..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे राम, किती वाचायचे राहिले Sad Sad

रामभौ, रिझल्ट १७ ला आहे. तोवर इथे येऊन टेंशन कमी करा की... आणि आता टेंशन घेऊन काय उप्योग?? Proud

आम्च्या घरी सकाळपासुन प्रार्थना चाललीय सगळ्या मुली सुटू दे म्हणुन.. Happy

सुप्रभात लोक्स Happy
हाले दिल हमारा>>>>> __/\__ मामी, Biggrin

माधवचं उत्तर बरोबर वाटतंय Happy

कोडं ८८:
तिचा नवरा नोकरी निमित्त शहरात आणि ती गावाकडे. त्याचे घर खुपच लहान आणि पगारही फार कमी असतो म्हणुन तो बायकोला शहरात आणत नसतो. शेवटी एकदाची त्याला चांगल्या पगाराची नोकरी लागते आणि तो एक छानसं घरही घेतो. त्याचे गाव अगदी मागासलेलं. गावात टेलिफोन्/मोबाईल काही नाही. संपर्काचे साधन म्हणजे पत्रव्यवहारच. त्याचा एक मित्र गावी जायला निघतो तेंव्हा त्याच्याजवळ तो निरोप पाठवतो. रात्रीच्या गाडीत बसलेला मित्र सकाळी ४:३० वाजता गावात उतरतो आणि त्याच्या बायकोला त्याचा निरोप कळवतो. अत्यानंदाने ती कोणतं गाणं म्हणेल.

थ्री चिअर्स फॉर जिप्सी Happy

कोडं ८७:
"अजून किती चालायचं आहे? माझे पाय जाम दुखताहेत. मी बसतो थोडा वेळ" अमोल जाहिर करतो. त्याच्याबरोबरचे सगळे मित्र-मैत्रिणी थांबतात.
"अरे असं काय करतोस? आता तर फक्त अर्धा तास झालाय चढायला सुरुवात करून" शशी म्हणतो.
"तर काय? दिवस मावळेपर्यंत पोचायचं आहे आपल्याला मुक्कामी" तारा म्हणते.
"ह्या अमोलचं वजन ना ते सगळं जंक फूड खाऊन खाऊन वाढलंय. अस्साच चालवूया त्याला दर विकेन्डला म्हणजे चांगला बारीक होईल" तिची जुळी बहिण धारा अमोलला चिडवत म्हणते.
"तुम्ही काहीही म्हणा. मी ढिम्म हलणार नाहिये इथून पुढची १५ मिनिटं तरी" अमोल आरामात झाडाला टेकत म्हणतो.
"मग आम्ही काय करायचं?" त्याची बहिण सरिता विचारते.
"तुम्ही जा की पुढे. मी येतो मागून." अमोल म्हणतो.
"हॅ, म्हणे येतो मागून. आम्ही गेलो की तू झोपशील इथे कुंभकर्णासारखा. ते काही नाही. मी थांबतो रे ह्याच्याबरोबर, आणि ह्याला हाकत घेऊन येतो १० मिनिटांत. तुम्ही चौघे निघा पुढे." नील म्हणतो.
पण चांगला अर्धा तास झाला तरी अमोल उठायचं चिन्ह दिसत नाही. शेवटी वैतागून नील एक हिंदी गाणं म्हणतो....ओळखा.

उत्तरः नदिया चले, चले रे धारा, चन्दा चले, चले रे तारा तुझको चलना होगा

मामीला १० पैकी १० उकडीचे मोदक Happy

कोडं ८८:
तिचा नवरा नोकरी निमित्त शहरात आणि ती गावाकडे. त्याचे घर खुपच लहान आणि पगारही फार कमी असतो म्हणुन तो बायकोला शहरात आणत नसतो. शेवटी एकदाची त्याला चांगल्या पगाराची नोकरी लागते आणि तो एक छानसं घरही घेतो. त्याचे गाव अगदी मागासलेलं. गावात टेलिफोन्/मोबाईल काही नाही. संपर्काचे साधन म्हणजे पत्रव्यवहारच. त्याचा एक मित्र गावी जायला निघतो तेंव्हा त्याच्याजवळ तो निरोप पाठवतो. रात्रीच्या गाडीत बसलेला मित्र सकाळी ४:३० वाजता गावात उतरतो आणि त्याच्या बायकोला त्याचा निरोप कळवतो. अत्यानंदाने ती कोणतं गाणं म्हणेल.

उत्तर:
दिन प्यार के आयेंगे सजनिया
तेरी बहार लायेंगे सजनिया
आया है संदेसा ये सवेरेवाली गाडी से
मेरे दिलदार का

८९.
पाकिस्तानातली एक स्री तिथल्याच एका मुस्लीम माणसाशी कोर्ट मॅरेज करणार असते. तिच्या बाजूनी विटनेस म्हणून ती शेजारी राहणार्‍या भगवान नावाच्या माणसाला घेऊन जाते. तिचा भावी नवरा हा कोण म्हणून विचारतो तर ती त्याला काय उत्तर देईल?

<<<<
तू मुझे कबूल, मै तुझे कबूल
इस बात का, गवाह खुदा... खुदा गवाह..

मामी बरोबर

८६ सुनीता विल्यम्सने अंतराळातून आपल्या नवर्‍याशी व्हिडिओ चॅट करताना कोणतं गाणं म्हटलं असेल?
आजकल पांव जमींपर नहीं पडते मेरे
बोलो देखा है तुमने मुझे उडते हुए

बरूबरे श्रध्दा.
८९.
पाकिस्तानातली एक स्री तिथल्याच एका मुस्लीम माणसाशी कोर्ट मॅरेज करणार असते. तिच्या बाजूनी विटनेस म्हणून ती शेजारी राहणार्‍या भगवान नावाच्या माणसाला घेऊन जाते. तिचा भावी नवरा हा कोण म्हणून विचारतो तर ती त्याला काय उत्तर देईल?
<<<<
उत्तर :
तू मुझे कबूल, मै तुझे कबूल
इस बात का, गवाह खुदा... खुदा गवाह..

अरे वा, भरत, माझं उत्तर बरुबर आलं. Happy

मामी, आज शंखपुष्पी सिरप घेऊन आलेल्या दिसताहेत सकाळी. एक्दम सगळ्या कोड्यांची धडाधड उत्तरं देताहेत Happy

हो मामी , तुम्हाला पाच अळुवड्या.

हे आणखी एक सोप्प.
९० कॉल सेंटरमधले नाइट शिफ्ट वाले घरी जाताना कोणतं गाणं म्हणतील?

आज
एम्टीएनेलच्या ब्रॉडब्रँडला ग्रहण लागलं होतं Sad

आता एक कैच्या कै कोडं हं....हेही सोप्पं आहे. Happy

कोडं ९१:
मगनलाल चाळ एकदम मोडकळीला आलेली असते. खरं तर दोनच मजले असतात पण कधीही ढासळतील असली गत. पहिल्या मजल्यावरचे रहिवासी अगदी जीव मुठीत धरून राहत असतात. त्यात एके दिवशी मुसळधार पावसाचं निमित्त होऊन पहिल्या मजल्याचा जिन्याचा कठडा कोसळतो. मालज डागडुजी करायला नकार देतो. रहिवाश्यांकडे एक्दम पैसे नसतात. शेवटी तळमजल्यावरचा बिकमचंद बनवारीलाल त्यांच्या मदतीला येतो. तो म्हणतो की मी कठडा बांधून देईन पण त्या कठड्यावर माझ्या किराणा मालाच्या दुकानाची जाहिरात असली पाहिजे. रहिवाशी बिचारे काय करतात? ते तयार असल्याचं त्याला कोणत्या गाण्यातून सांगतील?

स्वप्ना जिन्याचा की व्हरांड्याचा कठडा? जिन्याच्या कठड्यावरची जाहिरात बाहेरून दिसणार नाही ना? माझा अगदी टेक्निकल पॉईंट आहे.

घ्या स्वप्ना,श्रद्धा आणि जिप्सी तुमच्यासाठी ताटभर कोथिंबीरवड्या. भांडू नका बरं.
९०. कॉल सेंटरमधले नाइट शिफ्ट वाले घरी जाताना कोणतं गाणं म्हणतील?

उत्तर : रात के हमसफर थक के घर को चले...

जिन्याचा हो.....आमच्या चाळीचा जिना आणि पर्यायाने कठडा बाहेरून दिसतो Happy जिप्सी इज राईट वन्स अगेन!

कोडं ९१:
मगनलाल चाळ एकदम मोडकळीला आलेली असते. खरं तर दोनच मजले असतात पण कधीही ढासळतील असली गत. पहिल्या मजल्यावरचे रहिवासी अगदी जीव मुठीत धरून राहत असतात. त्यात एके दिवशी मुसळधार पावसाचं निमित्त होऊन पहिल्या मजल्याचा जिन्याचा कठडा कोसळतो. मालज डागडुजी करायला नकार देतो. रहिवाश्यांकडे एक्दम पैसे नसतात. शेवटी तळमजल्यावरचा बिकमचंद बनवारीलाल त्यांच्या मदतीला येतो. तो म्हणतो की मी कठडा बांधून देईन पण त्या कठड्यावर माझ्या किराणा मालाच्या दुकानाची जाहिरात असली पाहिजे. रहिवाशी बिचारे काय करतात? ते तयार असल्याचं त्याला कोणत्या गाण्यातून सांगतील?

उत्तरः बनवारी रे जीने का सहारा तेरा नाम रे

घ्या स्वप्ना,श्रद्धा आणि जिप्सी तुमच्यासाठी ताटभर कोथिंबीरवड्या. भांडू नका बरं.>>>>धन्स भरत. स्वप्ना, श्रद्धा आपण मांडवली करूया. Happy तुमच्यासाठी मी दुसरं काहीतरी आणतो. या ताटभर कोथिंबीरवड्या मलाच राहु द्या. Happy

:कोथिंबीरवडीप्रेमी बाहुला:

>>तुमच्यासाठी मी दुसरं काहीतरी आणतो
तुझ्यावर विश्वास नाही माझा. माझे सातारी कंदी पेढे अजून दिले नाहियेस. श्रद्धा, एकही वडी देऊ नकोस ह्या जिप्स्याला. आधी दुसरं काय देणार आहेस ते सांग तरच आम्ही विचार करू. होय की नाही श्रद्धा? Happy

९२ तुम्हाला माहितीय का? किशोरकुमारने स्वतःच्या पत्नीला उद्देशूनच हे गाणं म्हटलं.
कोणतं?

Pages