सारेगमप लिटल चॅम्प्स (मराठी)

Submitted by योगी on 12 January, 2009 - 16:21

१२ जानेवारी:
पहिली फेरी:

आर्या - खरा तो प्रेमा... अप्रतिम Happy
प्रथमेश - उठी उठी गोपाला... ठिक ठिक... फारसं नाही आवडलं. अवधूत म्हणाल्याप्रमाणे खरंच आवाजात ताण जाणवत होता...
मुग्धा - कोटी कोटी रुपे तुझी... खूप दमल्यासारखी गायली (असं मला वाटलं)
कार्तिकी - पाणगौळण... छान गायली, आधी हीसुद्धा दमल्यासारखीच वाटत होती. वन्स मोअरला मात्र जास्त छान गायली. गाणं झकास होतं आणि गाताना कार्तिकी ज्या प्रकारे एक भुवई उडवायची तेही फार छान होतं Happy
रोहित - येशील येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील - मस्त गायला पोरगा. ह्याने पुर्ण कार्यक्रमात जी प्रगती केली आहे ती खरंच कौतुकास्पद आहे.

दुसरी फेरी:

आर्या - मागे उभा मंगेश... नेहमीप्रमाणेच... खूपच छान, खूपच छान...
मुग्धा - नारायणा रमारमणा... शब्दातीत अप्रतिम. पहिल्या गाण्यात दमलेली वाटणारी मुग्धा ती हीच का असं वाटलं. तिने गाण्याची सुरुवातच इतकी जबरदस्त केली की खरी मुग्धा काय आहे ते लक्षात यावं!
कार्तिकी - चल गं सखे पंढरीला... झक्कास... अगदी तिच्या स्टाईलमधे गायली...
रोहित - ही दुनिया माया जाग मनुजा जाग जरा... छान गायला. आवडलं! अवधूतने अगदी नेमक्या शब्दांत सांगितलं त्याच्या गाण्याविषयी... इंडियन आणि वेस्टर्न स्टाईलमधला फरक...
प्रथमेश - मी हाय कोली... त्याच्या नेहेमीच्या स्टाईलपेक्षा एकदम वेगळं गाणं... आख्खा स्टुडियो डोक्यावं घ्येतलाव की वो प्वोरानं... भारती आचरेकर, राणी वर्मा (माणिक वर्मांच्या कन्या) आणि विजय कदम... एवढंच नव्हे तर सगळे प्रेक्षक धमाल नाचत होते... प्रथमेशमधला हा बदल खूपच सुखद धक्का होता...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि कोण म्हणाल होत इथे कि सरेगमप मराठी चे जजेस दिसण्या बद्दल नाही बोलत? >>> मी म्हणालो होतो... IMO असं लिहून मी काहिही बोलू शकतो नाही का?? Proud

'कशाला उद्याची बात, कशी करु स्वागता, अंगणी माझ्या मनाच्या, प्रेमा काय देउ मी तुला, रुणुझुणुत्या पाखरा' >>>>> ह्यात अजून दोन गाणी म्हणजे स्वप्नातल्या कळ्यांन्नो आणि छबीदार छबी... एकदम बेस्ट होती दोन्ही गाणी... स्वप्नातल्या कळ्यांन्नो मधे तिने लिहिलेल्या भावनांचं उषाताईंनी खूप कौतूक केलं होतं आणि आशाताईंच्या ८५% असं म्हंटलं होतं..

शिवाय अवंतीच्या अबके सावन ला पण जजेस नी ठिकठिक च म्हंटलं होतं.. अवंतीची त्या स्टाईलची सगळीच गाणी मस्त होती.. कैसी पहेली जिंदगानी, कांदेपोहे पण जबरी होती... शमिका, शाल्मली आणि अवंती खरच फायनल ला हव्या होत्या..

आणि मी आधी म्हंटलं तसं रागेश्री बैरागकर पण.. तिचं फायनल च्या आधीच eliminate होणं ही पण गंमतच होती... Jr. मधली one of the best ती...

IMO चा अर्थ काय?
...;
आपला, लिम्बुटिम्बु

IMO चा अर्थ काय??>>>>
इन माय ओपिनिअन... (मा.म. ....माझ्या मते :))

-->-->-->-->-->-->-->-->-->
बुटक्यांच्या या देशात...आम्ही उंच माणसे..

झी मराठीच्या अधिकार्‍यांनी अनधिकृतपणे केलेला खुलासा:-
आर्या, प्रथमेश आणि मुग्धा यांची सांपत्तीक स्थिती चांगली असल्याने तसेच आर्या कदाचित पुढील शिक्षणासाठी परदेशातही जाण्याची शक्यता असल्याने या बक्षीसाचा जास्तीत जास्त चांगला ऊपयोग कार्तिकीच करु शकेल या उद्देशाने तिला विजेती ठरवली आहे. हे बक्षीस मुलांच्या पुढील सगीत शिक्षणासाठी उपयोगी ठरावे हा सदहेतू यामागे आहे.

ठिक आहे. उत्तर काही अंशी पटणारे आहे. पण मग हाच criteria लावायचा तर रोहीतचं काय ? त्या particular दिवशी आणि आधीच्याही काही भागांमध्ये काही गाणी रोहीत (कार्तिकीपेक्षाही) अप्रतिमच गायला होता. रोहीत हा आईवेगळा मुलगा आहे. त्याचे वडील एका खाजगी कंपनीत नोकरी करत होते. पण या कार्यक्रमाच्या निमीत्ताने सतत रोहीत बरोबर रहावं लागत असल्याने त्यांनी नोकरीही सोडली आहे. सांपत्तीक निकषच जर लावायचा तर मग रोहीत का नाही ? (परवाच्या क्रिकेट मॅचमध्ये दोघे पठाण छान खेळले पण युसुफने एक बळी जास्त मिळवल्याने त्याला सामनाविर ठरवले गेले.) हे उदाहरण मी सहज सुचलं म्हणुन दिलं नाही तर पुन्हा काही जणांना माझ्या अकलेबद्द्ल चर्चा करायला विषय मिळेल.

शेर्लॉक, हा खुलासा कुठे झाला? म्हणजे infomal इ-मेल, प्रत्यक्ष, ओळखील्या कोणी केला की कसा? मी अर्थातच identity/ proof मागत नाहिये..कारण तुम्ही अनधिकृतपणे असं आधीच म्हणताय... फक्त एक curiosity..

अनधिकृतपणे का होईना पण झी मराठी वाल्यांनी हे मान्य केलच शेवटी की कार्तिकी ला बक्षिस देण्यामागे इतर कारणं होती आणि निव्वळ टालेंट हे नाही... !!
ठिक आहे.. पटण्याजोगं कारणं आहे..

माझ्यामते आता रोहीत का नाही हा वाद घालण्यात अर्थ नाही... कारण झी वाल्यांनी ह्याचा विचार केला असेल.. आणि ते अनधिकृतपणे ह्याचा ही खुलासा करू शकतील...

झी मराठीच्या अधिकार्‍यांनी अनधिकृतपणे केलेला खुलासा:- Rofl
मलाही एक असाच 'अनधिकृत खुलासा' उद्या कळणार आहे!!!
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

>>>> मलाही एक असाच 'अनधिकृत खुलासा' उद्या कळणार आहे!!!
च्यामारी, उद्यापर्यन्त हे "कोलित" विझुन जाईल की रे भो! Proud DDD
...;
आपला, लिम्बुटिम्बु

माझे मित्र श्री. दिपक जामखेडकर हे संगीतकार श्री. श्रीनिवास खळे यांचे निकटवर्तीय आहेत. प्रत्यक्ष कार्यक्रमालाही ते खळेकाकांबरोबर त्यांनी दिलेल्या पासवरच उपस्थित होते. आपल्याला जे टी.व्ही. वर जे थेट प्रक्षेपण म्हणुन दाखवले जात होते ते प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या तास-सव्वा तास ऊशीरा होतं होतं. रात्री साधारणपणे १०:३० च्या सुमाराला मला श्री. जामखेडकर यांनी फोनवरुन कार्तीकीच्या विजयाची बातमी कळवली होती. त्यानंतरही त्यांनी मुद्दाम थांबून संगीतकार कौशल ईनामदार (जे अथपासुन या कार्यक्रमाशी संबधीत आहेत) यांच्याशी थेट आणि दिग्दर्शक श्री. राजन डांगे यांच्याशी श्री. खळेकाकांमार्फत चर्चा केली. या चर्चेतुनच मला ही माहिती मिळाली आहे. मी पहील्यापासुनच काही लपविण्याच्या (identity सकट) विरोधात आहे. त्यामुळे ईथे लिहीलेली सगळी नावे खरी आहेत.

"माझ्यामते आता रोहीत का नाही हा वाद घालण्यात अर्थ नाही..."
खरं आहे. यातला फोलपणा मलाही मान्य आहे. पण जे आपल्याला पटलं नाही ते कुठेतरी व्यक्त करणे हा मानवी स्वभाव आहे. आणि मायबोलीवरची माणसं ही आपली माणसं आहेत.

योग, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मी जवळपास वर्षभर काही चर्चेत भाग घेतला नव्हता. पण धर्म आणि जातीवरुन चालणारं राजकारण हे माझे पोटतिडीकीचे विषय आहेत. आणि या प्रकरणात मला १००% राजकारणच दिसलं, म्हणून मी यात पडलो. बाकी काही नाही.

लिंब्याभाउ,तुम्ही तेल टाकत रहा,कोलीत अजीबात विझणार नाही Proud
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

>>>> मी पहील्यापासुनच काही लपविण्याच्या (identity सकट) विरोधात आहे
मान्य, जीवनातल्या फार मोठ्या भागात लपवालपवी असूच नये!
पण, जीवनातली काही अन्गे अशीही आहेत जिथे त्याशिवाय पर्याय नाही, इतका की ती अन्गे कोणती याचीही चर्चा उघडपणे होऊ शकत नाही! असो, या बीबीचा विषय नाही
तु काहीही न लपवता जे उघड केलेस त्यामुळे बरेच खुलासे झालेत! Happy होप सो, की तू नाव घेतलेल्या व्यक्ती या तुझ्या खुलाशामुळे अडचणीत येवु नयेत! Happy

आगाऊ, माझ्या आधी शेरलॉक ने टॅन्करभर पाणी ओतलय, ते बघ आधी! जमतय का पुसायला.....! Proud
...;
आपला, लिम्बुटिम्बु

शेर्लॉक ह्यांनी केलेला खुलासा बरोबर आहे असे मानले तर (नल हायपॉथिसीस):
त्यांनी दिलेले कारण हे 'ऑब्विअस/जातीय राजकारण' मधे बसते का?

"होप सो, की तू नाव घेतलेल्या व्यक्ती या तुझ्या खुलाशामुळे अडचणीत येवु नयेत!""

नाही येणार. कारण एकतर ईथली सगळी माणसं आपली आहेत. आणि ज्यांनी ही कारणं दिली आहेत ते झी मराठीचे अधिकृत प्रवक्ते नाहीत. म्हणूनच मी या खुलाश्याला "अनधिकृत खुलासा" असे आधीच म्हटले आहे.

"त्यांनी दिलेले कारण हे 'ऑब्विअस/जातीय राजकारण' मधे बसते का""

मला तरी असंच वाटतं. कारण तोंडावर आलेल्या निवडणूका आणि त्यात सत्ताधारी पक्षाचा एक भाग असलेला जातीय पक्ष. "राष्ट्रवादी आणि सपा यांची होऊ घातलेली (अभद्र) युती" ही आजची ताजी बातमी आहे.

>>> त्यांनी दिलेले कारण हे 'ऑब्विअस/जातीय राजकारण' मधे बसते का?
अर्थात! अर्थातच बसते! Proud
कमकुवत आर्थिक स्थिती असो वा अपन्ग असो वा सवर्णेतर असो, कोणच्याही कारणाने "वेगळी वागणूक" मिळाल्याचे जेव्हा सिद्ध होते, सगळ्यान्सहित बहुसन्ख्यान्ना जाणवते, त्यालाच वीसाव्या शतकाच्या अखेरी अखेरीला नि एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला "रिझर्वेशन" म्हणतात, बर का भाऊ! Happy चु. भु. दे. घे.
त्याला माझा विरोध नाही! झाल ते चान्गलच झाल! होऊ दे की भल त्या मुलिच! Happy काय फरक पडतो?
विरोध होता नि आहे तो "ताकाला जाऊन भान्ड लपविण्याच्या" ढोन्गी वृत्तीला! Happy
हे आधीच स्पष्ट केले अस्ते झी ने तर वाद उभाच राहिला नसता! न स्पष्ट करण्यामागे "ढोन्गी" पणा वा "मजबुरी" वा "दिलखुलासपणा-प्रामाणिकपणा नसणे" या व्यतिरिक्त काही कारण नाही!
असो, हे आपले माझे मत बर का! काय म्हणायच ते??? IMO Proud
...;
आपला, लिम्बुटिम्बु

sherloc,

तुमच्या पोस्ट बद्दल एव्हडच म्हणता येईल की अनधिकृत खुलासा हा अधिक्रूत खुलाशापेक्षा अधिक धोकादायक ठरु शकतो कारण उद्या आणखिन कुणी भलताच कुठला अनधिकृत खुलासा घेवून येईल.. तेव्हा त्यास प्रमाण धरण्यात काही अर्थ नाही. मी फक्त झी चे संचालक वैद्य यांचा मटामधील अधिकृत खुलासा याही आधी इथे वर दिला आहे.. त्यातून बरेच काही स्पष्ट होतेच. आणि साम्पत्तिक स्थिती परदेशी प्रयाण हेच criteria लावायचे असले तर आधी तसे घोषित करा मग बघु किती समस चा धंदा होतो.
यांचे खायचे दात वेगळे अन दाखवायचे वेगळे असतात हे तुम्हालाही माहित असेलच..
एक सुजाण प्रेक्षक म्हणून जोपर्यंत आपण झी सारख्या business house ला जाब विचारत नाही, कायद्याने त्यांन्ना जाब द्यायला भाग पाडत नाही तोवर हे असले अगम्य निकाल, अनधिकृत खुलासे (सारवासारव) अन फसवणूक होत राहणार आहे.. तेव्हा तुम्ही नित्त्य नेमाने येत चला.
मला स्वताला यात जातीय राजकारण नाही पण धंदाकारण निश्चीत दिसते. हा आता निवडणूका तोंडाशी असल्याने वड्याचं तेल वांग्यावर जाणं काही नविन नाही Happy
तन्या,
अरे अजूनही तो obvious शब्द आहेच का इथे..? Happy

आपण थेट प्रक्शेपण म्हणुन कार्यक्रम रात्री उशिरा पर्यंत पाहत अस्लो तरी माझ्या माहीती प्रमाणे निकाल रात्री १०:३० वा. जाहीर केला गेला. खरेतर ९:०० वा. sms ची संख्या आणी थोड्या वेळाने जजेस चे मार्क्स झी वाल्यांना कळुन चुकले होते. त्यामुळे जो पर्यंत कूणी ०९:३० पुर्वि हा निकाल मला माहीत होता असे छाती ठोकपणे सांगत नाही तो पर्यंत झी ने partiality केली असे म्हणता येणार नाही.
===================
जात नाही ती 'जात'

>>जो पर्यंत कूणी ०९:३० पुर्वि हा निकाल मला माहीत होता असे छाती ठोकपणे सांगत नाही तो पर्यंत झी ने partiality केली असे म्हणता येणार नाही.>> एक्झॅक्टली.
त्यापेक्षाही मुद्दा हा आहे की असल्या अनधिकृत खुलाशांनी काहीच सिद्ध होत नाही किंवा सत्यही प्रकाशात येत नाही.
मेगाफायनलच्या आद्ल्या दिवशीपर्यंत कार्तिकि आवडत होती पण ती अंतिम विजेती ठरल्यावर ती एकदम खटकायला लागली असे जर आपले झाले असेल तर त्याचे खरे कारण प्रत्येकाने आपल्याच मनाला विचारुन पहावे,ज्याचे जे उत्तर असेल त्याच्याशी प्रामाणिक राहील्यास कसलीच 'ताकाची भांडी' लपवायची वेळ येणार नाही.
शेवटी प्रत्यक्ष मनातले आणि समाजात व्यक्त करायचे IMO किती वेगळे असावे किंवा ठेवावे हा ज्याचा त्याचा प्रश्न!!
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

मला तरी निकाल अनपेक्षित वाटला नाही. कॉलबॅकमधुन परतल्यावर जेव्हा कार्तिकीला वरचा नी मिळाला तेव्हाच मला कळले होते की निकाल काय असणार आहे. मी तसे याच बीबीवर लिहिलेही होते.
असो...
दोन्-एक वर्षांत कळलेच कौन कितने पानीमें है...
शेरलॉक म्हणतात त्याप्रमाणे जर झी टीव्हीची पॉलिसी असेल तर पुढच्या वेळी त्यांनी केवळ गरजु स्पर्धकांनाच संधी द्यावी, बाकीच्यांना स्पर्धेत उतरवुच नये.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
झुळूक आणखी एक, आणखी एक पान गळले..

आर्या, प्रथमेश आणि मुग्धा यांची सांपत्तीक स्थिती चांगली असल्याने तसेच आर्या कदाचित पुढील शिक्षणासाठी परदेशातही जाण्याची शक्यता असल्याने या बक्षीसाचा जास्तीत जास्त चांगला ऊपयोग कार्तिकीच करु शकेल या उद्देशाने तिला विजेती ठरवली आहे. हे बक्षीस मुलांच्या पुढील सगीत शिक्षणासाठी उपयोगी ठरावे हा सदहेतू यामागे आहे.
<<< हा हा हा..गरजु स्पर्धकाला चॅरिटी म्हणून झी ने कित्येक करोडोंचा बिझनेस केला त्यातून काही द्यायचे, किंवा गरजु म्हणून पाचही जण्यांच्या वाटेची रोख रक्कम तिला द्यायची, पण निदान मानाची ट्रॉफी मात्र 'डिझर्विंग' गायिकेला ( गरजु नाही) द्यायला हवी होती .(पुन्हा एकदा IMO)

धन्यवाद sherloc....
खूपच सुन्दर लेख आहे... Wink

-->-->-->-->-->-->-->-->-->
बुटक्यांच्या या देशात...आम्ही उंच माणसे..

शेरलॉक, या लेखासाठी मनापासून धन्यवाद.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

धन्यवाद श्री. टोकेकरांना द्या. मी देखील दिलेत. एका झटक्यात मनातली सारी किल्मीषं दुर झाली. कुणीतरी अशी एक सणसणीत चपराक देऊन डोकं ठिकाणावर आणणारं पाहीजेच बाबा. लहान मुलांच्या भांडणात आणि लहान मुलांच्या कार्यक्रमात मोठ्यानी पडू नये हे परत एकदा शिकवलं त्यांनी.

खूप सुंदर लेख ! इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद ..
इथल्या सगळ्यांनीच वाचावा असा .
-----------------------------------------
सह्हीच !

अतिशय सुंदर लेख ! thanx for sharing !

ही चर्चा वाचल्यानंतर YouTube वर डिजे नी दिलेल्या आणि बाकिच्या लिन्क्स पाहील्या. काय सुंदर गातात ही मुलं! अंतिम फेरीतले पाचच नव्हे तर अवंती, शाल्मली, शमिका यांचीही गाणी खूप आवडली. सगळीच मुलं खूप आत्मविश्वासानं गात होती. वरच्या लेखात म्हटल्याप्रंआणे खरच या मुलांनी खूप आनंद दिला. सर्वांना खूप खूप आशिर्वाद आणि शुभेच्छा.

अंजली,
सुंदर गातात आणि किती कॉन्फिडन्स या वयात.. हॅट्स ऑफ !
मला पण शमिका-शाल्मली-अवंति खूप आवडायच्या.
मुलींनी डॉमिनेट केल हे पर्व.

ते सारेगमप संपलं ना गेल्या आठवड्यात ?

दमले वाटत सगळेजण लिहून लिहून Happy

Pages