>>सैलाब का कुठल्यातरी सीरीयल मध्ये रेणुका शहाणेची धाकटी बहिण असते (बहुतेक फिरदौस दादी असे काहीतरी नाव आहे त्या अॅक्ट्रेस चे.
ह्यात तिचा दीर सलिल अंकोला होता तीच ना? झक्कास दिसायचा तो त्या सिरियलमध्ये.
तिच्या नवर्याचं अफेअर असतं वगैरे काहीतरी स्टोरी होती ती.
रेणुका आणि सलिल अंकोला वाली
रेणुका आणि सलिल अंकोला वाली सीरीयल वेगळी होती गं! बहुतेक कोरा कागज. त्यात रेणुका मोठ्ठ टिळा वगैरे लावून दाखवली होती. ती सीरीयल मी कधीही पाहिली नव्हती. मी वरच्या पोस्ट मध्ये लिहिलंय त्यात आलोक नाथ च्या रेणुका आणि फिरदौस दादी या २ मुली असतात. आलोक नाथ पहिल्या काही एपिसोड्स मध्येच ऑफ होतो. फिरदौस दादी डॉक्टरकीचे शिक्षण घेत असते. तिचे लग्न ज्याच्याशी होते तो लग्नानंतर लगेच ऑफ होतो. मग विधवा असलेल्या फिरदौस दादी ला तिच्या प्रोफेसरची भुमिका करणारा नितीश पांडे मागणी घालतो. असं काहीसं आहे. सैलाबच होती बहुदा ती सीरीयल.
सैलाब का कुठल्यातरी सीरीयल
सैलाब का कुठल्यातरी सीरीयल मध्ये रेणुका शहाणेची धाकटी बहिण असते (बहुतेक फिरदौस दादी असे काहीतरी नाव आहे त्या अॅक्ट्रेस चे. - ही बहुतेक इम्तिहान
ह्यात तिचा दीर सलिल अंकोला होता तीच ना? झक्कास दिसायचा तो त्या सिरियलमध्ये. तिच्या नवर्याचं अफेअर असतं वगैरे काहीतरी स्टोरी होती ती. : ही कोरा कागज : आशा पारेखची
सैलाब : सचिन खेडेकर, रेणुका शहाणे, प्राजक्ती देशमुख, रेणुकाच्या नवर्याच्या भूमिकेत आधी अजिंक्य देव होता. नंतर कोण ते आठवत नाही.
याचं टायटल साँग आही मी लिहिलंय :
अपनी मर्जी से कहां अपने सफर के हम हैं
रुख हवाओं का जिधर का है उधर के हम हैं (जगजीत सिंग)
सैलाब का कुठल्यातरी सीरीयल
सैलाब का कुठल्यातरी सीरीयल मध्ये रेणुका शहाणेची धाकटी बहिण असते (बहुतेक फिरदौस दादी असे काहीतरी नाव आहे त्या अॅक्ट्रेस चे. - ही बहुतेक इम्तिहान
>>>
येस्स, भरत परत एकदा धन्स
मेमरीचा लोचा झालाय चांगलाच !
खवय्ये मध्ये ते चमचमीत
खवय्ये मध्ये ते चमचमीत खाण्याचा रे<< नाहिहो चमचमीत खाण्याचा ते असं आहे
आणि रडूबाई अमृता सुभाषच्या अहसं चं साँग
मन माझे मोरपिशी स्वप्न जणू मन माझे शिशिरातील इंद्रधनू
हुंदक्यांची कुजबूज भावनांचे अलगूज
नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश
राखेतून मीच नवा घेतला आकार
उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार ओssssssओ
अवघाची हा संसार
'तिसरा डोळा' अशा नावाचा
'तिसरा डोळा' अशा नावाचा काहीतरी क्राईम रीलेटेड कार्यक्रम लागायचा ना? मला त्यातले 'तिसरा डोळाSSSSSS' इतकेच आठवतेय. मोदक कायम हे टायटल साँग 'एकसे पन्नासावा डोळाSSSSSS' किंवा 'एक हजार छत्तीस्सावा डोळाSSSSSS' असे तिसरा ऐवजी कुठलाही आकडा घालून गायचा. शिवाय ते "अधुरी एक कहाणी" च्या "भातुकलीच्या खेळामधली...." अशा शब्दांऐवजी मोदक कायम "माणुसकीच्या शेतामधली...." असे गात असे. हसून हसून पुरेवाट व्हायची.
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो हॅलो हॅलो
हॅलो हॅलो हॅलो इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर
रात्रंदिनी हो हो हो सौरक्षिणी
जागून जो हो हो हो शोधी ककुणा
पोलिस हा हो हो हो पोलिस हा
......??
.......गुन्हा......आ आ आ
हो हो हो
हॅलो हॅलो हॅलो
हॅलो हॅलो हॅलो इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर
हे घे निंबे , जडतो तो
हे घे निंबे ,
जडतो तो जीव
लागते ती आस
बुडतो तो सूर्य
उरे तो आभास
कळे तोच अर्थ
उडे तोच रंग
ढळतो तो अश्रू
सुटतो तो संग
दाटते ती माया
सरे तोच काळ
ज्याला नाही ठाव
ते तर आभाळ
घननीळा डोह
पोटी गूढ माया
आभाळमाया आभाळमाया
<<< रात्रंदिनी हो हो हो
<<< रात्रंदिनी हो हो हो सौरक्षिणी
ते संरक्षणी हवंय ,
<<< जागून जो हो हो हो शोधी ककुणा
पोलिस हा हो हो हो पोलिस हा
......??
.......गुन्हा......आ आ आ
हो हो हो.
<<< ......??
इथे सुरक्षिततेसाठी जागरूक हा हा हा ओ ओ ओ
असं होतं बहुतेक .
धन्स्, संपदा.
धन्स्, संपदा.
मानसीच्या टायटल साँग मध्ये
मानसीच्या टायटल साँग मध्ये
कुणा आकाशाची ओढ कुणा जमिनीचा घोर
कुणा जगण्याची धुंदी तरी धुंदीतही भान
कुणी स्वतःमध्ये मग्न तरी ढळते न ध्यान
संपदा थँक्स. वर गाळालेल्या
संपदा थँक्स. वर गाळालेल्या जागा भरल्या.
झी मराठी-"कळत-नकळत मन होई
झी मराठी-"कळत-नकळत
मन होई फुलांचे थवे
गंध हे नवे कुठुन से येती
मन पाऊल पाऊल स्वप्ने ओली
हुळहुळणारी माती
मन वार्यावरती झुलते
असे उंच उंच का उडते
मग कोणा पाहुन भुलते
सारे कळत नकळच घडते
सारे कळत नकळच घडते.:)
स्वप्ना, भरत धन्स!
स्वप्ना, भरत धन्स!
देवकी पंडीतने गायलेली सगळीच
देवकी पंडीतने गायलेली सगळीच टायटल सॉग्ज्स भारी आहेत
आभाळमाया, वादळवाट, अवघाची संसार, गुंतता हृदय हे आणि अजुनही असतील.
मला Friends आणि Mad about you
मला Friends आणि Mad about you चे टायटल साँग फार आवडते.
गुंतता हृदय हे: रात्र अंधारते
गुंतता हृदय हे:
रात्र अंधारते गूढ रानातूनी दाटले हे धुके
कावरे बावरे पक्षी झाडातूनी जाहले हे मुके
....(?) होई इथे जीवघेणा असा खेळ हा
मनाची मनाला लागतसे आस
प्रीतीच्या फुलाचा चांदणप्रवास
पाखरु जीवाचे अडकत जाते
सुटका न होते
गुंतता हृदय हे
गुंतता हृदय हे
मला ते डकटेल्सचं म्युझिक भारी
मला ते डकटेल्सचं म्युझिक भारी आवडायचं... नीटसं आठवत नाही..
जिंदगी तुफानी है.. ये है डकटेल्स...
गाडीया लेकर या हवाई जहाज..ये है डकटेल्स..
....
इतिहास बनाओ.. ..
...
असं काहीतरी.. कोणी पूर्ण देऊ शकेल काय ?
झी मराठी- कूलवधु माझी डोली
झी मराठी- कूलवधु
माझी डोली चालली गं दुर देशी नव्या गावा
तिथे सोबतीला येई माझ्या स्वप्नांचा रावा
तिथल्या चौकटीत शोधीन माझे नवे से आभाळ
तिथले ऊन पाऊस भरतील माझी ओंजळ
स्वप्न राही मागे आता व्यथा सतत उरात
नव्या उंबर्याची आस जागे तरीही मनात
एक नदी सारखी वाहते मी जणु
पाऊल खुणा ठेऊन मागे चालले मी कुलवधु.:)
हे हे हे हे चम्द्रकाम्ता कि
हे हे हे हे
चम्द्रकाम्ता कि काहानि ये माणा के है पुराणि
कुणाला ते सह्याद्री वर
कुणाला ते सह्याद्री वर लागणार्या दामिनी चे आठवतय का टायटल साँग..
सत्यता शोधण्या घेउनी लेखणी.. सज्ज ही दामिनी.. असे काहितरी होते..
मला त्या प्रत्येक दामिनी ला ती एक वीज तळपायची तेवढेच आठवतेय...
(No subject)
प्रत्येक दामिनी ला ती एक वीज
प्रत्येक दामिनी ला ती एक वीज तळपायची >>>
१>फार पूर्वी 'मुंबई दूरदर्शन'
१>फार पूर्वी 'मुंबई दूरदर्शन' ('सह्याद्री' नामकरण व्हायच्या आधी) महाराष्ट्र शासनाची एक मोठी जाहीरात दाखवायचे. संपूर्ण जाहिरातीत एक छान गाणं होतं. गायक होते श्री, चंद्रशेखर गाडगीळ, गाण्याचे बोल होते - कानाने बहीरा, मुका परी नाही... या एका गाण्या साठी ती पूर्ण जाहिरात पहायचो...
२> झी-हिन्दी सुरु झाल्यावर काही वर्षांनी त्यावर 'दरार' नावाची मालीका सुरू झालेली. त्याचं टायटल सॉन्ग रिश्तों में दरार आयी... गायक्-संगीतः जगजीत सिंग... अत्यंत प्रीय...
३>हिन्दि मालिका 'हसरतें' - याचं टायटल सॉन्ग देवकी पंडीत यांनी गायलेलं - हसरतें ही हसरतें हैं, और क्या बात है... अतीशय आवडतं टायटल सॉन्ग
४> हिन्दी मधील एक मालिका (नाव आठवत नाही), कलाकार - विक्रम गोखले, सुप्रीया पिळगावकर, तुषार दळवी... या मालिकेला टायटल सॉन्ग नव्हते, पण सुरुवातीचे म्युझिक आणि संपूर्ण मालिकेमधे वापरलेले म्युझिक पिसेस अप्रतीम... हे सगळे म्युझिक पिसेस गोळा करुन, गावी एका एकांकिकेला पार्श्व-संगित दिलेले, आणि स्पर्धे मधे उत्कृष्ट पार्श्वसंगिताचे बक्षीस मिळवलेले...
५> भारती आचरेकरची 'राधीका' आठवतेय? मालिकेचे नाव पुन्हः एकदा विसरलो... त्यातले Xylo-Phone चे पीसेस अतीशय सुन्दर होते....
साम टीव्ही वर 'मधुरा' नावाचा
साम टीव्ही वर 'मधुरा' नावाचा मुलाखती चा कार्यक्रम लागतो. त्याच टायटल साँग पण छान आहे.
कानाने बहिरा, मुका परि
कानाने बहिरा, मुका परि नाही>>>> वा वा, क्या बात! किती दिवसांनी ऐकलं या गाण्याबद्दल...
तसंच अजून एक गाणं होतं........
पूरब से सूर्य उगा, फैला उजीयारा
जागी हर दिशा दिशा, जागा जग सारा.
Pages