बारा ए.वे.ए.ठी, १८ जुन २०११

Submitted by अनिलभाई on 3 June, 2011 - 10:13
ठिकाण/पत्ता: 
चटणी मॅनोर 3793 US Highway 1 South Monmouth Junction, New Jersey 08852

From: Northern New Jersey
Take Garden State Parkway South to Exit-130, Take Route-1 South for about 12 miles, pass Regal Cinemas on your right. Chutney Mary / Chutney Manor is on your right hand side after the 4th Traffic light between Henderson Road and Deans Lane.

From: Southern New Jersey
Take Route-130 North to Route-1 South for about 5 miles or take NJ Turnpike North to Exit-9 and continue as above.

सगळ्यानी जरुर या.

तारीख/वेळ: 
शनिवार, June 18, 2011 - 12:30 to 15:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंडे गप जा आणि असंबद्ध बडबड करु नको.(वरती फचिन म्हणतोय.) कारण सगळे तेच करणार आहेत. तु जरा वेगळ कायतरी कर. Proud
त्या दिवशी बहुदा ट्रेनचा संप आहे आणि टेंपरेचर १०० आहे. सोसणार नाही तुम्हाला. जाऊ नका त्यामुळे. Proud
(एकतरी मन घालण्याची पोस्ट लिहायलाच पाहिजे मला, म्हणुन. Wink )

नने, तू सांगशील तो ड्रेस मी घालेन. आपण बँडवाल्या होऊन जाऊ. (आणि टेबलाऐवजी फळीवर बसू. :P)

बरं तर लोकहो, भेटू उद्या. Happy

उद्याच्या ए. वे. ए. ठि. साठी शुभेच्छा.
मायबोलीवरच्या सध्याच्या ज्वलंत प्रश्नांवर गंभीर व विचारपूर्वक चर्चा करून, एकदा काय ते ठरवा, हुसेनला श्रध्हांजली द्यावी का, रामदेवबाबाचे काय करायचे, वटपौर्णिमा करावी की नाही वगैरे.

सात जन्म तोच नवरा वगैरे ऐकून एक गाणे आठवले - सौ बार जनम लेंगे, सौ बार फना होंगे,
ऐ जाने 'बया(?)', फिरभी हम तुम न जुदा होंगे!! कुठल्या सिनेमात आहे, कुणि, नि का म्हंटले ते माहित नव्हते.

पण आता कळले - हाच नवरा सात जन्म मिळू दे म्हणून बायको वटपौर्णिमा करत असते. ते पाहून नवरा म्हणतो, आयला, म्हणजे ही बया सात जन्म माझे वाटोळे करणार? थांब जरा, मी देवाला सांगतो - शंभर वेळ जन्माला येईन, शंभर वेळा 'फना' होईन (म्हणजे काय नक्की माहित नाही, पण काहीतरी भले नक्कीच नाही), इतकेच नव्हे तर तुला सोडणार नाही. तुला पण माझ्याबरोबर 'फना' करीन!! माझे नाक कापीन पण तुला अपशकून करीन!! असे म्हणत त्याने त्याच वडाच्या झाडाला विरुद्ध दिशेने शंभर फेर्‍या मारल्या!!

म्हणजे सौ सुनारकी एक लोहारकी, नव्हे तर सात सुनारकी तर सौ लोहारकी!! एकदम अमेरिकन स्टाईल, शॉक अँड ऑ, स्लॅम डंक!!

मी साडेबारा ते एक दरम्यान येइन. पण साडेबारा ते चार इतका वेळ बसू देतील का चटणी वाले? तिथून जायला सांगितले तर जवळच दुर्गा मंदिर आहे तिथे जाऊयात. कार्यक्रमाची सुरुवात एक मिनिट हुसेन यांना श्रद्धांजलीने करुयात का?

झक्की, Rofl

आधी माहिती असतं तर कालच बफेलोमधून मृण्मयीची धिंडका जर्सीत आली असती. असो, कोणाला फोन करू १ वाजता?

पुढल्या गटगला झक्कींनी उल्लेखलेल्या बाफांवर आधारित एक वगनाट्य बसवून सादर करा.

शिरस्त्याप्रमाणे खूप खूप मज्जा आली! हो, आणि इथे पण लिहिणारी मी पैली आणि तिथे पोहोचणारी पण मीच्च पहिली होते !!

झक्की नाहीत तर मी माझ्यातर्फे ड्रिन्क्स म्हणून सांगूनही नंतर माझ्या बाजूने बोलावे लागेल या भीतीने कोणी ड्रिन्क्स घेतले नाहीत असे कळले. अशक्य लोक आहेत! Proud

आधी कधी वृत्तांत न लिहिलेल्यांनी लिहा जरा..

न आलेल्यांची आठवण काढली. >>>> रीड इट अ‍ॅज न आलेल्यांच्या नावाने गॉसिप्स केले Proud

येट अनादर धम्माल गटग Happy

झक्की नाहीत तर मी माझ्यातर्फे ड्रिन्क्स म्हणून सांगूनही नंतर माझ्या बाजूने बोलावे लागेल या भीतीने कोणी ड्रिन्क्स घेतले नाहीत असे कळले. अशक्य लोक आहेत!
>>>> Proud खरंय, पण ड्रिंक्स नाहीत तर आता अनुमोदन द्यायचं कुणाला असा गहन प्रश्न पडला सगळ्यांनाच.

Pages