बारा ए.वे.ए.ठी, १८ जुन २०११

Submitted by अनिलभाई on 3 June, 2011 - 10:13
ठिकाण/पत्ता: 
चटणी मॅनोर 3793 US Highway 1 South Monmouth Junction, New Jersey 08852

From: Northern New Jersey
Take Garden State Parkway South to Exit-130, Take Route-1 South for about 12 miles, pass Regal Cinemas on your right. Chutney Mary / Chutney Manor is on your right hand side after the 4th Traffic light between Henderson Road and Deans Lane.

From: Southern New Jersey
Take Route-130 North to Route-1 South for about 5 miles or take NJ Turnpike North to Exit-9 and continue as above.

सगळ्यानी जरुर या.

तारीख/वेळ: 
शनिवार, June 18, 2011 - 12:30 to 15:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो पोहोचले असतीलच.. वॄंदाताईंनी आणलेली बिस्कीटं मस्त होती (आजपण खाल्ली) आणि प्रज्ञाने काहीतरी आणलं होतं, ते पण. पण अनुपस्थित लोकांना कळू नये म्हणून लिहीत नाहीय..
Happy
झक्कींच्या अनुपस्थितीमुळे GS नाराज वाटले, पण त्यांना विकू भेटल्यामु़ळे त्यांची नाराजी फार टिकली नसावी Happy

मला बाईंकडून फोटो आले. बाकी नाही मिळालेत. अजून कोणीकोणी पाठवलेत? देसाई, तुम्ही पाठवलेत? Uhoh

"मोठ्या माणसांना उत्तम प्रकारे जमणारी कामे लहान मुलांनी करायला जाऊन त्यातली मजा घालवू नये" असं म्हणतात. मी लहान आहे. (मेधाच्या यादीतले बाकीचे मला सिनिअर आहेत.) Proud (खात्री झाली ना आता? Wink )
तस्मात्, तुम्ही लिहा, मी येते 'मम' म्हणायला.

मी पाठवलेत.. बाईंकडे, भाईंकडे, शिंडेकडे, मामाकडे नक्की आहेत. पण त्यात मी पण होतो.. त्यामुळे चांगले वाटले नाहीत, तर भाईंचे घ्या.. Proud

'लहानानी शिकायचे नाहीतर काय झक्कींच्या वयाचे झाल्यावर वॄत्तांत लिहीणार का?' Sad

Proud

"मोठ्या माणसांना उत्तम प्रकारे जमणारी कामे लहान मुलांनी करायला जाऊन त्यातली मजा घालवू नये" असं म्हणतात. मी लहान आहे. (मेधाच्या यादीतले बाकीचे मला सिनिअर आहेत.) >> अनुमोदन प्रज्ञा... Proud
'लहानानी शिकायचे नाहीतर काय झक्कींच्या वयाचे झाल्यावर वॄत्तांत लिहीणार का?' >> त्यांच्या वयाचे झाल्यावर तरी लिहायला जमेल का? Wink
लोकहो, मला फोटु नाही मिळाले.

देसाई, फोटोंबद्दल धन्यवाद.
वृत्तांत येणार का? देसाई, जेवणाच्या वेळचा तुमीच लिवा. (नाहीतर तुमी रुसता) आणि ईबा, तुमच्या घरापास्नंचा तुमी लिवा.

दारू न मिळाल्याने वृत्तांत लिहिता येत नाही.>>> अहो बाई, कुणाला अनुमोदन द्यायचं नाहीये वृत्तांतात तेव्हा दारुचा संबंध नाही. Proud

सायो.. मी वॄत्तांत सन्यास घेतल्याची बातमी तुझ्यापर्यंत आली नाही का?
(म्हणून तर मी एवेएठिला येत नाही ..असे बर्‍याच लोकांना वाटते.) Proud

प्रज्ञा ... तुला दुसरे काहीतरी (विशेष) पाजले होते.. विसरायचं नाही Lol

मी वॄत्तांत सन्यास घेतल्याची बातमी तुझ्यापर्यंत आली नाही का?>>> अर्र, हो का? देसाईंनी डिक्लेअर केलं तेव्हा बाकीच्यांनी कामाला लागा कसं. Wink

मी वॄत्तांत सन्यास घेतल्याची बातमी तुझ्यापर्यंत आली नाही का?
>>
अहो देसाई, तुम्हाला ती स्वातीने सांगितलेली गोष्ट आठवतीये ना? एवेएठीकरांची परवानगी घेतल्याशिवाय संन्यास वगैरे काही नाही. घेतला तर सगळ्यांनी एकत्र घ्यायचा संन्यास! मी तर तयार नाही बुवा. त्यामुळे आता तुम्ही लिहाच.

खरंतर देसाई दारू देतो म्हणाले होते. पण प्रत्येकजण आपापला चमचा आणायला विसरले. देसाईंकडे एवढ्या लोकांसाठी चमचे नव्हते. म्हणून मग ते कॅन्सल झालं.. Proud

मला लिहावा लागणार बहुतेक Uhoh

वृत्तांत-

अमूकतमूक खाल्ले.
पाणी प्यालो.
केदार बोलला.
बाकीच्यांनी ऐकले.

समाप्त.

दारु होती सभी के पास है, सब छुपाके रखते है, पर देता कोई नहीं. Proud
सगळ्यांनी आमिषं दाखवली आणि दिली कुणीच नाही

छे. उलट मी, देसाई, जी एस, अशांचे उदबोधन की काय ते झाले आणि इतके वर्ष मायबोलीवर असून बर्‍याच गोष्टी नवीन कळाल्या. Happy

मी वृत्तांत लिहिणार नाही.
स्वाती म्हणाली की मला बालसाहित्याशिवाय बाकी काही लिहायला कधी जमणार?
म्हणून ज्ञानवृद्धीसाठी मी केदार आणि विकुंची अ‍ॅडल्ट चर्चा कान देऊन ऐकायला गेलो पण चटणी मध्ये नासक्या दुधाची खीर खाल्ल्यामुळे आधीच कलुषित झालेल्या माझ्या आत्म्याला ती चर्चाही बालवाङमयापेक्षा काही वेगळी वाटली नाही.

वृत्तांतः
('आताशा मी फक्त रकाने'च्या चालीत वाचावा.)

एका वेळी एक ठिकाणी जमला रे कंपू
प्रत्येकाला वाटत होते नयेच हे संपू!

कधी नव्हे ती मैत्रेयी बघ पहिल्याने आली
उभ्या उभा आले देसाई, बसलेही खाली
सिंडीसंगे आले मामा, प्रमुख्पाहुणेही
भाईंच्या क्यामेर्‍याने मग टिप्ले खाणेही
बघता बघताऽ
बघता बघता इडली डोसे लाग्ले रे संपू
एका वेळी...

नंतर आली तरुणाईची मोठीशी लाट
सायो, बाई, प्रज्ञा, मेधा, नक्षीही त्यात
केदाराच्या वाक्गंगेला विकुंचा बांध
श्रवणभक्तीचा खराखुरा पण चमनाला छंद
माबोकरऽऽ
माबोकर नसलेले नवरे चुकलेले गंपू
एका वेळी...

खाल्ल्यावर खुर्च्या धरणे हा दखल्पात्र गुन्हा!
चटणीवाले वेटर म्हणती असेच या पुन्हा!
हाकललेले वर्‍हाड सदनी नेती देसाई
इतके खाऊन चहा पिण्याची सर्वांना घाई!
केक रव्याचाऽऽ
केक रव्याचा प्रज्ञाचाही चहासवे डंपू!
एका वेळी..

वृंदाताई घेऊन आल्या होममेड कुक्क्या
त्याही बघती चाखुन असल्या पार्ल्याक्वा पक्क्या!
ब्याक्यार्डी नेऊन काढले टोळीचे फोटू
पार्ल्याक्वा मग पिठे, पुस्तके लागल्या की वाटू
घडीत खी खीऽऽ
घडीत खीखी घडित टडोपा असला हा कंपू!
एका वेळी...

(समाप्त!)

ता.क. : टडोपाने वृत्तांताचा शेवट करण्यात आल्याचे सूज्ञ वाचकांच्या इ. इ.

Proud

Pages