Submitted by निंबुडा on 5 July, 2011 - 03:36
काही काही मालिका पडद्याआड जाऊनही त्यांचे शीर्षक गीत गुणगुणावेसे वाटते. जुन्या काळात जेव्हा आतासारखे सतराशे साठ उपग्रह वाहिन्यांचे पेव फुटलेले नव्हते तेव्हा मोजक्याच मालिका, कार्यक्रम लागायचे व लोकही न चुकता प्रत्येक भाग सुरुवातीचे शीर्षकगीत न चुकविता बघायचे. महाभारत, रामायण, लहान मुलांचे दानासूर (डायनॉसोर), मोगली, मराठीत असे पाहुणे येती, बोक्या सातबंडे इ. इ.
मी इथे माझी आवडती शीर्षकगीते लिहितेय. तुम्हीही लिहा.
मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषांमधल्या जुन्या/नव्या मालिका, मनोरंजनपर कार्यक्रम, लहान मुलांचे कार्यक्रम इ. पैकी ज्या कशाचे शीर्षक गीत तुम्हाला आवडते ते इथे लिहा. पूर्ण लिहिल्यास दुधार साखर! त्या निमित्ताने विस्मृतीत गेलेल्या शीर्षक गीतांना उजाळा देऊ.
युट्युब वर ही गीते available असतील तर इथे दुवा द्या (आणि दुवे घ्या) प्लीज.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझं आवडतं मालिका
माझं आवडतं मालिका शीर्षकगीत...
मालिका : किले का रहस्य
ये रहस्य है किले का
ईस मे मत जाना.......
धन्स, उदयवन वैशाली सामंत ने
धन्स, उदयवन
वैशाली सामंत ने गायलेले एका मालिकेचे शिर्षक गीत कुठले ते >>
कळत..नकळत मालिकेचे शीर्षकगीत म्हणताय का?
ते असे आहे:
मन होई फुलांचे थवे, गंध हे नवे, कुठुनसे येती
मन पाऊल पाऊल हळवे, ओली हुळहुळणारी माती
मन वार्यावरती झुलते
असे उंच उंच का उडते
मग कोणा पाहून भुलते
सारे कळत-नकळतच घडते
सारे कळत-नकळतच घडते
या गाण्यात एक कडवेही आहे, पण शीर्षकगीत म्हणून दाखवताना ते वगळतात. त्याच्या ओळी अशा आहेत.
कुणी तरे मग माझे होईल
हात घेऊनी हाती
कुशीत येऊन मोजू चांदण्या
काळोखाच्या राती
उधळून द्यावे संचित सारे
आज मनी जे जपले
साथ राहू दे जन्मोजन्मी
असेच नाते अपुले
असेच नाते अपुले
मन होई फुलांचे थवे....
माझं आवडतं मालिका
माझं आवडतं मालिका शीर्षकगीत...
मालिका : किले का रहस्य
ये रहस्य है किले का
ईस मे मत जाना >>>>
हे शीर्षकगीत बहुतेक गायक सकाळी सकाळी गुळण्या करतानाच घाईघाईत रेकॉर्ड झालं होतं!
अरे, मस्त बीबी आहे हा......
अरे, मस्त बीबी आहे हा...... मला आभाळमाया, वादळवाट, पिंपळपान (सगळ्यात 'ळ' आहेच :फिदी:) यांची शीर्षक गीते आवडतात.... विशेष करून पिंपळपान.....
व्यथा वेदना, शब्दामधूनी
गीतामधूनी वाजती छंद
जगण्यामधल्या अर्थासंगे
बहकून गेले अक्षररान
वार्यावरती थिरकत आले..... आठवणींचे पिंपळपान..... पिंपळपान..
फार सुंदर होतं ते गाणं... आणि सुरेश वाडकरच्या आवाजात तर अप्रतिम वाटायचं अशोक पत्कींचं संगीत... मला शब्द नीटसे आठवत नाहियेत.
स्टार प्रवाह वरची राजा
स्टार प्रवाह वरची राजा शिवछत्रपती ही मालिका मी केवळ त्याचे टायटल साँग ऐकायला टीव्ही लावत असे म्हणून अधले मधले एपिसोड्स पाहत असे. याचे सर्व शब्द लिहिल का कुणी? >>>
हे दीदींनी गायलेले... http://lyricsindia.net/songs/show/328
आणि हे राजा शिव छत्रपती मालिकेचे शिर्षकगीत... http://ekmarathimanoos.blogspot.com/2009/09/raja-shivchhatrapati.html
पूर्वी दूरदर्शन असताना "अहो,
पूर्वी दूरदर्शन असताना "अहो, ऐकलंत का?" नावाची विनोदी मालिका लागायची. त्याचे शीर्षकगीत असे होते.
चाळ असो वा असू दे सोसायटी
घरोघरी हेच बोल कानी पडती
अहो, ऐकलंत का? (एक बाईची ही हाकाटी इथे ऐकू येत असे. )
माजघर किंवा स्वयंपाकघर
अहो, खोली किंवा न्हाणीघर
कुणी तरी म्हणत असेल
अहो, ऐकलंत का?
रागाचा व लोभाचा
कुठल्याही मुद्द्याचा
हाच शब्द प्रारंभाचा
हाच शब्द, हाच शब्द,हाच शब्द..... प्रारंभाचा
पोटली बाबाकी नामक लहान
पोटली बाबाकी नामक लहान मुलांचा कार्यक्रम लागत असे.
"आया आया छेनुवाली छुन्नु का बाबा..." अशा काहीतरी अगम्य ओळी होत्या. येतंय / आठवतंय का कुणाला?
मराठी सारगमचे शीर्षकगीत छान
मराठी सारगमचे शीर्षकगीत छान आहे.
गाईन गीत सुरेल नवे
जे रसिकांचे मन रिझवे
संगीताने मन भरले
हे स्वप्न सुरांचे अवतरले
रंगले, गुंगले, नाचले, दंगले
तन मन गुणगुणले
सा रे ग म प, "****" सा रे ग म प....
(इथे फुल्यांच्या जागी त्या त्या वेळचे कार्यक्रमाचे स्पॉन्सरर्स चे नाव असते.)
अरे आणि सगळ्यात फेमस आणि लहान
अरे आणि सगळ्यात फेमस आणि लहान मुलांचं आवडतं 'मोगली - जंगल बुक्'चं गाणं विसरलात का?
जंगल जंगल बात चली है, पता चला है
अरे चड्डी पहेनके फुल खिला है, फुल खिला है
हे माझ्या लहानपणी माझं आणि आता मुलाचं पण आवडतं शिर्षकगीत आहे.
छेनुवाली छुन्नु>>>> नाही...
छेनुवाली छुन्नु>>>> नाही... झेनुवाली झुन्नु का बाबा, किस्सोंका कहानीयोंका, गीतोंका ठाबा (???) असं काहीतरी मोहम्मद अजीज (मर्द टांगेवाला फेम) का कोणीतरी शिंगर गायचा. आणि मग 'आया रे बाबा' असं रेकायचा...
आणि दुसरं खुप खुप शिर्षक
आणि दुसरं खुप खुप शिर्षक संगित होतं 'मालगुडी डेज' - 'तनाना तनाना ना, तनाना ना ना'
आठवलं?
निंबे घुटनचे टायटल साँग हे
निंबे घुटनचे टायटल साँग हे घे
रवा हैं कश्ती मगर हर तरफ अंधेरा हैं
किसीका दोष नही यह कुसूर मेरा हैं
बुझा हैं मेरेही हाथो चिराग साहिलका
कहिं सफर है कहिं रासता हैम मंजिल का.....
डीडीवर पूर्वी इम्तजार और सहि म्हणूनही मालिका होती..ग्रेसी सिंग होती त्यात
तिचे टायटल साँग जगजित सिंगने गायले होते..आठवले की पूर्ण लिहिते इथे
दानू दानासोर चं पण छान
दानू दानासोर चं पण छान होतं
चिपकली के नाना है चिपकली के है ससूर
दानासूर दानासूर दानासूर
गाते है तराने मे दिम तननन दानासूर
पूर्वी डीडी वर 'चुनौती'
पूर्वी डीडी वर 'चुनौती' नावाची एक सिरियल होती, त्याचं पण टायटल साँग छान होतं
मन एक सिपी है
आशा मोती है
हरपल जीवन का... एक चुनौती है
वादळवाट चं ही मस्त
वादळवाट चं ही मस्त होतं..
महाश्वेताचं टायटल
भय इथले संपत नाहि मग तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गाते तू मला शिकविले गेय ते
ते झरे चंद्र सजणांचे ती धरती भगवी माय
झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया
तो बोल मंद हलकासा आयुष्य स्पर्शूनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला
स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे
भय इथले संपत नाही
मिट्टी के रंग मिट्टी के
मिट्टी के रंग मिट्टी के रंग
दुनिया बदल गयी ..इन्सां बदल गये
बदले नही कभी ये मिट्टी के रंग...मिट्टी के रंग
हे आठवतय का कोणाला ?
भुंगा मित एकदम चुक ये है
भुंगा मित
एकदम चुक
ये है अभिशक्त किला
सदियोंsss पुराsssनाssss
भुल के भी कधी इस के अंदर
मत जाsssनाssss मत जाsssनाssss
अॅं!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
आणि किल्ल्यावरून पडणार प्रेत
मन एक सिपी है आशा मोती
मन एक सिपी है
आशा मोती है
हरपल जीवन का... एक चुनौती है
सोने ना दे आग सिनेकी कर ले लगनसे तू प्यार
आवाज देके बुला ले तू तेरे लिये है बहार
जो बन जाता है धूल राहोंकी उसकी दिवानी मंजील होती है
हरपल जीवन का... एक चुनौती है
सही!!!!!
बुनियादचं टायटल सॉन्ग, तसंच
बुनियादचं टायटल सॉन्ग, तसंच सुबहचं
ऐ जमाने तेरे सामने आ गये, आजके दौरके नौजवा आ गये
दरपे तेरे बनके सुरज लेके सुबह आ गये
इस सुबहको कर सलाम
मौत और जिंदगी दोनो हैरान है
वक्तको मोड दे हम वो तुफान है
ऐ जमाने तेरे सामने आ गये.....
>>ये है अभिशक्त किला अभिशक्त
>>ये है अभिशक्त किला
अभिशक्त नाही, अभिशप्त म्हणजे शापित....आम्ही भावंडं तेव्हा खूपच लहान होतो. माझी एक मावसबहिण हाताने चेहेरा पूर्ण झाकून बोटांच्या फटीतून ही सिरियल पहायची.
स्वप्ना, सुबह..... भारीच!
स्वप्ना, सुबह..... भारीच! :आठवणीत हरवलेली बाहुली:
नंतर प्रिया तेंडुलकरने काम
नंतर प्रिया तेंडुलकरने काम केलेली स्वयंसिध्दा
एक दफा तो अपना जीवन मुझको खुदही जीने दो
लिख लेने दो किस्मत अपनी, होना है जो होने दो
दुखके दाने, सुखके मोती
सब है मेरी आखोंमे
अबकी बार तो मुझको अपना आचल भरके रोने दो
मध्ये अजून एक कडवं असावं बहुतेक, आता आठवत नाही. ते "आचल भरके रोने दो" शब्द तेव्हाही आवडायचे, आता मोठं झाल्यावर अजून आवडतात.
आणि एक खोज म्हणुन सिरियल
आणि एक खोज म्हणुन सिरियल होती, त्याला हेमंत कुमारांचं सिनेमा मधलं गाणं होतं. नक्की आठवत नाही. मिस्टरी होती. मौसमी होती त्या मधे. आणि आपल्या शाहीद्ची आई.
विक्रम गोखलेंचा डबलरोल असलेली
विक्रम गोखलेंचा डबलरोल असलेली 'प्रतिबिंब' नावाची मालिका आठवते का?
बिंबातून प्रतिबिंब जन्मते,
प्रतिबिंबित हे बिंब(की चिंब??) जाहले... असे काहीतरी शब्द होते!
फायरबॉल एक्सएल५ (स्टीव्ह
फायरबॉल एक्सएल५ (स्टीव्ह झोडियॅक, व्हिनस, जुनी कुत्रा) म्हणून एक मुलांसाठी सिरियल लागायची. त्याचं क्लोझिंग टायटल माझ्या भावाने मला मागल्या वर्षी पाठवलं होतं आणि आम्ही दोघे खूप हसलो होतो. हे घ्या http://www.youtube.com/watch?v=nXGGuqXB8h4.
कुणीतरी वादळवाट, आभाळमाया च
कुणीतरी वादळवाट, आभाळमाया च लिहा न..छान होती दोन्ही.
उन पाउस
ऋतु सोबतीने सारी जुनी झाडे नवी होता
पान फुलं सांगतात उन पावसाची कथा
सुख संसारी उन्हाचे
दु:ख पावसाचे गावे
अशा जगण्याला द्यावी
किती नवी जुनी नावे
अशा सोसण्याची सय
किती व्हावी होता होता
उन पावसाची कथा
त्याला हेमंत कुमारांचं सिनेमा
त्याला हेमंत कुमारांचं सिनेमा मधलं >>>> खामोशी सिनेमातलं 'तुम पुकार लो'
सारे सुरो का हे ये ही
सारे सुरो का हे ये ही मिलन
गितो से मेहेका हे सारा चमन
आओ सब मिल गाए
सारे गा मा पा [सोनु निगम चा बर का!!! ]
http://www.zeemarathi.com/Zee
http://www.zeemarathi.com/ZeeMarathi_Archives.aspx वर आभाळमाया, वादळवाट वगैरेची लिंक आहे, कदाचित एमपी३ मिळतिल.
थोडी सागरनिळाई, थोडे शंख नि
थोडी सागरनिळाई, थोडे शंख नि शिंपले
कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले.
कधी उतरला चन्द्र तुझ्या-माझ्या अंगणात,
स्वप्न पाखरांचा थवा विसावला ओंजळीत.
कधी काळोख भिजला कधी भिजली पहाट
हुंकारला नदी काठ
कधी हरवली वाट...
वारया-पावसाची गाज,
काळी भासे गच्च दाट.
कधी धुसरं धुसरं,
एक वादळाची वाट..
Pages