बारा ए.वे.ए.ठी, १८ जुन २०११

Submitted by अनिलभाई on 3 June, 2011 - 10:13
ठिकाण/पत्ता: 
चटणी मॅनोर 3793 US Highway 1 South Monmouth Junction, New Jersey 08852

From: Northern New Jersey
Take Garden State Parkway South to Exit-130, Take Route-1 South for about 12 miles, pass Regal Cinemas on your right. Chutney Mary / Chutney Manor is on your right hand side after the 4th Traffic light between Henderson Road and Deans Lane.

From: Southern New Jersey
Take Route-130 North to Route-1 South for about 5 miles or take NJ Turnpike North to Exit-9 and continue as above.

सगळ्यानी जरुर या.

तारीख/वेळ: 
शनिवार, June 18, 2011 - 12:30 to 15:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही हो, आय एस आय ही पाकीस्तानमधली एक संघटना आहे, बहुधा अमेरिकेच्या सी आय ए सारखी. त्यांच्या बर्‍याच कारवाया असतात.

स्वाती_आंबोळे, अहो डोहाळजेवण नाही, केळवण, केळवण - बनानाफॉरेष्ट.

नाही हो. मायबोलीवर पाककृति लिहीली आहे का कुणी? असल्यास सर्व मित्रांच्या बायकांना कळवतो. ज्याचे/जिचे केळवण होणार आहे, तिला पटवतो की ही भाजी खाच, म्हणजे मग पुढच्या केळवणाला तीच भाजी!

स्वाती, प्रज्ञा, केदार वृत्तांत झकासच.

परदेसाई, सिंडरेला, फचिन यांच्याशी तर जुना स्नेह आहे, लालूही असती तर बरे झाले असते.

पण माझ्यासाठी अजून एक मोठी गोष्ट म्हणजे भाई, स्वाती, सायो, मैत्रेयी, शोनू, निराकार असे गेली आठ
दहा वर्षे फक्त आयडी आणि लेखनातून ओळख असलेले माबोकर भेटले. खूप छान वाटले.

केदारचे लेखन वाचून जसा वाटला होता त्यापेक्षा बराच वेगळा वाटला. (शिवाय मी फोटोही दुसर्‍याच केदारचा पाहिला होता मागे कधीतरी)

विकु तर आमचे परममित्रच... त्यामुळे पहिल्यांदा भेटतो आहे असे वाटले नाही.

गप्पांमध्ये साडेसहा कसे वाजले ते कळलेच नाही. स्वातीने फर्माईश होताच आढेवेढे न घेता गाणे म्हटले तेही आवडले. लोकांचा माबो व्यासंग बघून माझी वाचाच बसल्याने पोस्ट लिहायला उशीर होत आहे. Happy

चमन आणि एबाबा यांचे मला नेण्या आणण्याबद्दल विशेष आभार.
आणि प्रमुख पाहुणा म्हणून केलेल्या पाहुणचाराबद्दल भाई, देसाई इ. संयोजकांसह सर्वांचेच मनापासून आभार.

डीसी बघणे म्हणजे नंबर एक भंपकपणा आहे त्यामुळे तिथे जाऊ नकोस असं त्याला कुणी तरी सांगितलय Proud तेव्हा रुनी तुच पुढच्या बारागटगला हजेरी लाव. Happy

वैद्यांनी फर्माइश न होता सुद्धा गाणं म्हंटलं असतं Happy

>>यांच्याशी तर जुना स्नेह आहे, लालूही असती तर बरे झाले असते
आँ? लालूशीही कुठल्या वादापासूनचा जुना स्नेह आहे ना? Proud

छान आहेत वृत्तांत.
स्वातीने केदारच्या बोलण्याला वाक्गंगा म्हटल्यामुळे केदारने आपल्या वृत्तांतात 'मी फक्त ऐकत होतो' असे दोनतीनदा लिहिले आहे. पण प्रयत्न अयशस्वी वाटला. Proud

लालूच्या वृत्तांतावरून प्रेरणा घेऊन मी माझा वृत्तांत लिहित आहे.

मी सिंड्रेलाच्या घरी पोचलो. तिथून तिला पिक करून आम्ही निघालो.
वाटेत पूर्णवेळ ती बोलत होती. मी फक्त 'हो का', 'अरे वा', 'नाहीतर काय' एवढंच बोललो. माझं काही ऐकूनच घेतलं नाही.
आम्ही तिथे पोचलो. पुढचा वृत्तांत लोकांनी लिहिला आहेच.
मग गटगनंतर आम्ही चमनच्या घरी गेलो. तिथे चमन असल्यामुळे मला थोडे बोलायला मिळाले. त्याच्याकडे चहा वगैरे घेऊन परत जायला निघालो.
वाटेत पूर्णवेळ सिंड्रेला बोलत होती. मी फक्त 'हो का', 'अरे वा', 'नाहीतर काय' एवढंच बोललो. माझं काही ऐकूनच घेतलं नाही.
आम्ही पोचलो. रात्रीचे जेवण तिच्याकडेच केले. तिथे नितेशशी थोड्यावेळ मला बोलायला मिळाले.
मग मी घरी आलो.

इतक्या बोलण्यात तिने तिच्या इयत्ता पहिली पासून ते आत्ताच्या नोकरीपर्यंत काय काय काय काय सांगितले. आता आज्जीकडून फक्त एक दोन प्रश्नांची उत्तरं मिळवायची आहेत - 'तुम्ही घर आणि नोकरी सगळं एकदम कसं सांभाळता?' , 'तुम्ही स्त्रीमुक्तीवादी कधीपासून झालात?', इत्यादि. मग माझ्याकडे आज्जीचं चरित्र लिहिता येईल एवढं मटरिअल असेल. प्रकाशन झाल्यावर इच्छुकांनी (विकत घेऊन) वाचावे.
धन्यवाद.

Proud Light 1

फचिन Lol

:d

चांगले आहेत वृतांत....
वि.सु. : कोणीतरी येऊन दोन त लिहिले म्हणून ओरडेल म्हणून एक त कमीच लिहिला आहे Happy

मी फक्त 'हो का', 'अरे वा', 'नाहीतर काय' एवढंच बोललो. माझं काही ऐकूनच घेतलं नाही.

फचिन, अहो लग्न झाले नाही तुमचे म्हणून तुम्हाला वाटते, की आपण काही बोलावे. पण जरा लग्न होऊन एक दोन वर्षे झाली की कळेल की बायका हजर असताना, उगाच आपल्याला काही बोलायला मिळेल, अशी आशा ठेवू नये. आणि 'ऐकून घेणे'! हा, हा, हा. काय पण बालीश, निरागस बालकासारखे बोलता?
लवकर मोठे व्हा.
Light 1

मी फक्त 'हो का', 'अरे वा', 'नाहीतर काय' एवढंच बोललो <<<< Proud हा सराव (प्रॅक्टिस)
चांगला आहे. पुढील आयुष्यात उपयोगी.. तेव्हा असा सराव करत रहा.. पु.वा.शु. Happy

चमनच्या घरी चमी होती त्यामुळे मला (सुद्धा) बोलायला मिळाले नाही Proud

सिंडे म्हणूनच तू बहिणाबाईंना डीसी दाखवलस का >>>> तेव्हा डीसी बघूनच मी हे मत बनवलय Wink आता आले तर कुणाच्या घरी जायचं म्हणूनच येइन Wink

Pages