..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी....९९.८२% गॉश्श....हे मार्क्स ??? टंकताना बोटाना थरथराट जाणवला.

कॉन्ग्रॅट्स ! मेरीट लिस्टची यादीतच असणार ते नाव....यादी प्रकाशित होवो वा ना होवो.

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं अभिनंदन!! Happy

(रच्याकने, इतके मार्क्स मिळाले असं ऐकण्यासाठी आमच्याही पालकांचे कान आसुसलेले असत कधीकाळी, आणि ते कधीच तृप्त झाले नाहीत Sad )

साधना,मामी,प्रतीक.. अभिनंदन..:)
सर्वाना धन्यवाद..:) आज बीपी नॉर्मल ला आले.. Happy

कोडे क्रमांक १०३

कॉलेजमधल्या मूलामुलींची वेगवेगळी सहल जाते. पण योगायोगाने ते एकाच ठिकाणी जमतात. पण त्यांना एकमेकांना भेटता येत नाही कारण प्रोफेसर साहेब आणि प्रोफेसरीण बाई, दोघेही कडक शिस्तीचे असतात. मूलामूलींना एकमेकांच्या घरात जायला अजिबात परवानगी नसते. पण शेवटी प्रोफेसर साहेबांचे मन पाघळते. कारण त्यांचेही कुणावर तरी मन जडलेले असते. तर ते एक युक्ती काढतात. आणि स्वतःदेखील या कटात सामील होतात. तर ते प्रोफेसर कुठले गाणे म्हणतील.

क्लू : आजवर दोन्ही भागात विचारलेल्या कोड्यांपेक्षा हे कोडे सर्वस्वी वेगळे असल्याने (केवळ एखादा अपघात ) मी याचे उत्तर देणार नाही.

कॅटॅगरी: कैच्या कै. काठिण्य पातळी: सोप्पं Happy

कोडं १०५.
तुमच्यापैकी काहींनी बॉन्डचा 'गोल्डफिंगर' पाहिला असेल. त्यातला त्या व्हिलनला म्हणजे गोल्डफिंगरला बायकोला लग्नाच्या वाढदिवशी पॅरिसला न्यायचं असतं. पण त्याची बायको लग्नाचा वाढदिवसच विसरते. झालं! गोल्डफिंगर महाशय रुसुन बसतात. मिसेस गोल्डफिंगर त्याची समजूत कशी काढतील?

वा वा राम, साधना, प्रतीक, मामी अभिनंदन कळवा.
मामी ९९.८२ % म्हणजे किती विषयांत १००/१०० मिळालेत? मार्क लिस्ट दाखवा कशी दिसते ती.

जिप्सी तू गणितात नापास झाला होतास का? मी १०२ क्रमांकाचं कोडं टाकलं होतं ना? परत तोच क्रमांक कसा दिलास?

हे परत
१०२ एक तरुणी प्रेमात पडते, पण तिचा प्रियकर इतका शब्दबंबाळ असतो की तिचं डोकंच फिरतं आणि ती पोलिस स्टेशनमध्ये जाऊन माझा खून झालाय अशी तक्रार नोंदवते.
प्रियकराने आधी काय म्हटले? प्रेयसीने पोलिस स्टेशनात काय गाणं म्हटलं?

आज बीपी नॉर्मल ला आले..
राम काहीही लिहीतोयस त्यात काहीच नॉर्मल नसत.
खि!!!!खि!!!! खि!!!!

कोडे क्रमांक १०३
तुम कितनी खुबसुरत हो

जंगल मे मंगल

जिप्सी तू गणितात नापास झाला होतास का? >>>>>>>>भरत, असं पब्लिक फोरमवर सांगु नै. Proud

गुगु, मलाही तोच चित्रपट आठवला. Happy

दिनेशदा, भरत, स्वप्ना क्लु प्लीज. Happy

गुगु ते उत्तर नाही.

माझ्या कोड्याचा क्लू : जिप्सी... हो हाच जिप्सी !!

आणि मी वर लिहिलेच आहे मी उत्तर देणार नाही.

धन्यवाद लोक्स....मीही सुटकेचा निश्वास सोडला...! च्यामारी ही भाचरे उद्या मोठी होऊन नावलौकिक मिळविते झाले तर ह्या मामाची आठवणदेखील काढणार नाहीत...पण असो, शेवटी लाडक्या बहिणीची पोरे आहेत.

चला...मीही कोड्यात उतरतो आता...तस्स सोप्पंच आहे इथल्या महारथीना...

कोक्र. १०६ ~~

मीनाचा प्रियकर एम.बी.बी.एस. शिकतोय...परगावी. त्याच्याकडून बर्‍याच दिवसानी आलेले प्रेमपत्र पाहून मिनीटलीची तब्येत एकदम खूश झाली आहे. पण ते पाहून तिच्या शेजारी असलेल्या राजा कदमाचा तोलच बिघडतो. तर त्याची ती परिस्थिती पाहून आनंदलेली मीना कुठले गाणे म्हणते....?

१०२ एक तरुणी प्रेमात पडते, पण तिचा प्रियकर इतका शब्दबंबाळ असतो की तिचं डोकंच फिरतं आणि ती पोलिस स्टेशनमध्ये जाऊन माझा खून झालाय अशी तक्रार नोंदवते.
प्रियकराने आधी काय म्हटले? प्रेयसीने पोलिस स्टेशनात काय गाणं म्हटलं?

उत्तर :तो : इतना प्यारा है ये प्यार प्यारा
हुआ है पहली बार होता है एक बार
फिर ना होगा ये दोबारा (आहे की नाही शब्दबंबाळ : समीर झिंदाबाद)
ती: हाय मेरा दिल चुराके ले गया
चुरानेवाला मेरा कातिल

(हे गाणं ऐकून माझं डोकं फिरलं दिल चोरलं म्हणून कातिल कसा काय?)

दिनेशदा, सही Happy

कोडं १०५.
तुमच्यापैकी काहींनी बॉन्डचा 'गोल्डफिंगर' पाहिला असेल. त्यातला त्या व्हिलनला म्हणजे गोल्डफिंगरला बायकोला लग्नाच्या वाढदिवशी पॅरिसला न्यायचं असतं. पण त्याची बायको लग्नाचा वाढदिवसच विसरते. झालं! गोल्डफिंगर महाशय रुसुन बसतात. मिसेस गोल्डफिंगर त्याची समजूत कशी काढतील?

उत्तरः ओ मेरे सोना रे सोना रे सोना

भरत, ते गाणं माझं सॉल्लिड आवडतं आहे. ऐश्वर्या आणि शाहरूख जुळी भावंडं दाखवले आहेत त्या पिक्चरात Proud

ह्या स्निग्धाला.....रामच्या त्या डिशमधील सर्व मिठाई...!!! खा हवी तेवढी....

कोक्र. १०६ ~~

मीनाचा प्रियकर एम.बी.बी.एस. शिकतोय...परगावी. त्याच्याकडून बर्‍याच दिवसानी आलेले प्रेमपत्र पाहून मिनीटलीची तब्येत एकदम खूश झाली आहे. पण ते पाहून तिच्या शेजारी असलेल्या राजा कदमाचा तोलच बिघडतो. तर त्याची ती परिस्थिती पाहून आनंदलेली मीना कुठले गाणे म्हणते....?

उत्तर :
तेरा खत ले के सनम पाँव कहीं रखते हैं हम,
कहीं पडते हैं कदम, कहीं पडते हैं कदम

चित्रपट : "अर्धांगिनी" ~ मीनाकुमारी

भरत / प्रतीक / स्वप्ना / जिप्स्या / गुणेश - हे ऐकले असेलच तरीपण सूचवून बघतो. रागा डॉट कॉम वर हिंदी गाण्यांत कंपायलेशन असा विभाग आहे. त्यात संगीतकारांनुसार कंपायलेशन केलेय. चित्रगुप्त, जयदेव, वसंत देसाई आदी थोर संगीतकारांची सुंदर गाणी एकत्र आहेत. श्रवणीय आहेत, हे काय वेगळे लिहायला हवे का ?

दिनेशदा, डाऊनलोड ऑप्शन आहे काय? ऑफिसमध्ये गाणी नाही ऐकता येणार आणि घरून मी शक्यतो नेट अ‍ॅक्सेस करत नाही. Sad मी पापुयार वरून इतकी जुनी गाणी डाऊनलोड केली की ४ जीबीचा सगळा सोनी वॉकमन भरून गेलाय. मी स्वतःलाच ८ जीबीचा न घेतल्याबद्दल फटके मारून घेतले. Sad पण पापुयारवर कटी पतंग सारखे अनेक पिक्चर्स नाहियेत Sad म्हणून दुसरी एखादी साईट शोधतेय.

कोडे क्रमांक १०३

कॉलेजमधल्या मूलामुलींची वेगवेगळी सहल जाते. पण योगायोगाने ते एकाच ठिकाणी जमतात. पण त्यांना एकमेकांना भेटता येत नाही कारण प्रोफेसर साहेब आणि प्रोफेसरीण बाई, दोघेही कडक शिस्तीचे असतात. मूलामूलींना एकमेकांच्या घरात जायला अजिबात परवानगी नसते. पण शेवटी प्रोफेसर साहेबांचे मन पाघळते. कारण त्यांचेही कुणावर तरी मन जडलेले असते. तर ते एक युक्ती काढतात. आणि स्वतःदेखील या कटात सामील होतात. तर ते प्रोफेसर कुठले गाणे म्हणतील.

क्लू : आजवर दोन्ही भागात विचारलेल्या कोड्यांपेक्षा हे कोडे सर्वस्वी वेगळे असल्याने (केवळ एखादा अपघात ) मी याचे उत्तर देणार नाही.

उत्तर :

खरे तर मी इथे चापलुसी केली होती. हे कोडे नसून थेट सिनेमातलाच प्रसंग होता. (असा अपघात जिप्स्याने केला होता. पण त्या वेळी तो बेरकी नव्हता.)
आणि गूणेश उत्तरापर्यंत पोहोचला होता. पण .. सिनेमा तो असला तरी गाणे ते नव्हते. जंगल मे मंगल हा थोडा कॉमेडी थोडा हॉरर प्रकारातला चित्रपट होता.
किरण कुमार, रिना रॉय, जयश्री टी वगैरे होते. प्रोफेसरांच्या भुमिकेत प्राण आणि सोनिया सहानी होते.
त्या दोघांची पण जोडी होती. किरण कुमार आणि प्राण चक्क स्त्री वेशात हे गाणे म्हणतात.

स्त्री रुपात अनेकांनी गाणी सादर केली. त्यात अगदी शम्मी कपूर, विश्वजीत, ऋषी कपूर, अमजद खान आणि बच्चन पण होते. पण विश्वजीत सोडल्यास ( !), बाकीच्यांचे सादरीकरण मला तरी हिडीस वाटले.
त्यांच्या तूलनेत थोडेसे अनोळखी असलेल्या या गाण्यातील प्राणची अदाकारी बघा. (आवाज आशाचा आहे ना ?)

मी वर लिहिले होते उत्तर देणार नाही, म्हणून ही लिंक देतोय.

http://www.youtube.com/watch?v=_H-uwzvnfkQ

प्रतीक तुम्ही १०६ साठी घेतलेलं गाणं रेअर साँग आहे. लताच्या रेअर जेम्स या ट्विन कॅसेट सेट मध्ये आहे.(दिनेशदांकडे आहे ना हा?) त्यातलंच मी
'तेरे तीर को हमने प्यार से दिल में रख लिया' विचारलं होतं.
यातले संगीतकार पण रेअर आहेत :
अभी तो मैं जवां हूं - हुस्नललाल भगतराम, सपना बन साजन आए - जमाल सेन,
कारी कारी अंधियारी रात में : पं गोविंदराम, साजन तुमसे प्यार करूं : बसंत प्रकाश,
जाओगे ठेस लगाके बहुत पछताओगे : अनिल विश्वास, टूटेगी ना प्यार की डोर : गुलाम मोहम्मद,
साजन से पहली बार हम कैसे बोले हाए हमें आपसे है प्यार : दत्ताराम, अब के बरस बडा जुल्म हुआ : नाशाद, बडी मुश्कील है अजब मेरा दिल है : मनोहर,
तबीय्त ठीक थी और दिल भी बेकरार न था - ये तबकी बात है जब हमें किसीसे प्यार ना था: शार्दुल क्वात्रा, दे दे मोरा कंगना- हंसराज बहल, नदिया के पानी - शैलेश, ऐ दिल जुबां न खोल - एन दत्ता, तेरे तीर को हमने प्यार से : दत्ताराम,
इतना ना सता के कोई जाने- इक्बाल कुरेशी.
ही गाणी शोधून नक्की ऐका सगळ्यांनी.

मी वर लिहिले होते उत्तर देणार नाही, म्हणून ही लिंक देतोय.>>>>>दिनेशदा :फिदी:.
घरी जावून बघावे लागेल, हापिसात अ‍ॅक्सेस नाही Happy

भरत, यातील एकही गाणी ऐकलेली नाही. Sad

स्वप्ना, फ्रीरेकॉर्डर ४ नावाचे एक चांगले सॉफ्टवेअर नेटवर आहे. फ्री आहे. (पण विंडोजचे ऑफिशियल व्हर्जन हवे. ) जे कॉम्प्यूटरच्या स्पीकर मधून ऐकले जाते, ते सगळे रेकॉर्ड करता येते. व्हीडीओ क्लीप्स पण रेकॉर्ड करता येतात. मी खास गाण्यांसाठी एक वेगळी हार्ड डिस्क घेतली आहे. मोबाईल मधली गाणी दर आठवड्याला बदलतो.

दिनेशदा...'राग.कॉम' बद्दल थॅन्क्स....ट्राय करतोय, पण हेमंतकुमार नावावर क्लिक केले तर सध्यातरी Service Unavailable असा सिग्नल आलाय....असो, तात्पुरती अडचण असेल, परत नंतर क्लिकतो.

भरत दोन गाणी राहिली की.
एक रंगरंगिला सावर मोहे ले गया जमना पार (बारुद) आणि मचलती आरजू खडी बाहे पसारे (उसने कहा था ) दोन्ही अप्रतिम.

दिनेशदा, धन्स! Audacity म्हणूनही असंच एक सॉफ्टवेअर आहे असं मला माझ्या मित्रमंडळींकडून कळलं. भरत, मी मोठ्या आशेने तुमची लिस्ट वाचली पण एकही गाणं कधी ऐकलेलं नाहिये. लानत है मुझपर Sad

दिनेशदांसारखंच मीही थेट चित्रपटातील एक प्रसंग सांगतो, तुम्ही गाणं ओळखा.

कोडं १०७
चित्रपटातील अविवाहित नायिका, नायक तिच्या घरी येण्याची वाट बघतेय. त्याच्या येण्याच्या जाणीवेने ती मनोमन खुष होते पण तो नक्की येणार का? असा विचारही ती गाण्यातुन करतेयं. गाणं संपल्यावर तो येतो आणि नायिकेच्या वडिलांच्या हातात बेड्या ठोकतो. Sad
ते गाणं ओळखा.

(रच्याकने, मामी अशा थीमवर (नंतर कधीतरी) एखादा नविन धागा उघडायचा का?. Happy

Pages