बारा ए.वे.ए.ठी, १८ जुन २०११

Submitted by अनिलभाई on 3 June, 2011 - 10:13
ठिकाण/पत्ता: 
चटणी मॅनोर 3793 US Highway 1 South Monmouth Junction, New Jersey 08852

From: Northern New Jersey
Take Garden State Parkway South to Exit-130, Take Route-1 South for about 12 miles, pass Regal Cinemas on your right. Chutney Mary / Chutney Manor is on your right hand side after the 4th Traffic light between Henderson Road and Deans Lane.

From: Southern New Jersey
Take Route-130 North to Route-1 South for about 5 miles or take NJ Turnpike North to Exit-9 and continue as above.

सगळ्यानी जरुर या.

तारीख/वेळ: 
शनिवार, June 18, 2011 - 12:30 to 15:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पहिल्यांदाच "प्रस्थापित बाराकरांबरोबर" (:फिदी: ) गटग करणार असल्यामुळे थोडी एक्साईटेडच होते. गुगल्यांकडून ट्रेन आणि बशींचं वेळापत्रक जमवून, पुढे सायोबरोबर तिच्या गाडीने चटणी पर्यंत जाऊ असा प्लान झाला. तिच्याच गाडीत बुवा आणि स्वाती असणार हे समजल्यामुळे गाडीत बसल्याबसल्या गटग सुरु होणारच होतं. बुवांनी आयत्या वेळी टांग दिली ते सोडा!
तर, ठरल्याप्रमाणे आम्ही सव्वाबाराला मॉलपाशी उतरलो. आधी चुकीच्या मॉलला उतरून रस्ते-बिस्ते चुकायची माझी परंपरा मी कायम करणार होते, पण बरोबर नवरा होता, त्याने मला हा वेंधळेपणा करू दिला नाही. आम्ही भेटलो तेव्हा माझा जोरदार अपेक्षाभंग झाला! बाईंनी ध्यानीमनी नसताना स्वप्नी मात्र येऊन एकदा दर्शन दिलं होतं मला. इंटर्व्यू घेत होत्या माझा. असो. शिवाय, एकूण मायबोलीवरचा त्यांचा वावर, व्यासंग इत्यादी इत्यादी बघता नंतर त्या मला केसात एखाद-दुसरी रुपेरी बट असलेल्या, ८व्या-९व्या यत्तेच्या मराठी शाळेतल्या मुलांना मराठी(च) शिकवणार्‍या स्वाती आंबोळे बाई असतील असं वाटलं होतं. प्रत्यक्षात त्या मी कल्पिलेल्या वयापेक्षा (दिसायला तरी!) बर्‍याच यंग होत्या! सायो मात्र आवाजावरून जशी वाटली तशीच आहे हे बघून जरा बरं वाटलं.

आमची ओळख वगैरे झाली. नवरा माबोकर नसल्यामुळे फॉर्बिडन सिटीबद्दल त्याने थोडी विचारपूस केली. इथूनच गटग सुरु झालंय असं मानायला हरकत नसल्यामुळे मी रव्याचा केक देऊन खादाडीची आघाडी सांभाळली. "पार्लेकरीण झालीस आता" हे ऐकून "आता मी सुखाने डोळे मिटते" म्हणण्याइतकं समाधान झालं माझं. गप्पा चालूच होत्या. मधे लाल्वाक्कांशी फोनवर बोलणं झालं. काही कारणामुळे त्या येणार नव्हत्या गटगला. पण मला भेटायची त्यांना उत्सुकता होती हे ऐकून पुन्हा एकदा "आ मी सु डो मि" असं वाटलं मला. त्यांनी डीसीला यायचं निमंत्रण दिलं आम्हाला.

यथावकाश चटणीमधे पोचलो.
मीच नवा मेंबर होते बहुतेक, किंवा पहिल्यांदा भेटणार्‍यांच्या ओळखी झाल्या असाव्यात, बहुतेकांनी मला लग्गेच ओळखलं! पहिले भेटले भाई. त्यांचा फोटो मी बघितला होता त्यामुळे ओळखलं. जीएसना भेटले होतेच. सिंडीने आल्याआल्या, "मी स्वप्नातल्यासारखी दिसते की वेगळी?" असं विचारलंच! तीही भलतीच यंग आहे! एकूणातच, पार्ल्यात मी चकाट्या पिटताना पार्ल्याक्कांचं जसं चित्र उभं राहिलं होतं त्यापेक्षा पार्ल्याक्का जरा तरूणच आहेत! एकेकीचा व्यासंग, लिहायची पद्धत, त्यातून हमखास जाणवणारी मॅच्युरिटी, आणि एखाद्या वेळी मी ज्युनिअर मेंबर म्हणून मला सांभाळून घेणं हे सगळं बघता सगळ्या काक्वा माझ्याहून कैच्या कै मोठ्या असतील असं वाटलं होतं मला, पण नाही! (म्हणजे मी मोठी नाहिये, पण त्या यंग आहेत. ३दा उल्लेख झाला! हुश्श!! )मला बघून मात्र, वजन कमी करायच्या बीबीवर पोस्ट टाकलेली हीच का ती प्रज्ञा असा प्रश्न नक्षीला नक्की पडला असेल! विचारायचं राहिलंच! फचिन, चमन, मेधा, देसाई, मैत्रेयी यांची ओळखही झाली. जेवण सुरु असताना विकु आले. मग गप्पांना अजून रंग भरला. (झक्की आणि लालू गटगला नाहीत हे सगळ्यांना फार्फार जाणवत होतं. मलाही.)

इडली-डोसे, मुख्य जेवण आणि मग जास्त तुपातला जास्त गोड गा. ह. नासक्या दुधातली (आभार-चमन) खीर आणि आंब्याचं(च) आहे का असा प्रश्न पडेल असं आइस्क्रीम खाऊन मंडळी उठली. म्हणजे उठावं लागलं. पुढच्या गप्पा देसाई यांच्या घरी \चहा घेत माराव्यात म्हणून सगळे निघाले. नक्षी आणि कुटुंब मात्र चटणीतूनच आमचा निरोप घेऊन गेले.

पुढे \चहा घेता घेता अनेकानेक विषय तोंडीलावणे झाले होते. मी \चहा घेत नसल्यामुळे माझ्या एकटीकरता त्यांच्याकडे वेगळी कॉफी करावी लागली, त्यासाठी विशेष आभार :).

इकडे एव्हाना पार्ल्याक्कांचा एक कंपू, केदार-विकु यांचा एक कंपू आणि चमन श्रोता, आणि भाई, देसाई, फचिन आणि माझा नवरा यांचा एक कंपू फॉर्म होऊन गप्पा चालू होत्या. जीएस केदार-विकुंच्या कंपूत होत, पण मग सगळे पुन्हा एकत्र गप्पा मारायला लागले.

नेहेमीसारखं गॉसिप चालू होतं. दारू नसल्यामुळे अनुमोदन कसं द्यायचं आणि कोणाला, हा प्रश्न होताच. थोड्या वेळाने वृंदाताई आल्या. येताना त्यांनी चविष्ट आणि दिसायलाही सुरेख (इथे मला उगीचच, सिंडी आणि बाईंनी स्वप्नात ऑफर केलेला, मला रंगरूपही न समजलेला पदार्थ आठवला!) अशा कुकीज आणल्या होत्या. त्यांनाही मी पहिल्यांदाच भेटत होते. थोड्या वेळाने एबाबा आले. ते तर विमानतळावरून थेट गटगलाच आले होते!

सगळ्यांना भेटत असताना, गप्पा मारताना मला हे खरं की (हेही) स्वप्नच कळेना. कधीच्या काळी मी मायबोली आयडी घेते काय, देशात असताना वापर न करता इथे आल्यावर मायबोलीवर माझं मैत्र काय तयार होतं आणि त्या सगळ्यांना मी प्रत्यक्षात भेटते काय!

मधल्या काळात मायबोलीवरची अ‍ॅक्टिव्ह मेंबर झालेच मी, पण पार्ल्यात, बारात येऊन अजून जास्त अ‍ॅक्टिव्ह झाले. Happy
सगळ्यांना भेटून आनंद झाला मला! परतीच्या वाटेवर केदार आणि आम्ही दोघं सोबत होतो. मग केदार आणि विश्रामच्या खूप गप्पा झाल्या. भारत-अमेरिकेतल्या नोकर्‍या, वेदकालीन संस्कृती, न्यूयॉर्कातली खादाडी वगैरे वगैरे.... (प्लीज नोट, बाकी 'कुणाचाही' उल्लेख केदार यांच्या बोलण्यात झाला नाही! )

तर असं एकूण गटग मस्त मजेत पार पडलं. परत आल्यावर घरी सुखरूप पोहोचल्याचं कळवायला म्हणून बाराबाफवर पोस्ट टाकली.
कोणी लिहो न लिहो, आपण ४ ओळी खरडायच्या असं नक्की झालं होतं. Proud उगीच थोडा भाव खाऊन झाला. 'प्रस्थापितांसारखा' ( Light 1 )उत्तम वृत्तांत लिहिता येणार नाही याची खात्री असूनही पांढर्‍यावर काळं करायची हौस भारी! ते जमलं तसं केलंय. गोड मानून घ्या.
कोणाचे उल्लेख राहिले असतील तर उदार मनाने माफ करा. Happy शेवट टडोपा वगैरे...

प्रज्ञा, छान लिहिलाय वृत्तांत. टडोपा म्हणजे काय? टपोर्‍या डोळ्यांत पाणी? Proud

टपोर्‍या डोळ्यांत पाणी>>>> :इश्शः

टचकन डोळ्यांत पाणी.
आजच तुझी आठवण निघाली होती पार्ल्यात. मी "ब्रेफाला भेळ?" असं विचारल्यावर सिंडीने आठवण काढली. Happy कशी आहेस? (अगं म्हणून ना? Wink )

सायो मात्र आवाजावरून जशी वाटली तशीच आहे हे बघून जरा बरं वाटलं.>>> अगदी शिताफीने तरुण, म्हातारीचा अंदाज येऊ दिलेला नाहीस हे लक्षात आलंय माझ्या.

वृत्तांत वाचून टडोपा आलंच. येताना मी आणि स्वाती मिलिंदा आणि बुवांचा सिक्सर आठवून इतकं हसलो की मला डोळ्यात पाणी आल्याने गाडी चालवायला दिसेना. Proud

तु(म्हा)ला 'प. पा.' म्हणून प्रमोशन मिळालंय. तेव्हा अगं म्हंटलेलं चालेल. Proud

अशीच आठवण काढत रहा. Happy पुढच्या राहून-खाऊन-पिऊन गटगात ब्रेकफास्टाला भेळच ठेवू. तीही आधल्या दिवशीची. मुरलेला कांदा आणि चिवट मुरमुरे!! अफाट छान लागते. कोणी खाल्ली आज भेळ?

अगदी शिताफीने तरुण, म्हातारीचा अंदाज येऊ दिलेला नाहीस हे लक्षात आलंय माझ्या.
>> Lol सही..

बाईंनी काव्यवृत्तांतात तरूण म्हटलंय की तुला सायो..

नंतर आली तरुणाईची मोठीशी लाट
सायो, बाई, प्रज्ञा, मेधा, नक्षीही त्यात

गटगंला जायचे नक्की झाल्यावर त्या सप्ताहांताचे परतीचे तिकीट काढले नाही, पण नेमके ऐनवेळी गटग बोंबलंल तर? अशी धास्ती होती, पण तशी शनिची वक्री नजर न फिरल्यामुळे किंवा मैत्रेयीने शुक्रवारीच सत्यनारायण घातल्यामुळे गटग आहे त्या ठिकाणी झाले. नजर लागू नये म्हणून मैत्रेयी आणि निराकारने लिंब उतरविने, चप्पल दाखविने असे कार्यक्रम त्या दिवशी केल्यामुले गटगला कोणाचीही (उदा सीमा पाऊसे येऊदे वगैरे) नजर लागली नाही. (जामोप्याने मैत्रेयीशी संवांद साधून नजर न लागण्याविषयी माहिती घ्यावी. ) पण नेमके दक्षिण दिशेला काहीतरी फेकल्यामुळे मला फचिन उचलणार होता त्याला मात्र नजर लागली अन सिंडी नामक व्यक्तीने बिचार्‍या मामाला धमकी देऊन मला मामा बनविल्यामुळे गुपचूप ट्रेन्टन लाईन पकडून जावे लागले. चमन घ्यायला आला नि तिथे आमच्या गटगची सुरूवात झाली.
चमन आणि चमी दोघेही फारच अगत्यशील आहेत. चमीने पोहे वगैरे खादाडीची मस्त सुरूवात केली. दोनेक तासात चमन, चमीला पहिल्यांदाच भेटतोय असे वाटले नाही. त्यात चमी आमच्या लाईनीची! मग काय तिथेही मार्केट फंडामेंटल का टेक्नीशियनच्या दृष्टीने पाहावे ह्यावर चर्चेचा बाफ उघडला गेला आणि सोबत तोंडी लावायला श्री गौतम बुद्धांचे अवतार म्हणवून घेणारे चेंगीझ खान पण आले. गप्पांमध्ये वेळ जाताना जीएस ने फोन करतो असे म्हणून फोनच नाही केला व शेंडी लावली. १ च्या सुमारास परत आम्ही त्याला उचलून चटणीला गेलो. तिथे पब्लिक आधी पासून होतंच. गाडी पार्क करणार तितक्यात भाईंनी, ए अरे तिकडे लाव रे, मधे घाल मधे घाल अशी आरोळी दिल्यामुळे चमनने घाबरून तिकडे गाडी घेतली. जाता जाता भाई खिशातून घोडा बिडा काढतात की काय? हे पण पाहिलं आणि तसे काहीसे न दिसल्यामुळे निःश्वास टाकला.

बाराबस न आल्यामुळे आम्ही येणार्‍या प्रत्येक गाडीकडे निरखून पाहून " बाराबस परिवार गटग सोहळा" अशी काही पाटी दिसते का असे पाहू लागलो. पण तसे काही दिसले नाही. थोड्यावेळाने बारा बस म्हणवून घेणारी एक व्हॅन आली, आणि बारामधले दोन पाच लोक खाली उतरले. त्यात एकच बिचारा पुरूष दिसला, म्हणलं कसं झेललं असेल बाबा इतक्या आक्कांना? तो नंतर बराच वेळ गप्पच होता, त्यामुळे एकतर घरूनच तशी काही तंबी मिळाली असेल किंवा पार्ल्याक्कांचा प्रभाव पाहून तो नामोहरम झाला असावा असे काही मनात येऊन गेले.

यथावकाश पब्लिकने जोरदार खादाडी सुरूवात केली. (इच्छुकांनी सिंडी व इतरांस काय खाल्ले? ह्या संबंधी संपर्क साधावा. Happy )

तितक्यात विकु आले व हसून श्रद्धांजली वहा असे फतवा काढला. पण अहो फतव्याला जुमानणार कोण? तिथे जीएस भौ असल्यामुळे त्याने विकुंना पकडले व "दंड नसला तरी बेहत्तर पण विकुंना आत्ता सोडणार नाही" अशी घोषणा केली. पण विकुंकडे सोनियास्त्र असल्यामुळे त्यांनी ते वापरून सुटका करून घेतली.
मध्येच लालूचा फोन आला व तिने फ्लोरिडाच्या गटगची घोषणा केली.

मग नक्षीने तिच्या चिमुकल्या गोंडूल्या पिल्लासोबत आमची रजा घेतली. (खरे तर कोणीतरी पगार कापून घेतो, बिनपगारी रजा घ्या असेही म्हणाले) पण नक्षीने मग हास्यटिकली देऊन राजीनामा दिला. ह्यावरून आम्हास मायबोलीवर आजकाल राजीनामा देण्याची प्रथा पडत आहे व लोकं चर्चेत देखील राजीनामा मागत असल्याचे आम्ही इतरांच्या निदर्शनास आणून दिले.
देसायांकडे सर्व लोक गेले. तिथे परत एकदा थोडी इतर, थोडी वेद, राम, दाहसंस्कार इ इ वर चर्चा होऊन प्रत्येकाने तावातावाने आपले मत मांडले. मग सगळ्या पार्ल्याक्कांनी चर्चा कशा व कुठे रंगतात, विपू अलर्ट असे काही भारी ज्ञान बिन दिल्यामुळे देसाई, मी, फचिन अशा तुलनेने अजुनही कच्चा असलेल्या मायबोलीकरांना थोडाफार धक्का बसला.
परिसंवादाचे आयोजन न केले तर तो पार्ले (सा) खात्याच्या गटग कसला? मग काही परिसंवादांचे आयोजन करण्यात आले. ह्यात बाई, मैत्रेयी, सिंडी, सायो अशा तलवार कमावून असलेल्या भगिनींनी भाग घेतला. (म्हणजे त्याच बोलत होत्या आम्ही आपले ऐकून घेत होतो.) सगळ्यात महत्त्वाचा परिसंवाद म्हणजे, "मराठी साहित्य व येणार्‍या पिढीला मिळणारा साहित्याचा वारसा" हा होता. बर्‍याच लोकांचे मत असे पडले की आपण फिकीर करून काय फायदा? उपसंहारात मैत्रेयीने तिच्या बालपणीच्या मित्रांची कथा दर्शन म्हणून सांगितली.

दुसरा परिसंवाद, मायबोलीवर येण्यार्‍या ज्ञानवर्धक साहित्याबद्दल आणि इ साहित्य जगतातील (इथे इ साहित्य जगत म्हणजे मी पा किंवा मनोगत आणि त्यांचे शुद्धलेखन ) संकेत स्थळांबद्दल होता. ह्यात प्रामुख्याने जी एस ह्यांनी बिजभाषण केले आणि त्याला विकुंनी मुलाखतीसारखे स्वरूप दिले. कोणत्या स्थळावर काय आणि कसे घडले व त्यावरून मायबोलीने घ्यायची काळजी इ गप्पा रंगल्या. आणि त्याला इतर पार्लेकरांनी हातभार लावला, आम्ही आपलं ऐकण्याचे काम केले.
कोण माहितीचा कसा वापर करतो, असा एक उपविभाग पण ह्या परिसंवादात होता. ह्यावर मेधा ह्यांनी विवेचन केले व त्याला आम्हांसकट सगळ्यांच्या हातभार लागला.

यशावकाश वृंदाताई आल्यावर मस्त नानखटाई टाईप बिस्किट (कुकी) मिळाली. माझ्यामते जीटीजीचा सर्वात चांगला भाग होता तो देसाई वहिनींनी केलेला चहा!

एबाबांनी येऊन ते जीटीजीला किती कमिटेड आहेत हे दाखविले. नाहीतर केप्या, नुसताच तुम्ही हेलिकॉप्टर पाठवलं असतं तर आलो असतो म्हणे, अन ते ही गटग झाल्यावर!

पुस्तकांची देवाणघेवाण झाल्यावर पुढचा गटग पर्यंत ह्या आठवणी घेऊन पब्लिक निघालं. काही मस्ट रिड पुस्तकांची नावे देखील लिहून देण्यात व घेण्यात आली. ह्या अनुषंगाने अनुवाद कसा असावा हा परिसंवाद घ्यायची इच्छा होती पण वेळेअभावी व योग्य त्या बीजभाषणाअभावी आवरते घेण्यात आले.

मध्येच गटग रुढी व परंपरेप्रमाणे बाईंनी दोन गाणी ऐकवली. आता ही रुढी किंवा परंपरा जाचक आहे का? स्त्रीच का पुरूषास बरोबरीचे स्थान का नाही? असे प्रश्न निदान तेंव्हा तरी पडले नाही. त्यातले एक आम्ही म्हणावयास भाग पाडले. ते गाणे प्रताधिकार कायद्याचा भंग करून मी दोन तीन मायबोलीकरांना देतो अशी घोषणा मी केली त्याची आठवण मला आहे. Happy

गाडी नसलेल्या लोकांना देसायांनी स्टेशनावर नेऊन टाकलं आणि प्रज्ञा, विश्राम व मी असे आम्ही गाडीची वाट पाहत थांबलो. इतका वेळ गप्प असलेला विश्राम बोलू लागला. मग आम्ही मायबोली सोडून इतर गप्पा मारल्या, काही वेळाने त्यांचे ठिकाण आल्यावर ते ही कटले आणि मी आपला परत टाईम्स स्वेअरच्या झगमगाटी दुनियेत आलो. मात्र आल्याबरोबर ह्या झगमगाटी दुनियेपेक्षा गटगचा कलकलाट मात्र मला हवाहवासा वाटला!

तिन्ही पद्य आणि गद्य वृत्तांत मस्त झालेत. गटगपण एकदम भारी झाले असणार.
केदार कुकी आणल्या त्या वृंदाताई होत्या.

सगळे वृत्तांत छानच.

काव्यमय वृत्तांत ही नवीन प्रथा दिसते. पण यात एकहि उर्दू शब्द, शब्दप्रयोग कसे नाहीत? हे काय जुन्याकाळचे मराठी का? नवीन मराठी शिकण्यासाठी श्री. बेफिकीर यांची शिकवणी लावावी ही नम्र सूचना.

मी ऐकले होते की एकवेळ हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर हॉस्पिटलमधे नाही गेले तरी चालेल, पण टडोपा आल्यावर बाथरूममधे जावेच लागते. पण तसा उल्लेख नाही.

या नवीन प्रथा कधीपासून सुरु झाल्या? त्या तंत्र व शास्त्र यांच्या कसोटीला उतरतात का? यामागे भाजप चा हात आहे का? की आय एस आय चा? याबद्दल काही खुलासा मिळाल्यास बरे.

एकंदरीत छान, छान, छान. आनंद झाला.
Happy
Light 1

Lol
मस्त वृत्तांत दोन्ही! Happy
पण प्रज्ञाचा (मला यंग म्हटल्यामुळे) मला जरा कांकणभर अधिकच आवडला. Proud

झक्की, तुमचं डोहाळवजेवण कसं झालं? Proud

सायो गं सायो, तूपण यंगच बरं! Proud

जाताना सायो आणि परतताना देसाई यांनी पिकअप/ ड्रॉप दिला म्हणून इतक्या सहजपणे गटगला उपस्थिती लावता आली. या दोघांचे आभार पुन्हा एकदा आभार. Happy

प्रज्ञा, तुमच्यात नक्की तरुणां/णींनाच यंग म्हणतात ना ? Proud

तिन्ही वृतांत छान झाले आहेत.

एक गटग आणि वृतांत मात्र तीन (असं कुणीतरी म्हणेल आता) Proud

Pages