बारा ए.वे.ए.ठी, १८ जुन २०११

Submitted by अनिलभाई on 3 June, 2011 - 10:13
ठिकाण/पत्ता: 
चटणी मॅनोर 3793 US Highway 1 South Monmouth Junction, New Jersey 08852

From: Northern New Jersey
Take Garden State Parkway South to Exit-130, Take Route-1 South for about 12 miles, pass Regal Cinemas on your right. Chutney Mary / Chutney Manor is on your right hand side after the 4th Traffic light between Henderson Road and Deans Lane.

From: Southern New Jersey
Take Route-130 North to Route-1 South for about 5 miles or take NJ Turnpike North to Exit-9 and continue as above.

सगळ्यानी जरुर या.

तारीख/वेळ: 
शनिवार, June 18, 2011 - 12:30 to 15:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार!
मी जीएस यांना संपर्क करून जर्सी सिटीतून यायचं नक्की करतेय. अहो पण असतीलच बरोबर. नेवर्क पर्यंत पाथ ने येऊ. पुढे अजून कुठलीतरी बस/ ट्रेन आहे. बघते परत नकाशात. पण पुढे कुठल्या ठिकाणापासून चटणी पर्यंत पिक-अप आणि परतताना ड्रॉप मिळेल? (मिळेल ना? :फिदी:)

प्रज्ञा जीएसबरोबर कशी काय येणार ? जीएस तर सँटिच्या गाडीत येणार होता ना ?

तर मग रात्रीचं जेवण आणि मुक्काम माझ्याकडे ना ? या या नक्की या.

प्रज्ञा, जीएसना सांगितलं आहेच, तुलाही सांगते की तिथून जर मिलबर्न स्टेशनपर्यंत आलात तर पुढे आपण गाडीने जाऊ शकतो. मिलबर्न मला वाटेवर येतं तेव्हा काही प्रॉब्लेम नाही.

जीएस सध्या जर्सी सिटीत आहेत ना? म्हणून तर संपर्क करून एकदम येता येईल असं वाटलं मला Uhoh

मग काय करावे बरे?
आणि आम्हाला शनिवारी संध्याकाळी घरी परत येणं आवश्यक आहे. Happy इथे दुसरं एक काम आहे आल्यावर.

आमंत्रणासाठी आभार Happy

तर मग रात्रीचं जेवण आणि मुक्काम माझ्याकडे ना ? या या नक्की या.>>>यावर लिहिलं होतं गं मी ते! Lol (मला पण बोलावलं असेल असं समजून Proud Light 1 )

असो. मीपण बहुतेक मिलबर्न ल येऊ शकेन. जीएस सिंडीकडून येतील म्हणालेत. मी तुला संपर्कातून माझा नं देते गं सायो. गुरुवारपर्यंत नक्की कशी येतेय ते कळवते. गुरुवार चालेल ना?

सायो, Lol प्रज्ञा नवीन मेंबर आहे म्हणून रॅगिंग घेत आहेस का?

भाई, एवेएठीच्या पेपरमध्ये यावेळी एक प्रश्न टाका - जीएस नक्की कसा आला? संदर्भासह स्पष्टीकरण द्या. Proud

मी येऊ का? >> आता नोंदणी करुन मग हे असं विचारायच म्हणजे. खर तर 'मी खरच येवु का?' अस विचारायला पाहीजे. Happy

भाई, ११ची वेळ का दिली आहे? चटणीला खोबरं आपण खवून द्यायचं नाहीये. Proud
साडेबारा धरा लोकहो.

सगळी मिळुन किती डोकी होताहेत?.
प्रज्ञा, नावनोंदणी करुन टाक.

१३ जण अधिक प्रज्ञा (२) + मै (+३)
= १८

आणखी कोणी राहील का?.

अहो अनिलभाई तुम्ही फोन नं काय वास्तू शास्त्राच्या (किंवा टेलिफोनशास्त्राच्या) पद्धतीने घेतला अहे का? सगळे दोनचे द्विभाजक पण एक नाही, कारण तो दक्षिण दिशेचा. (थोडक्यात दृष्ट बिष्ट लागू नये असा) Happy

अरे बाप रे.. आता हा असा अशुभ नंबर लावायचा तर वास्तुशास्त्र्यांना उतारा विचारावा लागेल. Lol
केदार तुम्ही हे दाखवून मला फार अडचणीत टाकले हो. मागे, घराच्या उत्तरेला पडते पाणी असल्यामुळे (नायगारा आपला), मला घराचे दार पूर्वेला करायला सांगितले होते त्यानी..

हो रे अगदी. केवळ वास्तुशास्त्र्याना विचारुन तो ३ टाकलाय मधे. नाहीतर तिथे पण ४ होता. माझा जन्म अप्रिल आणि २२ तारीख त्यामुळे सगळे २,४,८. Lol

भाई.. मग तुमचा जन्म २०००, २००२, २००४... किंवा इसवी सन ८००, ८०२,८०४.. वगैरे साली झाला असला पाहिजे.. तेव्हा तर झक्कींचे बाबाही अर्ध्या चड्डीत नव्हते.. Sad

Pages