Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुप्रभात लोक्स झिम्माड
सुप्रभात लोक्स

झिम्माड पावसात धम्माल विकएण्ड साजरा केल्यावर आज नव्या जोमाने कोडी सोडवण्यासाठी/घालण्यासाठी मी तय्यार.
कोडं ५८:
रीमा अनिल जाधव या मराठी मुलीचे, रमेश सिताराम यादव या परजातीच्या मुलावर प्रेम जडते. अर्थात तिच्या घरात लग्नाला परवानगी नसते. दोघांचे एकमेकांवर खुप प्रेम असते. रीमा त्याच्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असते. तिच्या घरचे तिला खोलीत डांबुन तिचा छळ करतात. या सगळ्यांना कंटाळुन शेवटी ती आत्महत्या करते. मरता मरता ती तिच्या प्रियकरासाठी कुठले गाणे म्हणेल?
५५ गेल्या एशियाडची गोष्ट.
५५ गेल्या एशियाडची गोष्ट. भारतीय महिला तीरंदाजी संघाचा उपांत्य फेरीचा सामना होता. सामन्यापूर्वी भारतीय संघातल्या एका खेळाडूला काही तांत्रिक अडचण येत होती. तर चक्क प्रतिस्पर्धी संघाच्या मार्गदर्शकाने तिला मदत केली. मग काय तिचा खेळ चांगला झालाच, पण ते त्या कोचच्या प्रेमातही पडली आणि गाणं गाऊ लागली. कोणतं?
कोड्यातला एक महत्त्वाचा शब्द राहून गेला होता. तो आता दिलाय. त्यामुळे हे कोडं खूपच सोप्प झालंय.
भरत, ५५ >>>>>तेरा तीर ओ बेपीर
भरत,
५५ >>>>>तेरा तीर ओ बेपीर दिल के आरपार है जाने किसकी जीत है ये जाने किसकी हार है??
जिप्सी, तुमच्या गाण्यात रसिया
जिप्सी, तुमच्या गाण्यात रसिया हा शब्द आहे काय?
५५ : जिप्सी हे मला नंतर आठवलं
५५ : जिप्सी हे मला नंतर आठवलं होतं. पण कोडं रचताना मनात दुसरं गाणं होतं.
शेवटचा क्लु : त्या दोघांची अजून दुसरी भेट झालेली नाही.
ओक्के भरत स्वप्ना
ओक्के भरत

स्वप्ना
कभी आर कभी पार लागा तिर ए नजर
कभी आर कभी पार
लागा तिर ए नजर
५८: तुम संग प्रीत लगायी
५८: तुम संग प्रीत लगायी रसिया, मैने जानके जान गवायी. रसिया - रमेश सिताराम यादव. बरोबर आहे का?
भरत....'तीर' वरून एक गाणे आहे
भरत....'तीर' वरून एक गाणे आहे :
"चलेंगे तीर जब दिलपर तो अरमानो का क्या होगा ?
लुटेगा घर तो उस घरके मेहमानो का क्या होगा ?"
(हे नसणारच....कारण द्वंद्वगीत आहे....आणि तुमची तिरंदाज राणी तर एकट्याने गाणे म्हणत आहे ना !)
स्वप्नाआआआआआअ ~~ "रसिया"
स्वप्नाआआआआआअ ~~ "रसिया" फोडीबद्दल साष्टांग नमस्कार्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र !!!!!
स्वप्ना, तुला एक प्लेट मस्त
स्वप्ना, तुला एक प्लेट मस्त कुरकुरीत कांदाभजी आणि सोबत गवती चहाची पाती घातलेला वाफाळता चहा
कोडं ५८:
रीमा अनिल जाधव या मराठी मुलीचे, रमेश सिताराम यादव या परजातीच्या मुलावर प्रेम जडते. अर्थात तिच्या घरात लग्नाला परवानगी नसते. दोघांचे एकमेकांवर खुप प्रेम असते. रीमा त्याच्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असते. तिच्या घरचे तिला खोलीत डांबुन तिचा छळ करतात. या सगळ्यांना कंटाळुन शेवटी ती आत्महत्या करते. मरता मरता ती तिच्या प्रियकरासाठी कुठले गाणे म्हणेल?
उत्तर:
तुम संग प्रीत लगायी रसिया (रमेश सिताराम यादव :फिदी:) मैने जान के जान गवायी रसिया
हाय मै मर गयी बेदर्दी तेरे प्यारमें
सुप्रभात लोक्स.. जिप्सी
सुप्रभात लोक्स.. जिप्सी स्वप्ना... रसिया... मस्तच..
५५ गेल्या एशियाडची गोष्ट.
५५ गेल्या एशियाडची गोष्ट. भारतीय महिला तीरंदाजी संघाचा उपांत्य फेरीचा सामना होता. सामन्यापूर्वी भारतीय संघातल्या एका खेळाडूला काही तांत्रिक अडचण येत होती. तर चक्क प्रतिस्पर्धी संघाच्या मार्गदर्शकाने तिला मदत केली. मग काय तिचा खेळ चांगला झालाच, पण ते त्या कोचच्या प्रेमातही पडली आणि गाणं गाऊ लागली. कोणतं?
उत्तर : तेरे तीर को हमने प्यार से दिल में रखलिया वय वय वय वय
हम तो खो गए तेरे हो गए एकबार मिलके
हे गाणं तसं रेअर आहे, त्यामुळे कदाचित तुम्ही ऐकलेलं नसेल.
स्वप्ना, ___/\___ ग्रेट!!
स्वप्ना, ___/\___ ग्रेट!!
अचुक शब्द उचललास! पुर्ण नाव देण्यात तिथेच गोम आहे हे लक्षात येत होतं पण तरीसुद्धा आमचा गोंधळ झालाच!
>>"रसिया" फोडीबद्दल साष्टांग
>>"रसिया" फोडीबद्दल साष्टांग नमस्कार्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र
आयुष्यमान भव वत्स!
>>स्वप्ना, तुला एक प्लेट मस्त कुरकुरीत कांदाभजी आणि सोबत गवती चहाची पाती घातलेला वाफाळता चहा
अरे व्वा! कोणालाही एकही भजं मिळणार नाही. तेव्हा मागू नये.
कोडं ५९:
नील आर्मस्ट्राँग आणि एडविन ऑल्ड्रीनबरोबर चंन्द्रावरच्या अपोलो ११ मोहिमेत मायकल कॉलिन्सही होता. आर्मस्ट्राँग आणि ऑल्ड्रीन चंन्द्रावर उतरले पण कॉलिन्स प्रदक्षिणा घालत राहिला. का ह्याचा कधी विचार केलाय्?अहो, कॉलिन्स एकटा नव्हता, त्याच्याबरोबर त्याची प्रेयसीही होती त्या यानात. तिनेच हट्ट धरला होता यायचा आणि नासाने नाईलाजाने परवानगीही दिली होती. आर्मस्ट्राँग आणि ऑल्ड्रीन उतरून गेल्यावर कॉलिन्सची प्रेयसी काय म्हणाली असेल त्याला?
कोडं ५९: नील आर्मस्ट्राँग आणि

<<<<<
ये वादा करो चांद के सामने, भुला तो न दोगे मेरे प्यार को..
येस्स श्रध्दा! कोडं ५९: नील
येस्स श्रध्दा!
कोडं ५९:
नील आर्मस्ट्राँग आणि एडविन ऑल्ड्रीनबरोबर चंन्द्रावरच्या अपोलो ११ मोहिमेत मायकल कॉलिन्सही होता. आर्मस्ट्राँग आणि ऑल्ड्रीन चंन्द्रावर उतरले पण कॉलिन्स प्रदक्षिणा घालत राहिला. का ह्याचा कधी विचार केलाय्?अहो, कॉलिन्स एकटा नव्हता, त्याच्याबरोबर त्याची प्रेयसीही होती त्या यानात. तिनेच हट्ट धरला होता यायचा आणि नासाने नाईलाजाने परवानगीही दिली होती. आर्मस्ट्राँग आणि ऑल्ड्रीन उतरून गेल्यावर कॉलिन्सची प्रेयसी काय म्हणाली असेल त्याला?
उत्तरःये वादा करो चांद के सामने, भुला तो न दोगे मेरे प्यार को..
जिप्सी, स्वप्ना 'रसिया'
जिप्सी, स्वप्ना 'रसिया' ग्रेटच!
४८: भारतीय अंतराळविरांना मंगळावर सजीव सापडतो. अगदी मानवासारखाच दिसतो तो फक्त अंगात रक्तवाहिन्या नसतात. ते त्याला पृथ्वीवर घेउन येतात. तो प्रचंड बुध्दीमान असतो काही मिनिटातच सगळे आत्मसात करत असतो. लोक त्याला भारत वि लंकेच्या सामन्याला घेउन जातात. नेमका तेंव्हाच सचीन दुखापतीमुळे खेळू शकत नाही म्हणून धोनी मंगळ्याला संघात घेतो. पण त्याला काही खेळता येत नाही आणि भारत सामना हरतो. सगळे प्रेक्षक काय गाणे म्हणतील?
क्लू अधोरेखीत केला आहे
वा स्वप्ना, मस्त लॉजिक !
वा स्वप्ना, मस्त लॉजिक !
माधव, अजुन काही क्लु
माधव, अजुन काही क्लु
धन्स मी_आर्या, माधव,
धन्स मी_आर्या, माधव, दिनेशदा!
माधव इन्सान वरून गाणी आहेत पण त्यात खून वगैरे येत नाहिये कुठेच. 'प्यासी डायन', 'खूनी मुर्दा' सारखा काही पिक्चर आहे का?
स्वप्ना, असे काहीच नाहिये
स्वप्ना, असे काहीच नाहिये त्या गाण्यात. आशाचे साधेसुधे गाणे आहे.
आणखी एक क्लू (जवळपास उत्तरच
) : वैद्य
"...तेरे तीर को हमने प्यार से
"...तेरे तीर को हमने प्यार से दिल में रखलिया वय वय वय वय...."
~ आयुष्यात एकदाही न ऐकलेल्या गाण्यावर कोडे बेतल्याबद्दल भरत मयेकर यांचा सौम्य, मध्यम आणि तीव्र तालातील एकत्रित निषेध !!!!!
"रसिया" बद्दल एकटीने भजी खाल्याबद्दल आणि वरतून गवती चहाही पिणार्या स्वप्नाचे मनःपूर्वक अभिनंदन (लडकी दिमागवाली है !!!)
प्रतीक माझ्याकडच्या कलेक्शन
प्रतीक माझ्याकडच्या कलेक्शन मधली ही काही काही गाणी मी इतके वेळा ऐकलीत की ती रेअर आहेत, हेच लक्षात राहात नाही.
नक्की ऐका
http://music.raag.fm/watchvideo-390265-Tere_Teer_Ko_Humne_Pyar_Se-Lata_M...
पहिली ओळ रिपीट करताना लता आधी 'आह' करते. तो एक 'आह' आणि 'आह' छोड दो आंचल जमाना क्या कहेगा मधला आह.
४८: भारतीय अंतराळविरांना
४८: भारतीय अंतराळविरांना मंगळावर सजीव सापडतो. अगदी मानवासारखाच दिसतो तो फक्त अंगात रक्तवाहिन्या नसतात. ते त्याला पृथ्वीवर घेउन येतात. तो प्रचंड बुध्दीमान असतो काही मिनिटातच सगळे आत्मसात करत असतो. लोक त्याला भारत वि लंकेच्या सामन्याला घेउन जातात. नेमका तेंव्हाच सचीन दुखापतीमुळे खेळू शकत नाही म्हणून धोनी मंगळ्याला संघात घेतो. पण त्याला काही खेळता येत नाही आणि भारत सामना हरतो. सगळे प्रेक्षक काय गाणे म्हणतील?
उत्तरः अनाडी (शरीरात नाड्या नसलेला) का खेलना खेल का सतीयानास
अनाडी (शरीरात नाड्या नसलेला)
अनाडी (शरीरात नाड्या नसलेला) का खेलना खेल का सतीयानास>>>>>>:हहगलो:
माय गॉड! हे अनाडी.., पद्मिनी
माय गॉड! हे अनाडी.., पद्मिनी कोल्हापुरेचं गाणं ना? ... काय काय लॉजीक लढवतील!!
माधव. __/\__
अनाडी.. लय भारी.. भरत,
अनाडी.. लय भारी..
भरत, लताच्या रेअर जेम्स अल्बममधे मधे ते गाणे होते !
कोडं ६०: बंटी एक ब्रह्मचारी
कोडं ६०:
बंटी एक ब्रह्मचारी तरूण. जन्मापासुन त्याला स्त्रीजातीचा तिटकारा. एखाद्या स्त्रीशी बोलणं तर दूर पण हा गडी तिच्याकडे बघायचा देखील नाही. एकदा बाईकवरून जात असताना त्याचा मोठा अपघात होतो. आजुबाजुची लोकं त्याला नजिकच्या हॉस्पिटलात घेऊन जातात. नेमकं तिथ उपचार करणारी निष्णात डॉक्टवर लेडिजच असते. डॉक्टरला समजते कि हा ब्रह्मचारी आहे आणि एखाद्या स्त्रीकडुन उपचार करून घेणार नाही. म्हणुन ती वॉर्डबॉयच्या मदतीने त्याला जबरदस्ती इंजेक्शन देते. स्त्री डॉक्टरचा स्पर्श होताच तो जोरात आरडाओरडा करून हॉस्पिटल डोक्यावर घेतो. इतर पेशंट काय झाले म्हणुन डॉक्टरला विचारतात, तेंव्हा ती स्त्री डॉक्टर कोणंत गाणं म्हणेल?
"अ....नाडी" ????? इथं आमची
"अ....नाडी" ?????
इथं आमची नाडी बंद पडायची वेळ आली होती....च्यामारी, ह्या मंगळ्याच्या !!!!!
Pages